नांदेड : नांदेड शहरातील परिसरातील नशेखोरीच्या दुनीयाता माग घेतला असताना स्टीक फास्ट ची बाजारातील मागणी वाढली आहे. छुप्याने विक्री होत असलेले स्टीक फास्ट आता बाजारात सहज उपलब्ध होत आहे. विशेषत: लहान मुले या स्टिक फास्टच्या आहारी गेली आहेत. स्टिकफास्टचा वापर नशा करण्यासाठी केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार गावामध्ये लहान शाळकरी मुले या स्टिकफास्ट चा वापर करून नशा करताना आढळून आले आहेत.
राज्यात पहिल्यांदा स्टिकफास्टचा वापर नशा करण्यासाठी होतोय हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्टिकफास्ट जनरल स्टोअरमध्ये फक्त 10 रुपयांना मिळते. त्यामुळे गरीब घरातील मुलांना या स्टिकफास्टची नशा करणे आर्थिकदृष्ट्या परवडत आहे. हा संपूर्ण प्रकार जवळा बाजार येथील आहे मुलांच्या आई वडिलांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आई वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी गांभीर्य ओळखत स्टिकफास्ट विक्रेत्यांना नोटीसा बजावल्या आणि स्टिकफास्ट लहान मुलांना विकण्यास प्रतिबंध घातला आहे.
नशा करण्यासाठी स्टिकफास्टची मोठ्या प्रमाणावर मागणी होऊ लागली आहे. शाळकरी मुळे मोठ्या प्रमाणावर नशा करण्यासाठी स्टिकफास्ट खरेदी करत असल्याने या एका स्टिकफास्टच्या बॉटलची 40 रुपयांपर्यंत चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती आहे. या स्टिकफास्टची नशा करणे कितपत घातक असू शकते याची माहिती घेण्यासाठी आम्ही थेट डॉक्टरकडे पोहचलो. डॉक्टरांच्या मते स्टिकफास्टची नशा करणे गांजा आणि दारूच्या नशेपेक्षा घातक आहे. या स्टिकफास्टच्या विक्रीवर निर्बंध घालायला हवे अन्यथा नवतरुण पिढी प्रमाणे शाळकरी मुले सुद्धा नशेच्या आहारी जायला वेळ लागणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या