Nashik News : मुंबईमध्ये (Mumbai) सुरू असलेली गोवरची (Govar) साथ मालेगाव शहरामध्ये (Malegaon) पोहाेचली आहे. मालेगाव शहरातील ४४ लहान मुलांना गोवर साथीच्या आजाराने ग्रासले असून ते महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ज्या बालकांना गोवर प्रतिबंधक लसीकरण झालेले नसेल त्यांना संबंधित पालकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नाशिक (Nashik) आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवरचे रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून मालेगाव शहरात गोवरचे रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर गोवरचे निदान झालेल्या बालकांवर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने पावले उचलली आहेत. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विशेष करून पूर्व भागात असलेल्या अनास्थेमुळे विविध साथरोग सातत्याने उद्भवत आहेत व बहुसंख्य रुग्णांनी गोवरची लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. मालेगाव शहरात गोवरचे रुग्ण आढळून आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


मालेगाव शहरात गोवर या संसर्गजन्य आजाराने बालकांना वेढा घातल्यामुळे आता नजीकच्या भागात  प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपायोजना म्हणून लगेचच्या गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. गोवरचा रुग्ण आढळतात त्याच्यावर चाचणी उपचार करण्याची व्यवस्था ठेवली असल्याचे माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहर्ते यांनी दिली. शिवाय मालेगाव शहराचा लगतच्या ग्रामीण भागाची संपर्क येतो. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी बालकांची तपासणी करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्ह्याच्या अन्य भागांतही गोवरचे रुग्ण आहेत का? यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याचे डॉक्टर नेते यांनी सांगितले. 


दरवर्षी साधरणतः जानेवारी ते मार्च दरम्यान गोवरची साथ येते. मात्र यंदा हवामानातील बदलामुळे लवकर साथ आली असून त्यापासून बालकांचा बचाव करण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मालेगाव शहराच्या बालकांना गोवरने ग्रासले आहे.  यातील अनेक बालकांना गोवर प्रतिबंधक रूबेला लसीकरण करून घेतले नसल्याचे चौकशी अंतिम आढळून आले आहे. एका विशिष्ट भागातील बालकांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे आता अशा बालकांवर तातडीने लसीकरण हाती घेण्यात आले आहे. रुग्णांमध्ये तीव्र ताप शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षण दिसतात. यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन नाशिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


लहान मुलांची काळजी घ्या?
मुंबई आणि इतर शहरात गोवरची लागण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. हा आजार मुख्य लहान मुलांमध्ये पाहायला मिळत असून महापालिका आरोग्य विभाग अलर्ट झाला असून मुलांमध्ये काही लक्षण आढळल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये, या आजाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्यावी. तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन उपचार करून घ्यावीत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी आणि चार ते सहा दिवसानंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो गोवर झालेल्या रुग्णांमध्ये अ जीवनसत्वे प्रमाण कमी होते. गोवर सोबत होणारा निमोनिया हा बराच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो.