Maharashtra Live Update : मोठी बातमी : राज ठाकरेंनी उद्या पुन्हा बोलावली बैठक, महायुतीबाबत मोठा निर्णय होणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2024 03:20 PM
Lok Sabha Election : शरद पवार गटात नाराजीनाट्य, शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Lok Sabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत असून, अनेक समर्थक कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ रावेर वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. 

Baramati Crime : बारामतीत दांपत्याची हत्या, घटनास्थळी पोलीस दाखल; परिसरात खळबळ

Pune Crime News : बारामतीत दांपत्याचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. बारामती शहरातील जामदार रोडवरील सोसायटीत पती-पत्नीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नेमकी का झाली कशामुळे झाली? याची माहिती पोलीस घेत आहेत. परंतु, बारामती ही सुरक्षित आहे अशी भावना लोकांची असतानाच गेल्या काही दिवसापासून बारामतीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आजच्या खुनेच्या घटनेने बारामती शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Maharashtra Live Update : उदय सावंत यांची हिंगोलीत बंद दाराआडा बैठक, नेमका क्या ठरलं?

हिंगोली : मंत्री उदय सावंत आज सलग तिसऱ्या दिवशी हिंगोली लोकसभा मतदारसंघात पोहचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे, शिवसेना आमदार संतोष बांगर , महायुतिचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या समावेत मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआडा बैठक झाली. आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोलीतील कार्यकर्त्याच्या निवासस्थानी बंद दाराआड़ ही बैठक झाली आहे. 

Shirur News : गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या; अमोल कोल्हेंकडून कारवाईची मागणी

 शिरुर : महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातुन गरोदर असणाऱ्या मातेस व गर्भात असणाऱ्या बालकास उत्तम प्रकारची शक्ती मिळावी यासाठी  शासनाचा पोषक आहार म्हणून किट दिले जाते. त्यामध्ये बदाम ,खारीक, काजू गुळ व इतर पौष्टिक आहाराचा समावेश आहे. शासनाचे उद्दिष्ट हे त्या गरोदर मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले राहावे. तसेच त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच हा उपक्रम आहे. परंतु शिरुर तालुक्यातील आंबळे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असुन ह्या आहारातील गुळ आणि काजु मध्ये किडे आढळून आले असुन गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचे समोर आले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी उद्या पुन्हा बोलावली बैठक

Raj Thackeray Meeting : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) उद्या पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. यासाठी समन्वयकांची यादी जाहीर केली जाणार आहे.  त्यामुळे उद्याच्या बैठकीत महायुतीशी संवाद साधण्यासाठी मनसेकडून समन्वयकांची घोषणा केली जाणार आहे.  राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्या अकरा वाजता ही होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Indapur News : एक वाढदिवस प्राण्यांसाठी; इंदापुरातील डॉक्टर इमानदारांनी साजरा केला अनोखा वाढदिवस

Indapur News : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाच्या झळा जशा मानवाला झळा बसतात ताशा वन्यप्राण्यांना बसत आहेत. इंदापुरातील डॉक्टर इमानदारांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. इनामदार डॉक्टर इंदापूर तालुक्यातील वन्य प्राण्यांची तहान भागवणार आहेत. चिंकारा व इतर वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी वन विभागाच्या पाणी साठवून टाक्यांमध्ये पाणी सोडून निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्यात आला. निमगाव केतकी येथील वनीकरणात  टँकरद्वारे चिंकारासह वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. यावेळी डॉक्टर इनामदार यांनी उन्हाळा संपेपर्यंत दर आठवड्याला एक टँकर पाणी वन्य प्राण्यांसाठी सोडण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. इनामदार डॉक्टरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही असा पुढाकार घेऊ शकतो.

Raj Thackeray : आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, मात्र आमच्या भूमिका मुद्यावर आहेत

Raj Thackeray PC : गुडी पाडवा मेळाव्यात मी सांगितलं मनसेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे. पहिल्या पाच वर्षात आम्हाला त्यांचा भूमिका पटल्या नाहीत तेव्हा टीका केली. टीका केली तेव्हा काय मागितलं नव्हतं, पूर्वी मुद्यावर टीका होती. पाच वर्षात काही बदल झाले त्यामुळे स्वागत ही केले. राम मंदिर, 370 कलम असे अनेक निर्णय चांगले होते. आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, मात्र आमच्या भूमिका मुद्यावर आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. 

AHmadnagar Crime : अहमदनगर शहरात रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी

अहमदनगर : अहमदनगर शहरात शुक्रवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.आंबेडकर जयंती निमित्त आयोजित भीम गीतांच्या कार्यक्रमात फोटो लावण्यावरून हाणामारी केल्याची माहिती आहे. या घटनेत चार जण  गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहे. 

Budhala Unusual Rain : जिल्ह्यातील अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या भागात उमेदवारांची धावपळ

बुलढाणा : सलग चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस वादळी वारे आणि गारपीट होत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसानही झाला आहे. निवडणुकीच्या काळात शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे त्याला दिलासा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले सर्व नेते गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बघायला मिळत आहे आज सकाळपासूनच खा.प्रतापराव जाधव आ. संजय गायकवाड शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सुविद्य पत्नी शर्वरी तुपकर हे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत.

 पावसात संजय जाधव अन् राजेश टोपेंचं भाषण 

घनसावंगी : लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असताना अवकाळी पाऊस सर्वत्र बरसतोय. याच पावसाचा फटका बैठकांना ही बसतोय मात्र उमेदवार आणि नेते आता या पावसात भाषण ठोकत आहेत.परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील तीर्थपुरीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला राजेश टोपेंसह अनेक नेते अन कार्यकर्ते उपस्थित होते मात्र भाषण सुरु असतानाच पाऊस सुरु झाला मग काय महाविकास आघडीचे उमेदवार संजय जाधव अन राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते राजेश टोपेंनी यांनी भिजून भर पावसात भाषण ठोकले आहे.

Navneet Rana : नवनीत राणा यांचं भाजप प्रचार कार्यालय वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त

 Amravati : अमरावतीच्या इर्विन चौकातील नवनीत राणा यांच भाजप प्रचार कार्यालय वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे मंडपात 8 जण होते ते सुखरूप असल्याची माहिती मंडप संचालक यांंनी दिली आहे. अमरावती शहरात पहाटे 4 वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे.  अमरावती शहरातील अनेक भागात झाडं कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. कोसळलेली झाडे हटवण्यासाठी मनपा प्रशासन लागलं कामाला लागलं आहे.

भंडाऱ्याच्या साकोली येथे राहुल गांधी यांची प्रचार सभा; महविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती

Bhandara MVA Sabha :  पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भंडाऱ्याच्या साकोलीत आज दुपारी सभा होत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासह पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली या पाचही लोकसभेच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा साकोलीत होत आहे. या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते साकोलीत येत आहेत. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त मागील दोन दिवसांपासून तैनात करण्यात आलेला आहे. या सभेला लाखोच्या संख्येत नागरिक उपस्थित राहतील, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह मतदारसंघातील साकोलीत ही सभा होत असल्यानं ही सभा यशस्वी करण्यासाठी नाना पटोले मागील आठवडाभरापासून भंडाऱ्यात तळ ठोकून आहेत.

रोहित पवार बारामती दौऱ्यावरच कान्हेरीत घेणार पहिली सभा घेणार

बारामती : कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी पवारांचे श्रद्धास्थान असलेल्या कन्हेरीच्या मारुतीरायाचे दर्शन घेऊन संवाद यात्रेला सुरुवात केली. कन्हेरी येथे रोहित पवार यांची बारामती तालुक्यातील पहिली जाहीर सभा आहे. आज रोहित पवार हे बारामती तालुक्यातील अनेक गावांचा दौरा करणार असून नागरिकांची संवाद  साधणार आहेत 

Unseasonal Rain : भाषण सुरु होताच पाऊस सुरु, धो धो पावसात 'या' नेत्यांनी भाषण ठोकलं

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असताना, अवकाळी पाऊस सर्वत्र बरसतोय. याच पावसाचा फटका नेत्यांच्या बैठकांना ही बसतोय. मात्र, उमेदवार आणि नेते या पावसात भाषण ठोकत आहेत. परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील तीर्थपुरीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राजेश टोपेंसह अनेक नेते अन् कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र भाषण सुरु असतानाच पाऊस सुरु झाला, मग काय महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह राजेश टोपेंनी भरपावसात भाषण ठोकलं. 

Rohit Pawar : देशभरात 70 टक्के घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्येच; रोहित पवारांची टीका

Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा समोर येताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली होती. या मुद्द्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहे. सध्या देशभरात जे खासदार आहेत त्यातील 70 टक्के घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्ये असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हंटले आहे...देवेंद्र फडणवीस , पंकजा मुंडे , सुजय विखेंना घराणेशाही आहे... अशी 70 ते 80 नाव सांगता येतील असं रोहित पवारांनी म्हटले आहे , सोबतच भाजपचे भाषणातील मुद्दे वेगळे असतात त्यातच खोटं बोल पण रेटून बोल अशी स्थिती असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे

Pune Weather Update : उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

Pune Weather Update : मागील काही दिवसांपासून पुण्यात चांगलाच उकाडा जाणवत आहे. पुढील दोन दिवस पुण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Unseasonal Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Unseasonal Rain Alertराज्यासह देशात आठवड्याभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. राज्यात पुढील 24 तासात  विविध ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.. गेल्या आठवड्याभरात पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. या वीकेंडलाही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्याच पावसाची शक्यता कायम आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.