Maharashtra Live Update: दहा वर्षात काय केलं? भाजप उमेदवार अनुप धोत्रेंना करावा लागला गावकऱ्यांच्या रोषाचा सामना
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील सभेत भाजपवर जोरदार टीका केली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मी उद्धव ठाकरे यांचे भाषण मोबाईलवर ऐकले. त्यात ते म्हणाले अडीच वर्षात आम्ही काय काम केलं, ते ऐकायचे असेल तर एका मंचावर या. उद्धवजी अडीच वर्ष तुम्ही नुसतं फेसबुक लाईव्ह करत होते आणि कोमट पाणी प्या असे म्हणत होते. उपराजधानी नागपूरला सुद्धा तुम्ही आले नाही. तुम्ही आमच्याशी विकासावर चर्चा करू नका. जर आम्ही नुसतं गडकरींनी केलेल्या विकास कामांची यादी सांगितली, तर तुम्हाला चार-पाच पेले कोमट पाणी प्यायची वेळ येईल. त्यामुळे तुम्ही नुसते टोमणे मारत बसा. टोमणे मारल्यामुळे तुम्हाला मत तर मिळणार नाही. मात्र तुमच्या मनाचा समाधान नक्कीच होईल, अशी टीका त्यांनी केली आहे.
शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने झालेल्या घटनेत चार शेळ्यांसह शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे घडली. सुधाकर धोडीराम पाचे असे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शरद पवारांनी लेक व सुनेत फरक केला. 40 वर्षे पवार कुटुंबात वावरणाऱ्या सुनेबाबत भेदभाव करण्यात आला. बारामतीचा निकाल हा पवारांच्या सुनेच्याच बाजूने लागणार आहे. मराठवाड्यातल्या पाटलाची लेक पवारांना परकी वाटू लागली, असे प्रत्युत्तर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शरद पवारांना दिले आहे.
ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा जन्मच आरक्षणाच्या लढाईतून झाला आहे. ही भावना असली तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुद्धा भूमिका आहे. पण, ते आरक्षण 50 टक्केच्यावर द्यावं. आम्हाला आमचं आरक्षण वाचवायचं असेल तर, आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक जी आर पाहावं लागेल. बेरोजगार, शेतकरी हे मुद्दे सुद्धा आहेतच, अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.
प्रकाश शेंडगे, अध्यक्ष, ओबीसी बहुजन पार्टी
लक्ष्मण हाके यांना माढा लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रकाश शेंडगे यांनी माहिती दिली आहे.
माढ्यात प्रस्थापित विरुद्ध विस्तापित अशी ही लढत असोल
राज्य मागासवर्गीय आयोगावर हाके सदस्य होते
हाके यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नाही मात्र अवाका मोठा आहे
शिवसेनेत प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली होती मात्र त्यांची घुसमट होत होती
अशात आज ओबीसी बहुजन पार्टीतून त्यांनी उमेदवारी घेण्याची इच्छा व्यक्त केली
आज त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे
उद्धव ठाकरेंना त्यांनी मॅसेज देखील पाठवलेला आहे
लक्ष्मण हाकेंसाठी ही लढत मोठी नाही आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो
विशाल पाटील सोमवारी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता
विशाल पाटील समर्थकांनी आज घेतले दोन अर्ज
विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकानी आणि कॉग्रेस कार्यकर्ता यांनी घेतले कोरे 2 अर्ज
याबाबत अद्याप विशाल पाटील यांच्या कडून खुलासा नाही
विशाल पाटील यांच्या निकटवर्तियांची माहिती
मुंबईतील सहापैकी अवघ्या दोनच जागांवरती महायुतीकडून उमेदवार जाहीर झाले आहेत.यातील उत्तर मुंबईच्या जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आता त्यांच्या विरोधात वंचित कडून एक महिला उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे. बीना सिंग ह्या पियुष गोयल यांच्या विरोधात वंचित कडून उत्तर मुंबई मतदार संघात लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. बीना सिंह उत्तर मुंबईतून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. आतापर्यंत मुंबईत उत्तर भारतीय व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी दिली नव्हती मात्र आता वंचित पक्षाकडून बीना सिंग यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेऊन उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवार देऊ नका असे विनंती देखील करणार असल्याचे बीना सिंग यांनी म्हटले आहे.महिला आणि शिक्षण या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे विना सिंग यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे आणखी एक अपक्ष आमदार नाराज आहेत
आज इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आपली उमेदवारी घोषित करू शकतात
आवाडे यांच्या भूमिकेमुळे हातकणंगले मधील महायुतीच्या उमेदवाराची अडचण होण्याची शक्यता आहे..
Akola News: अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. दहा वर्षात काय केलं, आता मतदान का करायचं असा जाब ग्रामस्थांनी धोत्रेंना विचारला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र खासदार संजय धोत्रे मतदारसंघात फारसे दिसले नाहीत. त्यामुळे त्यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करताना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
Nashik News: नाशिकमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते ठाण्यात पोहोचले आहेत. ठाण्यातील कोपरी परिसरात चैत्र नवरात्र देवीचे दर्शन घेत बोरस्ते पूजेसाठी पाठावर बसले आहेच. त्यांच्या हस्ते देवीची पूजा केली जात आहे. दरम्यान महायुतीचा नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
Madha Lok Sabha :माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने देवगिरीवरील अजित पवारांची बैठक संपली. देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बैठक पार पडली . माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे कार्यकर्त्यांना निर्देश देण्यात आले आहे.
शरद पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज 55 वर्षानंतर काकडे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान चर्चा करीत असताना शरद पवार यांनी सांगितले की माढ्याच्या उमेदवारी संदर्भात धैर्यशील मोहिते पाटील 14 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असून 16 किंवा 17 तारखेला माढा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांत्वन पर भेटी दरम्यान फलटण तालुक्यातील माजी आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम हे देखील काकडे कुटुंबीयातील एक घटक असून त्यांची मदत लागणार आहे. चिमणराव कदम यांच्या मुलीचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला आहे. सह्याद्री हा संभाजी काकडे यांच्या मुलाचा मुलगा आहे. म्हणून शरद पवार यांनी सह्याद्री कदम असताना ही माहिती दिली आहे.
देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने बैठक पार पडली
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत
रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी तत्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठक बोलावली होती
आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण रामराजे नाईक निंबाळकर माजी आमदार प्रभाकर घाडगे या सोबतच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते
Mithi River: मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसचं अन्य कामांसाठी जवळपास तेराशे कोटींहून अधिकचा खर्च झालाय. या प्रकरणी चौकशीसाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. २००५ पासून मिठी नदीचं काम सुरू आहे. 18 वर्ष काम सुरू असून केवळ गाळ काढण्यासाठी तेराशे कोटी खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता एसआयटीची स्थापना करण्यात आलीय
Jayant Patil: शिंदे गटाच्या राजेंद्र पाटील यड्रावकरांची जयंत पाटलांनी भेट घेतली. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी दोघांची भेट झाली. भेटी वेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे उपस्थित होते. जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार यड्रावकरांना घातलं साकडं
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री गडकरी आज देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात प्रचार करतायेत.. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनीष नगर भागात गडकरी मतदारांशी संवाद साधतायेत.
Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंच्या हृदयावर साताऱ्यात शस्त्रक्रिया झाली आहे. प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
NCP Nashik Crisis: नाशिकच्या जागेसंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात 'देवगिरी'वर होणार आहे. नाशिकच्या जागेसह प्रचार सभांच्या नियोजनावर चर्चा होणार आहे.
CM Visit Nanded : मुख्यमंत्री शिंदे आज नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री संवाद मेळावा घेणार आहेत. तर यवतमाळमध्ये आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची लोकसभा आढावा बैठक होईल. त्यानंतर नागपरमध्ये जात मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
Election Duty: निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आजवर ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी अर्ज केलेत. अर्ज करताना एक से बढकर एक अशी भन्नाट कारणे देखील दिल्याची माहिती समोर आली आहेत. अनेकांनी बायको, आई आणि मुले आजारी असल्याची कारणं देत अर्ज दिलेत. यानंतर आता प्रशासनाकडून मेडिकलशी निगडित प्रकरणांची बारकाईने तपासणी केली जातेय. बोगस मेडिकल प्रमाणपत्र दिल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाने दिलाय.
Nagpur University: डॉ. सुभाष चौधरी यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारला. राज्यपाल रमेश बैस यांनी अनियमिततेचं कारण देत डॉ सुभाष चौधरी यांचं निलंबन केलं होते. या निर्णयाच्या विरोधात चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.
Parbhani News: परभणीत पावसानं थैमान घातलंय. इथं सगल तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जनावरही दगावलेत.. वीज पडून ईळेगाव इथल्या 55 वर्षीय बाबुराव शेळके या शेतकऱ्याचा मृत्यु झालाय.. तर हरिबाई सुरनर यांच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय
Raigad Lok Sabha : तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. १९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.. त्यामुळे २२ एप्रिलनंतरच रायगड लोकसभा मतदार संघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश असून ७ मे रोजी मतदान होणार आहे.
Uddhav Thackeray In Palghar : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आज बोईसरच्या आंबट गोड मैदानावर सभा होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा आहे.
Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड आज राजधानी दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. मुंबईतील जागावाटप आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडशी चर्चा करणार आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -