गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी ब्युरो Last Updated: 30 Aug 2023 06:52 PM
India Alliance Prakash Ambedkar : 'इंडिया' आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा समावेश? उद्धव ठाकरे म्हणाले...
Uddhav Thackeray On Prakash Ambedkar In India : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीचा समावेश 'इंडिया' आघाडीत होणार का, याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. Read More
गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय
गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर

8 सप्टेंबर 2023 पर्यंत शासकीय विमा कवच लागू राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More
'भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपानं ओवाळणी दे'; नाशिकमधून दोन हजार राख्या पाठवत भगिनींची आर्त हाक
Nashik News : राखी पौर्णिमेच्या (Rakshabandhan) सणानिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राखी पाठवण्यात येत आहे. Read More
Maharashtra News: विदर्भात लम्पीचा शिरकाव, प्रशासन सतर्क; लसीकरणामुळे परिस्थिती नियंत्रणात
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांवर लम्पी चर्मरोगाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 19 जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. Read More
अकोला मनपाचं करवसुलीचं काम झारखंडमधील एका खाजगी कंपनीला; भाजप, ठाकरे गटात गंभीर आरोपांच्या फैरी
Akola News: अकोला महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. मात्र, महापालिका आयुक्त आणि प्रशासक कविता द्विवेदी (Kavita Dwivedi) यांच्या एका निर्णयावर संशय निर्माण झाला आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन


  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.


 राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक


राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 


विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'


छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी


कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक


लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.