Maharashtra News Updates 7th January 2023 : राज्यातील पारा 9 जानेवारीनंतर पुन्हा घसरणार, तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअस घट होण्याचा अंदाज

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jan 2023 11:44 PM
Dhule News: धुळ्यात हिट अँड रनची घटना, टँकरची अनेक वाहनांना धडक

धुळे शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या गुजरातच्या दिशेने केमिकलने भरलेला टँकरने अनेक वाहनांना धडक दिली आहे. टँकर चालक हा नशेमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजेंद्रसिंग सकट असे टँकर चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नेमकं किती लोक या हिट अँड रन घटनेत जखमी झाले आहेत याचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.


ही घटना साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडल्याने धुळे शहरात या घटनेची एकच खळबळ उडाली . घटनेची माहिती मिळतात धुळे जिल्हा पोलीस दलाने तात्काळ घटनास्थळी नाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय येथे जखमींची पाहणी केली, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन धुळेकर नागरिकांना केले.

धावत्या लोकलमधून उतरणे पोलिस  अधिकाऱ्याच्या जीवावर बेतले, कळवा रेल्वे स्थानकावर उतरताना पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

धावत्या लोकलमधून उतरणे पोलिस  अधिकाऱ्याच्या जीवावर बेतले


कळवा रेल्वे स्थानकावर उतरताना पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू


मनोज भोसले असे या अधिकार्याचे नाव असून तो पवई पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.


 ठाणे रेल्वे पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Belgaum News: रामसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवी कोकीतकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

रामसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवी कोकीतकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना हिंडलगा येथे घडली आहे.दोन अज्ञात व्यक्तींनी कार मधून जात असलेल्या रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केला.रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांना उपचारासाठी के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.रवी कोकीतकर यांचा चालकही गोळीबारात जखमी झाला आहे.

प्रेम प्रकरणांमधून लांब करण्यासाठी मित्रांनी केली आपल्या जिवलग मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला

मुंबईच्या मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेम त्रिकोणातून महाविद्यालयीन तरुणाने आपल्या जिवलग मित्रावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे,या हल्ल्यात जयेश सावंत हा वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या हल्ला प्रकरणी मालाड पोलिसांनी हल्लेखोर तरुण आयुष खेडकर वय 20 वर्ष यास 24 तासात अटक केली आहे. दोघेही मुंबईच्या गोरेगाव परिसरातील पाटकर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मात्र एकच मुलीवर दोघं प्रेम करत असल्यामुळे त्या रस्त्यामधून जयेश सावंत याला एकदमच लांब करण्यासाठी आयुष खेडकर यांनी कोयतानी हल्ला केलाचा उघडकीस आला आहे, सध्या मलाड पोलिसांनी आयुष खेडकर याला अटक करून अधिक तपास करत आहे...

रामसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवी कोकीतकर यांच्यावर गोळीबार, मानेला लागली गोळी 

रामसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवी कोकीतकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केलाय. ही घटना हिंडलगा येथे घडली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी कारमधून जात असलेल्या रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केला. रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांना उपचारासाठी के एल ई रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवी कोकीतकर यांचा चालकही गोळीबारात जखमी झाला आहे. 

श्री राम सेनेचे कार्यकर्ते रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार




रामसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवी कोकीतकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना हिंडलगा येथे घडली आहे.दोन अज्ञात व्यक्तींनी कार मधून जात असलेल्या रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केला.रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांना उपचारासाठी के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.रवी कोकीतकर यांचा चालकही गोळीबारात जखमी झाला आहे.

 

 



 


Mumbai: मशीद बंदर परिससार दुकानाला भीषण आग

मुंबईतील मशीद बंदर परिससार दुकानाला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. येथील अब्दुल रेहमान गल्लीतील दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप विजयी, 14 पैकी 14 जागांवर विजय

सिंधुदुर्गमधील कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत 14 पैकी 14 जागा भाजपने जिंकल्या  आहेत. आमदार नितेश राणे यांनी तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघावर भाजपचा झेंडा फडकवला आहे. 

नागपूरात एलजीबीटी कम्युनिटीचा प्राईड मार्च

नागपूरच्या संविधान चौकामध्ये एलजीबीटी समुदायाचे लोक वेगवेगळ्या वेशभूषा स्वतःच्या सन्मानासाठी प्राईड मार्च काढला. यात शेकडो एलजीबीटी समूहाचे लोक सहभागी झाले होते. त्याची आकर्षक वेशभूषा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीला उत्साहात सुरुवात
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीला उत्साहात सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यात एकूण 508 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. यात 160 चालक शिपाई पदे तर 348 पोलीस शिपाई पदांचा समावेश आहे. वीस हजार उमेदवार शिपाई पदासाठी पात्र ठरले असून यात पाच हजार महिला आहेत तर चालक शिपाई पदासाठी 5000 उमेदवार असून यात 266 महिलांचा समावेश आहे. संपूर्ण भरती दरम्यान शारीरिक  व क्षमता मोजण्यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाचा वापर करत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. शासनाने घालून दिलेल्या समानांतर आरक्षणानुसार संपूर्ण प्रक्रियेचे काटेकोर नियोजन केले जात आहे. 2018 पासून शासनाने निर्णय केल्याप्रमाणे केवळ गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारच या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोलीस दलाच्या वतीने यासाठी मोठी यंत्रणा राबविली जात आहे.

 
सूरजागड यात्राला सुरुवात 
गडचिरोलीः शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या सुरजागडवरील ‘ठाकूर देवा’ची जत्रा दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात जत्रा भरवण्याची परंपरा कायम आहे. चार दिवस ही जत्रा चालणार आहे. जत्रेच्या तिसऱ्या दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढते. कारण आदिवासींचे दैवत ‘ठाकूर देवा’चे पूजन तिसऱ्याच दिवशी केले जाते.

 

जत्रेत पहिल्या दिवशी भाविकांचे आगमन व बिंदिया पूजा दुसऱ्या दिवशी घटस्थापना व सांस्कृतिक कार्यक्रम तिसऱ्या दिवशी गड चढाई व महापूजा तसेच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन चौथ्या दिवशी इलाखा ग्रामसभा मार्गदर्शन आणि समारोप असे जत्रेचे स्वरूप असते. मुख्य म्हणजे तिसर्‍या आणि चौथ्या दिवशीच भाविकांची गर्दी वाढते. ठाकूर देवाची पूजा करण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून सुद्धा भाविक येथे येत असतात. सुरजागड हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर आलापल्लीपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे तर जिल्हा मुख्यालया पासून 200 किलोमीटर वर आहे.

 

जल, जंगल, जमिनीच्या संरक्षणासाठी आदिवासी करतात प्रार्थना सुरजागडावर असलेल्या मंदिरात बळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे भाविक बकरी आणि कोंबड्यांचा बळी देतात. आदिवासी वाद्य वाजवत व नृत्य करीत पूजा करतात. ग्रामसभेकडून असा कायदा वन कायदा याबद्दल मार्गदर्शन करून जल, जंगल, जमीन त्याचे संरक्षण करणे याबद्दल जागृती केली जाते.

 
ATM मध्ये बिघाड करून रक्कम लंपास करणाऱ्या मोरक्यांना सह चार जणांना वाशीम पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वाशीम जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ATM मशीन मध्ये  तांत्रिक बिघाड करून पैसे काढणाऱ्या सराईत चार गुन्हेगारांना वाशीम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाशीम जिल्ह्यासह अकोला, अमरावती आणि इतर काही जिल्ह्यातील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ATM मशीन मध्ये बिघाड करून उत्तर प्रदेश मधील काही सराईत आरोपी ATM मशीन मधून पैसे काढत होते. याचा वाशीम पोलिसांनी छडा लावला असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची रामदास कदम यांच्यावर टीका

माजी पर्यावरण मंत्री व शिंदे गटातील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर आज राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी जोरदार टीका केली आहे.रामदास कदम यांनी स्वतःचे सख्खे भाऊ सदानंद कदम यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना हाताशी धरून अनिल परब यांच्या नावाखाली स्वतःच्या भावाचे नुकसान केले आहे.सोबतच त्यांनी कोकणातील पर्यटन व्यवसाय देखील अडचणीत आणला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी खेड येथे पत्रकार परिषदेत दिली. कोकणातील पर्यटन व्यावसायिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी असून एकही व्यवसाय बंद पडला तर आम्ही उग्र आंदोलन छेडू असा इशारा देखील संजय कदम यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादीचे माजी आमदारांनी मात्र या संशयावर टीका
शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात झालेल्या अपघातानंतर माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदारांनी मात्र या संशयावर टीका ...

केली आहे. बंगाली बाबाची शिधा दिली नसल्यामुळे हा अपघात झाला का, असा सवाल करत बंगाली बाबा कोणाच्या गाडीतून फिरतो हे सर्वानाच माहिती आहे असा टोला संजय कदम यांनी रामदास कदम यांचे नाव न घेता लगावला आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला
दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.राष्ट्रवादीने केलेल्या एका आंदोलनात गाढवावर बसवून एका प्रतिकात्मक व्यक्तीची धिंड काढल्यानंतर रामदास कदम यांनी गाढवावर बसलेली व्यक्ती हुबेहूब आपल्यासारखी दिसते म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केला होता व तारखेला हजर राहिलो नाही म्हणून त्या प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट काढले.आता अटक वॉरंट निघाल्यानंतर जमीन घ्यायला मी बोरिवली न्यायालयात गेलो तर मी फरार झालो म्हणून रामदास कदम ओरड करत आहेत. रामदास कदम आता ज्यांच्या सोबत सत्तेत आहेत तेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांची उंची किती, बोलत किती,पगार किती हे जाहीर सभेत विचारले होते. पण आज सर्वकाही विसरून रामदास कदम त्यांच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत.त्यामुळे रामदास कदम हे काय आहेत हे जनतेला माहीत आहे,जे सख्ख्या भावाचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार,असा उलट सवाल राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाच्या आधीच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात कलगीतुरा

यवतमाळ जिल्हयातील शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शेतकरी धडक आक्रोश मोर्चाचे 9 जानेवारीला आयोजन केलं आहे.  या मोर्चाचे नेतृत्व खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहेत जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड, खा भावना गवळी हे शिंदे गटात गेल्यापासून जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे अस्तिव थोडं कमी झाले होते मात्र माजी आमदार संजय देशमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार बाळासाहेब मूनगीनवार यांनी ठाकरे गट कायम ठेवत जिल्ह्यातील शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला त्यातच उद्धव ठाकरे गटाने पहिल्यादा मोठ्या मोर्चाचे आयोजन करत शक्तीप्रदर्शन करणार आहे मात्र या मोर्चाच्या आधीच जिल्ह्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे या मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या ठेवण्यात आल्या त्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांच्या काळातील प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांचे अपयश दाखविण्यासाठी हा मोर्चा असल्याची आरोप शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, गजानन बेजांकिवार यांनी केला आहे.  

Sameer Wankhede: आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या घरात चोरी, 4 लाखांची चोरी

प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरात चोरी झाल्याची बातमी समोर येत आहे. चोरीच्या घटनेनंतर अभिनेत्रीने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

शिवाजी महाराज यांनी राज्य स्थापन केलं पण ते रयतेचे राज्य होतं: शरद पवार

''सत्ता हातात आल्यानंतर ती सामान्य जनतेसाठी वापरायची याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली. शिवाजी महाराज यांनी राज्य स्थापन केलं पण ते रयतेचे राज्य होतं, हिंदवी स्वराज्य होतं'', असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.

शृंगेरी देवीच्या यात्रेनिमित्त ब्रह्म गावात भव्य कुस्त्यांचे आयोजन आमदार सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती
बीडच्या आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील शृंगेरी  मातेच्या यात्रेस प्रारंभ झाला असून या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांच्या सामन्याच आयोजन करण्यात आला आहे.. या कुस्ती सामन्याची सुरुवात भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आली.. शृंगेरी मातेच्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील अनेक भाविक ब्रम्हगावात दाखल झाले असून कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावेळी पहिला कुस्तीचा जोड हा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते लावण्यात आला..

 
Navi Mumbai: नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 1 मध्ये कंपनीला लागली भीषण आग

नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 1 मध्ये कंपनीला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. ऐरोली येथे वीट भट्टी परिसरा जवळ असणाऱ्या पेपर कंपनीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी
गडचिरोली:  नक्षलीदृष्टया अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा , दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखिल विकासापासून  कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व नक्षल कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. ह्या पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, त्यात 15000 मनुष्यबळ , 10 जेसीबी,10 ट्रेलर,3 पोकलेन,40 ट्रक सह इतर यंत्रसामुग्रीच्या सहायाने अवघ्या एका दिवसात पोस्ट उभारणी करण्यात आली.पोस्टमध्ये  वायफाय सुविधा ,20 पोर्टा कॅबिन, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे 3 अधिकारी व 46 अमलदार, एसआरपीफ चे 2 अधिकारी व 50 अमलदार तसेच सीआरपीएफ चे एकअसिस्टंट कमांडंट,4 अधिकारी व 60 अमलदार तैनात करण्यात आले आहेत. 
दंगल नियंत्रण करण्यासाठी पोलोसांचे प्रात्यक्षिक

मुंबई मध्ये दंगल सदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क आहेत? याचे प्रात्यक्षिक मुंबई पोलिसांनी केले आहे.परिमंडळ सात च्या सर्व पोलिसांनी एकत्र येत घाटकोपर च्या आचर्य अत्रे मैदानात ही मॉकड्रिल पार पडली.यात दगड फेक, रस्ता रोखणे, दोन गटात मारामारी, आग लावणे, जखमी माणसे अश्या स्थिती ला कसे हाताळावे या बाबत तज्ञ अधिकाऱ्यांनी पोलिसांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले.अश्या प्रात्यक्षिक मधून पोलिसांचे आत्मबल वाढणे, सराव होणे आणि नागरिकांमध्ये ही सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केले असल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.

मिरजेत  इमारती, गाळे पाडल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनाकडून उद्या मिरज शहर बंदचा इशारा

मिरजेत  इमारती, गाळे पाडल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनाकडून उद्या मिरज शहर बंदचा इशारा दिलाय. एमआयएमचे नेते महेश कुमार कांबळे यांनी हा सर्वपक्षीय शहर बंदचा इशारा दिलाय. बेकायदेशीर बांधकाम पाडल्या प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांच्यावर गुन्हा दाखल झालाय. 

जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

तिसगांव, पाथर्डी येथे मिरी गावाचे शिवारात मोटार सायकलस्वाराला कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय... दशरथ दळवे हे पत्नीसह मोटारसायकलहून जात असतांना मिरी परिसरात अनोळखी तीन इसम तोंडाला मास्क लावुन आले आणि त्यांना आडवुन कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन घेवुन गेले होते याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता...या चोरीचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील दोन आरोपींना फाकळी फाटा येथून ताब्यात घेतले...एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला...सचिन काळे,  सचिन भोसले असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नाव असून ते औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

उल्हासनगरमध्ये जीन्स कारखान्यात चोरी, दोन जीन्स कारखान्यामधील 16 लाखाच्या मालावर चोरांचा डल्ला

उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील कोहिनूर कंपाऊंडमध्ये असलेल्या दोन जीन्स कारखान्यावर चोरांनी डल्ला मारलाय. जीन्स व्यापारी यश मोटवाणी तसेच त्यांच्या शेजारच्या कारखान्यात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी 1566 तयार जीन्स, 37 जीन्स कपड्याचे रोल चोरून नेलाय. या सर्व मुद्देमालाची किंमत 16 लाख रुपये इतकी आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरांचा शोध घेण्यासाठी दोन पथकं तयार केली आहेत.

गोंदियात माथेरानचा फिल! सलग तिसऱ्या दिवशी तापमान 7 अंशावर

 गत चार दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या शितलहरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये हुळहुळी भरली आहे. थंडीचा जोर वाढल्याने गोंदिया जिल्ह्याचा पारा तिसऱ्या दिवशीही नीच्यांकावर घसरला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावस आणि ढगाळ वातावरणाचा पिकांवर काही अंशी परिणाम जाणवू लागला आहे. गत तीन दिवसात गोंदियाचे तापमान अगदी गारठवणारे राहिले आहे. आज गोंदिया जिल्हाचा पारा 7 अंशावर पोहचला असून विदर्भात सर्वात कमी तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता दिवसाही मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. या कुडकुडत्या थंडीने जनजीवन प्रभावित झाले असून थंडीपासून बचावासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दिवसभर उबदार कपडे घालून शेकोटीचा आसरा घेतल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र बघावयास मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांवर परिमाण जाणवणारा असला असून सध्या रब्बी पिकांच्या धान पिकांचे परे पेरली असून गारव्यामुळे पऱ्यांची वाढ खुंटून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर, गारठा वाढल्याने फुलकोबी पिकांवर अडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून कोबी पिवळी पडू लागली आहे.

बिंदुसरा नदीच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेचा पुढाकार

बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात यावी व त्यावरील अतिक्रमण हटण्यात यावं, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होत. यानंतर आता बीडचे जिल्हाधिकारी आणि नगरपालिका यांनी बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली असून तब्बल 200 कर्मचाऱ्यांकडून ही स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे. आजपासून बिंदुसरा नदीच्या साफसफाईला सुरुवात झाली असून यावेळी स्वतः जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे या उपस्थित होत्या.

त्यात शिवसेनेचा एकही नगरसेवक दाखवावा खासदारकीचा राजीनामा देतो - परभणीचे खासदार संजय जाधव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत शिवसेना उद्धव गटाच्या ३० नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा केला होता त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया देत त्यात एकही जण शिवसेनेचा दाखवावा मी खासदारकीचा राजीनामा देतो असं थेट आव्हानच शिंदे गटाला दिले आहे.


मुंबईत शिंदे गटाच्या नेत्याने परभणी जिल्ह्यातील शिवसेना,राष्ट्रवादी,रासप आदी पक्षातील तब्बल ३० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा केला होता त्यावर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी एबीपी माझाशी प्रतिक्रिया देत जे शिंदे गटात गेले आहेत ते केवळ स्वार्थासाठी गेले आहेत त्यात एकही शिवसेनिक किंवा शिवसेनेचा नगरसेवक नाही त्यांनी आमचा एक जण जरी दाखवला तर मी खासदारकीचा राजीनामा देतो असे थेट आव्हानच शिंदे गटाला आहे.. 

पिवळ्या रंगावरची संक्रांत
दरवर्षी वेगवेगळ्या रंगावर येणारी संक्रांत यावर्षी पिवळ्या रंगावर आली आहे परंपरेनुसार संक्रांत ज्या रंगावर येते तो रंग संक्रातीच्या सहा दिवशी आणि वर्षभर महिला वापरण्याच टाळतात.. यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आली असून महिलांना आता पिवळ्या रंगाच्या साड्या त्याचबरोबर इतर साहित्य खरेदी करता येणार नाही... महिलांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संक्रातीच्या सणानिमित्त खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठा फुलून गेल्या आहेत अनेक महिलांच्या आवडत्या असलेल्या पिवळ्या रंगावर यावर्षी संक्रात आल्याने खरेदीसाठी आलेल्या महिला आता पिवळा रंग घेण्यास टाळत आहेत..
 


 
राज्यातील पारा 9 जानेवारीनंतर पुन्हा घसरणार, तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअस घट होण्याचा अंदाज 

Maharashtra Temperature : राज्यातील पारा 9 जानेवारीनंतर पुन्हा घसरणार 


राज्यातील तापमानात 2 ते 4  अंश सेल्सिअस घट नोंदवण्याचा अंदाज 


उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता 


पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची लाट 


आज आणि उद्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात थंटीच्या लाटेचा अंदाज


नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालन्यात ९ जानेवारीनंतर एक अंकी तापमानाची शक्यता 


१३-१४ जानेवारी दरम्यान मुंबईतील तापमानात मोठी घट, १५ अंश सेल्सिअसच्या खाली किमान तापमान जाण्याचा अंदाज

'चला जाणूया नदीला' या उपक्रमातून पैनगंगा नदी स्वच्छ होणार

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवण्यात येत असून, या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार येणार आहे. यातून जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे..पैनगंगा नदीसोबतच नळगंगा आणि ज्ञानगंगा या नदीक्षेत्रातही हा उपक्रम राबविण्यात येईल. नागरिकांमध्ये नदीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे सर्व लोकसहभागातून होणार आहे..नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुटुंबासह एक दिवसभर श्रमदान करणार आहे. 

G-20 परिषदेच्या निमित्ताने पुणे पालिकेत भव्य सायकल रॅली

Pune News : आज G-20 परिषदेच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीनं भव्य सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये G -20 व इतर पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. जवळपास 1 हजार 500  सायकल प्रेमी या रॅलीमध्ये सहभागी होताना बघायला मिळाले. ही रॅली मनपा भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज, टिळक रोड, अभिनव कॉलेज चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा पुणे महानगरपालिका अशी पार पाडली. यामध्ये तीनही अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी व इतर महानगर पालिकेतील अधिकारी यांनी रॅली पूर्ण केली. यानंतर सर्वांना मेडल देण्यात आले. या रॅलीचे आयोजन श्री सुरेश परदेशी, मुख्य समन्वयक पुणे महानगरपालिका सायकल क्लब यांनी केले.

Covid19 in India : देशात 214 नवीन कोरोनाबाधित, BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण; ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?

Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग घटचाना दिसत आहे मात्र धोका कायम आहे. देशात आज 214 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 228 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 14 रुग्णांची घट झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण घटताना दिसत असेल तरी, कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या XBB आणि BF.7 या सब-व्हेरियंटचे रुग्ण देशात वाढताना दिसत आहे. देशात सध्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर नवीन BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत.


ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?

Parbhani News : परभणीत अवतरला थेट चार्ली चॅपलीन

Parbhani News : परभणीत अवतरला थेट चार्ली चॅपलीन


Parbhani News : परभणी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळं अनेक अपघात घडत आहेत. अशाच बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी परभणी शहरातील रस्त्यांवर थेट चार्ली चॅपलीन अवतरला आहे. चार्ली चॅपलीनच्या वेशातील व्यक्ती नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगत आहे. चार्लीच्या हावभावावरून तो शिकवत आहे.

 

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा 'मस्तमौला' अंदाज; वाद्य वाजवण्याचा आनंद लुटला, व्हिडीओ चर्चेत

Aaditya Thackeray Playing Drum : नेहमी राजकारणामुळे चर्चेत असलेले शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आता त्यांच्या 'मस्तमौला' अंदाजामुळे चर्चेत आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा वाद्य वाजवताना व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांनी वाद्या वाजवतानाचा एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य ठाकरेंचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिवेशन काळातील विषयांचा आढावा मंत्रालयातून घेतल्यास परिणामकारकता वाढेल : नीलम गोऱ्हे

अनेकदा विधी मंडळाकडे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आलेली असतात. पण ती सापडत नाहीत अशी उत्तरे दहा टक्के आहेत. याबाबत संसदीय कार्य विभाग तपास करतो. अधिकाऱ्यांची पदे रिक्त असणे, नवीन नियुक्त्या असणे, काही महामंडळे अवसायनात असणे, विशेष उल्लेख आणि औचित्य उत्तरे पंधरा दिवसात अपेक्षित असतात.  


मात्र ती अजून वेळेत मिळणे यासाठी अचूकतेने शोधण्यासाठी कक्ष अधिकारी नेमण्याच्या सूचना अधिवेशनात  दिल्याची माहिती विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज दिली. 


अनेक प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वतः मंत्री स्तरावरून यात लक्ष घालणे आवश्यक आहे. तरच या विषयाला गती मिळू शकेल. मंत्र्यांनी स्वतः अधिवेशनातील निर्णयाची अंमबजावणी करण्यासाठी विशेष बैठका घेऊन आढावा घेतला पाहिजे.

Nitesh Rane : आमदार नितेश राणेंचं स्टिकर आंदोलन

Nitesh Rane : आमदार नितेश राणे करणार थोड्या वेळात करणार स्टिकर आंदोलन


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा अशयाचे स्टिकर  गाड्यांवर चिकटवणार 


कणकवलीमध्ये काही वेळात होणार आंदोलनाला सुरुवात 


काल अजित पवार यांनी पुण्यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी राजे अशा आशयाचे स्टिकर गाड्यावर लावले होते, त्याच धर्तीवर त्याला टक्कर देण्यासाठी नितेश राणेंचे धर्मवीर संभाजी राजे स्टिकर

Bhandara News : राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्तसंचार; वाघाचे दर्शन होताच हौशी कलावंतांचा गजर, हर बोला हर हर महादेव...

Bhandara News : भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाघाचा मुक्तसंचार पाहायला मिळाला आहे. महामार्गावर असलेल्या कोकणागड फाटा येथील बसस्थानकावर पहाटे चार वाजताच्याh सुमारास या रुबाबदार वाघाचे दर्शन झाल्याने हौशी कलावंत हुरळून गेले. जुही शेरकर आणि त्यांच्या टीमचे सर्व कलावंत त्यांचा नाटकाचा कार्यक्रम आटोपून लाखनी मार्गाने भंडाराकडे निघाले होते. दरम्यान, त्यांना कोकणागड फाट्याच्याजवळ अचानक राष्ट्रीय महामार्गावर वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे कलावंत रोशन हुकरे यांनी वाघाचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला. वाघाचे दर्शन होताच, वाहनातील सह कलावंतांच्या चेहऱ्यावर आनंद झळकल्याने त्यांनी हर बोला हर हर महादेव असा गजर केला. वाघाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

Mumbai News : थीम पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सचा संपूर्ण भूखंड मिळावा यासाठी बीएमसी सरकारला पत्र लिहिणार

Mahalaxmi Race Course Theme Park : मुंबईतील (Mumbai) महालक्ष्मी रेसकोर्समधील (Mahalaxmi Race Course) जागेवर थीम पार्क (Theme Park) साकारण्यालाठी संपूर्ण भूखंडा मिळावा, यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) पुन्हा एकदा राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र पाठवणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत काल (6 जानेवारी) झालेल्या मुंबई सुशोभीकरण आढावा बैठकीत पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी रेसकोर्समधील जमिनीची मालकी मुंबई महापालिकेला मिळावी, अशी मागणी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात करण्यात येणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

डोपिंग सारख्या प्रकाराला खेडाळूनी बळी पडू नये : खासदार रामदास तडस

डोपिंग हे खेळाडूंसाठी सर्वात घातक आहे. दहा वर्षात अनेक प्रकरणे डोपिंगची समोर आले आहेय, डोपिंग करणाऱ्या खेळाडूंना आज काही वाटत नाही पण येणाऱ्या काळात त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे थांबले पाहिजे यासाठी शासनाकडे आम्ही कुस्तीगिर परिषदेच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत. ऑलिम्पिक, राष्ट्रकूल आणि कॉमनवेल्थ सारख्या खेळात देखील असे प्रकार समोर आले. यापुढे खेळाडूंची आरोग्य चाचणी घेऊनच त्याला खेळू दिले पाहिजे याशिवाय खेळाडूंनी देखील डोपिंग सारख्या प्रकारापासून दूर राहिले पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी केले आहे. महाराष्ट्रात पोलीस भुरत्या सुरू आहेय, यात मात्र डोपिंग सारखे प्रकार घडले असतील असे आपल्याला वाटत नाही असे सांगून रामदास तडस यांनी पोलीस भरती प्रक्रिया परदर्शक पद्धतीने सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Sangli News : सांगलीच्या मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटांत वाद

Sangli News : सांगलीच्या मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटांत वाद झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी अतिक्रमण पडल्याने वाद झाला.
सदर वादग्रस्त जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागलाय. महापालिकेने नोटीस दिल्याने हे अतिक्रमण हटवल्याचा दावा ब्रम्हानंद पडळकरांनी केलाय. अतिक्रमण हटवण्याला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केल्यानंतर राडा झाला होता.

Akola News : आज संपूर्ण अकोला शहरावर दाट धुक्याची चादर पसरली

Akola News : आज संपूर्ण अकोला शहरावर दाट धुक्याची चादर पसरली होती. गेल्या तीन दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात पारा चांगलाच घसरलाय. आज धुक्यामूळे दहा मीटरवरचं दृष्यही स्पष्ट दिसत नव्हतंय. सृष्टीचं हे अलौकीक रूप अकोलेकरांनी आपल्या मनात साठवलंय. सकाळचं हे धुंद रूप डोळ्यात साठविण्यासाठी अकोलेकर आज घराबाहेर पडले होतेय. 

नांदेडमध्ये उभारला जगातील सर्वात उंच आणि मोठा अशोकस्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ उभारला अशोकस्तंभ

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील दाभड येथे आज 36 व्या आखील भारतीय धम्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील भिक्खू अतुलनीय रतन थेरो यांच्या हस्ते करण्यात आलं. नांदेड शहरातील चौकाचौकातून ढोल ताशांच्या गजरात, लेझीम पथकासह बौद्ध भिक्खू आणि हजारो बौद्ध अनुयायांनी या धम्म रॅलीत हजेरी लावली. गेल्या 40 वर्षा पासून भारतातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील दाभड या ठिकाणी करण्यात येते. या अखिल भारतीय धम्म परिषदेसाठी चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, नेपाळ जगभरातून बौद्ध भिक्खू धम्मदेशना देण्यासाठी दाखल झाले आहेत. या अखिल भारतीय धम्म परिषद स्थळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात मोठ्या अशोकस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील सांची या ठिकाणाहून आणलेल्या संगमरवरी लाल दगडातून 72 टन वजनी अशोकस्तंभ उभारण्यात आला आहे. ज्याची उंची 80 फूट आहे. जमिनीच्यावर 65 फूट असून जमिनीखाली 15 फूट खोल आणि 15 फूट रुंदी असणारा विशाल असा जगातील सर्वात मोठा अशोकस्तंभ येथे उभारण्यात आला आहे.

Nagpur News : नागपूर जिल्हा परिषद पेन्शन घोटाळ्यात पोलिसांना मुख्य आरोपी सरिता नेवारे सह सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Nagpur News : नागपूर जिल्हा परिषद पेन्शन घोटाळ्यात पोलिसांना मुख्य आरोपी सरिता नेवारे सह सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यात सरिता नेवारे चालक सागर जठारे, नातेवाईक प्रकाश कछवा, पारशिवनी पंचायत समितीचे लेखा अधिकारी राकेश खैरनार, ईरसाद खान यांचा समावेश आहे. पोलिसांनी सरिताचे दोन ट्रक आणि एक बेलोनो कार जप्त केली आहे. सरिता नेवारे हिने नागपूर जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीत क्लर्क म्हणून कामावर असतांना मयत पेन्शनधारक शिक्षकांची पेन्शन त्यांच्या मृत्य नंतर बंद न करता आपल्या नातेवाइकांच्या नावावर उचलल्याचा तिच्यावर आरोप आहे.

Sangli News : सांगलीतील मिरजेत जागेचा ताबा घेण्यावरुन आणि अतिक्रमण पाडत असताना दोन गटात वाद

Sangli News : सांगलीतील मिरजेत जागेचा ताबा घेण्यावरुन आणि अतिक्रमण पाडत असताना दोन गटात वाद
 
जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर त्या गाळ्यामधील भाडेकरुंनी गाळे पाडण्यास केला विरोध


जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा नागरिकांचा आरोप 


छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानका शेजारची घटना


घटनास्थळी रात्रीपासून  पोलीस बंदोबस्त तैनात, नागरिकांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दाट धुक्याची चादर, धुक्यामुळं वाहतूक कोंडी

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दाट धुक्याची चादर बघायला मिळाली. त्यामुळे सकाळी चार वाजेपासून जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतुकीला खोळंबा होत आहे. कमी दृष्टी मानता असल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. सातत्याने पडणाऱ्या धुक्यामुळे मात्र पिकांवर रोगराईची शक्यता बाळवली आहे. 

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : शिंदे गटातील रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, तर शिवसेना फुटीसाठी परब जबाबदार, रामदास कदमांनी फोडलं खापर

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्याची टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलीय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या काळात मुलगा योगेश कदम आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी दिला. आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कट अनिल परब यांनी रचला होता. त्याचसोबत शिवसेनेच्या फुटीला अनिल परब जबाबदार असून त्यांची ईडीकडून चौकशी व्हायलाच हवी. अनिल परब यांची जागा जेलमध्येच असल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केलाय. 

बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाचे मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे आदेश

बेकायदा टेलिफोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज


मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात अर्ज सादर


न्यायालयाने शुक्ला यांच्या अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत आदेश 


वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीनंतर 4 मार्च रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात दाखल करण्यात आला होता गुन्हा 


महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा शुक्ला यांच्यावर आरोप


मात्र याप्रकरणी फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली नसल्याचा शुक्ला यांचा दावा

Phone Tapping Case : बेकायदा टेलिफोन टॅपिंग प्रकरण; आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज

Phone Tapping Case : बेकायदा टेलिफोन टॅपिंग प्रकरण,  आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज


मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात अर्ज सादर


न्यायालयाने शुक्ला यांच्या अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत आदेश 


वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीनंतर 4 मार्च रोजी  कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात दाखल करण्यात आला होता गुन्हा 


महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा शुक्ला यांच्यावर आरोप


मात्र याप्रकरणी फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलीसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली नसल्याचा शुक्ला यांचा दावा

Solapur News : "येणाऱ्या निवडणुकीत आपले तिकीट सांभाळा"; सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांचे आमदार विजयकुमार देशमुख यांना आव्हान

Solapur News : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढच्या निवडणुकीत आपले तिकीट सांभाळावं, असं आव्हान सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी दिलंय. सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी कारखानाच्या चिमणीच्या मुद्यावरून धर्मराज काडादी आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. काही दिवसांपूर्वी कारखान्याची चिमणी वाचावी यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर झालेल्या सभेत कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यानंतर विजयकुमार देशमुख यांनी देखील काळजी यांच्यावर पलटवार केला. 'हिम्मत असेल तर मैदानात या' असे आव्हान आमदार विजयकुमार देशमुख यांनी धर्मराज काडादी यांना दिले होते. याच मुद्द्यावरून धर्मराज कडादि यांनी आमदार देशमुख यांना प्रतिआव्हान दिले आहे. "1996 पासून मी  मैदानातच उभा आहे. कारखान्याच्या निवडणुकीत तुम्हाला धूळ चारली आहे. आता देखील मी मैदानातच आहे. उलट मी तुम्हाला प्रतिआव्हान देतोय येणाऱ्या निवडणुकीत आपले तिकीट सांभाळा. आणि जर तिकीट मिळाले तर विश्वासार्हता टिकवून दाखवा." अशी प्रतिक्रिया सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी दिली.

Renukaa Yallamma Devi Yatra : शाकंभरी पौर्णिमा निमित्त सौंदत्ती येथील यल्लमा देवीची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार

Renukaa Yallamma Devi Yatra : कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा आणि आंध्रप्रदेश येथून लाखो भाविक यात्रेसाठी यल्लमा डोंगरावर दाखल झाले होते. पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची पूजा आणि अभिषेक करून मंदिराचे दरवाजे भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. उदं गं आई उदं चा गजर करत भक्त बैलगाडी,वाहनातून डोंगरावर दाखल झाले. सर्वत्र भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती. गेली दोन वर्षे कोरो ना मुळे यात्रा झाली नव्हती. त्यामुळे यावर्षी भक्तांनी मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थिती दर्शवली होती. जोगन भावी येथे पवित्र स्नान करण्यासाठी देखील भक्तांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात पूजा साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. अनेकांनी तेथेच  स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवला. यात्रेमुळे हजारो वाहने आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी वारंवार होत होती. कर्नाटक परिवहन खात्याने यात्रेच्या निमित्त विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली होती.

Parbhani News: परभणीत भाजपच्या दोन जिल्हाध्यक्षांमध्ये बाचाबाची

Parbhani News: पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात थेट भाजपच्या दोन जिल्हाध्यक्षा मध्ये डायस वर लावलेल्या फोटो वरून जोरदार बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आलाय.भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांच्यात हा वाद झाला ज्यामुळे कार्यक्रमात तणाव निर्माण झाला होता.


परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात भाजपचा युवा मोर्चाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी डायस वर लावलेल्या नेत्यांच्या फोटोवरून ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.हा वाद कार्यक्रमाच्या मंचावरच झालाय..त्यामुळे कार्यक्रमातच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शेवटी इतर पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटवला..मात्र या वादाची चर्चा भाजपच्या गोटात जोरदारपणे सुरु होती. या आधीही असाच वाद भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळाला आहे त्यामुळे परभणी भाजप मध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shirdi News: कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेल्या मंडप व्यावसायिकांच साईंच्या गावात प्रथमच राज्यस्तरीयअधिवेशन

Shirdi News: कोरोना काळात अनेक निर्बंध आले मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही सर्वाधिक आर्थिक फटका बसलेला उद्योग अर्थातच मंडप व डेकोरेशन व्यावसायिक. आज साईंच्या शिर्डीत या व्यावसायिकांच राज्यस्तरीय तीन दिवसीय  अधिवेशनाला प्रारंभ झाला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या अधिवेशनाला प्रारंभ झालाय. कोरोना काळात मृत झालेल्या कामगारांना आर्थिक मदत मिळावी, मंडप व्यावसायिकांना एमआयडीसी मध्ये जागा मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

MLA Yogesh Kadam Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात

MLA Yogesh Kadam Accident News: राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्रच सुरु आहे की काय? असा प्रश्न पडत आहे. कारण आता आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज रत्नागिरीत शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकाच व्यासपीठावर असणार आहेत. सुतार समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने हे नेते एकत्र येणार असले तरी राजकीय फटकेबाजीदेखील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. 


रत्नागिरीत ठाकरे-शिंदे गटाचे नेते एकाच मंचावर


चिपळूण - उद्या चिपळूणमध्ये सुतार समाजाचा रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळावा आहे. या मेळाव्यात व्यासपीठावर ठाकरे गट शिवसेना नेते भास्कर जाधव त्याचप्रमाणे शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, जिल्हा खासदार ठाकरे गट नेते विनायक राऊत, राष्ट्रवादी आमदार शेखर निकम, ठाकरे गट राजापूर आमदार राजन साळवी, शिंदे गट खेड आमदार योगेश कदम आणि माजी आमदार रमेश कदम, शिंदे गट उपनेते सदानंद चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात कोण कोणाबद्दल काय बोलणार यावर राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेनेचे एकेकाळचे सर्व पदाधिकारी एकत्र असल्यामुळे पहिल्यांदाच शिंदे गट आणि शिवसेना आणि ठाकरेगट आपल्याआपल्यातले गटतट बाजूला एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. यावेळी कोकणातील सर्वच पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच घटना आहे.


सिंधुदुर्ग - 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' अशा आशयाचे स्टिकर आमदार नितेश राणे यांनी तयार केले आहेत. हे स्टिकर उद्यापासून कणकवलीमध्ये गाड्यांवर लावणार आहेत.


नाशिक - खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या पक्षातील फुटीनंतर त्यांची ही पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत राऊत माहिती देण्याची शक्यता आहे. 


पालघर: अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी


वसई अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिजान खानच्या जामीन अर्जावर आज वसई न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी शिजान खानला  ठाणे कारागृहातून वसई न्यायालयात आणलं जाणार आहे. 


 पुणे - जी-20 निमित्ताने शनिवार वाड्यावर रोषाणाई, लाईट्स अॅण्ड म्युझिक शो रंगणार


- जी 20 च्या निमित्तान पुण्यातील वेगवेगळे चौक, रस्ते सुशोभित करण्यात येतायत.  त्याचबरोबर अनेक वर्षं बंद असलेला शनिवार वाड्यातील संध्याकाळचा लाईट्स अॅण्ड म्युझिक शो पुन्हा सुरु करण्यात आला आहे.


- पिंपरी-चिंचवड मधील जागतिक मराठी साहित्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांचे भाषण होणार आहे. 


-  आमदार जयकुमार गोरे यांना पुन्हा पुण्यात दाखल करण्यात येणार आहे.गेल्या दोन दिवसात दगदग वाढल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयकुमार गोरे यांना रात्री पुन्हा पुण्याला हलविण्यात येणार आहे. फलटण येथे गेल्या 14  दिवसांपूर्वी भीषण अपघातात गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. गुरुवारी त्यांना एअर अॅम्बुलन्सने बोराटवाडी येथे आणण्यात आले होते. खूप दगदग झाल्याने त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात येत आहे. 


-  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांचे महाराष्ट्र साहित्य परिषदेत 'लोकशाही आणि न्यायव्यवस्था' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
 


मुंबई –  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी व मुमुक्षरत्न  सेतुकभाई अनिलभाई शाह यांच्या हस्ते, पवित्र जैन तीर्थ दर्शन सर्किटच्या (महाराष्ट्रातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी) लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित राहणार आहेत. 


- कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबई मॅरेथॉन 15 जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईची मॅरेथॉन यंदाच्या वर्षी कशाप्रकारे आयोजित केली जाणार, याबाबत आयोजकांकडून माहिती देण्यात येणार आहे. 


 सातारा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी आहेत. 


 कोल्हापूर-  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा 75 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शरद पवार कोल्हापुरात येणार आहेत. दिवसभर मान्यवर शाहू महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात येणार आहेत.
 
नांदेड -  नांदेड जिल्ह्यातील दाभड येथे 36 व्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे 40 वर्षापासून नांदेड येथे आयोजन होत आहे. चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, नेपाळसह देशभरातून बौद्ध भिख्खू व बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावतात. 
 
अहमदनगर - शिर्डी - इंजिनिअर असोसिएशनच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील निगडित घटकांचा महामोर्चा आयोजित करण्यात  आला आहे. सकाळी 10 वाजता मालपाणी लॉन्स येथून निघणार असून प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार आहे. वाळू  व खडी मिळत नसल्याने बांधकामाशी निगडीत व्यापारी , बिल्डर, मजूर आदींचा सहभाग असणार आहे. 


 नागपूर -  मनी बी इन्वेस्ट्मेण्ट तर्फे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव ते सुवर्णमोहत्सव या 25 वर्षाच्या काळाला लक्षात घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गुंतवणूकदारांसाठी  "अमृतकाल इंव्हेस्टर एजुकेशन इनेशियटिव्ह कॉन्क्लेव्ह" चे आयोजन केले आहे. त्यात प्रसिद्ध अर्थतज्ञ, इन्व्हेस्टरचे मार्गदर्शन असणार आहे. याचे उदघाटन देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.. तर समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.


 - नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशात विदर्भाला काहीच न मिळाल्याने विदर्भवाद्यांचे आंदोलन होणार आहे. 


अकोल्यात अखिल भारतीय गझल संमेलन


अकोला -  उद्यापासून अकोल्यात दोन दिवसीय 'अखिल भारतीय गजल संमेलन' होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील पोलीस लॉन्स येथील 'सुरेश भट गझल नगरी'त हे संमेलन संपन्न होत आहे. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या संमेलनाचं उद्घाटन करणारे आहेत. अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि गझलकार दिलीप पांढरपट्टे हे संमेलनाध्यक्ष आहेत. गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या 'गझलसागर संस्थे'नं हे संमेलन आयोजित केलं आहे. दोन दिवस गझल मुशायरे आणि परिसंवादांची रेलचेल असणारे आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.