Maharashtra News Updates: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज काश्मीरमध्ये समारोप, श्रीनगरच्या शेरे-काश्मीर मैदानाक काँग्रेसची जाहीर सभा.

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jan 2023 07:10 PM
राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. 


विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष  डॉ अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु  प्रा. सुरेश कुमार (युजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील. तर, आयआयटी कानपुरचे संचालक डॉ अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिर‍िक्त मुख्य सचिव दिपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ मीना चंदावरकर (युजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.


मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दिनांक १० सप्टेंबर  २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिंगबर शिर्के यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपव‍िण्यात  आला आहे.   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांचा कार्यकाळ दिनांक १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ कारभारी काळे यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Pune News : बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणी ईडीकडून अमर मूलचंदानी यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी छापे; 41 लाख रोख, दोन कोटींचे सोने जप्त

बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणी ईडीकडून अमर मूलचंदानी यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी छापे मारण्यात आले. ईडीने ही कारवाई 27 जानेवारी रोजी केली होती. या कारवाईत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील अमर मूलचंदानी यांच्याशी कार्यालये, निवासस्थानी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ईडीने 2.72 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने, सुमारे 41 लाख रुपयांची रोकड, डिजीटल उपकरणे, कागदपत्रे जप्त केली आहेत.





Beed News : नियम डावलून दारूच्या दुकानाला परवाने; त्पादन शुल्क विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रतिकात्मक दारू विक्री आंदोलन

Beed News :  बीडमध्ये नियम डावलून दारूच्या दुकानाला परवाने दिले जात असून यामध्ये अनेक हॉटेल चालक हे नियम अटीचे पालन करत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक दारू विक्री आंदोलन केलं.. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनेक लोकांना नियम डाउनलोड दारू विक्रीचे परवाने दिले जात आहेत त्याचबरोबर शहरांमधील वाईन शॉप आणि परमिट रूम हॉटेल सालकाकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत असून अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे

Mumbai Fire : मुंबईतील सायन परिसरातील ओम शिव शक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

Mumbai Fire : मुंबईतील सायन परिसरातील ओम शिव शक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. लेवल एकची आग आहे. 

Navneet Rana : शिवडी न्यायालयाचा नवनीत राणा यांना आणखी एक धक्का, हरभजन सिंग कोर्टाकडून फरार म्हणून घोषित

Navneet Rana : खासदार नवनीत राणा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाने नवनीत राणा यांना  आणखी एक धक्का दिला आहे. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Bharat Jodo Yatra:  राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये आज समारोप

Bharat Jodo Yatra:  पाच महिन्यांपासून सुरु झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये आज समारोप होतोय. जोरदार बर्फवृष्टी सुरू असतानाही श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानात काँग्रेसची सभा सुरू आहे..

CM Eknath Shinde :  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंच्या शासकीय विमानात पुन्हा बिघाड

CM Eknath Shinde :  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंच्या शासकीय विमानात पुन्हा बिघाड झाला आहे.  मुंबई विमानतळावरुन टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमानाचं लँडिंग करण्यात आले आहे.  

Dr. Narendra Dabholkar Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण, नव्या तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर

Dr. Narendra Dabholkar Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण झाला आहे. नव्या तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर करण्यात आला आहे. 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यातील साक्षही पूर्ण झाल्याचं सीबीआयने सांगितलं. या अहवालावर सीबीआय तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करणार आहे. सीबीआयच्या भूमिकेनंतर हायकोर्ट निर्देशजाहीर करणार आहे. खटल्यातील आरोपींच्या वतीने याप्रकरणी आता हायकोर्टाची देखरेख संपवण्याकरता याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टातील याचिकेचा खटल्यावर परिणाम होत असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. दाभोलकर कुटुंबियांचा मात्र याचिकेला विरोध आहे.

अकोल्यात नदीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, नदीकाठावर संरक्षक भिंतीची मागणी पूर्ण झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचा नातेवाईकांचा पवित्रा

Akola News :  खेळताना नदीच्या पुलावरून पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीच्या पुलावर ही घटना घडली.  दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत.  7 वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि 9 वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज असं मृत चिमुकल्यांची नावं आहे  नदीच्या पुलाला कठडे नसल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.  कठड्यांसह नदीकाठावर संरक्षक भिंतीची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे.   घटनेच्या निषेधार्त बाळापूर शहर बंद ठेवण्यात आले आहे. 

Pune Banglore Highway Accident : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात

Pune Banglore Highway Accident : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.रंजना सराफ आणि शांताबाई जाधव असे मृत महिलांची नावं असून जखमींवर शिरवळ येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कर्नाटक येथील गोकर्ण महाबळेश्वर येथून दर्शन घेऊन हे कुटुंब पुण्याच्या दिशेने जात होते. पहाटे पाच वाचण्याच्या सुमारास कारचालकाचे झोपेत गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने खंबाटकी बोगद्याच्या कठड्याला कार धडकल्याने हा अपघात झाला.

पुण्यातील येरवडा परिसरात चार अल्पवयीन टोळक्याचा धुडगूस; 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार, वाहनांची तोडफोड

Pune News : पुण्यातील येरवडा परिसरात चार अल्पवयीन टोळक्याने धुडगूस घातला. हातात कोयता घेऊन 19 वर्षीय तरुणावर वार केले तसंच परिसरातील वाहनांची तोडफोडही केली. येरवड्यातील लक्ष्मी नगर इथल्या गजराज चौकात शनिवारी (28 जानेवारी) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून आरोपींनी तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात पुन्हा वाढ,

Nagpur Metro Ticket Rate : नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. काही स्लॅबमधील तिकीट दरात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सर्वात कमीत तिकीट सहा रुपये हे शून्य ते सहा किमीच्या पहिल्या स्लॅबमध्ये असणार आहे तर सर्वात जास्त तिकीट दर 41 रुपये आहे. 18 किमीपेक्षा पुढील प्रवासासाठी 41 रुपये मोजावे लागणार आहेत.


आधीचे दर


0-6 किमी - पाच रुपये


6-12 किमी - दहा रुपये


12 किमी वरील - 20 रुपये


बदललेले दर 


0-2 किमी - दहा रुपये
2-4 किमी - पंधरा रुपये
4-6 किमी - 20 रुपये
6-9 किमी - 25 रुपये
9-12 किमी - 30 रुपये
12-15 किमी - 30 रुपये
15-18 किमी - 35 रुपये
18 किमीवरील - 41 रुपये

Solapur Fire:  सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंट्सच्या कारखान्याला भीषण आग

Solapur Fire:  सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंट्सच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  या भीषण आगीमध्ये रेडीमेड गारमेंट्सचे दोन कारखाने जळून खाक झाले आहेत. दत्तनगर येथील शिवमाहेश्वरी मंदिराशेजारील कारखान्यांना आग लागली. नागरी वस्तीत ही आग लागल्याने अग्निशमन दल सतर्क  झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  गड्डम आणि कुरापाटी हे दोन रेडीमेड गारमेंट्स कारखाने आगीच्या भक्षस्थानी आहे.  सोलापूर अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.  सुरुवातीला एका कारखान्याला आग लागल्यानंतर ती आग दुसऱ्या कारखान्यापर्यंत गेली. 


 





बारामतीमध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर, पिकांच्या नुकसानीच्या भीतीने शेतकरी मात्र चिंतातूर

Baramati Weather News : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दोन दिवसाच्या कडाक्याच्या थंडीनंतर आज सर्वत्र दाट धुके पडले होते. यामुळे बारामती पुणे रस्ता धुक्यात जणू गायब झाला असल्याचा आभास होत होता. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत दाट धुके होते. या धुक्यामुळे रब्बीतील कांदा, ज्वारी, हरभरा तसेच कोथंबीर, मेथी, पालक यांचे नुकसान  होणार आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

Maharashtra Weather Update: अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर

Maharashtra Weather Update: वातावरणातील बदलामुळे अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय.. दरम्यान या दाट धुक्यातून वाहनं चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Buldhana News: चार हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांमध्येच पडून, 'समाजकल्याण' विभागाचा कारवाईचा इशारा

Buldhana News:  बुलढाणा जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती चे अर्ज महाविद्यालयांकडे पडून आहेत.  त्यामुळे, हे प्रलंबीत अर्ज तत्काळ निकाली काढावे, अन्यथा अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी दिलाय. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले ऑनलाइन अर्ज महाविद्यालयांकडून पाठविले जातात. तर  महाविद्यालय प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवितात. मात्र जिल्ह्यातील चार हजार  18 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या महाविद्यालयावर कारवाईचा इशारा समाज कल्याण विभागाने दिलाय.

Buldhana News: चार हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांमध्येच पडून; 'समाजकल्याण' विभागाचा कारवाईचा इशारा

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांकडे पडून आहेत. त्यामुळे, हे प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढावे, अन्यथा अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी दिलाय. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले ऑनलाइन अर्ज महाविद्यालयांकडून पाठविले जातात. तर महाविद्यालय प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवितात. मात्र जिल्ह्यातील चार हजार 18 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या महाविद्यालयावर करवाईचा इशारा समाज कल्याण विभागाने दिलाय.

Kolhapur News:  फुटबॉल मैदानात राडा घातल्याप्रकरणी 70 जणांवर गुन्हे दाखल

Kolhapur News:  फुटबॉल मैदानात राडा घातल्याप्रकरणी 70 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.  शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान खेळाडूंमध्येही आणि प्रेक्षकांच्या गटात धुमश्चक्री उडाली होती . गुन्हा दाखल झालेल्या 70 जणांमध्ये 17 खेळाडूंचा समावेश आहे. शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या खेळाडूंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

Nanded News: महाराष्ट्रातील BRS पक्षाच्या आगमनाची पहिली सभा, यशस्वी सभा करण्यसाठी तेलंगणातील मंत्री,आमदार, खासदारांचा बैठकांचा धुरळा

Nanded News:  भारत राष्ट्र समिती BRS पक्षाचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे महाराष्ट्रातील आगमन हे जंगी करण्यासाठी आणि तेलंगणा प्रमाणे BRS पक्षाची ताकत व शक्ती प्रदर्शन महाराष्ट्रात दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान येत्या 5 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे के चंद्रशेखर राव यांची सभा तेवढीच भव्यदिव्य करण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आमदार खासदारांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. तर महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या आगमनाची पहिली सभा भव्य व यशस्वी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून BRS पक्षाचे आमदार,खासदार माजी मंत्री नांदेडात ठाण मांडून बसले आहेत. तर आज मोठ्या प्रमाणात BRS पक्षाचे मंत्री, आमदार,खासदार नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. 

Vidhanparishad Election:  विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Vidhanparishad Election:  विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. राज्यात सर्वात चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधरसह अमरावती तसेच नागपूर शिक्षक, मराठवाडा शिक्षक आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होतंय.  

सातारा-कोरेगाव रोडवर भीषण अपघात, ऊसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने उडवलं, दाम्पत्याचा मृत्यू

Satara News : सातारा-कोरेगाव रोडवर रात्री भीषण अपघात झाला. ऊसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने उडवले. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. बजरंग काटकर आणि शोभा काटकर अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची यांना धक्का बसणार, नवी मुंबईतील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी शिंदेंची साथ सोडणार

Navi Mumbai News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली तेव्हा नवी मुंबईतील 40 पैकी 32 नगरसेवकांनी त्यांना साथ देत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये महत्वाचे नगरसेवक होते तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी. ज्येष्ठ नगरसेवक असलेले सुरेश कुलकर्णी सहा ते सात नगरसेवक निवडून आणतात. मात्र सध्या स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री असूनही त्यांची कामे होत नसल्याने त्यांनी पक्ष सोडायची वेळ आली असल्याचे जाहीर केले आहे. कुलकर्णी यांनी तुर्भे येथे घेतलेल्या महिला मेळावा आणि हळदीकुंकू समारंभासाठी दहा हजार महिलांनी उपस्थिती होती. मात्र निमंत्रण देऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठ फिरवली. सरकारमधील मंत्र्यांकडे कामे सांगूनही ती होत नसल्याने नाराजीचा बांध फुटलेल्या सुरेश कुलकर्णी यांनी जाहीर भाषणात आपल्याच सरकारला खडे बोल सुनावले. आमची कामे होत नसतील तर आपण पक्ष सोडण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाई संदर्भात आज महत्त्वाचा दिवस. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. शिवाय विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानातील सभा घेऊन यात्रेचा समारोप होईल. 


शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात लेखी युक्तीवाद


शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाई संदर्भात आज महत्त्वाचा दिवस. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. मागील वेळी सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून आज निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडले जाणार आहेत.  


विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदान


विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे.  2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.  


बंजारा समाजाचा महाकुंभ मेळावा 


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी गावामधील बंजारा समाजाच्या महाकुंभ मेळाव्याचा आज मुख्य दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडवणीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योग गुरु रामदेव बाबा हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.   
 
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप


पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानातील सभा घेऊन यात्रेचा समारोप होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवतील. सकाळी 11.30 वाजता सभेला सुरुवात होईल. काँग्रेसकडून विरोधी पक्षातील 21 पक्षांना कार्यक्रमात सहभागी होण्याची निमंत्रण देण्यात आलंय.


मुंबईत चोवीस तासासाठी पाणीपुरवठा बंद


मुंबईत आज चोवीस तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर 4 फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. 


मुंबईत सर्व पक्षीय खासदारांची बैठक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होणार आहे.  
 
 सचिन वाझेंच्या अर्जावर सुनावणी


माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेनं जामीनसाह काहा कागदपत्रांची मागणी करत विशेष एनआयए कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.