Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर

Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मुकेश चव्हाण Last Updated: 19 Mar 2025 10:17 AM
सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचा अपघात मृत्यू; मोटर सायकलवर जात असताना घडला अपघात

नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात राहणाऱ्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा मोटरसायकलवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. नंदलाल शिरसाट असं मृत जवानाचं नाव असून त्याचे नुकतच जम्मू येथे त्याची बदली झाली होती. मृत जवान नुकताच होळीच्या सुट्टीत निमित्ताने आपल्या गावी आला होता. जवान नंदलाल यांचा पश्चात 5 वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे.. जवानाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हाभरात शोक व्यक्त करण्यात येत आहेत... नंदुरबार जिल्ह्यात मोटरसायकलींचा अपघात वाढ झाली असून यामुळे मृत्यूंची संख्या देखील सातत्याने वाढत आहेत.

सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचा अपघात मृत्यू; मोटर सायकलवर जात असताना घडला अपघात

नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात राहणाऱ्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा मोटरसायकलवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. नंदलाल शिरसाट असं मृत जवानाचं नाव असून त्याचे नुकतच जम्मू येथे त्याची बदली झाली होती. मृत जवान नुकताच होळीच्या सुट्टीत निमित्ताने आपल्या गावी आला होता. जवान नंदलाल यांचा पश्चात 5 वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे.. जवानाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हाभरात शोक व्यक्त करण्यात येत आहेत... नंदुरबार जिल्ह्यात मोटरसायकलींचा अपघात वाढ झाली असून यामुळे मृत्यूंची संख्या देखील सातत्याने वाढत आहेत.

वळणावर कंटेनरची कारला धडक; एक जण जागीच ठार तर दोघेजण गंभीर

भरधाव असलेल्या कंटेनर आणि कारचा  लोहारा परिसरातील वळणावर अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना अमरावती रोड मार्गावरील लोहारा परिसरात घडली आहे. विशाल देशमुख असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। तर युवराज परिहार आणि नितीन मिश्रा असे जखमी झालेल्याचे नाव आहे। जखमी दोघांनाही उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे तिघेजण यवतमाळ वरून नेरकडे जात असताना हा अपघात झाला अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला. 

संजय खोडके यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्यामुळे पक्षामधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नाराज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजय खोडके यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्यामुळे पक्षामधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नाराज


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एका विधानपरिषदेच्या जागेसाठी तब्बल ७५ हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते


झीशान सिद्दीकी,संजय दौंड,उमेश पाटील,अमरसिंह पंडित,आनंद परांजपे,सुरेश बिराजदार,दिपक मानकर,सुनील टिंगरे या महत्वाच्या स्थानिक नेत्यांनी विधानपरिषदेच्या जागेवर दावा ठोकला होता


संजय खोडके यांना विधानपरिषदेची संधी मिळाल्यावर एका घरात दोन आमदारकी देऊन काय फायदा असा सवाल आत्ता सर्व इच्छुक उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे

एअरटेलकडून आता मराठी भाषेत हेल्पलाइन सेवा सक्रिय केल्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र
एअरटेलकडून आता मराठी भाषेत हेल्पलाइन सेवा सक्रिय केल्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र

 

मालाड मधील एअरटेल गॅलरी मध्ये  मागील आठवड्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पाहायला मिळाला होता

 

 मालाड मधील एअरटेल गॅलरी मधील महिला कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला  हिंदी भाषेचा आग्रह करत अरेरावी करण्यात आली होती 

 

 त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून एअरटेल कंपनीला पत्र लिहून ग्राहकांसाठी मराठी हेल्पलाइन सेवा सुरू करण्याची मागणी केली होती...

 

 शिवाय मराठी हेल्पलाइन सेवा सुरू न केल्यास  एअरटेल गॅलरी राहणार नसल्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक  अखिल चित्रे यांनी दिला होता 

 

 त्यानंतर एअरटेल कंपनीकडून ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र देण्यात आले असून हेल्पलाइन सेवेमध्ये मराठी भाषा वापरली जाणार असल्याचं सांगितला आहे 

 

 त्यामुळे हेल्पलाइन सेवेमध्ये मराठी भाषा आता एअरटेल गॅलरीमध्ये संवाद दरम्यान वापरल्याचा पाहायला मिळेल
माथेरान सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा बंद

माथेरान पर्यटन बचाव समितीने पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी कालपासून माथेरान बंद आंदोलन सुरू केलं आहे.आज सुद्धा या बंद ला स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांकडून पाठिंबा मिळाला आहे.पुढील  काही दिवस माथेरानमध्ये हॉटेल, रिक्षा, आणि अन्य व्यवसाय बंद राहणार आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही होत नसल्याने ही बंदची हाक सुरूच आहे.

अटक पूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकर अर्ज करणार

अटक पूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात अर्ज करणार आहे.


इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा प्रशांत कोरटकरवर आरोप आहे.
कोल्हापूर मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल आहे.


प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारी पासून फरार असून अटकपूर्व जमीन मंजूर असतांना देखील प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे पुढे आला नाही हे विशेष आहे ..


अटकपूर्व रद्द झाल्या नंतर कोल्हापूर पोलिसांचे दोन पथक प्रशांत कोरटकरच्या मागावर आहे.

मुंबईत मनसेकडून मुंबई अध्यक्षपद निर्माण केलं जाणार 

मुंबईत मनसेकडून मुंबई अध्यक्षपद निर्माण केलं जाणार 


त्याचसोबत तीन मुंबई उपाध्यक्ष नेमले जाणार 


आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चेबांधणी सुरू


मुंबईत आता मनसे संघटनात्मक रचनेत भर देणार


मनसेकडून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आता केंद्रीय समिती गठित केली जाणार 


या केंद्रीय समितीची दर पंधरा दिवसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार

राज्याचे मंत्री नितेश राणे दिल्ली दौऱ्यावर

राज्याचे मंत्री नितेश राणे दिल्ली दौऱ्यावर


बंदर आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या अनुषंगाने बैठक


या विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट


हा शासकीय दौरा असल्याची नितेश राणे यांची माहिती

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्टोफर लॅक्सन आज महाराष्ट्र दौऱ्यावर

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्टोफर लॅक्सन आज महाराष्ट्र दौऱ्यावर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची भेट


कुलाबा येथील हॉटेल ताजमहाल पॅलेस याठिकाणी दुपारी १२.३० वाजता होणार भेट


न्यूझीलंड व महाराष्ट्र संबंध दृढ करण्याबाबत होणार चर्चा

नवापूर तालुक्यातील बिलमांजरे फाट्याजवळ असलेल्या खांडसरीला भीषण आग

नंदुरबार:- नवापूर तालुक्यातील बिलमांजरे फाट्याजवळ असलेल्या खांडसरीला भीषण आग...


खांडसरी निघणारे वेस्टेज आणि साठवून ठेवलेले इतर साहित्याला आग...


आगीचे रुद्र रूप काही क्षणातच जवळ असलेले घर जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान


नवापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आगीवर मिळविले नियंत्रण

देशातील बॅंकांकडून मार्च महिन्यातच दोन दिवसीय संपाचे हत्यार

देशातील बॅंकांकडून मार्च महिन्यातच दोन दिवसीय संपाचे हत्यार


सरकारी आणि काही खासगी बॅंका २४ आणि २५ मार्च रोजी संपावर जाणार


विविध मागण्यांसाठी बॅंक कर्मचारी संघटनांकडून संपाचे हत्यार


युनायटेड फोरम आॅफ बॅंक  युनियन्सकडून संपाची हाक


सलग चार दिवस बॅंका बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार


पाच दिवसांचा आठवडा, नोकरभरती आणि संचालक मंडळावर एका कर्मचारी किंवा अधिकाऱ्याची नेमणूक करायची असते ती होत नसल्याने ऐन मार्चमध्ये संप

दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहायक वकील डोंगरे यांचे अपहरण नव्हे तर अपघात

स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहायक वकील डोंगरे यांचे अपहरण नव्हे तर अपघात


वकिलाला अपहरण, मारहाण नव्हे तर अपघातामुळे जखमा


पुण्यातील वकील साहिल डोंगरे यांचा अपघात होऊन जखमी झाल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण


दारू पिऊन वकील डोंगरे एका हॉटेल मध्ये बाहेर पडत असल्याचे सीसीटिव्हीमधून समोर

महाल भागात झालेल्या तणावामुळे महापालिकेच्या परिवाराच्या 22 मार्गावरील 75 बसेसचे संचालन प्रभावित 

- महाल भागात झालेल्या तणावामुळे महापालिकेच्या परिवाराच्या 22 मार्गावरील 75 बसेसचे संचालन प्रभावित 


- 11 मार्गावरील बसेसचे संचालन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले तर 11 मार्ग डायव्हर्ट  करण्यात आले 


- पोलिसांनी कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ज्या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे त्यामुळे बस संचालन होऊ शकले नाही 


- अकरा मार्गावरील बस संचालन पूर्णपणे बंद असल्याने 40 फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत 


- परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच बसेसचे संचालन पूर्ववत होईल असे मनपाच्या परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे

नागपुरमध्ये झालेल्या दंगलीचा तपास नागपूर स्थानिक पोलिसांबरोबर समांतर तपास

नागपुरमध्ये झालेल्या दंगलीचा तपास नागपूर स्थानिक पोलिसांबरोबर समांतर तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) ही करणार


नागपूरमध्ये झालेली दंगल ही पूर्व नियोजित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले


जाणीवपूर्वक ही दंगल पेटवण्यात आल्यने त्यामागे कोण आहे. कुठल्या संघटना या मागे आहेत याचा तपास आता  ATS ही स्वतंत्र करणार आहे


सध्या तरी नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे


सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात आक्षपार्ह गोष्टी पोस्ट केल्या जातात त्यावर सायबर पोलिस नजर ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली

नांदूरमधमेश्वर गावात बिबट्याने केली कुत्र्याची शिकार...

निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर गावातील संदीप उबाळे या शेतकऱ्याच्या घराबाहेर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवत शिकार केली असून शिकारीनंतर कुत्र्याला तोंडात उचलून घेऊन बिबट्याने धूम ठोकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.बिबट्याच्या शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेतकऱ्याने माहितीसाठी व्हायरल केला..परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी निफाड वनविभागाकडे करण्यात आली.

सैलानी बाबा दर्गा परिसरात बॉम्ब ठेवल्याच्या माहितीने खळबळ

सैलानी बाबा दर्गा परिसरात बॉम्ब ठेवल्याच्या माहितीने खळबळ.


पोलिसांनी व बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण परिसर काढला रात्रभर शोधून.


कुठेही विस्फोटक किंवा आक्षेपार्ह वस्तू न मिळाल्याने ठरली अफवा.


माहिती देणारा निघाला मनोरुग्ण , अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती.


सध्या सैलाणी बाबांची यात्रा सुरू असून देशभरातील लाखो भाविक सैलानित आहेत.


आज सैलानी बाबाचा संदल निघणार असल्याने आज मोठी गर्दी आहे.


पोलिसांचा चोख बंदोबस्त.

शेतकऱ्यांनी हमीभावाप्रमाणे विकलेल्या सोयाबीनचे शासनाकडे ४ कोटी रुपये थकीत

धाराशिव जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाल्याने ३५ हजार ४०३ शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी केली होती.यामध्ये केवळ १४२५६ शेतकऱ्यांच्या ३ लाख ७५ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी झाली यापैकी २१९७ शेतकऱ्यांचे ४ कोटी रुपये अजुनही शासनाकडे थकीत आहेत दरम्यान सोयाबीनचे पैसे तातडीने मिळावे अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची मोठी कारवाई

औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची मोठी कारवाई


सोशल मिडीया आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबत 08 गुन्हे दाखल 


सोशल मिडीयावरील एकुण 506 आक्षेपार्ह पोस्ट सायबर पोलिसांकडून डिलीट 


व्हॉट्सॲप, फेसबुक, इंन्स्टाग्राम, X (ट्विटर) आणि यु-टूब सारख्या सोशल मिडीयावर पोलिसांची सायबर पेट्रोलिंग


व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास ग्रुप एडमिनवर देखील गुन्हयात जबाबदारी निश्चीत करण्यात येईल

संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नाही

सध्या तरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नाही..


संचारबंदी हि अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे.


परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदी मध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

नागपूरच्या हंसापुरी पुन्हा तणाव निर्माण झाला होता-

नागपूरच्या हंसापुरी भागात रात्री 11 वाजताच्या सुमारास परत एकदा काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता


संचारबंदी असतांना गुप्ता नावाच्या एका इसमाने आपले दुकान उघडले होते. त्याला घेऊन इतर दुकानदारांनी त्यावर आक्षेप घेत एकत्र जमायला सुरवात केली.


मात्र पोलीसांनी वेळीच हस्तेक्षेप करत गर्दीला पांगवाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

बनावट ड्रायव्हिग लायसन्स प्रकरणी अंधेरी आरटीओतून दोन अधिकार्यांचे निलंबन

बनावट ड्रायव्हिग लायसन्स प्रकरणी अंधेरी आरटीओतून दोन अधिकार्यांचे निलंबन


सहाय्यक आरटीओ रावसाहेब रगडे आणि मोटार वाहन निरीक्षक उमेश देवरे अशी या निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावे आहेत


या दोघांवर २०२३-२४ मध्ये ७६ हजार ३५४ लायसन्स हे देण्यात आले आहे


मात्र आॅडीट दरम्यान देण्यात आलेल्या लायसन्समध्ये दैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर परिवहन विभगाने या दोघांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली


ज्यावेळी हा गैरव्यवहार समोर आला त्यावेळी रगडे हे पूर्वेतील आरटीओ कार्यालयात कार्यरत होते तर देवरे हे मध्य परिवहन विभागमध्ये कार्यरत होते


ऑनलाइन 'सारथी' डेटाबेस वापरून १.०४ लाख ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमित तपासणीदरम्यान हा घोटाळा उघडकीस आला.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. तर सध्यातरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नाही. संचारबंदी अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीमध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या घडामोडींसह राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.