Maharashtra News Live Updates : चंद्रपूर: वरोरा-वणी मार्गावर कारच्या भीषण अपघातात प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2023 11:45 PM
Chandrapur News : चंद्रपूर: वरोरा-वणी मार्गावर कारच्या भीषण अपघातात प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वरोरा-वणी मार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. नव्या महामार्गावर कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने धडक दिली. मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार यांचा अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. 

अमृता फडणवीस लाच ऑफर प्रकरण:  मुंबई पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेतले

अमृता फडणवीस लाच ऑफर प्रकरण:  मुंबई पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेतले आहेत.


 ते आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार आहेत.


 अमृता फडणवीस यांना पाठवलेल्या व्हिडिओमधील ऑडिओची पडताळणी करण्यासाठी घेतले नमुने


 पोलिसांना तिच्या मोबाईल फोनचा लॉक उघडण्यास यश मिळाले आहे. अधिक तपशील मिळविण्यासाठी त्यांची छाननी सुरू आहे.  याआधी अनिक्षा पासवर्ड शेअर करण्यास करत होती टाळाटाळ

जालन्यात वांगी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संताप

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या  पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने वांग्याला एक रुपया किलोच भाव मिळत असल्यामुळे संताप व्यक्त करत वांगे रस्त्यावर फेकून दिले. मंगळवारी आठवडी बाजारात रामेश्वर देशमुख यांनी वांगे तोडून विक्रीसाठी आणले, मात्र दिवसभर बसूनही खर्चही निघत नसल्याच लक्षात येताच शेवटी  त्यांनी ही वांगे रस्त्यावर फेकून आपल्या संतापलावाट मोकळी करून दिली.

Corona Virus:  कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक

Corona Virus:  कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता पंतप्रधान मोदींनी  तातडीची बैठक बोलावली आहे.  दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान मोदींची बैठक होणार आहे. कोविडबाबत परिस्थिती हाताळण्यासाठी तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. 

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या गुढीवर केंद्र सरकारचं आक्रमण, संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut : महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो. त्या गुढीवर केंद्र सरकारने मोघलाई पद्धतीने आक्रमण केलंय अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीये.  तर नव्या वर्षात शिवसेनेची गुढी उभारण्याचा संकल्प जनतेने केला असल्याचं राऊत म्हणालेत.. 

Unseasonal Rain:  कृषिमंत्री अब्दुल सत्तार नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर

Unseasonal Rain:  एकीकडे मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होत असून दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बळीराजा संकटात सापडलाय... त्याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील आनंद खेडा येथे सत्तार यांनी झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली... असून येत्या 25 तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदत घोषित केली जाईल, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं...

Chandrapur:  चंद्रपूर- गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनतर्फे महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय

Chandrapur:  एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला.  त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. असाच निर्णय आता चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशननं देखील घेतलाय.. चंद्रपूर- गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या खासगी बसेसमध्ये आता महिलांना ५० टक्के सूट मिळणार आहे..

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार, राज ठाकरेंचा कुणावर निशाणा?

Raj Thackeray:  मुंबईतील शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे.. राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. राज ठाकरे नेमके कुठले मुद्दे मांडतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मशिदीवरील भोंग्यांवर ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Gudi Padwa:  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगली मार्केटयार्डात पार पडले हळद सौदे, हळदीला मिळाला प्रती क्विंटल 11500 उच्चांकी दर

Gudi Padwa:  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  सांगलीच्या मार्केट यार्डात हळद सौदे पार पडले. हळदीला प्रती क्विंटल 11500 दर मिळाला. यामध्ये हळदीला प्रती क्विंटल 11500 इतका दर मिळाला आहे.  दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळदीचे सौदे काढले जातात. यामध्ये खुल्या पद्धतीने हळदीचे लिलाव केले जातात. आज पाडव्याच्या दिवशीही मार्केट कमिटी आवारात हळदीचे सौदे पार पडले. यामध्ये कर्नाटकातील हळदीला उच्चांकी 11500 इतका दर प्रति क्विंटलसाठी मिळाला. याचबरोबर साडेसहा हजारापासून ते 11500 पर्यंत हळदीला आजच्या सौद्यामध्ये दर मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. 

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates : गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध शोभायात्रा यात्रा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.  जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...


मुंबई -  गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून सकाळी 8 वाजल्यापासून शोभा यात्रेला सुरूवात होणार आहे. साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथ हे या शोभा यात्रेतलं मुख्य आकर्षण असणार आहे. आर्य चाणक्य यांच्या हातात 22 फुटी गुढी या चित्ररथात साकारली जाणार आहे. 


डोंबिवली - गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा सकाळी 6:45 वाजता सुरू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 8.30 वाजता येतील. आकाश ठोसर आणि सायली पाटील डोंबिवलीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून असेल. सोनी मराठीची टीम हास्य जत्रा सकाळी 6.30 वाजल्यापासून शोभायात्रेत होणार आहेत.


ठाणे (Thane) – कोपिनेश्र्वर मंदिर न्यासा सकाळी 7 वाजता कोपिनेश्र्वर मंदिर, तलावपाळी येथून शोभा यात्रा निघणार आहे.


मुलुंड शोभायात्रा – मुलुंड गुढीपडवा शोभा यात्रा समिती आयोजित गुढी पाडवा शोभायात्रा सकाळी 7.30 वाजता निघेल. चिंतामणराव देशमुख उद्यान ते संभाजी मैदान निघणाऱ्या यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथक, लेझीम असेल. 


कोल्हापूर  – गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथून सकाळी 9.30 वाजता शोभा यात्रा सुरू होणार आहे. या शोभायात्रेत सुरूवातीला बाईकर्स त्यानंतर बैलगाड्या, मर्दानी खेळ, झिम्मा फुगडी, लेझीम पथक, ढोल पथक राजपथप्रमाणे साडेतीन शक्तीपीठाचा देखावा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे. 


पुणे – पुण्यात  (Pune)  बावधन परिसरात शोभा यात्रा असणार आहे, सकाळी 7.30 वाजता. या यात्रेमध्ये साधारण 500 लोक असतील. पोवाडा, लेझीम, ढोल पथक अशी पारंपरिक पद्धतीची यात्रा असेल. 


नाशिक – भद्रकाली येथून शोभायात्रा निघणार आहे, सकाळी 7 वाजता. 


नागपूर – सिद्धिविनायक ट्रस्टकडून सकाळी 6.30 वाजता नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा निघते. नागपूरच्या तात्या टोपे नगर गणेश मंदिरातून निघून ही मिरवणूक लक्ष्मीनगर चौकात पोहचेल. तेथे सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Mns Gudi Padwa Melava)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचा गुढीपाडवा आज शिवाजी पार्कवर होणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.