Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर

Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मुकेश चव्हाण Last Updated: 18 Mar 2025 01:56 PM
नागपूरमधील हिंसाचारामुळे राजकीय वातावरण तापलं,मंत्री नितेश राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

नागपूरमधील हिंसाचारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं 


मंत्री नितेश राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दालनात बोलवून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी 


मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांची देखील भेट 


दरम्यान, स्नेहभोजनाच्या निमंत्रणासाठी भेट झाल्याची देखील माहिती

खरा देवगड हापूस कसा ओळखायचा?

खरा देवगड हापूस कसा ओळखायचा?



देवगड हापूस म्हणून अनेकांची फसवणूक होते मात्र ही फसवणूक रोखण्यासाठी आता टेक्नोलॉजीचा वापर केलाय. या टेक्नोलॉजीमुळे नागरिकांना खरा देवगड हापूस ओळखणं सोप होणार आहे. यासाठी प्रत्येक आमच्यावर TP seal UID कोड लावण्यात आलाय. त्यामाध्यमातून खरा देवगड ओळखत येणार आहे. GI नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनादेखील याचा फायदा होणार आहे. 


 


TP Seal UID स्टिकर technology  कशी काम करते?


देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने GI नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार TP Seal UID वितरित केले आहेत. 


शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल. 


• प्रत्येक स्टीकर दोन भागात विभागलेला एक स्वतंत्र युआयडी असतो. त्या कोड चा एक भाग स्टीकर च्या वरती आणि दूसरा भाग स्टीकर च्या खाली असतो. 
• आपल्याकडील आंबा देवगड चाच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी +91 9167 668899 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून फोटो पाठवायचा आहे.  
• ही सिस्टम (प्रणाली) त्या स्टीकर वरील कोड वाचते आणि स्टीकर च्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते. नंबर वाचण्यासाठी स्टीकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात. 
• जर व्हॉट्सअॅप द्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टममधील UID शी जुळला, तर ग्राहकास शेतकरी/विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, GI नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील पाठवला जाईल. 


या पडताळणी प्रक्रियेमुळे ‘देवगड हापूस’ बाबत ची विश्वसनीयता वाढेल.

ग्राहकांनी बँकेत पैसे ठेवण्या पेक्षा सोन्याचे नाणे खरेदी करून,सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न

गेल्या दोन वर्षभराचा विचार केला तर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे
सोन्याच्या या वाढत्या दराच्या मुळे ,गुंतवणूकदाराना  बँकेच्या व्याज दराच्या पेक्षा सोन्याच्या दरात मोठा परतावा मिळत असल्याने,अनेक ग्राहकांनी बँकेत पैसे ठेवण्या पेक्षा सोन्याचे नाणे खरेदी करून,सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे
गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या सह सोने व्यावसायिक यांच्या सोबत चंद्रशेखर नेवे यांनी बातचीत केली आहे
पाहूया
गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या दरात पंधरा हजार रुपयांची तर वर्ष भरात बावीस हजार रुपयांची वाढ सोन्याच्या दरात झाली आहे
जागतिक पातळीवर युद्ध जन्य परिस्थिती मुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूक दारानी,सोन्याच्या मधे गुंतवणूक केल्याने,सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे
गेल्या वर्षी जी एस टी सह 76000 हजार रुपये वर असलेली सोन्याची किमती आज 91000 हजार रुपयांच्या वर पोहोचले आहेत
अजूनही सोन्याचे दर वाढतच राहतील असा अंदाज असल्याने, जळगाव चे सुवरन नगरीत सोन्याचे दागिने खरेदी करण्या सोबत सोन्याचे नाणे खरेदी करून गुंतवणूक करण्या कडे ग्राहकांचा कल असल्याचं पाहायला मिळत आहे
Byte
सुवर्ण व्यावसायिक आणि ग्राहकांच्या सोबत चंद्रशेखर नेवे यांनी बातचीत केली आहे

सोलापुरात आरपीआय आठवले गटाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि धरणे आंदोलन 

सोलापूर ब्रेकिंग 
---


सोलापुरात आरपीआय आठवले गटाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि धरणे आंदोलन 


बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आंदोलन 


आरपीआयचे प्रदेशध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात बौद्ध समाजाचे आंदोलन 


सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने 

नागपूरच्या हंसापुरी भागात  देखील मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची जाळपोळ

हंसापुरी केस स्टडी 2
( आशा खोब्रागडे )


नागपूरच्या हंसापुरी भागात  देखील मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली. एकाच परिसरात 15 वाहनांची जाळपोळ करण्यात आली . यात आशा खोब्रागडे यांच्या एकट्यांच्या घरच्या 3 दुचाकी जाळण्यात आल्या. ठराविक समुदायांच्या घरांना ठरवून लक्ष केल्याचा आरोप आशा खोब्रागडे यांनी केला. 

नागपुरात माथे फिरूंनी घातलेल्या धुळगुसामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम

Crane Move


नागपूरच्या चिटणीस पार्क आणि अवतीभवतीच्या भागांमध्ये काल झालेल्या गदारोळाचा विकास कामांवरील अत्यंत विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.. कारण काल ज्या भागात तोडफोड, जाळपोळ, दगडफेक झाली होती, त्या भागातून नागपूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा तब्बल नऊ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल जात आहे.. सध्या या उड्डाणपुलाचा निर्माण कार्य सुरू असून काल रात्री ज्या ठिकाणी जाळपोळ झाली, त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणाऱ्या एनसीसी कंपनीच्या दोन क्रेन आणि जेसीबी जाळून टाकण्यात आल्या..  


त्यानंतर कंत्राटदाराने दक्षता म्हणून सुरक्षेसाठी आपला सर्व साहित्य आणि मोठ्या मशिनरीज त्या ठिकाणातून उचलल्या आहे... घटनास्थळी क्रेन आणून मोठमोठे जनरेटर उचलून ट्रकवर लादून ते सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.. त्यामुळे येणारे काही दिवस तरी उड्डाणपूलचा बांधकाम स्थगित राहील अशीच शक्यता आहे.. त्यामुळे काही माथे फिरूंनी घातलेल्या धुळगुसामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे...

संजय राऊत आणी उद्धव ठाकरे यांच्या मनात औरंगजेब बद्दल सहानुभूती आहे का? किरीट सोमय्यांचा सवाल

अमरावती


किरीट सोमय्या ऑन नागपूर दंगल 


काही लोकांना औरंगाझेबला हिरो करायचे आहे... ही गोष्ट हिंदुस्थान आणी महाराष्ट्र सहनच करू शकत नाही...


सरकारी मंत्री असो किंवा सरकारी यंत्रणा असो त्यांनी सुद्धा थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे... कारण औरंगझेब हा एक नंबरचा क्रूर होता हा इतिहास आहे...


औरंगजेबच कोणी कौतुक करत असेल तर आम्ही सहन करू शकणार नाही पण, सरकारचे काही बंधन आहेत म्हणून त्या वास्तूचे रक्षण करावे लागत आहे...


 किरीट सोमय्या ऑन संजय राऊत.. 


संजय राऊत आणी उद्धव ठाकरे यांच्या मनात औरंगजेब बद्दल सहानुभूती आहे का? 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक भक्ताची, मग तो मंत्री का असे ना, त्याची इच्छा आहे की औरंगजेबची कबर असता कामा नये...


सरकारच्या काही मर्यादा असतात..ती जी काही वास्तू आहे त्याचं न्यायालयच्या निर्णयाप्रमाणे जे काही व्हायचं ते होईल, पण तो पर्यंत सरकारने त्याची काळजी घ्यावी...

ही दंगल सरकार,  फडणवीस पुरसकृत आह: मनोज जरांगे

वेरूळ मध्ये मालोजी राजांची गढी आहे तिथे आज शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली.. यावेळेस  शहाजीराजे भोसले यांना मानवंदना अर्पण करण्यात आली, जरांगे पाटील आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते...


जरांगे पॉइंटर्स 


निवडणूक आल्या की  वाद उकरतात समाजाने सावध राहणे गरजेचे आहे, हे सगळे कावे आहेत कबर इथं दंगल नागपूरला,  पैसे हेच देतात सरकार यांचेच कबर काढा ही तुम्हीच... म्हणतात  इथल्या मुसलमान लोकांना कबरीच्या प्रेम असणे गरजेचे नाही,  ही दंगल सरकार,  फडणवीस पुरसकृत आहे, याना तो कोरटकर सोलापूरकर दिसत नाही का...
तिथं हिंदुत्व जळते का,  निवडणूक तोंडावर ठेवून असले वाद करतात, बरं रक्षण ही तुम्ही करतात
बरं ते मूर्ख तर तुम्ही ही मूर्ख का इथं माझ्या मताला काय किंमत, सरकारचे लोक म्हणतात कबर हटाव, गोरगरिबांना अडचणीत आणतात हे बस


 मराठा आरक्षण दिले नाही सरकार आश्वासन पूर्ण करत नाही...
 मुस्लिम जनतेला आवाहन कबरीवर प्रेम करू नका


 सरकार तुमचे आहे कबर काढायची तर काढू शकता फक्त, गोरगरिबांना जुंझवू नका


तेलंगणा ने 42 टक्के ओबीसी आरक्षण दिले पण महाराष्ट्रात करणार नाही फडणवीस करनार नाही लोकांनी शांत राहावे आणि पोटापाण्याची काम करावे, दंगली नाही...

मविआच्या काळात बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना बदलविण्यासाठी धनंजय मुंडेंचा आपल्यावर दबाव: अनिल देशमुख

Akola Flash : 


महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना बदलविण्यासाठी धनंजय मुंडेंचा आपल्यावर दबाव होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा अकोल्यात मोठा गौप्यस्फोट. आपल्या पसंतीचे अधिकारी देऊन गुंडांना संरक्षण देण्याचा मनसुबा आपण यशस्वी होऊ दिला नाही. देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट. आपण धनंजय मुंडेंचं ऐकलं नाही म्हणून त्यांनी आपली तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होतीय. आपण आपल्या मंत्री पदाच्या काळात चुकीच्या गोष्टींना थारा दिला नाही. अनिल देशमुखांचा निर्वाळा. त्यावेळी नेमक्या कोणत्या पोलीस अधिक्षकांच्या बाबतीत मुंडेंनी बदलीसाठी आग्रह केला होता हे सांगणं देशमुखांनी टाळलंय. या काळात हर्ष पोद्दार आणि जी. श्रीधर होते बीडचे जिल्हा पोलीस अधिक्षक. 



साऊंड बाईट : अनिल देशमुख, माजी गृहमंत्री. 


पॉईंटर्स : 


# गृहमंत्री असताना कधीही बीड जिल्ह्याचे वातावरण खराब होऊ दिले नाही, आणि कुणालाही अशा पद्धतीने गुडांना संरक्षण दिल नाही. : अनिल देशमुख. 


# गृहमंत्री असताना बीड जिल्ह्याचे SP बदलण्यासाठी धनंजय मुंडे हे माझ्या खूप पाठीमागे लागले होते.. 


# त्यांचं ऐकलं नाही तर मुंडेंनी माझी तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली.. अनिल देशमुख यांचा गौप्यस्पोट.  


# गुंडांना संरक्षण देण, पसंतीचे अधिकारी देणं, अशा पद्धतीने गृहमंत्री असताना कधीही वातावरण होऊ दिलं नाही.

काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या, त्याला आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले: उदयनराजे भोसले्

नवी दिल्ली 


उदयनराजे भोसले, खासदार , भाजप


छत्रपती शिवाजी महाराजाची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही 


पण शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे काम मोदीजींनी केले


शिवाजी महाराजांचा शासनामान्य इतिहास प्रसिद्ध करावा 


शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो 


नागपूरात जे झालं ते समाज कंटकांनी केली 


हे लोक जातीचे नसतात 


ऑन प्रदीप पुरोहित, सुधांशू त्रिवेदी 


यांना शासन झालं पाहिजे अस भूमिका आम्ही मांडलीच आहे 


कायद्यात बदल करणे गरजेचे आहे 


दहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा व्हावी


उदयनराजे भोसले, खासदार , भाजप ऑन दंगल


काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या 


नेहमी दंगली व्हवायच्या 


त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले

संचारबंदी लागू केलेली असताना काल दगडफेक, जाळपोळ झालेल्या भागात जाणे योग्य नाही: चंद्रशेखर बावनकुळे

संचारबंदी लागू केलेली असताना काल दगडफेक, जाळपोळ झालेल्या भागात जाणे योग्य नाही असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावित क्षेत्रास न जाण्याचे ठरवले आहे...*त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता पोलिसांवरचा ताण नाहक वाढेल असं चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे...( एबीपी माझाशी दूरध्वनीवर बोलताना बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे..)


पोलिसांची माहिती घेतल्यानंतर बावनकुळे आता जखमी पोलिसांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहे...

रुई शिवारात अनोखा पदार्थ जमिनीबाहेर, शेतकऱ्यात भीतीचे वातावरण ; महावितरणचे दुर्लक्ष

रुई शिवारात अनोखा पदार्थ जमिनीबाहेर, शेतकऱ्यात भीतीचे वातावरण ; महावितरणचे दुर्लक्ष


AR: नांदेडच्या नायगांव तालुक्यातील रुई शिवारात एका शेतात जमिनीतुन कोळसा सदृश्य पदार्थ बाहेर येतोय. त्यामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 33 KV च्या उच्च दाबाच्या विजवाहिनीच्या खांबाला सपोर्ट करणाऱ्या जागेतून हा प्रकार झालाय. त्यामुळे स्थानिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले मात्र कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलय. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान विद्युत घर्षणातून उन्हाळ्यात असा प्रकार होऊ शकतो असा आजवरचा अनुभव आहे. मात्र रुई या शिवारातील या घटनेची तपासणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केलीय. 

सुरक्षेच्या कारणास्तव सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड शहर पोलीस ठाण्यात हलविले 

ब्रेकिंग..


सुरक्षेच्या कारणास्तव सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड शहर पोलीस ठाण्यात हलविले 


सतीश भोसले उर्फ खोक्या याची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. शिरूर न्यायालयाने खोक्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तीन दिवस त्याचा मुक्काम शिरूर पोलीस ठाण्यात होता. परंतु सुरक्षेच्या काही कारणास्तव त्याला बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत आणण्यात आले आहे. 20 मार्च रोजी खोक्या भोसलेची कोठडी संपणार आहे. परंतु शिरूर पोलीस ठाण्यात येणारे अडथळे लक्षात घेता सुरक्षेचे कारण देत त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात हलविण्यात आले आहे.

नागपूर घटनेचे ट्रिगर पॉईंट शोधू.. आता    शांतता प्रस्थापित करणे महत्वाचे: चंद्रशेखर बावनकुळे

बावनकुळे


घटना दुर्भाग्यपूर्ण.... मुख्यमंत्री मिनिट to मिनिट माहिती घेताय 


34 पोलीस जखमी आहे... 5 नागरिक जखमी 


50 ते 55 वाहने जाळले


सोशल मीडियातून वातावरण बिघडले...


शांततेचे आवाहन आम्ही सातत्याने करतोय


पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली...


हात जोडून विनंती आहे.. सर्वजण नागपूरचा संस्कृतीक इतिहास जोपसावा...


विरोधी पक्षाने पोलिटिकल पाहू नये....


सर्व पक्ष, संघटना यांना विनंती करावी की आपण सलोखा ठेवावे


ट्रिगर पॉईंट शोधू.. आता    शांतता प्रस्थापित करणे 


कॉल रेकॉर्ड, cdr काढावे लागेल...


शासन कडक कारवाई करेल 


पोलीस ढाल होते.. सगळ्यात जखमी झाले.. पोलिसांनी ढाल बनले म्हणून दोन समाजमध्ये 


5 Fir दाखल झालेय... 50 जण  ताब्यात घेतले आहे


सोशल मीडियातून वातावरण बिघडल...


देवेंद्रजींनी माहिती मिळताच पाऊल उचलले... सरकारच फ्ले्युअर कसे म्हणता... पोलिसांनी जिवाची पर्वा न करता ढाल म्हणून उभे 


पुढे येणारी शोभयात्रा 


--  सर्व धर्माचे लोक समजदार आहे... भेदभाव नाही 


नुकसान पंचनामा सुरु केलीय

महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट – प्रकाश आंबेडकर 

मुंबई  :  नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे."


ॲड. आंबेडकर यांनी हे देखील स्पष्ट केले की, "हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा."


ॲड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.


सध्या नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात ॲड. आंबेडकर यांच्या या वक्तव्याने समाजात शांतता आणि संयम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

सीताराम घनदाटांच्या पक्षप्रवेश, रविंद्र चव्हाणांनी केले पक्षात स्वागत

रवींद्र चव्हाण -


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक पक्षात येत आहेत.


आज अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सीताराम घनदाट यानी भाजप नेतृत्वावर विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. पक्षात त्यांच स्वागत आहे.


या लोकांच्या नक्कीच पक्षाला फायदा होईल, पक्षसंघटन वाढेल.


काही वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यानीही आज पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांचेही स्वागत.

छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी नगरसेवक भाजपच्या गळाला 

छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी नगरसेवक भाजपच्या गळाला 


भाजपकडून महाविकास आघाडीला संभाजीनगरात धक्का देण्याचा प्रयत्न 


आज दुपारी १२ः३० वाजता संभाजीनगर येथील शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकासह काही महत्वाचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार 


भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी

- शिरूर कासार 
- ब्रेक


- सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी.


- शिरूर कासार न्यायालयाने पोलीस कोठडी सूनावल्या नंतर 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यात होता मुक्काम.



- सुरक्षेच्या कारणास्तव सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवल्याची माहिती.


- मध्ये रात्री बारा वाजता शिरूर कासार पोलीस ठाण्यातून बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी.


- 20 मार्च रोजी संपणार आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेची पोलीस कोठडी.

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर, अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी केली रामराजेंवर टीका

सातारा:माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर, अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी केली रामराजेंवर टीका


सातारा:फलटण तालुक्यातील राजाळे येथे काही युवकांचा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पाडला. यावेळी त्यांनी आमच्याकडे इन्कमिंग सुरू झाले असून सावध राहा असा इशारा माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना दिला होता. याला माजी सभापती रामराजे यांच्याच पक्षाचे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी प्रतिउत्तर देत अजित पवार गटात कोणतेही प्रवेश झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे.


बाईट: सचिन पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)



 यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर रामराजेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत वैयक्तिक टीका टाळावी आपण किती उद्योग काढले? किती तरुणांना नोकऱ्या दिल्या? हे अगोदर तपासा. आम्ही आमच्या नेत्यावर केलेली कोणतीही टीका सहन करणार नसल्याची  प्रतिक्रिया यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिली.


बाईट: सचिन पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)

नागपूरच्या हिंसाचारामागे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच नितेश राणेंसारख्या काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं, अनिल देशमुखांचा आरोप

अँकर : नागपूरच्या हिंसाचारामागे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच नितेश राणेंसारख्या काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होतेय. मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना खडसावलं पाहिजे असं ते म्हणालेय. गेल्या काही दिवसातील फडणवीस मंत्रिमंडळातील काही मंत्री, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेय. नागपुरात सर्वात आधी शांतता प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहेय. त्यानंतर या विषयावर राजकारण करता येईल असं अनिल देशमुख म्हणालेय.


बाईट : अनिल देशमुख, माजी‌ गृहमंत्री.

नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत कडेकोट पोलिस बंदोबस्त

भिवंडी 


नागपूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील अति संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भिवंडी शहराची संवेदनशीलता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी परिमंडळ दोनच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.


शहरातील अति संवेदनशील तसेच गर्दीच्या भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, गस्तीदेखील तीव्र करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.


शहरात शांतता टिकावी यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या असून, कोणत्याही अप्रिय घटनेला थांबवण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नागपूर मधील रात्रीचा हिंसाचार, खबरदारी म्हणून मिरज शहरात सकाळपासून राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात


Anchor-: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर मध्ये हिंसाचार उफळल्यानंतर राज्यातील संवेदशील असलेल्या शहरांमध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज या शहराचा देखील संवेदनशील शहरात समावेश होतो. त्यामुळे आज सकाळपासून खबरदारी म्हणून मिरज शहरात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी लक्ष्मी मार्केट चौकात तैनात करण्यात आलेय. नागपूर मधील रात्रीच्या हिंसाचारानंतर सांगली मिरज या भागात देखील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क असून खबरदारी म्हणून ठिकाठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

नागपूरच्या 15 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी लावण्यात आली

नागपूरच्या 15 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी लावण्यात आली


औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.

नागपुरात दोन गटात दंगल !! जे पेराल तेच उगवत!! अभिनेते विद्याधर जोशी यांची फेसबुक पोस्ट

नागपुरात दोन गटात दंगल !!
जे पेराल तेच उगवत!!


 गाडला होता ना एवढे वर्ष त्याला. जमिनीत झोपला होता तो.काही फरक पडला होता??


ढोसून ढोसून उकरून बाहेर काढलंत त्याला. आता त्याचं भूत तुमच्या खांद्यावरती बसून खादाखदा हसेल आणि त्या भुताला ताकद, बळ कोण देतय तर ज्यांची शिवराय संभाजी आणि जिजाऊ यांची नाव मनात आणण्याची सुद्धा लायकी नाही असे राजकीय पुढारी!!
 
खरी खोटी बातमी पसरली की लगेच उतरले सगळे गट राडे करायला!!
इतके भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी औरंगजेब आजुबाजूला आहेत, त्यांचे पुतळे यांना कधी जाळावे असे वाटत नाही. त्यांना कबरीत गाडाव ,त्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्य लोकां विरुद्ध आंदोलन करावं असं वाटत नाही आणि निघाले so called धर्माभिमानाचा झेंडा खांद्यावर घेऊन.
अर्थात ह्यांनी भडकवल्यावर आपण भडकणारी मूर्ख जनता ही कारणीभूत आहोत त्याला !!

रामगिरी महाराज ऑन औरंगजेब  कबर आणि नागपूर दंगल

Exclusive


औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता औरंगजेबाने मंदिरे पाडून मसजीती बांधल्या,यासोबतच त्याने कुंभमेळ्यावर देखील हल्ला केला होता,संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तनासाठी त्याने  मारले.अश्या क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची जी मागणी सुरू आहे त्याला आमच समर्थन आहे असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.


 


नागपूर येथे झालेल्या दंगली बाबत देखील रामगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहेत, ही दंगल पूर्वनियोजित असून तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे...


सध्या अराजकता पसरवली जात आहे याच कारण मुस्लिम धर्मियातले काही धर्म गुरू हे लहान पानापासून मुलांना भलकवण्याच काम करतात असेही विधान महंत रामगिरी महाराजांनी केले आहे....

गंगाखेडचे माजी आमदार सिताराम घनदाट यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश 

Chk BJP office output


गंगाखेडचे माजी आमदार सिताराम घनदाट यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश 


भाजप  कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश. 


२००४ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले होते. 


२००९ साली विधानसभा निवडणूक ८२ हजार मतांनी निवडून आले होते


सिताराम घनदाट हे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत.

नागपूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे SP Office मध्ये पोहोचले

ब्रेकिंग 


नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे पोलीस आयुक्त कार्यलयात पोहचले


वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकार्त्यांसोबत बैठक सुरु

मुलगी घराच्या आत शिरताच घरावर मोठ्या प्रमाणावर दगडांचा वर्षाव, नागपूर राड्यात कालची परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरुण मुलगी घराबाहेर असेल आणि घराच्या प्रवेश दारावर दंगल उसळली असेल, तर तिच्या आईवर काय परिस्थिती उद्भववेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही... अशीच  परीस्थिती स्वाती दहीकर यांच्यावर ओढवली होती... त्यांची मुलगी आस्था कॉलेजमधून परत येत असताना स्वाती यांच्या वस्तीत मोठी दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुरू झाली अशा अवस्थेत मुलीला अनेक फोन करून लवकर घरी बोलावलं. मुलगी घराच्या आत शिरताच घरावर मोठ्या प्रमाणावर दगडांचा वर्षाव झाला...कालची परिस्थिती सांगताना स्वाती यांचे अश्रू अनावर झाले.. 


तर मुलगी आस्थाही कशा भयावह परिस्थितीत घरापर्यंत पोहोचली याचा  कथन तिने एबीपी माझाशी बोलताना केलाय.. अगदी रस्त्यात जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना कसतरी घरी पोहोचल्याच तिनं सांगितलं...


घरी ब्रेन स्ट्रोक झालेले आजोबा आतल्या खोलीत असताना बाहेर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही दहीकर कुटुंबाने बाहेर काय सुरू आहे हे सांगितलं नव्हतं अजूनही त्यांना काल वस्तीत काय घडलं हे सांगितलं नाही त्यांच्यासमोर जाताना चेहऱ्यावर हास्य घेऊनच जावं लागत आहे अशा परिस्थितीत हे कुटुंब जगतय...

राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही - हायकोर्ट

राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही - हायकोर्ट


एमएमआरडीए आणि राज्य सरकारला मोठा दिलासा


एका पत्रकारानं दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली 


सरकार आणि मेघा इंजिनिअरिंग या कंपनीनं याचिकेच्या वैधतेवरच सवाल उपस्थित करत याचिका फेटाळण्याची केली होती मागणी


मेघा इंजिनिअरींग या खासगी कंपनीकडून एमएमआरडीएला 16 हजार 600 कोटींची बँक गँरंटी 


युरोपातील सेंट लुशिया स्थित 'युरो एक्झिम बँक' या आरबीआयकडून मान्यता प्राप्त नसलेल्या परदेशी बँकेकडून दिलेली बँक गँरंटी कायदेशीर कशी?, याचिकेत उपस्थित केला गेला होता सवाल


मेघा इंजिनिअरिंग कंपीनचं नाव इलेक्टोरल बाँड घोटाळ्यात सर्वाधिक निधी देणारी दुस-या क्रमांकाची कंपनी, त्यामुळे यात राजकारण्यांचे लागेबांधे असल्याचाही केला गेला होता याचिकेतून आरोप

नागपूर राड्यानंतर औरंगजेबाच्या कबरीजवळ अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था

नागपूरच्या घटनेनंतर खुलताबादत औरंगजेबाच्या कबरीजवळ अतिरिक्त ची सुरक्षा व्यवस्था. आत मध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची फिजिकली आणि मेटल डिटेक्टर द्वारे चेकिंग केली जाते आहे. खुलताबाद आणि परिसरामध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. आत मध्ये आणि बाहेर दोनही ठिकाणी आज कशी सुरक्षा व्यवस्था आहे.

बुलढाणा पोलीस हे इंग्रजांपेक्षाही जास्त दादागिरी करत: रविकांत तुपकर

बुलढाणा


रविकांत तुपकर बाईट्स


अगदी इंग्रजांप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांना रातोरात घरातून उचलून अटक केली आहे बुलढाणा पोलीस हे इंग्रजांपेक्षाही जास्त दादागिरी करत आहे.


मी मुंबईत पोहचलो असून मी भूमिगत आहे


सत्याग्रह करणे हा आमचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सोयाबीन कापसाला भाव ही आमची मागणी आहे.


उद्या आमचं मुंबईत आंदोलन होणार म्हणजे होणारच... सरकारने कितीही दडपशाही केली तरी आम्ही आंदोलन करणारच.


पांढरपेशी गुंड मोकाट फिरतात त्यांना अटक करायला पोलिसांना वेळ नाही मात्र शेतकऱ्यांसाठी न्याय मागणाऱ्या नेत्याला अटक करण्यासाठी हे तत्परता दाखवतात.

नागपुरच्या राड्याचा घटनाक्रम कसा होता?

घटनाक्रम 


काल 1 वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी काल दुपारी बारा  वाजता महालच्या शिवाजी चौकात आंदोलनाला एकत्र आले 



 काल 1:30 वाजता - आंदोलनादरम्यान चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली.औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. 
औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला. 



मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली.


दुपारी 3 वाजता : दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेत विरोध नोंदविला 



दुपारी 3:30 वाजता पोलिसांनी परिस्थिती शांत केली



दुपारी 4 वाजता :  विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात एकत्र यायला सुरवात झाली 



सायंकाळी 5 वाजता : औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र समाजमाध्यमांवर वायरल झाले.


रात्री सात वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून व मुस्लिम गटाकडून  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकमेकांच्या विरोधात नारेबाजी सुरु झाली 


सायंकाळी 7 वाजता पोलीसांनी अधिकची कुमक मागवून घेतली 


रात्री साडेसात वाजता पोलिसांनी दोन्ही गटाला आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.


रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला. त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.


– रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे वाद चिघळला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.


दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.


– दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरु केले. काहींनी जाळपोळ केली.


– रात्री ८.४० पासून वाजतापासून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली 


रात्री - 9 वाजता एका गटाकडून भालदारपुरा व चिटणवीस पार्क परिसरात भागात जेसीबी व वाहनांची जाळपोळ सुरु झाली. काही स्थानिकांच्या घरांवर हल्ले झाले 



दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलीस देखील रस्त्यावर उतरली 


रात्री 10:30 नंतर पोलीसांनी दंगलखोरांनी धरपकड सुरु केली 



रात्री 12 वाजता हंसापुरी व गीतांजली थेटर परिसरात काही वाहनांची तोडफोड करत स्थानिकांच्या  घरांवर हल्ले करण्यात आले 


रात्रभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु करत 46 आरोपींना ताब्यात घेत गणेशपेठ पोलिसठाण्यात आण्यात आले.


प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्यात आली

मुख्यमंत्र्यांच नागपूर जळत आहे हे दुर्दैवी, याला मुख्यमंत्री जबाबदार : वर्षा गायकवाड

नवी दिल्ली -


खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस बाईट -


महाराष्ट्र आणि नागपूरच्या जनतेला आवाहन करते की शांतता राखा


घटना ऐकली तेंव्हा मनाला वेदना झाल्या


शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे


महाराज हे रयतेचे राजे होते


जाती धर्मात सौख्य राहील पाहिजे


शिवजी महाराज यांचं नाव घेत असताना काही लोक जाती जातीत तेढ निर्माण करत आहेत


काही मंडळी जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचं काम करत आहेत


त्यांच्या विभागवार ते काही बोलत नाही मात्र यावर अशी विधान करत आहेत


सगळ्या मंडळींना आवाहन आहे की द्वेषाचं राजकारण कडे तुम्ही लक्ष देवू नका


मुख्यमंत्री यांना आवाहन करायचं आहे की राज्यात काय सुरू आहे ?


नितेश राणे यांना प्रश्न आहे की त्यांना आज महाराष्ट्राबद्दल काय वाटतं ? त्यांना महाराष्ट्र जळयाचा आहे का ?


सगळ्या माणसांना आपला आपला धर्म काय आहे ते माहीत आहे


राज्याच्या मूलभूत प्रश्नावर हे लोक बोलत नाही


राज्याचं पुरोगामित्व आज धोक्यात आल आहे


राजकारण आणि धर्मकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत


बजेट, शेतकरी यांच्यावर हे काहीच बोलत नाहीत


या द्वेषाच्या राजकारणातून काय सिद्ध करणार आहात ?


सरकारने थडग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी


नितेश राणे यांना कोणी का थांबवलं नाही


राज्यात हे कोणी सुरू केलं आहे ?


मुख्यमंत्र्यांच नागपूर जळत आहे हे किती दुर्देवी आहेत... याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल


कोण बोलतंय याच आत्मचिंतन केलं पाहिजे


म्हस्के यांनी कधीतरी मुंबईच्या प्रश्नावर पोटतिडकिने बोलावं ना


खोटा इतिहास सांगायचं काम सुरू आहे


या मंडळींना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे


ऑन प्रदीप पुरोहित विधान -


हे हास्यास्पद वाक्य आहे


काय चालल आहे ?


शिवाजी महाराज यांच्याशी बरोबरी करता ?


तुम्हाला महाराज समजले आहेत का


तुम्ही गोविंद पानसरे यांचं पुस्तक वाचाव

स्लग : पुलाखाली आढळली बिबट्याची दोन पिल्लांचा वावर वनविभाग अनभिज्ञ...

 वाशिमच्या मालेगाव ते मेडशी या जुन्या मार्गावर मेडशी जवळ असलेल्या मोठ्या जुन्या  पुलाखाली आज सकाळी बिबट्याची 2 पिल्ल खेळताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील सरपंचांला  सकाळी  बिबट्याच्या  पिल्लाचं दर्शन झाल्याने  त्यांनी आपल्या मोबाईल केमेऱ्यात हे दृश्य टिपलं आणि या बद्दलची माहिती  वनविभागाला दिली. वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याची दोन पिल्लं आढळल्याने वन विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होतय ..वनविभागाला या परिसरात मादी बिबट्या आहे..याची माहिती नव्हती का असा प्रश्न? झालाय  परिसरात मादी बिबट्या बिनधास्त वावर असतांना नेमकं वनविभाग  करतय काय..आणि वर्दळीच्या ठिकाणी या वन्य जीव प्राण्यांच्या  जीव घोक्यात असताना वन कर्मचारी कुठे असा प्रश्न निर्माण होतय...

नागपूरमधील दंगलीचा नाशिकच्या रंगपंचमीला फटका बसण्याची शक्यता

Breaking news
नागपूर मधील दंगलीचा नाशिकच्या रंगपंचमी ला फटका बसण्याची शक्यता


जुने नाशिकमधील शिवाजी चौकात 60 वर्षानी  खुली करण्यात आलेली रहाड बुजविण्याचे पोलिसांचे फर्मान


नागपूर मधील वातावरण चिघळल्यानं रात्री उशिरा पोलिसांनी रहाड बंद करण्याचे सूचना केल्याची स्थानिकांची माहिती


हिंदू मुस्लिम अशी मिश्र वस्ती असल्यानं रंगपंचमी सणाला गालबोट लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा खबरदारीचा उपाय


पोलिसाच्या आदेशाला स्थानिक नागरिकांचा विरोध


पोलिसांच्या आदेशानंतर ही रहाडीची पूजा केली जाणार जाणार पूजाविधीच्या तयारीला सुरवात


*स्थानिक नागरिक पोलीस आयुक्तांची घेणार भेट, रहाड उत्सवाला पोलीस परवानगी देणार का याकडे लक्ष
-
शिवाजी चौकातील रंगपंचमी वादाची नाही तर एकोप्याची असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा



हिंदू बरोबर मुस्लिम बांधव ही रंगपंचमीच्या तयारीला लागले असून पोलिसांनी रंगपंचमी वर बंदी घालू नये अशी मागणी


नाशिकमधे पेशवेकालीन रहाडी मध्ये रंगपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा


जुने नाशिक परिसरात सहा ते सात रहाडी मध्ये रंगोत्सव साजरा केला जातो

पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात  सुनावणी 

पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात  सुनावणी 


पुजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली जिल्हा न्यायालय व त्यानंतर उच्च न्यायालयाने फेटाळला 


खेडकर सर्वोच्च न्यायालयात अपिलात


सर्वोच न्यायालयाच्या सात क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी

नंदुरबारnजिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पर्यंत

नंदुरबार फ्लॅश:-


नंदुरबार:-जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पर्यंत...


वाढत्या तापमानाचा फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका....



केळी आणि पपई चे फळ खराब होण्याची शक्यता....


तापमानात अजून वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज....



वाढत्या उष्णतेपासून फळबागांच्या संरक्षणासाठी गोणपाट आणि इतर आच्छादनांचा वापर......



पपईच्या फळांची उष्णतेपासून बचाव करण्यासाठी फळांवर गोणपाट आणि  इतर अच्छदनाचा वापर....



एप्रिल आणि मे मध्ये अजून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता

गॅसचा स्फोटात ओमनी सह घर जळून खाक

Nanded:गॅसचा स्फोट होऊन ओमनी कारसह घर जळून खाक झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय.. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील वण्णाळी गावात ही घटना घडलीय, घरासमोर पार्क केलेल्या ओमनी कार गाडीतील सीएनजी गॅस चा स्फोट होऊन ओमनी कार जळून खाक झाली, तर या आगीच्या लाटांमुळे  घरालाही आग लागली आगीत ओमनीसह संपूर्ण घर जळून खाक झाले आहे, घरमालकाचे यात लाखोंचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.. रात्री उशिरा अग्निशमन दलाला  आग विझवण्यात यश आले आहे..

Nagpur News: नागपुरातील बाजारपेठा पूर्णपणे बंद; शाळा आणि महाविद्यालय बंद, रस्तेही बंद करायला सुरुवात

नागपुरातील चिटणीस पार्क, भालदारपुरा, महाल शिवाजी चौक, हंसापुरी या भागात काल रात्री अशांतता निर्माण होऊन प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली. या परिसरातील काही बँक आज नियमित वेळेवर उघडण्यात आल्या आहे. महाल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेवर येऊन उघडली आहे. आम्हाला आज बँक उघडी ठेवण्याच्या सूचना असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दक्षता म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठा संचारबंदी लागू असल्यामुळे पूर्णपणे बंद आहेत. आता हळूहळू पोलिसांनी वेगवेगळे रस्तेही बंद करायला सुरुवात केली आहे. 

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर मधून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ; 21 दिवसापासून होते बेपत्ता

अहिल्यानगर मधून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीपक परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव असून परदेशी हे 21 दिवसापासून बेपत्ता होते. दीपक परदेशी यांचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. नगर मनमाड रोड वरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Nagpur News: नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी; रूग्णालयात उपचार सुरू

नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी काल रात्री गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात दाखल आहेत. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते, ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तेही रुग्णालयात दाखल आहे. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे, तेही रुग्णालयात दाखल आहे. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला आहे, मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत.

Nagpur News: नागपुरातील घटनेवरती खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडिया पोस्ट; कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केलं आवाहन

नागपुरातील घटनेवरती खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडिया पोस्ट करत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.  "नागपूर शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. नागरीकांना आवाहन आहे की कृपया कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. परस्पर सामंजस्य आणि सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. हा महाराष्ट्र प्रागतिक विचारांचा आहे. आपल्या राज्याची ही ओळख कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया", असंही त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.


 





Gadchiroli News: गडचिरोलीत रानटी हत्तींपाठोपाठ रानगव्यांचा उपद्रव; उन्हाळी धान आणि मका पिकांची मोठी नासाडी

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव सुरू असतानाच देसाईगंज वनपरिक्षेत्रातील डोंगरमेंढा, कळमगाव रिठी, पिंपळगाव, विहीरगावच्या शेतशिवारात रानगव्यांचा हैदोस सुरू आहे. जंगलालगतची उन्हाळी धानपिके, मका, तुळ आणि अन्य पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे परीसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. मागील चार वर्षांपासून देसाईगंज वनपरिक्षेत्रात रानगव्यांच्या कळपाचा वावर आहे. यात 10 ते 12 रानगव्यांचा समावेश असून शेत पिकांची मोठी नासाडी करीत आहेत. रानगव्यांना हुसकावून लावण्यासाठी काही शेतकरी रात्रीची जागल समूह-समूहाने करीत आहेत.

Nagpur News: नागपुरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस अलर्ट मोडवर; सोशल मीडियावर विशेष लक्ष

नागपूर कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. आरसीपी, एसआरपीएफ, होमगार्ड यांच्यासह शहर पोलिसांचे शहरात फिक्स पॉईंट लावले. सोशल मीडियावर विशेष लक्ष, काही आक्षेपार्ह आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्ट हटवल्या. Whatsapp वर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Nashik News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात स्थगिती आदेशा विरोधात याचिका दाखल; याचिकेवर आज होणार पहिली सूनावणी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यां विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज होणार पहिली सूनावणी होणार असून आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोकाटे यांना मिळालेल्या स्थगिती आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे-राठोड यांनी दाखल याचिका केली आहे.

Beed Crime News: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणा संदर्भात आज बीड न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भात आज बीड न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. हा खटला केज न्यायालयात चालवायचा की बीड न्यायालयात यावर आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात होईल. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना तारखेला केज कोर्टामध्ये हजर करताना होणाऱ्या अडचणी त्यामुळे सीआयडीने हा खटला बीडमध्ये चालवावा असा विनंती अर्ज केला होता. त्या विनंती अर्जावर आज सुनावणी होणार आहे. खटला केज मध्ये चालवला जातो की बीडमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Beed Crime News: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडेसह इतरांवर गुन्हा दाखल

शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोट मध्ये लिहून आत्महत्या केली होती. या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. विधान परिषदेत याचे पडसाद उमटताच बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Prabhani News: परभणीसह राज्यातील लाखो शेतकरी पिक विम्यापासून वंचित; विम्यातील राज्य सरकारचा हफ्ता थकला 

राज्यात निवडणुकीआधी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृतीमुळे लाखो हेक्टर वरील जमिन खरडल्या गेली होती. कापुस, सोयाबीनसह तूर हे तिन्ही खरीप पिके हातुन गेली होती. तत्कालीन कृषी मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री आदींनी नुकसानीची पाहणी करून पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. २५% अग्रीम रक्कम बाबत ऑक्टोबर मध्ये अधिसूचना ही काढण्यात आली होती. परंतु ६ महिन्यानंतरही ना अग्रीम मिळाली, ना पुर्ण पीक विमा. पिक विम्यातील राज्य सरकारचा हफ्ता च थकलाय. त्यामुळे परभणी सह राज्यातील लाखो शेतकरी पिक विम्या पासुन वंचित आहेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय मार्गी लागेल अशी अशा शेतकऱ्यांना होती याबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकरी हा आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत.

विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात सहा आरोपी अटकेत असून इतर चार जण अद्याप फरार आहे. आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथे प्रेम संबंधाच्या संशयातून भाऊसाहेब क्षीरसागर याने विकास बनसोडे या तरुणाची हत्या केली होती. या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह दहा जणांविरोधात खुनासह ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल

नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल


नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार


बावनकुळे हे सकाळी १० वाजता घटनास्थळी भेट देणार


नागपूर येथील महाल भागाची बावनकुळे करणार पाहणी


मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना

Nagpur News: नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी साधणार संवाद

नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार आहेत.  बावनकुळे हे सकाळी १० वाजता घटनास्थळी भेट देणार आहेत. नागपूर येथील महाल भागाची बावनकुळे पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना झाले आहेत.

चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हेमंत गावंडेंचा उपचारादरम्यान मृत्यू

अकोला रेल्वे स्थानकावर मंगळसुत्र चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हेमंत गावंडेंचा उपचारादरम्यान मृत्यू. अकोल्यातील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास. रविवारच्या रात्री अकोला रेल्वे स्थानकावर झाली होती घटना.  पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं महिलेच्या नवऱ्याला चांगलचं महागात पडलं होत.. मंगळसूत्र चोरट्याने पाठलाग करणाऱ्या महिलेच्या पतीला बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा ठेचून काढला होताय. अखेर पोलिसांनी मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला अकोल्याच्या एमआयडीसी परिसरातून रात्री उशिरा अटक केली आहे. अवघ्या 24 तासात या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.. परमार असं आरोपीचं नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे.

शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल 

शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल 


संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 


शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोट मध्ये लिहून आत्महत्या केली 


या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. विधान परिषदेत याचे पडसाद उमटताच बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तीव्र पाणीटंचाई...

नंदुरबार:- सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तीव्र पाणीटंचाई...


आदिवासी पाड्यावरील महिलांची पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट


धडगाव तालुक्यातील दुर्गम सेजला आणि इतर  भागातील गावांमधील परिस्थिती


नागरिकांना पिण्यासाठी झऱ्याचे अशुद्ध पाणी


सरकारची हर घर जल हर घर नल योजना अजून पोहोचलीच नाही


जिल्हा प्रशासनाचा टंचाई  आराखडा फक्त कागदावरच

स्वारगेट ST डेपोमधील बलात्कार पीडित महिलेनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

विधान भवनात पुणे स्वारगेट ST डेपोमधील बलात्कार पीडित महिलेची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परीषद उपसभापती निलम गोर्हे यांनी घेतली.


पिडीत महिलेच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली… यावेळी पिडीत महिलेने तीची व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परीषद उपसभापती निलम गोर्हे यांच्याकडे मांडली.


आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी पिडीत महिलेने केली.

धाराशिवमध्ये जिल्हापरिषद शाळांमध्ये 'गुढीपाडवा, प्रवेश वाढवा' अभियान

धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळेच शिक्षकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय. यावर मार्ग शोधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने पुढाकार घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये गुढीपाडवा प्रवेश वाढवा अभियान राबविण्यात येत आहे. आज पासून या अभियानाला सुरूवात झाली, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून गावातील नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आलं. यासोबतच शिक्षक घरोघर जाऊन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण देखील करणार आहेत. सहा ते 14 वर्षांमधील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कार्यकर्त्यांची धरपकड

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक १९ मार्च रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नरिमन पॉईंट मुंबई येथे समुद्रात कापूस आणि सोयाबीन फेकून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेत सरकारला जाब विचारणार आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आज मुंबईसाठी रवाना होणार होते . मात्र तत्पूर्वीच रात्री क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती आहे. तर बुलढाण्यातही अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर हे भूमिगत झाले असून कुठल्याही परिस्थितीत उद्या आंदोलन होणारच अशी भूमिका ही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले

‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये युट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले आहे.


ट्युबर समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली


त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.


आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने रैना, रणवीर सह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


रणवीरच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा सहभागाची पडताळणी सुरू आहे.

गँगस्टर छोटा राजन हत्येच्या एका प्रकरणात निर्दोष

गँगस्टर छोटा राजन हत्येच्या एका प्रकरणात निर्दोष


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ड्रायव्हरची साल 2011 मध्ये झाली होती हत्या


या हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं पुराव्यांअभावी राजनची निर्दोष मुक्तता केलीय


17 मे 2011 रोजी दक्षिण मुंबईत आरिफ अबुनाकर सय्यद नावाच्या व्यक्तीवर दोन आरोपींनी गोळीबार केला होता


आरिफ सय्यद हा दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ड्रायव्हर होता


या प्रकरणात छोटा राजनला हत्येच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता


छोटा राजन हा सध्या तिहार तुरुंगात असून त्याच्याविरोधातील सारे खटले मुंबईच्या सीबीआय कोर्टात सुरू आहेत


पत्रकार जेडे हत्या प्रकरणात राजनला जन्मठेप झाल्यानं त्याचा मुक्काम कारागृहातच राहिल

नागपूरमध्ये सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात

नागपूरमध्ये सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून (Nagpur Police) रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : नागपूरमधील सोमवारच्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा,यशोधरानगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर राज्याचं मुंबई अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. या घडामोडींसह राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.