Maharashtra News LIVE Updates : मंत्रालयातील बनावट कागदपत्र घोटाळा, उच्चपदस्थ अधिकारी सामील, मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2024 03:30 PM
नाशिक - आंदोलकांच्या शिष्टमंडळाची थोड्याच वेळात पालकमंत्री दादा भुसेंसोबत बैठक

नाशिक - आंदोलकांच्या शिष्टमंडळाची थोड्याच वेळात पालकमंत्री दादा भुसेंसोबत बैठक


- नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार बैठक 


- माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज आठवा दिवस 


- आतापर्यंतच्या प्रशासनासोबतच्या 5 बैठका ठरल्या आहेत निष्फळ

Supriya Sule : जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत आहे, पंतप्रधान मोदी, अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Supriya Sule : अतिथी देवो भव.. लोकशाही आहे ज्यांना निवडणूक लढायची आहे ते सर्वजण प्रचार करू शकतात... लोकसभा प्रचारासाठी माझे ही दोन राऊंड झाले आहेत.. जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत आहे..पंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Burning Train : अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसला आग, बेटावद जवळ गाडीतून निघाला धूर.

Burning Train : अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसला आग, बेटावद जवळ गाडीतून निघाला धूर....


हॉट एक्सल झाल्याने धुराचे लोट..


रेल्वे कर्मचारी व अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली...


रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना...

Prakash Ambedkar : नाना पटोले यांनी वकीलपत्र थोडी दिलं मला, प्रकाश आंबेडकर यांनी उडविली खिल्ली

Prakash Ambedkar : एकेकाळी नाना पटोले यांची भूमिका वंचितच्या बाबत कडक होती. मात्र, आता त्यांची निर्माण नरमाईची झाली. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारणा केली असता त्यांनी, हा प्रश्न नाना पटोले यानांचं विचारा...ते थोडी आम्ही सांगणार अहो. नाना पटोले यांनी जी धरसोड भूमिका जी आहे ती त्यांनी का ठेवली आहे, ते तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांनी मला वकीलपत्र थोडी दिलं आहे. त्यांनी त्यांची पिटिशन ड्रॉप करायला मला सांगितलं. हा मग मी त्यांना या धरसोडबाबत विचारतो. पिटिशन बाबत मग मी ड्रॉप मध्ये लिहितो....अशी खिल्ली प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केली. 

Manoj Jarange : जसा येवल्याचा टांगा पलटी केला तसा नागपूरचा आता नंबर आहे, मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange : जसा येवल्याचा टांगा पलटी केला तसा नागपूरचा आता नंबर आहे


 मराठा आरक्षणाच्या आडवा जो कोणी येईल त्याला आता सोडणार नाही


 मग तो यावल्याचा असून नागपूरचा असो ठाण्याचा असो किंवा बारामतीचा असो


 माझ्यासाठी मराठा समाज सर्वात आधी

Politics : इंदापुरातील राष्ट्रवादी आणि भाजप संघर्ष शिगेला, हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहलं पत्र

Indapur : इंदापुरातील राष्ट्रवादी आणि भाजप संघर्ष शिगेला


हर्षवर्धन पाटील यांनी लिहलं पत्र


मित्र पक्षातील लोकं जाहीर भाषणात धमकावत असल्याने उद्या आम्ही मतदारसंघात फिरायचं का नाही? हर्षवर्धन पाटील यांचा सवाल


जर उद्या काही झालं तर जबाबदार कोण - हर्षवर्धन पाटील


हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं पत्र

राज्यातल्या 44 जागांपैकी 40 जागांवरील महाविकास आघाडीतील वाटाघाती झाल्या निश्चित -बाळासाहेब थोरात 

Nandurbar :  राज्यातल्या 44 जागांपैकी 40 जागांवरील महाविकास आघाडीतील वाटाघाती झाल्या निश्चित -बाळासाहेब थोरात 
- चार जागांवरती वाटपाचा तिढा 
- त्या चारही जागांवरीलवाटप तिढा येत्या आठवड्यात सॉल्व करू
- राज्यातील  44 उमेदवार येत्या आठवड्यात जाहीर करणार

Jalgaon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाशिम आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा, जळगाव विमानतळावर गुलाबराव पाटलांनी केले स्वागत

Jalgaon : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी मा. आ. चंद्रकांत सोनवणे, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाशिम आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा असून जळगाव विमानतळावरून ते हेलिकॉप्टर वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्या समवेत पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.

Pune : पुण्यात भाजप कार्यालयात बैठकीला सुरुवात, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार

Pune : पुण्यात भाजप कार्यालयात बैठकीला सुरुवात


मंत्री चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थितीत


चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार क्लस्टर बैठक


पुणे, शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावा घेण्यासाठी बैठक


भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्षांचे मुख्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार

मंत्रालयातील बनावट कागदपत्र घोटाळा, अधिकारी, वकिलाविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल

Mumbai : मंत्रालयातील बनावट कागदपत्र घोटाळा


मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी यात सामील


अधिकारी आणि वकिलाविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल 


तत्कालीन गृहविभाग उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून तयार केली बनावट कागदपत्र


अनेक संवेनशील गुन्ह्यात, विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांद्वारे वकीलांची नियुक्ती


किशोर भालेराव यांच्यासह विशेष सरकारी वकील शेखर जगताप, श्यामसुंदर आणि शरद अग्रवाल सहआरोपी

Bhandara : नाना पटोलेंच्या गावात वंचितची महासभा, प्रकाश आंबेडकर काय बोलतील याकडं लागले लक्ष.

Bhandara : लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही वंचित बहुजन आघाडीचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. मात्र, येत्या दोन - तीन दिवसात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती होईल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश अद्याप झालेला नसल्यानं किंवा आघाडीत समावेश झाल्यानंतरही भंडारा लोकसभेची जागा वांचितला मिळण्याची शक्यता कमी असतानाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं गाव असलेल्या साकोलीत वंचित बहुजन आघाडीची आदिवासी बहुजन अधिकार महासभा होत आहे.

Mahadev Jankar : माढा आणि परभणीच्या जागासाठी आम्ही आग्रही आहोत  - महादेव जानकर

Mahadev Jankar : वाशिममध्ये महादेव जानकर यांचा महायुतीमध्ये महाविकास आघाडी समावेश असल्याबद्दलचे मौन सोडले


प्रथम शरद पवार यांनी माढाची लोकसभा जागा सोडण्यासाठी जी सकारत्मक भूमिका मांडली त्याबद्दल आभारी आहे


मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच अद्यापही काही उत्तर नाही आलं  


माढा आणि परभणीच्या जागासाठी आम्ही आग्रही आहोत   


स्वतंत्र लढण्याची तयारी केलीय


महाविकास आघाडी आणि महायुती कडून बैठकी संदर्भात निमंत्रण नाही

Solapur : सोलापुरातील मोहोळ मध्ये महिलांचा बेलन मोर्चा

Solapur : सोलापुरातील मोहोळ मध्ये महिलांचा बेलन मोर्चा


मोहोळ नगरपरिषदेवर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने बेलनं मोर्चा


मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवा आणि घरकुल योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना मिळावा या मागणीसाठी नगर परिषदेवर महिलांचा बेलनं मोर्चा


सीना नदीतून मोहोळ शहरासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन


यापूर्वी घागर मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती


मात्र झोपेचं सोंग घेणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला जाग आणण्यासाठी बेलनं मोर्चाचे आयोजन

Satara : साताऱ्यात कास रस्त्यावरील अपघात घटना, 2 जण जागीच ठार, 3 जण गंभीर जखमी

Satara  : कास रस्त्यावरील घटना 


कार कठड्याला धडकली


 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी


चालकाचे नियंत्रण सुटून कार सुरक्षा कठड्याला धडकली


कास पठाराहून सातारा कडे जात असताना कारचा झाला अपघात

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले


दादा भुसे, छगन भुजबळ, भारती पवार यांच्या उपस्थितीत कोनशीला अनावरण


फित कापून उद्घाटनसमृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमासाठी


अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  भारती पवार उपस्थित

11 वाजता सुरू होणारा कार्यक्रमाला एक तास उशीर

दादा भुसे पोहचण्याच्या साधारणपणे 10 ते 15 मिनिटे आधी छगन भुजबळ आणि इतर लोकप्रतिनिधी येऊन बसल्याने भुजबळ यांची नाराजी

Latur Accident : कार-ट्रॅक्टरच्या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना

Latur Accident : लातूर नांदेड महामार्गावरच्या महाळंग्रा पाटी येथे कार आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा भीषण अपघात झालाय..,  नांदेड वरून तुळजापूर येथे दर्शनासाठी जात असेलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय..ही ट्रॉली उसाची होती.. दरम्यान या अपघातात चार जणांचा  मृत्यू झालाय ,तर कार मधील इतर दोन जण गंभीर जखमी  झाले आहेत, जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे

Ratnagiri : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात धुसपुस सुरू

Ratnagiri : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात धुसपुस सुरू


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच खासदार झाला पाहिजे


लोकसभेच्या बदल्यात आम्ही रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार


त्या करिता येत्या सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला काही द्यावे लागले तर देऊ


भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळ माने यांचं मोठ्या विधान


रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून बाळ (सुरेंद्र) माने निवडणुकीसाठी आहेत इच्छुक

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या, स्थानिक तरुणांची मागणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या, स्थानिक तरुणांची मागणी


तरुणांची कार्यक्रस्थळी गर्दी


ज्याच्या जमिनी गेल्यात त्यांना कामात सामावून घ्या रोजगार द्या, तरुणांनी केली मागणी


अचानक ग्रामस्थ जमल्यानं पोलीस यंत्रणेची धावपळ


ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांना माघारी पाठवण्याचा पोलिसांचा प्रयत्न



समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे थोडयाच वेळात उद्घाटन होणार आहे



मात्र त्याआधीच ग्रामस्थ जमल्यानं रोजगाराचा प्रश्न उपस्थित

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस पक्षाकडून राज्यातील 19 मतदारसंघात तयारी सुरू

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये जागावाटप अद्याप जाहीर झालेला नसलं.. तरी काँग्रेस पक्षाने राज्यातील 19 मतदारसंघात तयारी सुरू केल्याचा चित्र आहे... 


मुंबईतील सहा मतदार संघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील 19 मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उद्या म्हणजेच 05 मार्च रोजी मुंबईत बोलावली आहे...  


विदर्भातून नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा-गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशीम या आठ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे...


या बैठकीत 19 मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे

Ajit Pawar : मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडणार

Ajit Pawar : उद्या आणि परवा मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडणार


प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल पटेल आणि लोकसभा प्रचारक धनंजय मुंडेंसह महत्वाचे नेते उपस्थित राहणार


जिल्हाध्यक्ष, सर्व फ्रंटलचे प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार


लोकसभेपूर्वी एकूण 17 मतदारसंघांसाठी दोन दिवस खलबत होणार

Jalgaon : जळगाव मध्ये सरकार आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बचत गटांतील महिलांना सक्ती?

Jalgaon : जळगाव मध्ये सरकार आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बचत गटांतील महिलांना सक्ती?


कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड आकारण्यात येईल अशी सक्त ताकीद


आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात आज सरकार आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन


कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सक्ती करणारे मेसेज सोशल मीडियात व्हायरल

Akola : अकोल्यात भांग विक्रीचा अजब प्रकार, चॉकलेटच्या रॅपरमध्ये भांग विक्री

Akola : अकोल्यात भांग विक्रीचा अजब-गजब प्रकार समोर आलाय. चक्क चॉकलेटच्या रॅपरमध्ये ही भांग विक्री होत आहे, समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा प्रकार समोर आला आहे. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले, ते वेगळे चॉकलेट थोडा आगळंवेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली

Bhavana Gawali : उबाठा गटाला वाशिम-यवतमाळ मध्ये भावना गवळींनी दिला मोठा धक्का

Bhavana Gawali : वाशिममध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिममध्ये येत आहेत.. याच महिला मेळाव्याच्या दरम्यान यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील 84 आजी-माजी  सरपंच, नगर सेवक, पंचायत समिती सदस्य आणी जिल्हा परिषद सदस्य उबाठा गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत.. त्यामुळे उबाठा गटाला लोकसभेच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जातोय...

Bhandara : भंडाऱ्यात तेली समाज बांधवांचा भाजप आणि काँग्रेस पक्षाला दिला निर्वाणीचा इशारा.

Bhandara : भंडारा - गोंदिया या दोन जिल्ह्यामिळून असलेल्या लोकसभा क्षेत्रात पोवार समाजानंतर तेली समाज सर्वात मोठा समाज असल्याचा दावा तेली समाज बांधवांनी केला आहे. असं असतानाही भाजप, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीत तेली समाजाला उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळं 2024 च्या निवडणुकीत या पक्षांनी तेली समाजाला उमेदवारी नं दिल्यास त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीत नक्की पाडू असा निर्वाणीचा इशाराचं तेली समाज बांधवांनी, राजकीय पक्षांना दिला आहे. काल भंडारा जिह्यातील लाखनी इथं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील तेली समाज बांधवांचा मेळावा पार पडला यात, हा इशारा दिला आहे.

Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्त्वाची बैठक

Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्त्वाची बैठक


मंत्री चंद्रकांत पाटील घेणार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची  बैठक


बारामती, शिरूर, आणि पुणे या 3  लोकसभा मतदार संघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार


महायुतीतले सर्व घटक पक्ष राहणार बैठकीला हजर


सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील करणार चर्चा


तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेत अहवाल देणार वरिष्ठांना


आज दुपारी बारा वाजल्यापासून पुण्यातील भाजप मुख्य कार्यालयात बैठकीचे आयोजन

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाच्या दौऱ्यावर

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत.. तेलंगणा मधील आदिलाबाद येथे पंतप्रधानांचे कार्यक्रम असून विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले जाणार आहे.. मात्र दिल्लीवरून आदीलाबादला जाताना पंतप्रधान नागपूर विमानतळावर आणि त्यानंतर नांदेड विमानतळावर काही मिनिटांसाठी थांबणार आहेत.. नागपूर विमानतळावर  पंतप्रधानांचा काही मिनिटांचा थांबा विश्रांतीसाठी नसून ते काही स्थानिक कार्यकर्त्यांना भेटणार आहे.

Ratnagiri : रत्नागिरीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चा, मोर्चाला पोलिसांनी दिली परवानगी

Ratnagiri : रत्नागिरीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चा


मोर्चाला पोलिसांनी दिली परवानगी


मध्यरात्री देण्यात आली परवानगी


मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार महामोर्चा


काजल हिंदुस्तानी करणार मोर्चाचं प्रतिनिधित्व

Baramati : महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधी सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स झळकले

Baramati : महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधी सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स झळकले


खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे फ्लेस झळकू लागले


बारामती तालुक्यातील नीरा वागज येथे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचा फ्लेक्स


दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी उमेदवारीचे स्टेट्स ठेवले होते

महाविकास आघाडीची युवा आघाडी आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात

महाविकास आघाडीची युवा आघाडी आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात, महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांचा सहा मार्चला  मुंबईत युवा महाराष्ट्रभिमान मेळावा


महाविकास आघाडीतील काँग्रेसची युवक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाची युवासेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह मोडवर


आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर युवा आघाडीकडून ठिकठिकाणी सभा होणार आहेत


त्यामधील पहिल्या मेळाव्याचे आयोजन 6 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान येथे आयोजित करण्यात आला आहे

BJP : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा आज नागपूर दौरा रद्द

BJP : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा आज नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी भाजप नेत्या स्मृती इराणी आज नमो राष्ट्रीय युवा संमेलनात सहभागी होऊन तरुणांना संबोधित करणार आहेत. आज भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ची नवी दिल्लीत मीटिंग होणार असल्याची माहिती आहे... आणि त्याच अनुषंगाने जे पी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती आहे...

Washim : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम दौऱ्यावर

Washim : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशिम दौऱ्यावर आहेत. स्थानिक खासदार भावना गवळी यांनी उभारलेल्या राज्यातील एकमेव शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे ते उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशिम शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ते उद्घाटन करणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत छत्रपती संभाजी राजे व महादेव जानकर असणार आहेत साधारणतः एकाच आठवड्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी व आता त्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे

Nashik : नाशिकमध्ये वातावरणात प्रचंड गारवा, शेतकरी बांधवांची कुडकुडत रात्र रस्त्यावरच

Nashik : नाशिकमध्ये वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून अचानक थंडीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळते आहे, उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणेही अवघड झालेले असतांनाच, दुसरीकडे मात्र या थंडीत आदिवासी शेतकरी बांधवांनी कुडकुडत रात्र रस्त्यावर काढलीय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे. प्रशासनासोबतच्या पाच बैठका त्यांच्या निष्फळ ठरल्या असून आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत तोडगा निघतो का हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे...

कांद्यावरील निर्यतबंदी कायम? 50 हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेशला जाणार

Onion : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या नोटीस नुसार 3 लाख मॅट्रिक टना ऐवजी 50 हजार मेट्रिक टन कांदा खाजगी निर्यातदाराऐवजी नॅशनल कॉपोर्टिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड (NCEL) च्या माध्यमातून बांगलादेशला निर्णयात केला जाणार असल्याचे 1 मार्च या परिपत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकारने 18 फेब्रुवारीला कांद्यावरची निर्यात बंदी उठवली होती. 3 लाख मॅटरिक टन कांदा निर्यात केले जाणार असल्याचे सांगितले होते.

Rajan Salvi : आमदार राजन साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी जाणार

Ratnagiri : दुपारी एक वाजता ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. हायकोर्टाला अंतरिम दिलासा देताना दिलेल्या निर्देशानुसार आज साळवी कुटुंबीय चौकशीसाठी हजर राहतील.

Rain : देशासह राज्यात अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा, पुढील 24 तासात पावसाचा अंदाज

Rain : देशातील हवामानात सध्या मोठा बदल 


देशासह राज्यात अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा 


विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 


पुढील 24 तासात राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार 


शनिवारी आणि रविवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. 


यामुळे हवामानात गारठा पाहायला मिळत आहे. 

PM मोदी भारतातील पहिल्या 'अंडरवॉटर मेट्रोचे' उद्घाटन करणार

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार


कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर म्हणजेच पाण्याखालील मेट्रो बोगद्याचे उद्घाटन करणार


ही मेट्रो हावडा मैदान ते एस्प्लेनेड दरम्यान धावणार 


कोलकाता येथे कोट्यवधी रुपयांच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे उद्घाटन आज

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज होणार आहे. 


सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार. 


समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा 


आज सकाळी 11 वाजता इगतपुरी पथकर प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे. 


या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार 


केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.