Maharashtra Live Update: अकोला, वाशिम आणि यवतमाळसाठी रेड अलर्ट जारी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Apr 2024 05:43 PM
भाजपने आमची फसवणूक केली, चंद्रकांत पाटलांचे भाषण सुरु असतानाच शेतकरी आक्रमक

माढा तालुक्यातील टेंभुर्णी मधील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच संपतराव काळे या शेतकऱ्याने आपले आयुर्वेदिक वनस्पती लागवड मध्ये 22 लाख  रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या कंपनी मुळे हा तोटा झालं आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे असे म्हणताच गोंधळ उडाला यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले भाषण थांबवत सभा गुंडाळावा लागलीं . भाजप ४०० पार का म्हणतो याचा खुलासा करताना प्रत्येक बुथवर 500 पैकी 370 मते कमळाला पाहिजेत असे ते सांगत होते . यानंतर संपतराव काळे यांनी असे काही घडणार नाही , अमाची फसवणूक केल्याचा उठून आरोप करताच एकच गोंधळ उडाला . भाजप व महायुतीचे कार्यकर्ते त्याला खाली बसवू लागताच चंद्रकांत पाटील यांनी त्याला बोलू देण्यास सांगितले . गोंधळ वाढत जाताच तुम्ही कोणत्या पक्षाचे असा सवाल करीत आम्ही सोडलेल्या मठात तुम्ही आहात असे पाटील यांनी सांगितले . हा सर्व गोंधळ टिव्ही कॅमेऱ्याने घेतला आता तुमचे काम झाले असेल तर खाली बसा असे चंद्रकांत पाटील बोलताच पुन्हा गोंधळ वाढला . यानंतर पोलीस व महायुतीचे पदाधिकारी या शेतकऱ्याला ओढून बाहेर नेवू लागले तर काही जणांनी त्यांना धक्काबुक्की केली . 
यानंतर बोलताना या शेतकऱ्याने माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचेवर आरोप करीत माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक झाल्याचे माझाशी बोलताना सांगितले 

मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब


मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब


सोमवारी सर्व याचिकाकर्त्यांना आपला युक्तिवाद संपवण्याचे कोर्टाकडून निर्देश


त्यानंतर मंगळवारी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता करणार युक्तिवाद


याप्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर संपवण्यासाठी हायकोर्ट आग्रही


राज्य सरकार मात्र मुदतवाढीच्या मुद्यावर ठाम


युक्तिवाद एक दिवसात पूर्ण होणं शक्य नसल्याची महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांची कबूली


राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या बाजूनं भूमिका मांडण्यासाठी हवा पुरेसा वेळ


राज्य सरकारनं दिलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला विरोध करत हायकोर्टाच दाखल विविध याचिकांवर हायकोर्टात पूर्णपीठाकडे सुनावणी सुरू


प्रकरण आठवड्याभरात संपवण्याचे मुख्य न्यायमूर्ती देवंद्रकुमार उपाध्याय यांचे सुतोवाच

पंत्परधान मोदींच्या रामटेकमधील सभेला मोठा प्रतिसाद मिळणार : फडणवीस

आज आनंदाची बाबा आहेय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक लोकसभा मतदारसंघात सभा होत आहे. चंद्रपूरला चांगला प्रतिसाद मिळाला तसाच रामटेकमध्ये सुद्धा सभेला प्रतिसाद मिळणार आहे. जनतेचे प्रचंड प्रेम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


मी अपघातासंदर्भात नाना भाऊंची विचारपूस केली आहे. मी त्यांना फोन केला आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. वैचारिक सामना सुरू असतो ते आमचे मित्र आहेत. मला समजलं तसा मी त्यांना फोन केला. अपघात त्या ठिकाणी झाला आहे, त्यांनी सांगितलं मी बचावलो. अपघात मोठा आहे, मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशी परिस्थिती ना उद्भवली आहे ना उद्भवणार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.

अकोला, वाशिम आणि यवतमाळसाठी रेड अलर्ट जारी

अकोला, वाशिम आणि यवतमाळसाठी रेड अलर्ट जारी


वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा अंदाज


विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज


अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि वर्ध्यासाठी आॅरेंज अलर्ट जारी


विदर्भात आज अनेक ठिकाणी गारपिटीची अंदाज


विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता


पुढील ४-५ दिवस मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात अवकाळीचा अंदाज


भारतीय हवामान विभागाची माहिती

मनसे नेत्यांची 13 एप्रिलला मुंबई महत्वपूर्ण बैठक होणार, महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिलीच बैठक

मनसे नेत्यांची 13 एप्रिलला मुंबई महत्वपूर्ण बैठक होणार


 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे एमआयजी येथे नेत्यांची बोलावली बैठक


 मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ही बैठक होतेय


 त्यामुळे मनसेनेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील

श्रीकांत भारतीय यांच्याविरोधात सोलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक

श्रीकांत भारतीय यांच्याविरोधात सोलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक


श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक पोस्टच्या विरोधात सोलापूरात सकल मराठा समाज आक्रमक


श्रीकांत भारतीय यांनी आपल्या नवीन आणलेल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवल्याने मराठा कार्यकर्ते संतप्त


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपल्याला कुठेही ग्राह्य धरत नसल्याने शक्तीस्थानांची अवहेलना करण्यात येत आहे


श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक पोस्टचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध


देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत भारतीय यांना समज न दिल्यास भविष्यात सर्व कुत्र्यांची नावे हे देवेंद्र आणि नरेंद्र असे ठेवण्याचा इशारा 

हवामान बदलांचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम, मार्च महिना ठरला सर्वात उष्ण

हवामान बदलांचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम 


मार्च महिना ठरला जगात सर्वात उष्ण असा महिना 


मागील १० महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात नवीन तापमानाचे विक्रम प्रस्थापित होतायत 


युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या हवामान संस्थेकडून अहवाल देण्यात आलाय 


एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ ह्या १२ महिन्यांच्या कालावधीत देखील सर्वात उष्ण असा काळ होता अशी नोंद झाली आहे 


दरम्यान, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक सरासरी तापमान पूर्व औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा १.५० अंश सेल्सिअस खाली ठेवणं अपेक्षित होतं मात्र मागील एका वर्षातल्या कालावधीत यात मोठी वाढ झाली आहे 


एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत जागतिक सरासरी तापमान १८५०-१९०० या पूर्व-औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा १.५८ अंश सेल्सिअस जास्त होते 


जागतिक स्तरावर अनेक संस्थांकडून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे, प्रामुख्याने दीर्घकाळ तापमानवाढीचा ट्रेंड दिसत असल्याने हवामान बदल वेगाने होत असल्याचं चित्र दिसत आहे 


२०२३ हे वर्ष जागतिक स्तरावर सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली होती, आता पुन्हा तोच तापमानवाढीचा ट्रेंड कायम दिसत असल्याने चिंतेत भर पडली आहे


 

मी आज राष्ट्रवादीमध्ये, उद्या भाजपात येणार : एकनाथ खडसे

मी आज एनसीपी मध्ये आहे उद्या भाजपात येणार 


मी भाजपात आलो मात्र तुम्हाला माहिती नाही 


सिंधी बांधवांच्या वतीने आयोजित चेट्री चंड्र कार्यक्रमात एकनाथ खडसे यांचे मोठं विधान 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर मी पहिलेपासून खुश आहे 


भारतीय जनता पार्टीशी माझा कुठलाही तान तणाव नव्हता 


काही लोकांमुळे मला भाजप सोडावी लागली होती - एकनाथ खडसे

सर्वोच्च न्यायालयाचा रश्मी बर्वे यांना झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

सर्वोच्च न्यायालयाचा रश्मी बर्वे यांना झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली! निवडणूक लढण्याची संधी मिळवावी अशी रश्मी बर्वे यांची मागणी होती.

सातारा लोकसभेतून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्याने माथाडी कामगारांकडून जोरदार स्वागत

सातारा लोकसभेतून शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटांची उमेदवारी मिळाल्याने त्यांचे माथाडी कामगारांकडून जोरदार स्वागत


एपीएमसी मार्केट मध्ये शिंदे यांचे स्वागत 


फटाके फोडून , ढोलताशे वाजवत माथाडी कामगारांनी केले स्वागत


यावेळी शिंदे यांनी तुतारी वाजवत लढाईला सज्ज असल्याचा दिला इशारा

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला नागपूरच्या रामगिरी निवास्थानी पोहचले...


औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार म्हणून संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे ...


मात्र भुमरे यांना जिल्ह्यात विरोध असल्याने, याची कल्पना द्यायला प्रशांत बंब हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला नागपूरला आल्याचे बोलले जात आहे...


ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे मैदानात आहे ...

वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळं शेतीच प्रचंड नुकसान

वाशिमच्या रिसोड  मालेगाव मंगरूळपीर तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस गारपिटीने
शेतकऱ्यांचं शेतातील  उन्हाळी पीक ज्वारी, बाजरी बीजवाई कांदा,लिंबू,संत्रा,टरबूज  आंबा ,खरबुजासह भाजीपाला आणि आंब्याचं प्रचंड नुकसान झालं आहे.या नुकसान झाले आहे नुकसान पंचनामे करून  नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

ठाणे - बेलापुर रोडला तुर्भे येथे वाहतूक कोंडी, बेलापूर ला जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवली

नवी मुंबई -
ठाणे - बेलापुर रोडला तुर्भे येथे वाहतूक कोंडी 


बेलापूर ला जाणाऱ्या मार्गीकेवर वाहतूक जाम


उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने बेलापूर ला जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवली आहे.


पनवेल , बेलापूर ला जाणाऱ्या वाहणांना वाशी ,नेरूळ किंवा 
एमआयडीसी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

नाना पटोले यांच्या कारला अपघात, भंडारा जिल्ह्यात घडली घटना


नाना पटोले यांच्या कार ला अपघात...


भंडारा जिल्ह्यातील घटना ...


उभ्या गाडीला ट्र्क ने मागून दिली धडक ...


नाना पटोले तेव्हा मिटिंग घेत होते ...


सुदैवाने मोठी घटना टळली ..

Chhagan Bhujbal: मराठा आंदोलक मनोज जरांगेनंतर छगन भुजबळांची अखंड सप्ताहाला हजेरी

Chhagan Bhujbal:   नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे सुरु असलेल्या श्रीजगद्गुगूरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळ्याला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिल्यानंतर लगेचच आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही भेट देत अखंड हरीनाम सप्ताहामध्ये रममान होत हरिनाम जप केला.. नेहमीच्या राजकीय चिखलफेकीतून भुजबळ यांनी वेळ काढत अध्यात्मात तल्लीन होत मन लावून कीर्तन ऐकतांना दिसले.यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणेही टाळले.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली..


 
Nashik News: भरवसच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याची सांगता

Nashik News: नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे सुरु असलेल्या श्रीजगद्गुगूरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळ्याच्या सांगतानिमित्त सुमारे सव्वा लाख भाविकांसाठी मांडे, दूध, भात, आमटी असा आगळ्या वेगळ्या मेनूच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्यासाठी  विविध तालुक्यातून भाविकांनी सव्वा लाख मांडे, १ लाख लिटर दूध आणून दिले होते. तसेच ८० क्विंटल तांदूळ शिजविण्यात आला होता तर २५ टँकर आमटी या ठिकाणी ठेवण्यात आली होती.काल्याच्या कीर्तनानंतर सुमारे दीड लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला..

Express Way Block:  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका आज बंद

Express Way Block:  पनवेल-कर्जत दुहेरी मार्गावरील चिखले पुलाचे लोखंडी गर्डर बसविण्याचे काम आज हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस- वेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका तीन तास बंद राहणार आहे. त्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आलीये...कळंबोली सर्कल येथून टी-पॉइंट, करंजाडे, पळस्पेमार्गे जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुढे जाता येणार आहे.

Unseasonal Rain: बुलढाणा, अकोला जिल्ह्यात गारपीटही, शेती, फळबागांचं नुकसान

Unseasonal Rain:  राज्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यात. मराठवाड्यातील लातूर आणि परभणीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. तर विदर्भातील अकोल्यातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यात..तर भंडारा, बुलढाणा, अमरावतीमध्येही विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली..अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारी कांदा यासह फळबागांचं मोठे नुकसान झाले. 

PM Modi in Nagpur:  पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नागपूरच्या कन्हानमध्ये सभा

PM Modi in Nagpur:  पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नागपूरच्या कन्हानमध्ये सभा होणार आहे. कन्हान नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठीची ही मोदीची एकत्रित सभा असणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक या सभेत येतील असा महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.