Sinner Accident : Pandharpur : फक्त मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 26 Jun 2023 09:52 PM
Mumbai News: ठाकरे गटाचे 13 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेचे कर्मचाऱ्याला मारहाण करणारे ठाकरे गटाचे 13  कार्यकर्त्यांना वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Pandharpur : फक्त मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार

उद्या सकाळी फक्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचेच व्हीआयपी दर्शन होणार. यात्रेच्यामुळे व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद केल्याने कोणताही मंत्री, आमदार किंवा खासदार यांना सोडणार नसल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले

Sinner Accident : समृद्धी महामार्गावर 35 फुटांवरुन कार खाली कोसळली, सिन्नर शिवारात दोन भीषण अपघात 
Sinner Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून एका अपघातात कार चक्क 35 फुटांवरुन खाली कोसळली. Read More
तळकोकणात पंतप्रधान किसान योजनेच्या यादीत बांगलादेशींची घुसखोरी; जिल्हाधकाऱ्यांचे चौकशीचे निर्देश
Sindhudurg News: पंतप्रधान किसान योजनेतंर्गत ऑनलाईन पद्धतीनं सन 21/22 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील डिगस गावात 108 बांगलादेशी नागरिकांनी अर्ज दाखल केल्याचं निदर्शनास आलं आहे. Read More
Nashik News : मोदी यांचे डांबरीकरण, राहुल गांधींचे काँक्रिटीकरण अन् आमचा छोटासा मार्ग, महादेव जानकर यांचं वक्तव्य
Nashik Mahadeo Jankar : माझ्या वाढदिवसानिमित्ताने आज नाशिकमधून पाच थैल्या मिळणार असल्याचे रासपचे महादेव जानकर म्हणाले. Read More
Kolhapur Crime: संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; खंडणीसाठी त्रास दिलेल्या माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊतला पाच दिवसांची पोलीस कोठडी
Kolhapur Crime: युवा उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून 1 कोटींच्या खंडणीसाठी त्रास दिलेली माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊतला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Read More
BRS च्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला हिंदुराष्ट्र सेनेचा विरोध; सोलापुरातील हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

BRS च्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला हिंदुराष्ट्र सेनेचा विरोध


मुख्यमंत्री केसीआर राव आणि त्यांच्यासह येणाऱ्या 300 ते 400 लोकप्रतिनिधींना विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन देऊ नये


सोलापुरातील हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


वारकरी 25-30 दिवसांपासून चालत येऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत असतात


त्यामुळं बी आर एस च्या 300 ते 400 लोकांना थेट दर्शन देणे चुकीचे आहे


त्यामुळे हिंदुराष्ट्र सेनेतर्फे राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी केसीआरच्या पूर्ण टीमला व्हीआयपी दर्शन देऊ नये


सर्वसामान्य वारकऱ्यावर हा अन्याय होईल, हिंदुराष्ट्र सेनेची भूमिका 

Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा पांढरेवाडीला मुक्काम, तर मुक्ताबाईंची पालखी पंचवीस दिवसांनंतर पंढरपुरात पोहोचणार 
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या जवळ असून मुक्ताबाईंची पालखी पंचवीस दिवसांनंतर आज पंढरपुरात पोहोचणार आहे.  Read More
Hasan Mushrif : माझ्या चिमुकल्या नातवाने काय गुन्हा केला होता? संतोष शिंदेंच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने हसन मुश्रीफांनाही अश्रू अनावर  
हसन मुश्रीफ शिंदे यांच्या घरी पोहोचताच शहरातील प्रमुख नागरिक व विविध संघटनांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली. मुश्रीफ घरी पोहोचतात संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी हंबरडा फोडला. Read More
Manmad Panewadi : मनमाडच्या पानेवाडी प्रकल्पातील टँकर चालकांचे आंदोलन, अनेक जिल्ह्यांचा इंधन पुरवठा ठप्प 
Manmad Panewadi : नाशिकच्या पानेवाडी प्रकल्पातून टँकर चालकांनी संप सुरु केल्याने अनेक जिल्ह्यांना पंपावर केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. Read More
CM Eknath Shinde: वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा नको, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री हे आषाढी एकादशीच्या दिवशी विशेष अतिथी असतात. दरम्यान आषाढीनिमित्त पाहणी करण्यासाठी आलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. Read More
World Anti Drug Day 2023: धक्कादायक! अल्पवयीन मुलं अंमली पदार्थांच्या आहारी; नशा भागविण्यासाठी तरूणांकडून फेव्हिक्विक, बॉंड अन् स्टीकफास्टचा उपयोग
World Anti Drug Day 2023: बुलढाण्यात अनेक प्रकारचे अंमली पदार्थ  गांजा, गुटखा सर्वदूर पोहचले असताना आता तरुणाईचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा व्यसनाचा भयंकर प्रकार समोर आला आहे. Read More
Maharashtra Weather : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Monsoon Update : पुढील 48 तासांत मुंबई, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. Read More
Monsoon Update : हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; दिल्लीत ठिकठिकाणी साचलं पाणी, पर्वतीय भागात अलर्ट जारी
Monsoon Update In India : देशभरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.