मुंबई  : राज ठाकरेंनी काल मशिदीवरचे भोंगे उतरवावेच लागतील असा इशारा दिला होता, त्यानंतर आता मुंबईच्या चांदिवलीत मनसे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांनी आपल्या पक्ष कार्यालयावर भोंगे लावून हनुमान चालिसा आणि गणेश आरती करण्यात आली. त्यानंतर  हे भोंगे पोलिसांनी काढून नेले आणि मनसे विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनाही ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर भानुशाली यांना  पाच हजार रुपये दंड भरुन सोडून देण्यात आलंय. दरम्यान पुन्हा भोंगे लावू नका अशी नोटीसही पण यावेळी महेंद्र भानुशाली यांनी मी यापुढे आणखी भोंगे लावणार असा इशाराही दिला. 


चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यांच्या कार्यालयवर भोंगे लावले आणि त्यावर हनुमान चालीसा आणि गणपती आरती वाजवण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी त्यांना पाच हजार दंड आणि 149 ची नोटीस देऊन सोडण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  घाटकोपर पोलीस ठाणे समोर दाखल झाले होते.


मनसे नेत्या रिटा गुप्ता, घाटकोपर विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल मनसेचे एकमेव नगर सेवक संजय तुर्डे इत्यादी पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. अखेर दीड दोन तासात पोलिसांनी महेंद्र भानुशाली यांची सुटका केली. या वेळी आपण संपूर्ण मनसैनिकाना आवाहन करतो आहोत असे भोंगे लावण्याचे असे रिटा गुप्ता म्हणाल्या. तर हा ट्रेलर होता आता ठिकठिकाणी असेच होणार असे महेंद्र भानुशाली म्हणाले.


संबंधित बातम्या : 


Raj Thackeray: मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कुठली शिक्षा करणार? राज ठाकरे यांचा मविआ सरकारला सवाल