Nashik Crime : पुण्यापाठोपाठ (Pune) आता नाशिक (Nashik) शहरातही वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरातल्या हेडगेवार गल्लीत समाजकंटकांकडून 16 वाहनांची कोयता आणि लोखंडी रॉडनं तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दशहत पसरली आहे. 


महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वाधिक गुन्हेगारीच्या जिल्ह्यात नाशिकचा (Nashik Crime) नंबर कदाचित पहिला लागत असेल. रोजच घडणाऱ्या घटनांनी नागरिकांसह पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच नाशिकच्या सिडकोत (Cidco) मध्यरात्री मद्यपी टवाळखोरांनी धुडगूस घालत कोयत्याने 16 वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मद्यधुंद अवस्थेत टवाळखोरांमध्ये आपसात काही वाद झाले. त्यातून काहींनी वाहनांची तोडफोड केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.


दरम्यान ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास घडली. या घटनेत समाजकंटकांनी कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर करून हेडगेवारी गल्लीतल्या 16 वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळं स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान यावेळी एका नागरिकाने संशयितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यास कोयत्याचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात नाशिकच्या अंबड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी दारुच्या नशेत दहशत माजवण्यासाठी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. पण एरवीही नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा वचक राहिलाय का, याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.


पावसाळी अधिवेशनात मांडणार 


दरम्यान टवाळखोरांनी नागरिकांच्या घरासमोर व मोकळ्या जागेत उभी केलेली चारचाकी वाहने, रिक्षाच्याही काचा फोडल्या. हा प्रकार काही स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घराबाहेर धाव घेत आरडाओरड केली. तेव्हा संशयित परिसरातून पसार झाल्याचे सांगितले जाते. सकाळी अनेक वाहनांची तोडफोड झाल्याचे स्पष्ट झाले. यात 14 चारचाकी वाहने, एक रिक्षा, एक दुचाकी अशा एकूण 16 वाहनांचा समावेश आहे. संशयितांनी कोयता व दगड मारून वाहनांचे नुकसान केले. नाशिक शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं आणि यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांशीही बोलणार असल्याचं भाजप आमदार सीमा हिरे यांनी म्हटलं आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Accident : नाशिकमधील त्रिमुर्ती चौक परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड : ABP Majha