Nashik NIMA : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफ्रॅक्चर असोसिएशनचे (NIMA) अध्यक्ष धनंजय बेळे (Dhananjay Bele) यांच्या एसएस कंपनीवर गेल्या आठवड्यात अज्ञात टोळक्याकडून हल्ला होऊन सामानाची नासधूस करण्यात आली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (ambad Police) गुन्हाही दाखल करण्यात आला होता. संशयितांना तात्काळ अटक न झाल्यास या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत मंगळवारी उद्योजकांची बैठकही पार पडली होती. 


नाशिक (Nashik) स्थित निमा संघटनेच्या वतीने उद्योग प्रदर्शनाच्या उद्घाटनच्या दुसऱ्या दिवशी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालय हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी वेळे यांनी अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र यातील आरोपी अद्याप फरार असून पोलिसांच्या भूमिकेवर उद्योजकांकडून संशय व्यक्त केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील उद्योजक (Nashik Industrial) एकवटले असून निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योग जगतावरील हल्ला असून त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी एकमताने घेतला आहे.


दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिकमधील उद्योजकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये पोलिसांनी तत्परता दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले, मात्र चार दिवस उलटूनही पोलीस यंत्रणेकडून संशयितांना अटक केले नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. उद्योजकांच्या या निर्णयास पिंपरी चिंचवडसह धुळे, नंदुरबार, ठाण्यातील उद्योगांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिला आहे. धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी व हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय? 


काही दिवसांपूर्वी निमाच्या माध्यमातून उद्योग प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंत्री व सामान त्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. उद्घाटनाच्या वेळी आमदार सीमा हिरे, मंत्री दादा भुसे, त्याचबरोबर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे हे देखील उपस्थित होते. याचवेळी आमदार सीमा हिरे यांना धक्का लागून त्याखाली कोसळल्या होत्या. त्यावरून आयोजक असलेल्या धनंजय बेळे यांच्यावर अनेक टीका झाली होती. याच भावनेतून बेळे यांच्या कार्यालय हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच ही घटना ताजी असतानाच बेळे यांच्या कंपनीवर हल्ला झाल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरतो आहे.