Maharashtra LIVE Updates : हिंगोली तिहेरी हत्याकांडातील आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jan 2024 08:29 PM
Hingoli : हिंगोली तिहेरी हत्याकांडातील आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावामध्ये तिहेरी हत्याकांड घडले होते, स्वतःच्याच मुलाने आई वडील आणि भावाला ठार मारून अपघात केल्याचा बनाव केला होता. या प्रकरणी आरोपी महेंद्र जाधव याला आज बासंबा पोलिसांनी हिंगोलीच्या न्यायालयामध्ये हजर केले असता हिंगोली कोर्टाने त्याला पुढील चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Vasai News : MSEB अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

वसई  : एम.एस.ई.बी.चा कनिष्ठ अभियंता राजेश रविशंकर गुप्ता याला दोन हजाराची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. फिर्यादीकडून दुकानाला लाईटचे दोन मिटर लावून देण्याकरीता त्याने दोन हजार लाचेची मागणी केली होती. फिर्यादीने याबाबत तक्रार ठाणे लाच लुचपत विभागाला केल्यावर ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून,  सोमवारी दुपारी तीन वाजता दोन हजार घेताना रंगेहाथ गुप्ताला पकडलं. मंगळवारी राञी अडीज वाजता त्याच्यावर नायगांव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजेश गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. राजेश गुप्ता याला याआगोदरही लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता ही त्याची दुसरी वेळ आहे.

Nylon Manja : मुंबईत मांज्यामुळे 800 पक्षी जखमी,

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीनिमित्त रविवारसह सोमवारी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात आलेल्या धारदार मांजामुळे (Nylon Manja) 800 पक्षी जखमी झाले आहेत. चर्चगेटपासून विरारपर्यंत घडलेल्या घटनांतील जखमी पक्ष्यांचा हा आकडा असून, दहिसर, कांदिवली, मालाड, बोरीवली पट्ट्यात अधिक पक्षी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. धारदार मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी रविवारी आणि सोमवारी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पतंगाचा मांजा अनेकवेळा झाडांसह तारांमध्ये अडकतो आणि हा मांजा पक्ष्यांसह मनुष्यालाही हानिकारक असतो ज्यामुळे असे अपघात होतात. दरम्यान, मुंबईच्या लोअर परळ येथील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल येथे अनेक जखमीला पक्षांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Manoj Jarange Patil : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे, मनोज जरांगेचा गंभीर आरोप

Maratha Reservation Updates : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे याची मला खात्रीलायक माहिती, असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला आहे. 'समाज सध्या संकटात आहे. काहींच्या मुंबईत, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगरला कानाकोपऱ्यात बैठका होऊ लागल्यात, एकदा आरक्षण मिळाल्यानंतर मी डोंगरात किंवा हिमालयात जाईन. हिंसाचार सुद्धा हीच मंडळी घडून आणणार आणि डाग मराठ्यांना लावणार', असं जरांगेनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil : माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, मनोज जरांगेचा सरकारवर गंभीर आरोप

जालना : माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला आहे. सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे, याची मला खात्रीलायक माहिती असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समन्वयकांवरती नाव न घेता गंभीर टीका केली आहे. 'मराठा समाजाच्या नावावर, जीवावर, राजकारण करणारे, मोठे झालेले अशा काही असंतुष्ट आत्म्यांना आरक्षण विषय कायमचा संपून द्यायचा नव्हता, त्यांना मी आतून खपत नाही, अशा लोकांना सरकार हाताशी धरत आहे, सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय', असं म्हणत जरांगेंनी निशाणा साधला आहे.

Nilesh Lanke : निलेश लंके यांच्या 'शिवस्वराज्य' यात्रेची आज सांगता

Nilesh Lanke : निलेश लंके यांच्याकडून शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप खासदार सुजय विखे यांना शह देण्यासाठी 'शिवस्वराज्य' यात्रेचं आयोजन केल्याची चर्चा आहे. यात्रेचे माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा घरापर्यंत पोहचवण्यासाठी यात्रा काढल्याचा लंके यांचा दावा आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात यात्रा गेल्याचाही दावा करण्यात आला आहे. तर, नगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे, 25 जेसीबीच्या माध्यमातून यात्रेवर पुष्पवृष्टी होणार आहे. त्यामुळे, समारोपावेळी आमदार निलेश लंके काय बोलणार?, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुन्हा वक्तव्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

Parbhani Maratha News : परभणीत मराठा बांधवांकडून मुंबईसाठी जोरदार मोर्चे बांधणी, घरोघरी अक्षता वाटप

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईकडे निघण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केल्यानंतर आता गावागावात मुंबईकडे निघण्याची तयारी केली जात आहे. कुठे गाड्या तयार केल्या जात आहेत, तर कुठे मुंबईत राहण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा केले जात आहे. परभणीच्या पुर्णा तालुक्यातील गोदा पट्ट्यातील लिमला आणि आसपासच्या गावात गावकरी घोरघरी जाऊन अक्षता रूपी निमंत्रण दिल्या जात आहे. ''एकच वारी, वीस जानेवारी'' ची घोषणाबाजी ही करण्यात येत आहे. या लहान मुलांपासून वृद्ध ही घरोघरी जात मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईकडे निघण्याचे निमंत्रण आणि आवाहन करताना दिसत आहेत.

Amravati News : भाजप नेत्यांनी केली अंबादेवी मंदिरात स्वछता

अमरावती : भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन मंदिर परिसरात स्वछता केली. आपल्या परिसरातील श्रद्धास्थान असलेले मंदिर हे स्वच्छ असले पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्या अनुषंगाने आज भाजप नेते पदाधिकारी यांनी अमरावतीची आराध्य दैवत असलेली माता अंबादेवी संस्थानची स्वच्छता मोहीम करत मंदिर परिसर स्वच्छ केला.

नायलॉन मांजाने तरुणीचा गळा चिरला, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

भंडारा : बंदी असतानाही भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजामुळे एका 17 वर्षीय मुलीचा गळा चिरला. यात ती सुदैवानं बचावली. ही घटना सोमवारी सायंकाळी भंडाऱ्याच्या लाखनी इथं घडली. ईशा शिवदास गायधने (रा. लाखनी) असं जखमी तरुणीचं नाव आहे. तिच्या जखमेवर 12 टाके पडले असून सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Mumbai : गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान मेट्रोला उशीर झाल्याने प्रवासी नाराज

Mumbai : गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान मेट्रोला उशीर झाल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. मुंबई मेट्रोच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडपेश्वर आणि एकसर मेट्रो स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे आज सकाळी 8:00 च्या सुमारास ट्रेन थांबवण्यात आली. मात्र सध्या गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान मेट्रो ट्रेन धावत आहे. सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो ट्रेन थोडी उशिराने धावत आहे.

Maharashtra Weather : राज्यात पुढील तीन दिवस गारठा वाढणार

Maharashtra Weather :  उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशा खाली राहण्याचा अंदाज आहे. आज देखील अनेक भागात किमान तापमान 10 अंशाखाली असणार असून, उद्या किमान तापमानात आणखी घट नोंदवली जाणार आहे. तसेच, 9.4 , अहमदनगर 9.6, नाशिक 9.8, संभाजीनगर 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  पुण्यातील किमान तापमान 10.8 अंशांवर, उद्या पुण्यातील किमान तापमान 10 अंशांखाली राहण्याची शक्यता . यवतमाळमध्ये 11.5 अंश सेल्सिअस तर अकोल्यात तापमान 12 .3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली

चंद्रपूरात मंदिर स्वच्छता अभियानाला सुरवात

चंद्रपूर : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभर मंदिर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने  सुद्धा मंदिरांमध्ये स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रमांची सुरवात झाली आहे. चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील हनुमान मंदिरात स्वच्छता अभियान राबवून मोहिमेची सुरवात करण्यात आली. पुढील काही दिवसात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नागरिक योगदान देणार आहेत. सिविल लाईनच्या हनुमान मंदिरातही यज्ञ व पूजेद्वारे प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जाणार आहे. 

Paral Bridge: ट्रिपल सीट बाईक चालवणं महागात! परळ ब्रिजवर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू 

Paral Bridge: परळ ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. पहाटे साडे सहा दरम्यान झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू  झाला आहे. दोन तरुणीसह एका मुलाने  जीव गमावला आहे.  दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला आदळल्याने  अपघात झाला. ट्रिपल सीट बाईक चालवणं  महागात पडलं.  घटनास्थळी भोईवाडा पोलिसांनी पोहोचत जखमींना शेजारीच असलेल्या रुग्णालयात केले दाखल

परभणीचे तापमान 9 अंशावर, 2 दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट

Parbhani Weather : आठवडाभरानंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन झाले असुन, आज जिल्ह्याचे तापमान हे 9 अंश सेल्सिअसवर आल्याने सर्वत्र कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. मागच्या दोन दिवसापासून परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. जोरदार थंडी पडल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटत असुन, उबदार कपड्यांचा वापर ही सूरू झालाय. दरम्यान ही थंडी गहू हरभरा पिकांसाठी पोषक आहे.

Mahabaleshwar Temperature:  महाबळेश्वरातील पारा घसरला,  तापमान 9 अंशावर

Mahablehwar Temprature:  महाबळेश्वरातील पारा घसरला असून तापमान 9 अंशावर तर वेण्णालेक परिसरातील तापमान 6 अंशावर गेले आहे.  काही भागात दवबिंदू तुरळक गोठले. या मोसमात पहिल्यांदाच दवबिंदू गोठले

Sharad Mohol:  शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करणार

Sharad Mohol:  शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केलीय. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केलीय. शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आलीय. शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलिसांची देखील मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

SambhajiNagar News:  छत्रपती संभाजीनगरमध्ये मांज्यामुळे 50 हून अधिक जण जखमी

SambhajiNagar News:  छत्रपती संभाजीनगरमध्ये मांज्यामुळे 50 हून अधिक जण जखमी झाले.  धारदार मांज्यामुळे 20 पक्षी जखमी झाले.   नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 19  जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Rashmi Thackeray: ठाकरे गटाच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रेला आजपासून सुरुवात

Rashmi Thackeray:  रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून ठाकरे गटाच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रा सुरु होत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या महिला नेत्या आज नागपुरात दाखल होतील. पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, राजूल पटेल, शितल देवरुखकर आणि रंजना नेवाळकर आज नागपुरात पोहोचतील. तर बुधवारपासून मुख्य स्रीशक्ती संवाद यात्रा सुरु होईल.

Nagpur News: नागपूर आंतरराष्ट्रीय विमातळात ऑपरेटरचा मृत्यू, कुटुंबीयांचं आंदोलन

Nagpur News:  नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळात ऑपरेटरच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबियांनी आंदोलन केलं. कुटुंबियांनी मृतदेहासह एअरपोर्टवरील फायर गेटसमोर ठिय्या मांडला. या आंदोलनात काही कार्मचारीही सहभागी झाले होते. राजेश कुहीकर असं मृत ऑपरेटरचं नाव असून ट्रॅक्टरवरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबीयांचा आहे.

CM Eknath Shinde In Davos: जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दावोसला रवाना

CM Eknath Shinde In Davos:  स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दावोसला रवाना झाले.  या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.