Maharashtra News LIVE Updates 18th March : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते आणि अमर साबळेंच्या नावाची चर्चा आहे. याच जागेवर देवेंद्र फडणवीस हे साबळे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. आज दिल्लीत होणाऱ्या महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील काही जागांवर चर्चा होणार आहे. त्या आधी देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या इच्छुक उमेदवारांशी बोलत आहेत.
शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, ती जागा काँग्रेसची असल्याचं विश्वजित कदम म्हणाले. या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगलीची जागा ही शिवसेनेला मिळाली आणि त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले होते.
Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार काल अनेक जिल्ह्यात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नागपूर शहरात विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे नागपुरकरांची चांगलीत तारांबळ उडाली. तर अमरावती, अकोल्यातही अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान झालं. तर वर्ध्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय.
Rahul Gandhi vs PM Modi: पंतप्रधान मोदी हे देश चालवणाऱ्या अज्ञात शक्तीच्या हातचं बाहुलं झालेत अशी टीका राहुल गांधींनी केली. देशाची संपत्ती मूठभर लोकांच्या हाती एकवटलीय. चीनशी टक्कर देऊ शकतील असे लघु उद्योग संपवले जात आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. इलेक्टोरल बॉण्डस् हे एक्सटॉर्शन रॅकेट आहे या आरोपाचा पुनरूच्चार राहुल गांधी यांनी केला. ईडी सीबीआय एखाद्या गुंडाच्या हाती दिल्यासारखी स्थिती आहे असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातल्या एका नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली. ते सोनिया गांधींसमोर अक्षरशः रडले, या शक्तीशी लढण्याची ताकद माझी नाही अशी गयावया करत होते असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Mumbai News: मुंबईत काल इंडिया आघाडीची शिवाजी पार्कवर सभा झाली. इंडिया आघाडीने या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राहुल गांधींसह उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, तेजस्वी यादव, एम के स्टॅलिन, रेवंथा रेड्डी, चंपई सोरेन हे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर इंडिया आघाडीने जोरदार हल्लाबोल केला.
जिल्ह्यात कुठे माध्यम तर कुठे जोरधार पाऊस
दोन दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली होती.
Ahmednagar News: अहमदनगर : भाजपची अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे , भाजपचे प्रदेश महामंत्री, विजय चौधरी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व आजी- माजी आमदार , पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -