Nashik Air Quality : नाशिकचे (Nashik) वातावरण जरी सुदृढ वाटत असले तरी प्रत्यक्षात नाशिकच्या हवेमध्ये प्रदूषणाचे (Air Pollution) प्रमाण वाढू लागले आहे. नाशिक प्रदूषणातील धोकादायक शहरांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. अलीकडच्या वर्षांत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) खराब झाला असून नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्याचे समोर आले आहे. 


नाशिकच्या (Nashik) हवेची गुणवत्ता (Air quality) सध्या ढासळत असल्याचे दिसून येत आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगिक क्षेत्र यासोबत अनेक घटकांत वाढ झाल्याने परिणामी हवेत प्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे. त्यावर वेळीच लक्ष दिले नाही तर नाशिकची हवा प्रदूषित (Air polluted) होण्यास वेळ लागणार नाही. झपाट्याने ढासळत असलेला नाशिकमधील हवेचा स्तर दिवसागणिक खालावत असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात समोर आलेल्या आकडेवारीनुसार नाशिकची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 252 पर्यंत म्हणजेच खराब श्रेणीत दिसून आल्याने नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्याने द्योतक आहे. 


दरम्यान दिवाळीपूर्वी शहराचा एक्यूआय चांगल्या श्रेणीत (48) होता, पण उत्सवानंतर तो 143 एअर क्वालिटी इंडेक्ससह मध्यम पातळीवर घसरला. आता गुणवत्ता 252 एअर क्वालिटी इंडेक्स श्रेणी खराब झाली आहे. केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचा भाग असलेल्या शहरांपैकी नाशिक हे एक आहे. नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेची मुख्य समस्या म्हणजे पार्टिक्युलेट मॅटरची (पीएम) वाहनांचे प्रदूषण आणि रस्त्यावरील धुळीमुळे. महाराष्ट्र प्रदूषण शॉपिंगमोड कंट्रोल बोर्ड (MPCB) अधिकाऱ्यांनी सांगितले की, नाशिक शहरातील एक्यूआयमधील वाढ पीएम 10 आणि पीएम 2.5 च्या पातळीत वाढ झाली असून धुळीचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र दिवाळीपूर्वी नाशिक शहरात 40 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेली पीएम 10 पातळी आता वाढून 173 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर झाली आहे. शिवाय, पीएम 2.5 पातळी, जी दिवाळीपूर्वी 49 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती, ती आता 252 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर झाली आहे. मात्र नायट्रोजन डायऑक्साइड 2, अमोनियासह इतर एअर क्वालिटी इंडेक्स पॅरामीटर्समध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. 


एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांतील अतिवृष्टीमुळे धूळ निर्मिती कमी झाली आणि नाशिकमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स कमी होण्यास मदत झाली. मात्र आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा माती कोरडी झाली असून हवेत धूळ अधिक आहे. तसेच, शहरात वाहनांची संख्या वाढली असून रस्त्यांचा दर्जा खालावला आहे. यामुळे हवेत धुळीचीही भर पडत आहे. गोदावरी संवर्धन समितीचे देवांग जानी म्हणाले की, सुमारे 20 वर्षांपूर्वी हे शहर चांगल्या दर्जाच्या हवेसाठी ओळखले जात होते, परंतु धूळ निर्माण होण्याचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती बदलली आहे. शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक बस सीएनजीवर चालणाऱ्या असाव्यात आणि शहरातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहनांची शॉपिंगमोड कंट्रोल (PUC) प्रमाणपत्र अंतर्गत तपासणी केली जावी, असे देवांग जानी म्हणाले.


अशी ठरवली जाते हवेची गुणवत्ता 
दरम्यान नाशिकची हवा खराब होत असून यामध्ये दिवसेंदिवस श्रेणी ढासळत असल्याचे दिसत आहे. यामध्ये 1 ते 50 मधील एअर क्वालिटी इंडेक्स चांगल्या हवेची गुणवत्ता दर्शवतो, ज्याचा लोकांच्या आरोग्यावर कमीत कमी परिणाम होतो. 51 आणि 100 मधील एअर क्वालिटी इंडेक्स वाचन समाधानकारक मानले जाते आणि अशा हवेच्या गुणवत्तेमुळे संवेदनशील लोकांमध्ये श्वास घेण्यास किरकोळ त्रास होऊ शकतो. 101 आणि 200 मधील एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम आहे, तर 201 आणि 300 मधील एअर क्वालिटी इंडेक्स खराब आहे, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यास बहुतेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, जो सध्या नाशिक शहरात दिसून येत आहे.