Marathwada News: खरिपाच्यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसत, रब्बीच्या कामाला लागले असल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात आतापर्यंत 34 टक्के रब्बीची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 7 लाख 41 हजार 180.28 हेक्टर असून,  त्यापैकी आतापर्यंत 2 लाख 30 हजार 284 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.  


कोणत्या जिल्ह्यात किती पेरणी.. 



  • औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश आहे.

  • औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख 90 हजार 935 हेक्टर असून, त्यापैकी 20 हजार 496 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत.

  • जालना जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र 2 लाख 17 हजार 892 हेक्टर असून, त्यापैकी 63 हजार 177 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत.

  • बीड जिल्ह्यात एक लाख 46 हजार 611 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या असून, सर्वसाधारण लागवड क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 44.11 टक्के एवढे आहे.

  • औरंगाबाद विभागात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख दोन हजार 138 हेक्टर असून, त्यापैकी 1 लाख 25 हजार 338 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. 


पिकांची आकडेवारी... 


औरंगाबाद विभागात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 71 हजार 857 हेक्टर एवढे आहे. तर आतापर्यंत 86  हजार 861 हेक्टरवर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहे. तसेच विभागात गव्हाचा पेरा 18 हजार 471 हेक्टर झाला असून, हरभऱ्याचा पेरा 3 लाख 63 हजार 948  हेक्टरवर झाला आहे. 


शेतकऱ्यांना रब्बीतून मोठ अपेक्षा...


यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, परतीच्या पावसाने देखील खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खरीपातून काहीच आले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी लावलेला खर्च देखील निघालं नाही. काही ठिकाणी तर शेतातील पीकं अक्षरशः वाहून गेली आहेत. दरम्यान आता रब्बीच्या पेरण्या सुरु झाल्या असून, यातून तरी काहीतरी हातात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेक भागात पेरण्या सुरु झाल्या आहेत. 


Aurangabad: औरंगाबादेत चार कंपन्या करणार 3500 कोटींची गुंतवणूक, फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक