Maharashtra Exit Polls Result 2024  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, काही ठिकाणी कमी मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झालं आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंतर आता उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदारांनी मताचं दान कोणाच्या पारड्यात टाकलं हे जरी 23 नोव्हेंबरला समजणार असलं तरीदेखील एक्झिट पोलचे ( Exit Polls) आकडे समोर आले आहेत. यामध्ये कोकणात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबतची माहिती दिली आहे. 


कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर मंत्री अदिती तटकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, नितेश राणे आणि निलेश राणे असे नेते निवडणुकीच्या मैदानात आहेत. 


SAS GROUP हैदराबादचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसान कोकणात महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या यासंदर्भातील माहिता पाहुयात. 


SAS GROUP हैदराबाद  एक्झिट पोल 


१) कोकण  (एकूण जागा 39)


महाविकास आघाडी 14 ते 15 जागा
महायुती - 22 ते 23 जागा
इतर 1 ते 2


2) लोकशाही रुद्र


कोकण - (एकूण जागा 39)


भाजप - 07
शिवसेना (शिंदे गट) - 11
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
काँग्रेस - 01
शिवसेना (ठाकरे गट ) 06
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 06


3) ZEE AI POLL


ठाणे- कोकण (एकूण जागा 39)


महायुती - 23-28
मविआ - 09-14


....................................................................................................................................................................................................................................................


SAS GROUP HYDRABAD एक्झिट पोलनुसार राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?


महायुती 127-135
मविआ 147-155
इतर 10-13


विदर्भ (एकूण जागा 62)


मविआ 33-35
महायुती 26-27
इतर 2-3


पश्चिम महाराष्ट्र  (एकूण जागा 70)


मविआ 40-42
महायुती 27-28
इतर 2-3


मराठवाडा   (एकूण जागा 46)


मविआ 27-28
महायुती 17-18
इतर 2-3


मुंबई   (एकूण जागा 36)


मविआ 18-19
महायुती 17-18
इतर 1-2


उत्तर महाराष्ट्र  (एकूण जागा 35)


मविआ 15-16
महायुती 18-21
इतर 2


कोकण  (एकूण जागा 39)


मविआ 14-15
महायुती 22-23
इतर 1-2


मुंबई - (एकूण जागा 36)
भाजप - 12
शिवसेना (शिंदे गट) - 02
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
काँग्रेस - 02 
शिवसेना (ठाकरे गट ) 14
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 01


लोकशाही रुद्र कोणत्या विभागात कोणत्या पक्षाला किती जागा?


कोकण - (एकूण जागा 39)


भाजप - 07
शिवसेना (शिंदे गट) - 11
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
काँग्रेस - 01
शिवसेना (ठाकरे गट ) 06
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 06


पश्चिम महाराष्ट्र - (एकूण जागा 58)


भाजप -18


शिवसेना (शिंदे गट) - 05
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 07
काँग्रेस - 08
शिवसेना (ठाकरे गट ) 02
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 14


उत्तर महाराष्ट्र - (एकूण जागा 47)


भाजप - 14
शिवसेना (शिंदे गट) - 06
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
काँग्रेस - 06
शिवसेना (ठाकरे गट ) 06
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 08


मराठवाडा - (एकूण जागा 46)


भाजप - 09
शिवसेना (शिंदे गट) - 03
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 02
काँग्रेस - 09
शिवसेना (ठाकरे गट ) 10
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 09


विदर्भ - (एकूण जागा 62)


भाजप - 23
शिवसेना (शिंदे गट) - 04
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
काँग्रेस - 21
शिवसेना (ठाकरे गट ) 04
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 04