Maharashtra News Live Updates: नागपुरातील अजित पवारांच्या घराबाहेर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jan 2024 11:31 AM
Nagpur News: नागपुरातील अजित पवारांच्या घराबाहेर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार

Nagpur News: नागपूरमध्ये आज अंगणवाडी सेविका उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड या शासकीय निवासास्थानी आंदोलन करणार आहेत. तसंच कोमताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नव मतदारांसोबत 'नमो नवमतदाता संमेलनाचं' आयोजन

PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नव मतदारांसोबत 'नमो नवमतदाता संमेलनाचं' आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने भाजपतर्फे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईतील विल्सन महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय.

Nanded Suicide: नांदेड जिल्ह्यातील तरुणाची आरक्षणासाठी आत्महत्या

Nanded Suicide: नांदेड जिल्ह्यातील थुगाव येतील अरविंद भोसले वय 21 या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे नाही तर माझ्या मरणाला काही अर्थ राहणार नाही. एक मराठा लाख मराठा असे चिठ्ठी लिहीत अरविंद यांनी आपली जीवन संपवले. सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावी आणि अरविंद यांच्या घरच्यांना आर्थिक मदत द्यावी असे मागणी स्वराज्य संघटनेतर्फे करण्यात आली आहे 

Nashik ATS:  नाशिकमध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधित एका आरोपीला अटक

Nashik ATS:  नाशिकमध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधित एका आरोपीला एटीएसने ताब्यात घेतलंय.. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी एटीएसने ही कारवाई केलीय. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं आरोपीचं नाव असून त्याची अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसकडून मिळालेय

Panvel Manoj Jarange: मराठा मोर्चासाठी पनवेल , रायगड जिल्हातून 10 लाख भाकरी , चपाती येणार

Panvel Maratha Protest:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं कूच करत आहे. जरांगेंचा मोर्चा आज लोणावळ्यातून पुढे सरकतोय. आज हा मोर्चा पनवेलमध्ये मुक्कामी असणार आहे. तसंच या कार्यकर्त्यांसाठी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून १० लाख भाकरी आणि चपात्यांची व्यवस्था करण्यात आलीय. 

Ahmednagar Viral Video:  अहमदनगरमधील मराठा सर्वेक्षणातील सावळ्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

Ahmednagar Viral Video:  अहमदनगरमधील मराठा सर्वेक्षणातील सावळ्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये काही मराठा युवकांनी सर्वेक्षण न करता येणाऱ्या सर्वेअरचा व्हिडिओ शूट करुन व्हायरल केलाय. या व्हिडिओमधील व्यक्ती, सर्वेअर असून त्याला मोबाईल आणि त्यातील सर्वेक्षणाचं अॅप वापरता येत नसल्याचं दिसतंय. त्यामुळे मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करत या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची महत्वपूर्ण बैठक मुंबईत

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची महत्वपूर्ण बैठक मुंबईत आज सकाळी 11 वाजता होणार आहे...या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे...या बैठकीत काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल.

NCP Political Crisis:  शरद पवार गटाच्या दाव्यांवर अजित पवार गटाला उत्तरं द्यावी लागणार

NCP Political Crisis:  राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाच्या साक्ष नोंदवली जाणार आहे.... प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष घेतली जाईल. यावेळी शरद पवार गटाच्या वतीने जे दावे करण्यात आले होते, ते खोडून काढण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होईल. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.