Maharashtra News Updates 31th March 2023 : अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाने एकाचा मृत्यू तर 6 जणांना कोरोनाची लागण
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra News: रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
Wardha News: वर्धा येथील सावंगी टी पॉईंट येथील ट्रकचा अपघात झाला असून या अपघातात दोन दुकानाचे नुकसान झाले आहे. दोन जण जखमी झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे. ट्रकचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात असून ट्रक चालक आणि हात गाडीवाला जखमी झाला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Nashik News: संयोगिता राजे छत्रपती यांना काळाराम मंदिराच्या पुजाऱ्याकडून आलेल्या अवमाना प्रकरणाच्या निषेधार्थ स्वराज्य संघटनेच्यावतीने शनिवारी, काळाराम मंदिरासमोर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी
पैठण तालुक्यातील जांभळीवाडी येथे अवकाळी पावसाच्या तडाखा
वादळी वाऱ्यामुळे 20 ते 25 घरांवरील पत्रे उडाले
6 घरातील संसार उपयोगी वस्तुंची मोठ्या प्रमाणात नुकसान
Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील किल्ले गावठाण ते उरण आणि परिसरातील निर्जन स्थळी बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत पणे डेब्रिज टाकून शहर विद्रूप करणाऱ्यांवर महानगरपालिका आणि सिडको कारवाई करीत नसल्याने सामाजिक संघटनाकडून नाराजी व्यक्त होत होती. अखेर एनआरआय पोलिसांनी कारवाई केली असून 10 डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत.
Mumbai News: काल मुंबईच्या मालवणी परिसरात रामनवमीच्या रात्री झालेल्या दोन गटांच्या बाचाबाची नंतर दगडफेक झाली. यावेळी पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर मालवणी पोलिसांनी 200 ते 300 लोकांविरोधात गुन्हा दाखल करून 20 जणांना अटक देखील केली. आता या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आता मुंबई पोलिसांकडून मालवणी परिसरामध्ये रूटमार्च काढण्यात आला आहे. या रूट मार्चमध्ये मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यातील पोलीस सहभागी झाले आहेत. पोलिसांनी मालवणी पोलीस स्टेशन पासून संपूर्ण मालवणी परिसरातील रस्त्यावरून पायी गस्त (रूट मार्च) पूर्ण केला.
Mumbai News: काल मुंबईच्या मालवणी परिसरात रामनवमीच्या रात्री झालेल्या दोन गटांच्या बाचाबाची नंतर दगडफेक झाली. यावेळी पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर मालवणी पोलिसांनी 200 ते 300 लोकांविरोधात गुन्हा दाखल करून 20 जणांना अटक देखील केली. आता या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आता मुंबई पोलिसांकडून मालवणी परिसरामध्ये रूटमार्च काढण्यात आला आहे. या रूट मार्चमध्ये मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यातील पोलीस सहभागी झाले आहेत. पोलिसांनी मालवणी पोलीस स्टेशन पासून संपूर्ण मालवणी परिसरातील रस्त्यावरून पायी गस्त (रूट मार्च) पूर्ण केला.
Amravati News: कोरोनामुळे अमरावतीत एकाचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाने एकाचा मृत्यू तर 6 जणांना कोरोनाची लागण
अमरावती शहरातील विलास कॉलनी येथील 54 वर्षीय व्यक्तीचा हायटेक रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली...
Mumbai News : आरे कारशेडमधील झाडं तोडण्याच्या प्रकरणात पर्यावरणवाद्यांना अशंत: दिलासा
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार केवळ 84 झाडं तोडण्यास हायकोर्टाकडून परवानगी
त्याव्यतिरीक्त 93 झाडं तोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश स्पष्ट करून घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून ही झाडं तोडण्याबाबत अनुमती मिळत नाही तोपर्यंत परिस्थितीत 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देश
याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात 11 एप्रिलला होणार सुनावणी
येणाऱ्या काळात विविध निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवून लोकांचे सामाजिक ध्रुवीकरण करायचे संभाजी नगर मध्ये जसे घडवायचे होते तसे घडवण्यात यश आले नाही या सर्व प्रकारांवर गृहमंत्राचा अंकुश हवा पण तसं होत नाहीये असा आरोप काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. महाविकास आघाडीची संभाजी नगर मधील सभा घेण्यावर आम्ही ठाम आहोत परिस्थिती नियंत्रणात असल्याची महिती आमच्या कडे आहे त्यामुळे ती सभा रद्द करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात चित्रकला महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी परीक्षेवर बहिष्कार घातला असून आज पंढरपूर येथील सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयाच्या बाहेर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत परीक्षांवर बहिष्कार सुरूच राहणार असल्याची भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. यावेळी संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. वारंवार शासनाकडे मागणी करूनही अनेक वर्षांपासून राज्यातील चित्रकला महाविद्यालय अनुदानापासून वंचित आहेत. याचबरोबर शिक्षण शुल्कातही वाढ नसल्याने चित्रकला महाविद्यालय चालवणे कठीण झाल्याने शिक्षकांना शासकीय नियमाने वेतन मिळत नसल्याने कला महाविद्यालय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभरात एकाच वेळी कला संचालक विनाअनुदानित महाविद्यालस अनुदान आणि शैक्षणिक शुल्क वाढ याचबरोबर विविध मागण्यांसाठी परीक्षेवर बहिष्कार घालून शासनाचा निषेध करण्यात आला.
Jalgaon News : स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या बस अपघातात 25 हून अधिक शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. जळगावातील पहूर शेंदुर्णी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिरांची ही बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना हा अपघात घडला.
Palghar News : मोखाडा तालुक्यातील मोखाडा नगरपंचायत हद्दीतील टाक पाडा येथील रहिवासी भिकाजी बुधाजी माळी यांच्या राहत्या घराला रात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर ,रेशनिंग दुकान आणि घरात असलेली जवळपास पाच लाख रुपये रोख रक्कम जळून खाक झाली.
Mumbai Metro 4 : मुंबईतील मेट्रो 4 चा मार्ग अखेर मोकळा
दोन वर्षांपासून रखडलेल्या टप्प्याचं काम पूर्ण होण्यातील अडथळा दूर
इंडो निप्पॉन कंपनी आणि यशवंत सहकारी संस्थेने दाखल केल्या होत्या याचिका
बेकायदेशीर जमीन अधिग्रहण आणि इतर कारण देत दाखल केल्या होत्या याचिका
Mumbai Metro: मेट्रो 4 चा मार्ग अखेर मोकळा
दोन वर्षा पासून रखडलेल्या टप्याचं काम पूर्ण होण्यातील अडथळा दूर
इंडो निप्पॉन कंपनी आणि यशवंत सहकारी संस्थेनं दाखल केल्या होत्या याचिका
बेकायदेशीर जमीन अधिग्रहण आणि इतर कारण देत दाखल केल्या होत्या याचिका
मुंबई व ठाण्याला जोडणाऱ्या वडाळा-कासारवडवली या मार्गावरील मेट्रो-4 या प्रकल्पाविरोधातील दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. घाटकोपर परिसरातील या प्रकल्पाचे जवळपास दोन वर्षांपासून रखडलेले कामही आता मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प राबवण्याचे एमएमआरडीएला पूर्ण अधिकार आहेत. भूसंपादन प्रक्रिया मेट्रो कायद्यांतर्गतच करण्याचे सरकारला बंधनही नाही. त्यामुळे या प्रकल्पात काहीच अवैध नाही, असा युक्तिवाद राज्य सरकार आणि एमएमआरडीएतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ आणि अॅडव्होकेट अक्षय शिंदे यांनी युक्तिवाद केला. कोर्टानं तो ग्राह्य धरला. ठाण्यातील कासारवडवली ते वडाळा भक्ती पार्क असा हा मार्ग आहे.. ठाण्यातील तीन हात नाका, मुलुंडमधील आर-मॉल, भांडुप एलबीएस मार्ग, गरोडिया नगर ही या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं आहेत.
Buldhana Accident News: खामगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरातील रेल्वेगेट जवळ एका अज्ञात वाहनाने एका श्वानाला धडक दिली. त्यात त्या श्वानाचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी ‘पीपल्स फॉर अनिमल’ समितीच्या अध्यक्ष सुनीता आयलानी यांनी थेट खामगाव शहर पोलीसात रीतसर लेखी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला आणि मृत श्वानाचे विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात खामगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालक विरुद्ध भादंवि 1860 च्या कलम 428 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
The Elephant Whisperers: ऑस्कर-2023 (Oscar 2023) हा पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास ठरला. कारण या सोहळ्यात भारतानं दोन कॅटेगिरीतील पुरस्कार जिंकले. 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटानं डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून हत्ती आणि त्याचे केअर टेकर्स यांची गोष्ट मांडण्यात आली आहे. नुकतीच 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीच्या टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगानं (Guneet Monga) नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Nashik News: अवकाळी आणि गारपिटीने शेतकरी त्रस्त असलेल्या शेतकऱ्याचा कांद्याला अवघा कवडीमोल भाव मिळत असताना शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करत शासनाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करत दिलासा दिला आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आज 31 मार्च अनुदान मिळण्याची शेवटची तारीख असल्याने बाजार समितीत कांद्याची मोठी आवक वाढत आहे. याचा थेट परिणाम कांद्याच्या भावावर होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Mumbai Water Cut News: ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईवर (Mumbai Water Cut) पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला (Mumbai News) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मुंबईत पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. जून, जुलैच्या पावसावर (Rain Updates) पाणी कपाती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या (BMC News) वतीनं करण्यात आलं आहे.
Gondia News: आपल्या दुकानातून जवळच असलेल्या घरी जाण्याकरिता निघालेल्या चिमुकल्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदिया शहरातील बाजपेयी चौकात घडली. राफन अफरोज शेख रा. बाजपाई चौक गोंदिया असे या घटनेतील मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरातील आक्रोशीत जमावाने ट्रकला जाळपोळ केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रामनवमीचा सण तसेच रमजान महिना सुरू असल्यामुळे परिस्थिती चिघडू नये करिता घटना स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मृतदेह उत्तरीय तपासणी करीता शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. त्याचसोबत आज अनिल जयसिंघानी, जावेद अख्तर, चंदा कोचर, श्रद्धा वालकर यांच्यासंबंधित याचिकांवर सुनावणी होणार आहे. याचसोबत आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे...
अनिल जयसिंघानी यांच्या अटकेच्या याचिकेवर सुनावणी
अमृता फडणवीस प्रकरणात अटक आरोपी अनिल जयसिंघानीनं अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. आपल्या विरोधात दाखल FIR दाखल करण्यापासून अटक करेपर्यंत पोलिसांनी कायदेशीर बाबींच उल्लंघन केल्याचा दावा अजय जयसिंघानी यांनी या अर्जात केला आहे.
जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर सुनावणी
आरएसएसची तुलना तालीबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरील वादावर मुलुंड कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जावेद अख्तर यांना याप्रकरणी दिलासा द्यायला नकार दिल्यानं, आज जावेद अख्तर कोर्टात हजर होतात का हे पाहणं महत्वाचं आहे.
आयपीएलचा हंगाम सुरू
आजपासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
कलिना लायब्ररी लाच प्रकरणी याचिकेवर सुनावणी
पीएमएलए कोर्टात कलिना लायब्ररी कामात लाच घेतल्याचा आरोपांच प्रकरण न्यायालयात असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांवर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. नाशिक फेस्टिवलसाठी ही लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भुजबळांसह इतरांनी ही केस डिस्चार्ज करण्यासाठी एक याचिका दाखल केली आह.
चंदा कोचर यांच्या विरोधातील सीबीआयच्या रिमांड अॅप्लिकेशनवर सुनावणी
सीबीआय कोर्टात चंदा कोचर विरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या रिमांड अप्लिकेशनवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टानं जर सीबीआयची विनंती मान्य केली तर चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी
श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आफताबला ताकिद दिली होती कि पुन्हा वकिल बदलला तर बाजू मांडायला वेळ दिला जाणार नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -