Maharashtra News Updates: चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जाणवले भूकंप सदृश्य धक्के

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jan 2023 11:10 PM
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जाणवले भूकंप सदृश्य धक्के.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जाणवले भूकंप सदृश्य धक्के... रात्री अंदाजे 9:30 च्या दरम्यान जाणवले भूकंप सदृश्य धक्के, धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पसरली दहशत, अंदाजे 2 किलोमीटर भागा मध्ये हा प्रभाव जाणवल्याने या घटनेची कुठल्याच भूकंप मापक यंत्रात नोंद नाही, तज्ज्ञांच्या मते हे धक्के वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या भूमिगत खदनींमध्ये अंतर्गत भूस्खलन झाल्याने बसल्याची शक्यता, या भागात आहेत अनेक बंद पडलेल्या भूमिगत कोळसा खाणी, या खाणी योग्य पद्धतीने बुजवण्यात आल्या नसल्याचा आहे आक्षेप, काही महिन्यांपूर्वी घुग्गुस शहरात अशाच प्रकारे भूमिगत कोळसा खाण धसल्याने एक घर जमिनीत झाले होते गुडूप, प्रशासन सध्या या घटनेनंतर कारणांचा घेत आहे शोध

अहमदनगर शहरातील कोठला परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद






अहमदनगर शहरातील कोठला परिसरातील मंगळवार बाजारात काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले...पतंग उडवण्याचा कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे...या वादाचे रूपांतर नंतर दगडफेकीत झाले...या घटनेत दोन युवक जखमी झाले तर तीन वाहनावर दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले...घटनास्थळी दगडांचा मोठा खच सचल्याचे पाहायला मिळाले, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली...काही संशयितांना पोलिसांनी  ताब्यात घेतले, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले... घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,पोलीस उपअधीक्षक अजित पाटील,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, यांच्यासह मोठा पोलीस फाटा दाखल झाला होता...रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

 



 



नाशिकमध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी

मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झालीय. मामासोबत दुचाकीवर जात असताना या मुलीच्या गळ्याला मांजा कापला. जखमी मुलीला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखर करण्यात आलंय.  

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी, उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

 मकर संक्रातच्या पूर्वसंध्येलाच एक धक्कादायक घटना


- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी


- मामासोबत दुचाकीवर जात असताना घडली घटना


- धामणगाव नदीच्या पुलावरील सायंकाळी सहा वाजेचा प्रसंग


- उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले

Mumbai : निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर आणि कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल, किरीट सोमय्या यांनी दिली माहिती

Mumbai: मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे कुटुंबीय आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध  वरळी येथील गोमाता जनता एसआरएची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. 

Palghar News: पालघर - जव्हार मध्ये काळी जादू करणाऱ्यांना बेड्या

Palghar News: काळी जादू करून पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने गुजरातमधील एका इसमाला दीड लाखांचा गंडा घालणाऱ्या तीन संशयितांना जव्हार पोलिसांनी काळी जादू करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह अटक केली आहे . गुजरातमधील वलसाड येथील कमलेश जोगारी या इसमाला या तिन्ही आरोपींनी आम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे. त्यामुळे दीड लाख रुपये घेऊन या, आम्ही काळी जादू करून तुम्हाला पाच लाख रुपये देऊ असं आमिष दिलं होतं. यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 


 

 

नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करून मिळवली मानाची गदा

सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करून नांदेडच्या शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी खिताब पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या लढतीकडं लक्ष लागून राहिलं होतं. अवघ्या दीड मिनिटातच शिवराज राक्षे याने महेंद्र गाडकवाडला धूळ चारत मानाची गदा मिळवलीय.  

Maharashtra Kesari 2023 : माती विभागातून महेंद्र गायकवाड विजयी, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत धडक

माती विभागात सिकंदर शेख विरूद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. यात महेंद्र गाडकवाड याने सिकंदर शेख याला चिटपट करून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत धडक मारली आहे.  

पालघर जिल्ह्यातील सदिच्छा साने प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक; MBBS विद्यार्थीनी सदिच्छा साने 2021मध्ये वांद्रेमधील बँडस्टँड मधून झाली होती बेपत्ता

सदिच्छा साने प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने आज अटक केली आहे.  मिथु सिंगच्या अटकेनंतर आणखी एकाला अटक कऱण्यात आली आहे.  सदिच्छा साने 2021 मध्ये वांद्रेमधल्या बँडस्टँडमधून बेपत्ता झाली होती. सदिच्छा सानेची हत्या झालीय की आणखी काही घडलंय याचा तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती 


मिथु सिंगच्या अटकेनंतर जब्बार नावाच्या व्यक्तीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले आहे. 


 नोव्हेंबर २०२१ रोजी वांद्रे बँडस्टँड येथून एमबीबीएसचा विद्यार्थी बेपत्ता झाला होती


या आरोपीना बांद्रा पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्हा अंतर्गत अटक करण्यात आला आहे. 


मुंबई गुन्हा शाखा पुढील तपास करत आहे.

Palghar News: पालघर: तलासरीतील वेरोली नदीत मृत माशांचा खच, केमिकलयुक्त पाण्यामुळे घटना घडल्याचा संशय

Palghar News: पालघरमधील तलासरी तालुक्यातील वेरोली या नदीत मृत माशांचा खच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी या नदीत कंपन्यांमधून निघणार केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी टँकरच्या सहाय्याने या नदीत सोडलं असल्याने हा प्रकार घडल्याचं उघडकीस आले आहे. 

सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना गावकऱ्यांनी लावलं पळवून, बीडमधील घटना

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील सिरसदेवी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना गावकऱ्यांनी पळवून लावलंय. सिरसदेवी फाट्यावर भारत भोंगे यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र असा हल्ला केला. यामध्ये भारत भोंगे यांच्या वडिलांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर दरोडेखोर त्या ठिकाणावरून पसार झाले. त्यांनी अन्य दोन ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील नागरिक जागे झाल्याने या दरोडेखोरांना गावातून पळ काढावा लागला. या सर्व प्रकरणानंतर गेवराई पोलिस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. 

Tuljapur News: शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थ्याचे डोके फुटले, तुळजापूरमधील घटना

Tuljapur News: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग रस्त्यावरील  हंगरगा पाटी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर कोसळून दुसरीच्या वर्गातील एक विद्यार्थी जखमी झाला आहे. पहिली आणि दुसरीचे एकूण 18 विद्यार्थी  यातून बचावले आहेत. साहिल अविनाश भगत असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तुळजापुर शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या हंगरगा पाटी इथ जिल्हा परिषदेची शाळेत ही घटना घडली. साहिलला सात टाके पडले असून प्लास्टर जोराने आदळल्याने डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. साहिलला तुळजापूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचा आज नवी मुंबई दौरा, तीन महिन्यात दुसरा दौरा

 Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचा नवी मुंबईत दौरा  आहे. सीबीडी येथे तीन शाखांचे उद्घाटन करणार आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या   पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा  तीन महिन्यात नवी मुंबईत दुसरा दौरा आहे. 

Nashik : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल

Nashik : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल. शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाची खासदार संजय राऊत नेते सुभाष देसाई व नाशिक मधील पदाधिकारी उपस्थित आहेत

Pune News: पुण्यातील रस्त्यांवर थुंकणं काही जणांना महागात,तीन दिवसात तब्बल 1 लाख 23 हजारांचा दंड वसूल

Pune News: पुण्यातील रस्त्यांवर थुंकणं काही जणांना महागात पडलंय. रस्त्यावर थुंकणाऱ्यांनाच पुणे महापालिकेने आणि पोलिसांनी सफाई करायला लावत अद्दल घडवलीये. तर तीन दिवसात तब्बल 1 लाख 23 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

Jalgaon News: जळगावात विदेशातून येणाऱ्या हिवाळी पक्षांचं आगमन

Jalgaon News: सध्या राज्यात थंडीचा थंडीचा जोर काय कमी व्हायचं नाव घेत नाहीय. जळगावात विदेशातून येणाऱ्या हिवाळी पक्षांचं आगमन होतंय. विविध जलाशयावर या पक्ष्यांचं आगमनामुळे हे पक्षी पाहाण्यासाठी सर्वांनी गर्दी केलीय.  त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी निरीक्षणाची मोठी संधी निर्माण झालीय. या परिसरात तुतारी, बगळे, धोबी ,शिकारी, शेकात्या, भारीट, पानं कावळे, वटवते, श्वेत कंठी, गुलाबी मैना, मार्ष, हरिअर, आणि अंगारक अशा विविध प्रजातीचे पक्षी आढळून आलेत. हे पक्षी पाहाण्यासाठी पर्यटकांनीही मोठ्याप्रमाणात गर्दी केलीय.

Panipat:  हरियाणाच्या पानिपतमध्ये आज मराठ्यांचा जागर

Panipat:  हरियाणाच्या पानिपतमध्ये आज मराठ्यांचा जागर होणार आहे. पानिपतमध्ये शौर्यदिनाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत

माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप यांचा अपघात

माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा औरंगाबादहून माजलगावला  परत येत असताना शुक्रवारी रात्री 12 च्या दरम्यान गेवराईजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. 

Satara Accident : महाबळेश्वर जवळच्या मुगदेव इथं मजुरांचा टॅम्पो दरीत कोसळला, टॅम्पोत 50 कामगार असल्याची माहिती

Satara Accident : महाबळेश्वर येथील मुगदेव इथं मजुरांचा टॅम्पो दरीत कोसळल्याची घटना घडली. या टॅम्पोत सुमारे 50 कामगार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावजवळील भागात कामासाठी मजूर आले होते. हे मजूर मुंबईतून आल्याची माहिती मिळाली आहे. 


 


 

Pune MPSC Protest: तब्बल 18 तासानंतर पुण्यातलं एमपीएससी विद्यार्थ्यांच आंदोलन अखेर स्थगित

Pune MPSC Protest: तब्बल 18 तासानंतर पुण्यातलं एमपीएससी विद्यार्थ्यांच आंदोलन अखेर स्थगित करण्यत आले आहे

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. शिवाय आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
 


पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा फायनल थरार


महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. पुण्यात सुरु असलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातील अंतीम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापुरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोन अंतीम लढतींमधील विजेते महाराष्ट्र केसरीच्या अंतीम लढतीत खेळणार आहेत. शनिवारी संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येतील आणि यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जातोय. दुखापतीतून सावरत शिवराजने मॅट विभागाची अंतीम लढत गाठलीय. इथे त्याची लढत 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे.


औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार दिन
 
आज औरंगाबाद विद्यापीठ नामविस्तार दिन आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आणि नेते उपस्थित असतात. या निमित्ताने आज महाविकास आघाडीकडून एक सभा घेतली जाणार आहे. त्यासाठी कॉंग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते अंबादास दानवे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, नितीन राऊत, चंद्रकांत हांडोरे, सुषमा अंधारे , रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. 


पंढरपुरात भोगीनिमित्त रूक्मिणी मातेला भोगी करणार


आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.