Maharashtra News LIVE Updates : नाशिकमध्ये महापालिकेची सिटी लिंक बससेवा ठप्प; दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शिक्षण मंत्रांच्या जिल्हयात अभ्यासाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याचा गळा आवळल्याचा प्रकार घडला आहे. वर्गातील अन्य एका विद्यार्थ्याने थेट मोबाईलवर व्हिडीओ बनविल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितली. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या डोक्यात मारल्यानंतर हा शिक्षक त्याचा थेट गळाच आवळत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. ही घटना चार दिवसापूर्वीची असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार कुडाळ हायस्कूल मध्ये घडला असून या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थी मात्र घडलेल्या प्रकारामुळे नाराज आहेत.
जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीसह जागा वाटप पार पडलंय, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल, संजय राऊतांची माहिती. कोणती जागा कोणाला मिळेल यासंदर्भात वाद नाही, प्रत्येक जागेवर विजय होणं महत्त्वाचं, मविआच्या जागावाटप बैठकीनंतर संजय राऊतांचं वक्तव्य.
बस वाहकांनी आज सकाळी अचानक संप पुकारल्याने नाशिकमध्ये महापालिकेची सिटी लिंक बससेवा ठप्प झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने वाहकांनी हा निर्णय घेतला असून गेल्या दिड वर्षातील त्यांनी पुकारलेला हा सहावा संप आहे. ऐन परीक्षांच्या काळात महापालिकाची बससेवा बंद झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून बस थांब्यावर प्रवाशी बसची वाट बघत ताटकळत उभे आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगर खंडाळा ही गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत.. गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये जा करत असतात.. मात्र आता तर एक अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज संस्थांच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती.. पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्याकारणाने या ठिकाणी ती आली असावी असा ग्रामस्थांचा अंदाज आहे.. परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते.. आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्याने सध्या परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे..त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावरती येऊन संघर्ष केला व संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असल्यास त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला हवी..जालना मतदार संघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्र पणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील. अशी आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.
नाशिकच्या वणी - सापुतारा महामार्गावरील सुरगाण्याच्या ठाणापाडा येथे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला.सापुताऱ्याकडून शिर्डीकडे जात असतांना कारने अचानक पेट घेतला.बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने वाहनातील प्रवाशी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला..स्थानिक नागरिक व सापुतारा येथील अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.मात्र कार जळून खाक झाली..या घटनेने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामध्ये गहू ज्वारी हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये कापून टाकलेल्या गव्हाच्या पेंड्या पूर्णपणे भिजून गेले आहेत. त्यामुळे गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. याच गव्हाच्या पिकावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे खाण्याचे व्यवस्थापन केलेला. असतं परंतु कालच्या पावसामुळे कापून टाकलेले गहू पूर्णपणे भिजले आहेत. त्यामुळे या गव्हाला आता खायला सुद्धा चव लागत नाही तर बाजारात विकायचे असेल तर भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
नाशिकच्या येवला तालूक्यातील उत्तरपूर्व भागातील विहिरींसह कूपनलिकां फेब्रुवारी महिन्यात कोरड्याठाक पडल्या असून अनेक ठिकाणी उद्भव कोरडे पडल्याने अनेक गावांच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत..त्यामुळे ग्रामिण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे...फेब्रुवारी महिन्यातच ६० गाव - वाड्या वस्त्यांना सध्या ३५ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे..आगामी काळात पाण्याची परिस्थिती भयावह होऊन टँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
- नंदुरबार लोकसभेच्या निरीक्षक पद म्हणून माजी मंत्री डॉ. अशोक उईके आणि माजीमंत्री बाळा भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली....
- भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे....
- नंदुरबार लोकसभेसाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे....
- हे निरीक्षक आज नंदुरबार लोकसभेच्या आढावा घेणार आहेत....
- भाजपात उमेदवारांची मोठी लाईन लागली आहे त्यामुळे निरीक्षकांना कोण कोण भेटणार हे पहाणे महत्त्वाचे राहणार आहे...
Akola Theft : अकोल्याच्या अलंकार मार्केटमधील सहा दुकानं रात्री फोडण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिकच्या दुकानांमध्ये रात्री चोरी झाली आहे. सकाळी शटर वाकलेले दिसल्यामुळे चोरी झाल्याचे उघड झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. सहाही दुकानं शहरातील रामदासपेठ पोलिसांच्या हद्दीमधली आहे. अतिशय गजबजलेल्या रस्त्यावरील दुकान फोडल्यामुळे पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Manoj Jarange Contest Lok Sabha Elections : मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून लोकसभा निवडणूक लढविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी महायुती किंवा महाआघडीमध्ये न जाता अपक्ष (स्वतंत्र) निवडणूक लढविण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. जरांगे यांनी निवडणूक लढविल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना देणार पाठिबा देईल अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.
Ahmednagar Food Poisoning : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 200 जणांना विषबाधा झाली आहे. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील ही घटना असून, नवरदेवाच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या हळदीचा कार्यक्रमात हा प्रकार समोर आला आहे. हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून झालेल्या विषबाधानंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा समावेश आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी भाजपकडून सुरु असलेल्या पक्षप्रवेशावरून सामना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. एकीकडे 'काँग्रेसमुक्त भारत' आणि दुसरीकडे 'शून्य विरोधी पक्ष' असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूज याच धोरणाचा परिणाम आहे. 'काँग्रेसमुक्त भारत'च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप' होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही, असे म्हणत सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला गेला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -