राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..


300 रुपयांचा गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी द्या, मार्गदर्शक सूचना जारी; मात्र गणवेशाच्या रंगासंदर्भात संभ्रम कायम 


 राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश (Uniform) देण्याबाबत नुकताच आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला 300 रुपये किमतीचा एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळेच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.  वाचा सविस्तर


चिमुरड्यांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वेतून तस्करी


बिहारमधून (Bihar) महाराष्ट्रात (Maharashtra) लहान मुलांच्या संशयीत (Child Trafficking) तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या 30 अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर 29 लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आलं. त्यांच्यासोबत असलेल्या एकूण पाच जणांवर कलम 470 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)


काळजाचा तुकडा संकटात! नाशिकच्या हिरकणीचं धाडस पाहून अंगावर काटा उभा राहिल... असं काय घडलं?


आपल्या तान्हुल्याला कवेत घेणेसाठी अवघड असा कडा उतरुन हिरकणी घरी पोहचते. हीच हिरकणी पुन्हा एकदा आपल्या बाळासाठी कडा नाही पण उत्तुंग अशा इमारतीवरून जीव धोक्यात घालून उतरल्याचे गोष्ट नाशिक (Nashik) शहरात घडली आहे.   वाचा सविस्तर


Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांना पोलिसांचा मोठा दिलासा, सुषमा अंधारेंच्या तक्रारप्रकरणी मिळाली 'क्लीन चीट' 


शिवसेनेचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विरुद्ध विनयभंग करणारे वक्तव्य केल्या प्रकरणाच्या आरोपाबाबत शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आला आहे. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर शिरसाट यांना हा क्लीन चीट मिळाला आहे.  (वाचा सविस्तर)


'...तू होती का माझी परी'; गौतमीला बीडच्या पाटलाने घातली लग्नाची मागणी; पत्र व्हायरल


गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असताना, बीडच्या एका तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली आहे. "गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी, पण तु होती का माझी परी" असे म्हणत या तरुणाने तिला थेट पत्र लिहले आहे.  वाचा सविस्तर