Maharashtra Live Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात बावनकुळेंच्या भेटीला, बंद दाराआड झाली चर्चा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी भेटीला पोहोचले आहेत. पारशिवनीला प्रचारासाठी जात असताना कोराडी इथल्या बावनकुळेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु आहे.
Nashik News: नाशिकच्या सिडको परिसरात गोळीबार करण्यात आला आहे, त्रिमूर्ती चौकातील ही घटना आहे. तलवारी नाचवत टोळक्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्रिमूर्ती चौकातील गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर आले आहे.
Sharad Pawar: शरद पवार बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागाच्या दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील उंडवडी कडे पठार या गावातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालीय.
Amol Kirtikar: मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांची आज ईडी चौकशी होणार आहे. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी कीर्तीकरांची पुन्हा एकदा ईडी चौकशी होणारे.. अमोल कीर्तिकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांना ईडीची नोटीस आली होती. आज त्यांची ईडी चौकशी होणारेय..
Shelar Meets Salman Khan मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची भेट घेतली आहे. आशिष शेलार यांच्या लंच डिप्लोमसीची चर्चा रंगली आहे
CM in Nagpur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील रामगिरी या निवासस्थानी रात्री उशिराने महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासंदर्भात ही बैठक झाल्याचं समजतंय..
Sharad Pawar In Baramati: शरद पवार आज बारामतीमधील दुष्काळी गावांचा दौरा घेतला आहे. उंडवडी सुपे आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागांचा दौरा करणार आहे.
Kirit Somaiya In Dapoli: भाजप नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर आहेत. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर दाखल गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत येणारेत.. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर कोणते गुन्हे दाखल झाले याची माहिती घेण्यासाठी सोमय्या दापोलीतील पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाला भेट देणार आहेत.. दापोली दौऱ्यादरम्यान सोमय्या आणखी कोणते नवे आरोप परबांवर करतात का? हे पहावं लागेल..
NCP Meeting In Pune: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सातारा, माढा आणि रावेर या तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रवींद्र पाटील, सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण तर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख आणि अभय जगताप यांच्यापैकी एका नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Bhandara Lok Sabha: भंडारा-गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आज भंडाऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत पडोळे हे उमेदवार असले तरी खऱ्या अर्थानं ही लढत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यात होत असल्याचं चित्र आहे...
Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरु आहे. संघाकडूनही उमेदवारांसाठी चाचपणी केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हेंमत गोडसे आणि छगन भुजबळ यांना विरोध होत असल्याने कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो याबाबत चाचपणी केली जात आहे.
Ratnagiri Loksabha: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम आहे. रत्नागिरीच्या भाजप कार्यालयात आज महायुतीची समन्वय बैठक होणार होती. वरिष्ठ नेते नसल्यामुळे आजची बैठक रद्द केल्याची प्राथमिक माहिती आहे. भाजप शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी अशा महायुती मधल्या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. बैठक रद्द झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा आणखीन वाढला
Somvati Amavasya: जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा भरणार आहे. दुपारी 1 वाजता जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदी कडे मार्गस्थ होणार आहे. सोमवारी दिवसभर अमावस्या असल्याने जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.
Surya grahan2024: आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी ग्रहण सुरु होणार असून ते पहाटे २ वाजेपर्यंत चालणार आहे. ग्रहणाची वेळ रात्री असल्यामुळे भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही.
CM Yogi In Maharashtra : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये सभा घेणार आहेत. दुपारी २.३० वाजता वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे सभा घेणार आहेत, तर सायंकाळी ५ वाजता भंडारा, आणि सायंकाळी ७ वाजता नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची जाहीरप्रचारसभा होणार आहे.
Rohini Khadse: रोहिणी खडसे आज शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.. रावेर मतदारसंघांबाबत पुण्यात अंतिम बैठक होणार असून या बैठकीत उमेदवार ठरणार आहे.. त्यामुळे रावेरमधून शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार? याकडे लक्ष लागलंय. रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आलीय. तर दुसरीकडे एकनाथ खडसेही भाजपच्या वाटेवर आहेत.
PM Modi in Chandrapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी चंद्रपुरात येणार आहेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात जाहीर सभा होणार असून, भव्य दिव्य मंडप उभारण्यात आलाय...दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील. त्यानंतर त्यांची सभा होईल. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित राहतील
Satara Lok Sabha: उदयनराजे यांच्या प्रचारार्थ आज साताऱ्यात महायुतीचे जिल्ह्यात तीन ठिकाणी मेळावे होत असून या मेळाव्याला सर्व प्रमुख घटक पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल असे सांगितले जात आहे. पहिला मेळावा हा 11 वाजता कराड येथे होत असून या मेळाव्याचं नेतृत्व भाजपचे अतुल भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. दुसरा मेळावा हा दुपारी वाई येथे होणार आहे. या मेळाव्याचे नेतृत्व अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आ मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. तर तिसरा मेळावा हा सायंकाळी 5 वाजता साताऱ्यातील शेंद्रे या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्याला उदयनराजे भोसले यांच्यासह शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई भाजप नेते आ.जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ.मकरंद पाटील,यांच्यासह घटक पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. उदयनराजेंची तिकीट अद्यापपर्यंत जाहीर झाले नसतानाही महायुतीच्या या मेळाव्याचा सपाटा आजपासून सुरू झाल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -