Nashik Padvidhar Election : राजकारणात सहन करण हे, ते सगळं चालत असत, शेवटी राजकारणात काय वेळ येईल हे सांगता येत नाही. काहीतरी असल्याशिवाय कुणी नॉट रीचेबल होणार नाही, नॉट रीचेबल का झाले हे वेळवेर सांगेल, असे सूचक विधान नाशिक पदवीधरच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी व्यक्त केले. 


नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत आज माघारीच्या दिवशी मोठी घडामोड घडली. अवघा एक तास शिल्लक असताना अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील अचानक नॉट रिचेबल झाल्या. मात्र माघारीची मुदत संपताच त्या विभागीय कार्यालयातून बाहेर पडल्या. यावेळी त्यांनी नॉट रिचेबल होण्याचे कारण हे वेळेवर सांगेल, असे सांगून सर्वानाच बुचकळ्यात पाडले. नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) पहिल्या दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत असून दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार तसेच धुळे येथील भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत समीकरण बदलले. मात्र आज माघारीच्या दिवशी शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याने गोंधळ उडाला. दरम्यान कुणीही मुद्दामून नॉट रीचेबल होत नाही, ते वेळेवर सांगेल, असे स्पष्टीकरण शुभांगी पाटील यांनी दिले आहे. 


यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या कि, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित दादा, जयंत पाटील या सगळ्याशी संवाद साधला असून या पक्ष श्रेष्ठींना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते महाराष्ट्रातल्या एकमेव महिला उमेदवारांवर, एकमेव काम करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास टाकलेला आहे. या सर्वांशी संपर्क झाला असून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल, यात शंका नाही. भाजपाला काम करणारे व्यक्तीला थोडासा वेगळा विचार केला असेल, म्हणून त्यांनी ती संधी दिली नाही. भाजपमध्ये अवघ्या तीन महिन्यापूर्वी गेली होती. तीन महिन्यासाठी कोणी गेले असत का? भाजपने शब्द दिला म्हणूनच, भाजपात प्रवेश केला होता. तुम्ही पक्षात या आम्ही विचार करू असं सांगितलेले होते. मात्र ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. पण महाविकास आघाडी संधी देईल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. 


निवडणूक जिंकणारच.... 


नाशिक पदवीधर मतदारसंघातील अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केलेली असून पाठींबा मागितलेला आहे. सगळ्या शिक्षक संघटना पाठिंबा देतील, कारण की मी एक महिला शिक्षक उमेदवार असून गेल्या दहा वर्षापासून शिक्षकांचे अनेक प्रश्न, विनावेतन, पेन्शन, पदभरती असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अनेक हजारो प्रश्न सोडून सोडवले आहेत. याच लोकांच्या माध्यमातून पुढे आलेले आहे. त्यामुळे या सगळ्याच्या बळावर माझा उमेदवारी अर्ज कायम असून ही निवडणूक जिंकणारच असा आशावादही यावेळी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला.