Maharashtra News Updates : केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण, 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध; सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एअर इंडियाच्या इमारत खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नवी ऑफर
------------
इमारत खरेदीसाठी सरकारची १ हजार ६०० कोटींची ऑफर
-----------------
मविआ सरकारनं इमारत खरेदीसाठी १ हजार ४०० कोटींची ऑफर दिली होती
माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात. नसीम खान सुखरूप असून त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
मुंबई : एफडीएचने मोठी कारवाई करत 29 कोटी रुपयांचे अन्न पदार्थत जप्त केले आहेत. 2,62,663 किलो आणि 854.84 लिटरचा 29.67 कोटींचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. एफडीएचा अधिकाराने टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, नवी मुंबई येथे 02 नोव्हेंबर रोजी धाड मारून कारवाई केली होती. जप्त करण्यात आलेले अन्नपदार्थ हे बाहेरील देशातून आयात करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्तीआधी महत्त्वाचा निर्णय आहे. 103 वी घटनादुरुस्ती वैध की, अवैध याचा निर्णय होणार आहे.
औरंगाबादमध्ये भर दुपारी मंदिरात चोरी. आधी पाया पडले ,नंतर केली चोरी. गंगापूर तालुक्यातील दिवशी पाचपीरवाडी गावच्या टेकडी महादेव मंदिरातील दान पेटीतील रक्कम चोरट्यानी पळवली..
केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्ट सोमवारी निकाल देणार
मोदी सरकारने दिलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात फैसला
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता
सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्तीआधी महत्त्वाचा निर्णय
103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध याचा निर्णय होणार
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेवी गडावरील काळूबाईच्या मंदिरातील दानपेटी फोडून त्यात चोरी करण्याचा प्रयत्न पहाटे चोरट्याने केला. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून आपण ओळखले जाऊ नये म्हणून चोरट्याने तोंडाला आणि अंगाला काळे कापड गुंडाळले होते. बाबत सध्या ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.. आज्ञातावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली-: विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ नाटककार , दिग्दर्शक, अभिनेते, लेखक सतीश आळेकर यांना प्रदान
रंगभूमीदिनाचे औचित्य साधून जेष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला
यंदा दिले जाणारे हे ५५ वे गौरव पदक आहे
Akola: अकोल्यात (Akola) आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाला सुरूवात झालीये. 'विदर्भ साहित्य संघा'च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अकोला शाखेच्या वतीने हे आयोजन करण्यात आलंये. अकोल्यातील पातूर मार्गावरील प्रभात किड्स शाळेतील स्वर्गीय बाजीराव पाटील साहित्य नगरीत हे संमेलन होतंय. सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अरविंद जगताप हे साहित्य संमोलनाच्या अध्यक्षपदी आहेत. दोन दिवस परिसंवाद, कवीकट्टा, वर्हाडी कट्टा, गझलकट्टा, आणि कवीसंमेलन अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई मंचावर उपस्थित, ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला
सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी मागितला वेळ
3 तारखेला पोलीस कोठडी संपल्याने किरण लोहार आहेत न्यायालयीन कोठडीत
काल सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात लोहार यांच्यावतीने दखल करण्यात आला होता जामीन अर्ज
त्यावर आज सुनावणी होणे होते अपेक्षित
मात्र सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्याने सोमवारी होणार सुनावणी
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे पदाधिकारी कर्नाटकातील गावागावात सायकल वरून जाऊन आपल्या मागण्यासाठी जनजागृती करत आहेत.शनिवारी या पदाधिकाऱ्यांचे बेळगावात आगमन झाले.त्यावेळी बेळगावातील कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात त्या सवलती परिवहन कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजेत.सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तेरा ते चाळीस टक्के पगार कमी आहे.परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करावी.आरोग्यासाठी सुविधा ,सवलती लागू कराव्यात.पेन्शन केवळ 1500 ते 3000 मिळते त्यात वाढ करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या तर्फे राज्य सरकारला देण्यात आले.मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता.त्यावेळी तीन महिन्यात सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन देण्यात आले होते पण अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही असे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अटक, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची माहिती, पोलिस अधिक चौकशी करत असल्याचंही सांगितलं
परंपरागत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, शेतकरी आणि शेतमजुरांचे कष्ट कमी करणे, कमी वेळात अचूक फवारणी करून लागत खर्च कमी करणे याकरिता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार तर्फे ड्रोनद्वारे फवारणीचा पहिला प्रयोग चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथे आमदार बच्चू कडू यांच्याहस्ते सुरू करण्यात आला.. हा ड्रोन स्पेशल बेलोरा गावासाठी सुरू करण्यात आला असून येणाऱ्या चार पाच महिन्यात मतदार संघात 4-5 ड्रोन उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली...
उद्योगपती सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कार चालक अनिता पंडोल यांच्यावर 3040 अ प्रमाने पालघरच्या कासा पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला असून पालघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोन दिवसापूर्वीच अनहीता पांडोल यांचे पती डेरियस यांनी नोंदविला होता जबाब
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे याना आणखी एक धक्का बसला आहे. औरंगाबादनंतर बुलढाण्यातही आदीत्य ठाकरे यांच्या सभेला परवानगीही नाकारण्यात आली आहे.
Sharad Pawar: वाजपेयी यांच्या रुपाने सुसंस्कृत नेतृत्व होते. त्यांनी घटनेची चौकट ओलांडली नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांना बोलण्यासाठी त्रास होत असल्याने दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पवार यांच्या भाषणाचे वाचन
Sharad Pawar: वैचारिक शक्ती देणारे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. एव्हढी प्रचंड गर्दी इथे जमा झाली आहे. सगळ्याची इच्छा होती मी शिबिराला याव अशी होती. मी अनेकांची भाषणं ऐकली. डॉक्टरांनी मला सल्ला दिला आहे की आणखी 10 ते 15 दिवस आराम करण्याबाबत सांगितलं आहे. त्यानंतर मी दररोज पुन्हा एकदा कामासाठी उपलब्ध असेल अशी माहिती शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
Uddhav Thackeray: राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे भाकित उद्धव ठाकरेंनी केले आहे. उद्धव ठाकरेंनी विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवली होती, या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं. तसेत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देखील दिले.
Sharad Pawar: 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे सांगत शरद पवार यांनी 15 दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करण्याचे सुतोवाच केले.
Sharad Pawar: पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग: शरद पवार
Shivsena : शिवसेना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालयाच्या उदघाट्नला किर्तीकरांनी दांडी मारली आहे. समितीच्या अध्यक्ष पदी खासदार गजानन कीर्तिकर आहेत. आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सेनाभवनात नवीन कार्यालयच उद्घाटन केलं यावेळी अध्यक्ष गजानन कीर्तिकर गैरहजर होते. गेल्या काही दिवसापासून कीर्तिकर हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा आहे
Sharad Pawar : शरद पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी दाखल झाले आहेत. शिबिरानंतर शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहे. थोड्याच वेळात शरद पवार कार्यकर्त्यांना
मार्गदर्शन करणार आहेत
दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथे आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील स्वर्गीय नजारा अशी ओळख असलेल्या तळकोकणातील मालवण मधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर बंदर विभागाने पर्यटकांना प्रतिबंधक क्षेत्र म्हणून त्याठिकाणी लाल झेंडे लावले आहेत. या लाल झेंड्या मुळे स्थानीक पर्यटन व्यावसायिक आणि मच्छिमार यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. याच भागात मे महिन्यात बोट बुडून काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. पार्श्वभूमीवर पर्यटकांना सूचित करण्यासाठी या भागात लाल झेंडे लावण्यात आल्याचे बंदर विभागाने जाहीर केलं. मात्र स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना विश्वासात न घेता बंदर अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा पर्यटन व्यावसायिकांचा आरोप आहे. तर आमचं पर्यटन हे कोणत्याही प्रकारचे निबंध न घालता चालू ठेवावे आणि पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये असं मत पर्यटन व्यावसायिकानी व्यक्त केले.
Nandurbar News : दिवाळीच्या काळात वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत आणि सण उत्सवाचा हंगामात एसटी महामंडळाने केलेली दहा टक्के भाडे वाढ आता मागे घेत नियमित दरात प्रवासी वाहतूक सुरू केले आहे मात्र या विरोधी चित्र खाजगी ट्रॅव्हल्स धारकांकडे दिसून येत असून खाजगी ट्रॅव्हल्सधारक यांनी केलेली भाडेवाढ तसेच असून प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.
Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात दाखल होत आहे. मात्र, राहुल गांधी वाशिममधून अकोला जिल्ह्यात प्रवेश करतांना मेडशी ते पातुरदरम्यानचा यात्रेचा 16 किलोमीटर प्रवास कारने करणार आहे मेडशी ते पातूरदरम्यान जंगलाचा परिसर लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी त्यांना कारमधून प्रवास करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधींना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा आहे. राहुल गांधींनीही सुरक्षेची गोष्ट लक्षात घेता ती विनंती मान्य केली आहे.
Andheri News: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुनर्बांधणीसाठी 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी या संदर्भात आदेश जारी केला आहे. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी 6 पर्यायी मार्ग दिलेले आहेत.
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या 7 नोव्हेंबरच्या बुलढाण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली.7 नोव्हेंबर रोजी स्थानिक गांधी भवनात सभा होणार आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यालय जवळ असल्याचं कारण देत पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली आहे.
Chandrakant Khaire: फडणवीस काँग्रेसचे 22 आमदार फोडणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत असेही ते म्हणाले. शिंदे गटाचे 40 आमदार पडणार असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे.
Howrah Express Fire: शालिमार/हावडा एक्सप्रेसला आग लागली आहे. प्रवाशी गाडीला आग लागल्याने धावपळ झाली यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली. आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पार्सल डब्याला आग लागली होती.
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात कांद्याने भरलेला ट्रकचा अपघात झाला आहे. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक क्रमांक Rj 21 GC 4771 मालेगावकडून राजस्थानकडे कांदे भरून जात असलेला ट्रक तीव्र उतारावर अनियंत्रित झाल्याने घाटात कोसळला. चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने चालक व सहचालकला बाहेर काढले.
Beed News: बीडच्या अंबाजोगाई शहरात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी बाराभाई गल्लीमध्ये एका कत्तलखान्यावर छापा मारून बारा लाख वीस हजाराच्या 66 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. अंबाजोगाई शहरांमध्ये नगरपरिषदेच्या गळ्यात कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यामध्ये अनेक जनावर कत्तलीसाठी ठेवण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास कविता नेरकर यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी छापा मारला असून कतलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका करून सहा जणांच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
AhmadNagar: अहमदनगरच्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात 18 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य' चे आयोजन करण्यात आलंय...राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे...या महोत्सवासाठी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांची उपस्थित असणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपचे आज शक्ती प्रदर्शन. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर ठाण्यात विविध बैठका करणार आहेत. दिवसाची सुरुवात बाईक रॅलीपासून होणार आहे. थोड्याच वेळात बाईक रॅली सिंघानिया शाळे जवळून सुरू होणार. संध्याकाळी मोठा कार्यकर्ता मेळावा देखील घेण्यात येणार आहे. दरम्यान दिवसभर विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका बावनकुळे घेणार आहेत. येणाऱ्या पालिका निवडणुकांचा पार्श्भूमीवर आजचा दौरा महत्त्वपूर्ण
Nandurbar Accident : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघात झाल्याची घटना घडली. मालेगावहून राजस्थानकडे कांदे घेऊन जाणारा ट्रक घाटात अनियंत्रित होऊन अपघात झाला. अनियंत्रित ट्रक सुरक्षा कठड्यांना ठोकल्या गेल्यानं चालकाचा जागीच मृत्यू तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे. चरणमाळ घाटात अपघातांची मालिका सुरूच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे रात्री घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली आहे. आगीत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे.
Maharashtra Politics: दोन युवा नेते एक, आदित्य ठाकरे आणि दुसरे डॉक्टर श्रीकांत शिंदे एकाच दिवशी एकाच वेळेला सिल्लोड मध्ये सभा घेत आहेत. सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. नंतर जागा बदलण्याचा सल्ला दिला .त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत आदित्यला सहभाग घेण्यास परवानगी मिळाली . त्यामुळे सिल्लोड मध्ये 17 तारखेला संध्याकाळी चार वाजता शिंदेपुत्र विरुद्ध ठाकरे पुत्र यांचा सामना पाहायला मिळणार आहे.. त्यातच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेला पुन्हा एकदा दिवस झाले मी स्टेज देतो माइक देतो गरज पडली तर माझ्या स्टेजवरही माझ्या लोकांसमोर बोला रणछोडदास बनू नका अशी टीका केली आहे. त्यामुळे या सभेला अधिकच महत्त्व प्राप्त झाल आहे
Chiplun : बुधवारी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुय्यम निबंधक प्रशांत धोत्रे यांना सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्या अधिकाऱ्यांसह आणखी एकाला येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
Ratnagiri News : शासकीय दूध डेअरीतून देण्यात येणाऱ्या दरात गेल्या चार वर्षात बदल झालेला नाही.या दरांबाबत दुग्ध विकास खात्याने कोणतेच लक्ष न दिल्याने खाजगी दूध डेअरी चालकांचा दूध विक्रीत वाढ झाली अखेर घरघर लागलेली रत्नागिरीतील शासकीय दूध डेअरी बुधवारी बंद करण्यात आली.
Goa News: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कळंबस्ते येथे गोवा बनावट दारूचा कंटेनर पोलीसांनी पकडला .त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कळंबस्ते गमरे बोद्धवाडी येथील एकाच्या घरातील गोवा बनावट दारूचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईनंतर बेकायदा साठा करणारे व्यावसायिक पोलिसांच्या रडावर आले आहेत.या प्रकरणी वालोपेतील दोन बड्या व्यवसायिकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरु आहे
Maharashtra News : महाराष्ट्रातील पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच किनारी जिल्ह्यामध्ये खाड्या,नदी आणि खाडी क्षेत्राभोवती असणाऱ्या विकासावरील निर्बंध 100 मीटर पासून 50 मिटरपर्यत कमी करण्यासाठी राज्य सरकारची योजना आहे ज्यामुळे ज्या भागांत मोठ्याप्रमाणावर रिअल इस्टेट विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पाच जिल्ह्यासाठी कोस्टल झोन मॅनेजमेन्ट प्लॅन (CZMP) 2019च्या मसुद्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली .हा मसुदा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे..
Nagpur Crime: नागपूरमध्ये सुट्यांमध्ये चोरांची दिवाळी राहिल्याचे पाहायला मिळाले. ऑक्टोबर महिन्यात घरफोडीच्या घटनेत 27 टक्क्याने वाढ झाल्याचे पुढे आले असून सप्टेंबर महिन्यात 48 घरफोड्याच्या तुलनेने दिवाळीच्या सुट्ट्याच्या ऑक्टोबर महिन्यात यात भर पडून घरफोडीच्या 61 घाटंनांची नोंद झाली. विशेष मध्ये यातील 40 टक्के घरफोड्या या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या असून ज्यात बहुतांश घरमालक हे सुट्टी निमित्त घराबाहेर होते. सर्वधिक घरफोड्या या हुडकेश्वर व बेलतरोडी पोलीस ठाण्याची हद्दीत झाल्या असून यापैकी 35 टक्के घरफोडीचा उलघडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महानगर गॅस लिमिटेडकडून पुन्हा एकदा दरवाढीचा झटका
सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडनं ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा झटका दिला आहे. महानगर गॅसकडून मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो साडेतीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती पीएनजीच्या दरात प्रति एससीएम दीड रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ही दरवाढ आजपासून लागू होईल. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर 89.50 रुपये प्रति किलो तर घरगुती पीएनजीचा दर हा 54 रुपये प्रति एससीएम आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी व पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केली आहे. त्यामुळं आता महागाईची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना सोसावी लागणार आहे.
मराठी पाट्या 18 डिसेंबरपर्यंत कारवाईला स्थगिती
मुंबईतील दुकानांवर मराी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दुकानदारांना दिलासा. 18 डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकानं आणि आस्थापनांवरच्या नावाच्या पाट्या ठळक मराठीत अनिवार्य करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला होता.
प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ मागे
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा. मोठ्या स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर झाले कमी. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी फलाट तिकीटांचा दर वाढवला होता. असे दर वाढवण्याचा विभागीय रेल्वे मॅनेजराचा अधिकार रेल्वे बोर्डाने काढला.
पेन्शन योजनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. 2014 ची कर्मचारी पेन्शन सुधारणा योजना कायदेशीर आणि वैध. पेन्शन फंडात सामील होण्यासाठी 15 हजार रुपयांची मासिक वेतन मर्यादाही हटवली
सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात
कोकणातला रिफायनरी विरोध आणखी तीव्र करण्याचा निर्धार रिफायनरी विरोधी संघटनेने केलेला आहे. कारण आता यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील प्रकल्पविरोधात असलेली रिफायनरी विरोधी संघटना आता थेट बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. मुंबई इथे संघटनेची बैठक झाली आणि त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नाणार आणि आसपासच्या जवळपास 14 गावांमधील लोक हे सध्या सुरू असलेल्या रेफारणारी विरोधी आंदोलनाला साथ देणार आहेत. त्यात साठी आता थेट आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. वेळेप्रसंगी मुंबईतून देखील लोक या रिफायनरी विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -