Nashik News : नाशिक (Nashik) शहरात दुःखद घटना घडली असून 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने यात फूड डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककरांनी यंदा मोठ्या उत्साहात 31 डिसेंबर साजरा केला. या दिवशी हॉटेल्स रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात बुकिंग होते तर रस्त्यालगतच्या हॉटेल्सला गर्दीचा महापूर होता. अशातच ऑनलाईन फूडला देखील नाशिककरांनी पसंती दर्शवली. त्या पार्श्वभूमीवर फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांकडून त्या दिवशी नागरीकाकांसह फूड डिलेव्हरी बॉयस ला देखील ऑफर्स देण्यात आली होत्या. त्यामुळे अनेक फूड डिलेव्हरी रायडर्सनी सुट्टी न घेता रात्री उशिरा पर्यंत काम करण्याचा निर्णय घेतला होता. नाशिकमध्ये काम करणाऱ्या सागर याने देखील ऑफर्स असल्याचे पाहून अधिक वेळ काम करण्याचे ठरवले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. फूड डिलिव्हरीसाठी जात असताना अज्ञात कारने दुचाकीस धडक दिली. या धडकेत फूड डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाला.
सिडकोतील त्रिमूर्ती चौकात झालेल्या या अपघातात फूड डिलिव्हरी बॉय सागर दगा धिवरे (Sagar Dhivare) असे मयत झालेल्या दुचाकी स्वारी युवकाचे नाव आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको त्रिमूर्ती चौकात शनिवारी मध्यरात्री देवरे यांच्या दुचाकीला एका मोटारीने जोरदार धडक दिली. धिवरे हा कॉलेज रोड येथून सिडको त्रिमूर्ती चौकमार्गे पाथर्डी फाट्याकडे दुचाकीने ऑनलाइन फूड पार्सल डिलिव्हरी साठी जात होता. रविवारी मध्यरात्री पावणेदोन वयाच्या सुमारास जात असताना भरधाव वेगात जात असलेल्या कारने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक दिली. यावेळी दिवरे हे दुचाकीवरून खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जवळ दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मदत घोषित केले.
दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघात ग्रस्त कार सध्या अंबड पोलीस ठाण्यात जमा केली असून पुढील तपास सुरू आहे. धिवरे हे मागील चार वर्षांपासून नियमितपणे फूड डिलिव्हरीचे काम करत आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्युनंतर परिसरात तसेच शहरातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी रायडरच्या ग्रुप मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कारचालका विरुद्ध कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांसह डिलिव्हरी बॉईज कडून होत आहे. धिवरे हा अत्यंत सावधगिरीने व मध्यम गतीने दुचाकी चालवणारा रायडर होता, असे त्याच्या जवळच्या सहकारी मित्रांनी देखील यावेळी सांगितले.