Maharashtra Live Updates : मुंबईच्या हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आंदोलन

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी ब्युरो Last Updated: 31 Aug 2023 06:15 PM
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
संगीत देवबाभळी (Sangeet Devbabhali)  या नाटकाचा सामावेश आता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.  Read More
Metro Work : मेट्रोच्या कामामुळे मंत्रालयाच्या काचा फुटल्या 

Metro Work : मंत्रालयाजवळ सुरु असेलेल्या मेट्रोच्या कामावेळी करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे मंत्रालयाच्या काचा फुटल्या. यामुळे मंत्रालय परिसरातील अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालं आहे. 

सरंक्षण मंत्री राजनाथसिंग साईदरबारी

सरंक्षण मंत्री राजनाथसिंग साईदरबारी
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा आज शिर्डी आणि प्रवरानगर दौरा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राजनाथ सिंह यांचं स्वागत...
साईदर्शनानंतर प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार सोहळयास उपस्थिती...

धुळे जिल्ह्यातील 13 गावांमध्ये लम्पीचा शिरकाव, गावांपासून पाच किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित
धुळे जिल्ह्यातील 13 गावांमध्ये लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या गावांपासून पाच किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश  जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात धुळे तालुक्यातील अजनाळे, बोरविहीर, फागणे, शिंदखेडा तालुक्यातील मालपुर, धावडे, शिरपूर तालुक्यातील सुकवद, अहिल्यापूर थाळनेर, विखरण खुर्द आणि साक्री तालुक्यातील सुकापुर, जैताणे, कुत्तरमारे, कढरे या तेरा गावातील जनावरांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 219 जनावरांना लागण झाली आहे. यातील 75 जनावरे बरी झाली आहेत. 143 जनावरांवर उपचार सुरू आहेत. 5 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपी प्रादुर्भावग्रस्त गावापासून दहा किलोमीटर परिसरातील जनावरांची खरेदी विक्री आणि वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले असून तसेच या गावात यात्रा आणि प्रदर्शन भरवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरांना वेगळे ठेवावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असहकार्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा देखील इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आंदोलन, जितेंद्र आव्हाडांसह सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची उपस्थिती

Ncp Agitation : नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा मुंबई बळकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार मुंबईच्या हुतात्मा चौकात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोळा झाले आहेत. आंदोलनस्थळी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे देखील दाखल झाल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हुतात्मा चौक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जय महाराष्ट्र, मुंबई फोडणाऱ्यांचा धिक्कार अशी घोषणाबाजी सुरु आहे.


 

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

Bacchu Kadu : ऑनलाइन गेमिंगवरुन आमदार बच्चू कडू यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्या घराबाहेर आंदोलन केलं. त्याप्रकरणी बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

स्वभामानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता, पाच दिवसापासून सुरु होतं अन्नत्याग आंदोलन

स्वभामानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता.


गेल्या पाच दिवसापासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डीक्कर हे बसले होते अन्नत्याग आंदोलनाला.


रात्री अचानक प्रशांत डीक्कर उपोषण मंडपातून गायब झाल्याने जळगाव जामोद येथे खळबळ.


जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याने स्वाभिमानीचे सुरू होतं गेल्या पाच दिवसापासून आंदोलन.


दोन दिवसापूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपाचा विद्युत पुरवठाही केला होता खंडित या विरोधात काल महाविकास आघाडीने जळगाव जामोद येथे केला होता रस्ता रोको.


उपोषण कर्ताच गायब झाल्याने प्रशासनाची धावपळ.

 बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर

Agriculture news : बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा (Pik Vima) मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पीकविमा कंपनीनं तातडीनं अग्रीम पीकविमा वितरीत करण्याचे निर्देशही  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन


  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.


 राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक


राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 


विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'


छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी


कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक


लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.