Continues below advertisement

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेच्या बैठकीत 3 सप्टेंबरला जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले. आता 5 टक्के आणि 18 टक्के जीएसटी स्लॅब कायम आहेत. अन्न पदार्थ, कापड, कार, एसी, टीव्ही यासारख्या वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. जीएसटी दरातील बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

नव्या जीएसटी रिफॉर्मनुसार अनेक वस्तू 22 सप्टेंबरपासून स्वस्त होणार आहेत. अन्न पदार्थांपासून दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. एलपीजी सिलेंडरचे दर कमी होणार का याबाबत माहिती लोकांकडून घेतली जात आहे.

Continues below advertisement

एलपीजी सिलेंडरवर किती टक्के जीएसटी? LPG Cylinder GST Rate

सरकार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरवर वेगवेगळ्या प्रकारचा जीएसटी आकारते. घरगुती वापराच्या सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटी परिषदेकडून सिलेंडर दरावरील जीएसटी दरात बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच एलपीजीवरील जीएसटी कमी होणार नाही.

22 सप्टेंबरपासून इतर वस्तूंचे दर बदलले तरी घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर बदले जाणार नाहीत. सिलेंडरचे दर कायम राहतील. घरगुती वापराच्या सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी आणि 18 टक्के जीएसटी लागू असेल.

जीएसटी परिषदेच्या 3 सप्टेंबरला झालेल्या जीएसटी काऊन्सिलमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेनं मोठे बदल केले आहेत. 2017 मध्ये जीएसटी लागू करण्यात आलं होतं. परिषदेनं दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून आरोग्य, शैक्षणिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कृषी उपकरणं, विमा,ऑटोमोबाईलवरील जीएसटी घटवला आहे.

तंबाखू सारख्या उत्पादनांवरील जीएसटी 40 टक्के आहे. शीतपेयांवरील जीएसटी देखील 40 टक्के आहे. सुपर अलिशान कारवरील जीएसटी 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.