Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगर : साखळी आंदोलन मागे घेण्याची खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा; नामांतरविरोधी आंदोलनाला धार्मिक रंग देण्यात येत असल्याने आंदोलन स्थगित
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
छत्रपती संभाजीनगर : साखळी आंदोलन मागे घेण्याची खासदार इम्तियाज जलील यांनी घोषणा केली आहे. मागील 14 दिवसांपासून आंदोलन सुरू होते; काही संघटनांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नामांतर मुद्द्याला हिंदू मुस्लिम असा करण्यात आल्याने हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जलिल यांनी सांगितले.
Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्रात कोव्हिडच्या ॲक्टिव्ह केसेस पुन्हा एक हजारांहून अधिक, रुग्णसंख्या १ हजार २९ वर पोहचली आहे. 13 नोव्हेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक झाली. आज राज्यात 197 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आज राज्यात 93 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई, पुणे आणि ठाण्यात ॲक्टिव्ह केसेसची संख्या अधिक आहे.
विधान परिषदेची विशेष अधिकार समिती जाहीर करण्यात आली आहे. प्रसाद लाड समितीचे अध्यक्ष आहेत.
हक्कभंग सूचनांवर कारवाई करणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समिती गठीत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली आहे. या समितीने एका महिन्यात अहवाल सादर करावा अशा देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
Pune news : पुणेकरांना महापालिकेकडून मिळकतकरात देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम राहणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील कॅबिनेटच्या बैठकीत यावर प्रस्ताव आणून मान्यता देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय....
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा...
शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू योगदान देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतही कॅबिनेटमध्ये झाला निर्णय....
कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय....
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय....
Matheran : ई रिक्षाच्या समर्थनार्थ आज माथेरान बंद आहे. तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू झाली होती. 4 मार्चला मुदत संपल्यानं ई रिक्षासेवा बंद झाली. मात्र ई रिक्षा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी माथेरानकरांनी आज बंद पुकारला. माथेरानमधील सर्व दुकानं बंद, बाजारपेठेत शुकशुकाट आहे.
Bhandara News: भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांकडून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News: महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागल्याचा काही इतिहास प्रेमींचा दावा आहे माहुलीतील एक वास्तू येसूबाईंची समाधी असल्याचा उल्लेख आहे. मोडी लिपीतील एका पत्रात असल्याचा दावा केला
Chhatrapati Sambhaji Nagar News: बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बंदूक आणि तलवारीच्या धाकावर टोळक्याने एका वाहन चालकाचा 85 हजारांचा ऐवज लुटला. ही घटना 14 मार्चला रात्री बोगद्याजवळ सावंगी परिसरात घडली. या घटनेत मुंबईच्या एका वाहनचालकाच्या दोन अंगठ्या रोख 65 हजार असा 85 हजारांचा ऐवज लुटला गेला. या घटनेने वाहनचालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे..
Mumbai Pollution: मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. ही माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार आहे.
Ahmednagar News: अहमदनगरातील आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारात संप काळातही शाळा सुरु आहे . पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनात, गावकऱ्यांनी स्वतः मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला
Mumbai Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा एक भीषण अपघात झाला.. कारनं ट्रकला धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.. कार मुंबईहून पुण्याकडे जात होती.. उर्से टोलनाक्याजवळ कारनं ट्रकला मागून धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली.. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
पार्श्वभूमी
17 March Headlines : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे आच चौथ्या दिवशी देखील संप सुरू आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात काल शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती माजी आमदार जे. पी. गावीत यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री आज सभागृहात निवेदन सादर करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सभागृहात निवेदन सादर करणार
नाशिकवरून विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंदमध्ये पोहचला आहे. काल विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत तीन तास सर्व विषयांवर चर्चा झाली आहे. चर्चेनंतर मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार जे पी गावीत यांनी दिली आहे. परंतु, निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर मोर्चा आहे तसाच सुरू राहणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांसदर्भात सभागृहात निवेदन सादर करणार आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य जनतेची शासकीय कार्यालयातील कामे अडकून पडल्याने अनेक नागरिक शासकीय कार्यालय येथे फेऱ्या मारत आहेत.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची कोठडी आज संपणार
दारु घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची कोठडी आज संपत आहे. दुपारी 12 वाजता सिसोदीया यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
केंद्रीय कॅबिनेटची मिटींग
आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधानांच्या दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय कॅबिनेटची मिटींग होणार आहे.
काँग्रेसच्या निवडणूक समितीची
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे.
कृषी योजनांच्या जागरासाठी आजपासून सांगलीत 3 दिवस कृषी महोत्सव
कृषी योजनांच्या जागरासाठी आजपासून सांगलीत 3 दिवस कृषी महोत्सव सुरू होत आहे. या कृषी प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त स्टॉल असून यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे या प्रमुख उद्देशाने महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये पौष्टिक तृणधान्य उपपदार्थांचे प्रदर्शन व विक्री, पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट, पौष्टिक तृणधान्याबाबत आहार तज्ज्ञांचा परिसंवाद, पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -