Maharashtra News LIVE Updates : एसटी महामंडळाची 35 हजार रूपये वेतनाची जाहीरात खोटी, अहमदनगर महामंडळाची माहिती  

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Dec 2022 11:25 PM
Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर अवजड वाहनांची गर्दी

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर अमृतांजन पुलाजवळ रात्री 9 वाजता गाडी बंद पडल्याने वाहूतुक कोंडी झाली होती. आता ही गाडी हटवण्यात आली असली तरी सुमारे एक किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांची गर्दी आहे. 

एसटी महामंडळाची 35 हजार रूपये वितनाची जाहीरात खोटी, अमदनगर महामंडळाची माहिती  

एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने 17 डिसेंबर रोजी विभागिय कार्यशाळेत शिकाऊ तांत्रिक उमेदवारांसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात नियमित भरती प्रक्रियेची जाहिरात नसून ती शिकाऊ उमेदवारी अधिनियम अंतर्गत दरवर्षी आस्थापनांनी शिकाऊ उमेदवारांची भरती करणे अनिवार्य आहे. त्यानुसार सध्या कार्यरत असणाऱ्या शिकाऊ उमेदवारांची मुदत 31 जानेवारी 2023 रोजी संपत असल्याने नवीन शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी काढलेली जाहिरात आहे. ही जाहिरात BTRI यांच्या संकेतस्थळावरून  ऑनलाईन  प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येत आहेत.  परंतु, काही अनधिकृत समाज माध्यंमा वर ही जाहिरात नियमित भरती प्रक्रिया असून यात 35 हजार रुपये वेतन, संबंधित पदासाठी मिळणारं असल्याचे धातांत खोटे सांगण्यात आले आहे. समाज माध्यंमामध्ये दिसणारी जाहिरात ही एसटी महामंडळाकडून देण्यात आलेली नाही. तरी उमेदवारांनी या खोडसाळ जाहिरातीवर विश्वास ठेऊन अर्ज करु नये, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.  

नाशिकच्या सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के

नाशिकच्या सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुपारच्या सुमारास 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कुठलीही मोठी हानी झाली नाही. परंतु, अचानक  भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई विमानतळावर 28 डिसेंबर रोजी परदेशातून 97 फ्लाईट आल्या आहेत. ज्यामध्ये 16993 प्रवासी होते. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट मुंबई विमानतळावर करण्यात आली. यामध्ये एकूण 377 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यातील 350 प्रवाशांचे आरटीपीसीआर अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हा प्रवासी नेमका कोणत्या देशातून आला? या संदर्भात मुंबई महापालिका आता विमानतळ प्रशासनाकडून माहिती घेत आहे.  

मुकेश अंबानीच्या मुलाला पाहण्यासाठी मुंबई विमानतळावर गर्दी, आठ नंबर गेटवर वाहतूक कोंडी 

उद्योगपती मुकेश आंबानी यांचे पूत्र अनंत याचे लग्न राधिका मर्चंटसोबत ठरले आहे. लग्न लग्न ठरल्यानंतर हे जोडपे मुंबई विमानतळ गेट नंबर आठमधून काही वेळामध्ये बाहेर येणार आहे. अनंत अंबानी यांना पाहण्यासाठी मुंबई विमानतळाच्या आठ नंबर गेट बाहेर नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे.   गर्दीमुळे मुंबई विमानतळ आठ नंबर गेट बाहेर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

Chandrapur News : "मिशन 144" ची सुरुवात; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा चंद्रपूर दौऱ्यावर

Chandrapur News : भाजपच्या "मिशन 144" ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपुरातून करणार आहेत. यासाठी 2 जानेवारी रोजी जेपी नड्डा चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत. 2 तारखेला चार्टर्ड विमानाने सकाळी 9.30 वाजता चंद्रपुरच्या मोरवा विमानतळावर नड्डा दाखल होतील. त्यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 वाजता सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर नड्डा भाजपच्या 'लोकसभा टीमशी' एका बैठकीत संवाद साधणार आणि त्यानंतर औरंगाबाद साठी रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असतील. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दौऱ्याकडे बघितले जात आहे. याआधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करून केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनाविषयक विविध मुद्द्यांची हाताळणी केली होती. चंद्रपूर भाजपच्या वतीने नड्डा यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली जात आहे.

Dhule: चिमठाणे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे शिवारात तीन ते चार दिवसांपासून बिबट्या हा धुमाकूळ घालत असून चिमठाणे ते निशाणे या शिवारात गहू, हरभरा, ऊस अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी वर्ग हा शेतीमध्ये पाणी भरण्यासाठी जात असतो, कारण दिवसभर लाईट नसल्याने रात्री लाइट येते. त्यामुळे पाणी भरण्या करण्यासाठी सालदार किंवा अनेक शेतकरी पाणी भरत असतात. या वेळी निशाणे रस्त्याच्या कडेला उसाचे शेत असून या ठिकाणी बिबट्या हा अनेक दिवसांपासून आपले वास्तव्य करून असल्याचे निदर्शनास आले आहे. कैलास सिद्धा पावरा हा सालदार मोटारसायकल वर जात असताना त्याला बिबट्याने पंजा मारून जखमी केले असू काल या व्यक्तीला गहूला पाणी भरायला जात असताना हाताला व पायाला जखमी केले. 

Parali: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच सहा दिवसापासून आमरण उपोषण

परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी परळी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केल आहे. परळीतील अश्मक विद्युत केंद्रात ज्या लोकांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना सरकारकडून कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत सामावून घेण्याच आश्वासन देण्यात आलं होत. मात्र गेल्या दहा वर्षापासून या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाही व्यक्तीला नोकरीत सामावून न घेतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयासमोरच सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केल आहे.

Yavatmal: पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी बेमुदत उपोषण व मुंडण आंदोलन

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना चालू वर्षात पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच आजपर्यंत न मिळालेली महात्मा फुले शेतकरी सन्मान निधीचे अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी हिवळणी तलाव येथे बेमुदत उपोषण व मुंडण आंदोलन करण्यात आले. संजय मदन आडे यांनी मुंडन केले. तर इतर पाच ते सहा जण उपोषणाला बसले आहेत.

भिवंडीत एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई 

भिवंडीत एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक गुन्हे शाखेने अटक केली आहे. भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम 10 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने कापून तब्बल 26 लाख 4 हजार 500 रुपयांची चोरी केली होती. चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभे असताना त्याठिकाणी पोलिसांना 10 लिटरचा ऑक्सीजनचा बाटला मिळाला. त्याच्या आधारे  गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस पथकाने राज्यस्थान येथील कैथवाडा इथं पोहचून चोरट्यांना अटक केली. शराफत आजमत खान, इलियाज खान , गुलाम खान, शोएब  खान, तौफिक अन्सारी अशी अकट करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  

वाल्हेत बाळूमामा पालखी स्वागताला जेसीबीतून उधळला भंडारा

पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात बाळूमामा पालखी सोहळ्याचे वाल्हेकरांनी जेसीबीमधुन भंडाऱ्याची उधळणीत डिजे साऊंड सिस्टीमच्या तालावर फटाक्यांची आतषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले. आदमापुर येथील संत बाळूमामाची पालखी सध्या पुरंदर तालुक्यात मुक्कामी आहे. पालखी आणि मामांच्या मेंढ्याच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत. मामांच्या मेंढ्या आपापल्या गावात आणण्यासाठी गावनेत्यांची रांग लागली आहे. दरम्यान आज गुरूवार पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात पालखीच्या स्वागताला जेसीबीतुन भंडारा उधळुन डिजे साऊंड सिस्टिमच्या तालावर फटाक्यांची आतषबाजीत गावांतर्गत जंगी मिरवणुक काढुन जोरदार स्वागत केले.

खंडणी वसुली प्रकरणात छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटचा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज

खंडणी वसुली प्रकरणात छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटचा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज


व्यवसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात मुंबई पोलिसच्या खंडणी विरोधी पथकानं दाखल केलाय गुन्हा


खंडणी विरोधी पथकाकडून दाखल करण्यात आलेले आरोपपत्र मुदतीनंतरही अपूर्ण असल्यानं सलीमचा डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज 


आरोपपत्र दाखल करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याचा सलीम फ्रुटचा दावा 


या अर्जावर 4 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यासमोर होणार सुनावणी 


या प्रकरणात एकूण 6 आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे


अंधेरीतील व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी कार आणि सात लाखांहून अधिक रुपये आरोपींनी उकळले होते


व्यावसायिकानं याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती

दौंड तालुक्यातील वरवंड इथे दोन गटात सिनेस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड इथे दोन गटात सिनेस्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत हे युवक एकमेकांवर तुटून पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा प्रकार नेमका कोणत्या कारणावरून झाला हे स्पष्ट झाले नाही. मात्र, हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. हे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



Maharashtra Winter Session: दुसऱ्यांचे नेते, पक्ष आणि कार्यालय चोरण्याचे काम सुरू आहे; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

Uddhav Thackeray: दुसऱ्यांचे नेते, पक्ष आणि कार्यालय चोरण्याचे काम सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, आमदार कुणाल पाटील यांची मागणी

Dhule News : धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) हाती आलेली पीक पावसामुळं वाया गेली होती. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी विधानसभेत केली आहे.

Palghar News: पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने वार

Palghar News: पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर पहाटे रनिंग साठी गेली असता धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. डहाणू तालुक्यातील कासा येथील घटना घडली आहे . पूनम पिंटू भोमटे असं जखमी तरुणीच नाव आहे. तरुणीच्या डोक्याला आणि हाताला जबर मारहाण झाली आहे.  कासा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून जखमी तरुणीला केलं सिलवासा येथे पाठवण्यात आला आहे.  कासा पोलीस घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे.  हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे. कासा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे

Sindhudurg News: सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजनची सभा 5 जानेवारीला, सभेकडे जिल्हावासीयांचं लक्ष

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा 5 जानेवारीला जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. दरवेळी वादळी ठरणारी सभा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या सभेकडे पाहिलं जातं. राणे आणि राऊत वाद कायम जिल्हा नियोजन सभेत असतो, त्यामुळे या सभेकडे सर्वच लक्ष लागून राहिलेला असतो. या सभेत जिल्हाधिकाऱ्यांकडून 2023-24  या पुढील वर्षासाठी सुमारे 270 कोटीचा जिल्हा वार्षिक आराखडा मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात येणार आहे.

भंडाऱ्यात धावत्या व्हॅनने घेतला पेट, कोणतीही जीवितहानी नाही

धावत्या व्हॅनने घेतला पेठ... लाखनी उड्डाणपुलालगतची घटना....


Bhandara News : नागपूर-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी येथील उड्डाणपूलालगत एका धावत्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. चालक आणि वाहनातील प्रवाशांच्या सतर्कतेने त्यांनी तातडीनं वाहनातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्ग पोलीस आणि लाखनी पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने गाडीची आग नियंत्रणात आणली. 

Bhandara News: धावत्या व्हॅनने घेतला पेठ, लाखनी उड्डाणपुलाजवळची घटना

Bhandara News: नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी येथील उड्डाणपूलाजवळ एका धावत्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतला. चालक आणि वाहनातील प्रवाशांच्या सतर्कतेने त्यांनी तातडीने वाहनातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचविला. कुठलीही जीवितहानी झाली नाही. महामार्ग पोलीस आणि लाखनी पोलिसांना माहिती मिळतात स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने गाडीची आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Chanda kochar: चंदा कोचर, दिपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांना न्यायालयीन कोठडी

Chanda kochar: चंदा कोचर, दिपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.  तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 10 जानेवारीपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

Beed News:  परळीत राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा
Beed News:  राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परळी मध्ये हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात आला आहे. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहादच्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा मुकमोर्चा  राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत जाणार आहे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव तसेच महिला आणि तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या
कापसाच्या दरात घसरण, शेतकरी अडचणीत

Cotton Price : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे. नंदूरबार जिल्ह्यात सीसीआयकडून (The Cotton Corporation Of India Limited) कापसाची खरेदी सुरु आहे. मात्र, सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कापसाच्या दरात जवळपास दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Coronavirus : चिंताजनक! भारतात पुन्हा कोरोनाची लाट? पुढचे 40 दिवस महत्त्वाचे

जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे. भारतातही पुन्हा कोरोनाची लाट (Covid19 Wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास भारतात पुढील 40 दिवसात कोरोनाची मोठी लाट येणाचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्यातज्ज्ञांनी कोरोनाच्या लाटेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाच्या जगभरातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढील 40 दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या 40 दिवसांत कोरोनाच्या संभाव्य नव्या (Covid-19) लाटेबाबतच चित्रं स्पष्ट होईल. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटी भारतात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तयारी सुरु आहे.

Solapur News: सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात महिलेचा गोंधळ, किरण लोहार यांच्यावर आरोप करत महिलेचा गोंधळ


Solapur News: सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात महिलेचा गोंधळ सुरू आहे. महिलेवर बोगस शिक्षणाधिकारी म्हणून वावरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर आरोप करत महिलेचा गोंधळ सुरू आहे. 

 CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट देणार

 CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट देणार आहे. मुख्यमंत्री डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीक्षाभूमीलाही भेट देणार आहे.

Beed Crime:  दहशत निर्माण करून चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी बीड पोलिसांच्या ताब्यात
Beed Crime:  दहशत निर्माण करून लुटमार आणि जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर जिल्ह्यातून अटक केली आहे.. निंबाळकर आसाराम भोसले असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी चिंचोली पाटील येथून त्याला ताब्यात घेतलं आहे. आष्टी तालुक्यातील एका डॉक्टरच्या घरामध्ये चोरी करून 14 तोळे सोन्याची चोरी या आरोपीने केली होती त्याचबरोबर बीड जिल्ह्यात इतर ठिकाणीही वाटणारी आणि जबरी मारहाण करून चोरी केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि या सर्व गुन्ह्याची कबुली त्यांने पोलिसात दिली आहे.
NCP : राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस अध्यक्षासह 100 लोकांवर मुंबईत पोलिसांत गुन्हा दाखल

NCP : राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस अध्यक्षासह 100 लोकांवर मुंबईत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याता आला आहे.  अनिल देशमुख्यांच्या सुटकेच्या वेळी जेलबाहेर गर्दी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , कलम 143 आणि कलम 135 अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. 

Mumbai Local: पश्चिम रेल्वे वरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा

Mumbai Local: धुक्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने येत असल्याने त्याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला आहे.  त्यामुळे पश्चिम रेल्वे वरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. 

जालन्यात मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी,1 0 जण जखमी; 14 जणांविरोधात गुन्हा

Jalna News : जालना शहरातील वाल्मिकनगर भागात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी झाल्यानं यात 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन जण गंभीर आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार किरकोळ वादातून काठ्या आणि तलवारी घेऊन हे  दोन गट समोरसमोर भिडले आहेत. मध्यरात्री घडलेल्या या हाणामारी प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही गटाच्या 14 जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात 10 लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त

Pune News : पुण्यात 10 लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 कडून ही कारवाई करण्यात आली आहे. धीरज कांबळे (22) असे आरोपीचे नाव आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर पोलियांची नजर आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकं तैनात करण्यात आले आहे. मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ औषधी कॅप्सुलच्या स्वरूपात येतंं.


 

बुलढाणा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन ) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Buldhana News : बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यात मोठी कारवाई केली. नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याची जिगाव प्रकल्पात जमीन गेली होती. त्यात वडिलांच्या नावाऐवजी काकाचे नाव यादीत आल्याने ते नाव बदलून घेण्यासाठी तो आला होता.  परंतु या प्रकल्पातून  मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाच उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी मागितली. संपूर्ण रक्कम 21 लाख होती त्याची 10 टक्के रकम 2 लाख 17 हजार लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना भूसंपादन जिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना रंगेहाथ पकडले. त्यात त्यांचा लिपिक नागेश खरात आणि वकील अनंत देशमुख अशा तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

Pune Accident: पुण्यातील वाकडेवाडी भागात भीषण अपघात, पीएमपीएल बसची अनेक वाहनांना धडक

Pune Accident: पुण्यातील वाकडेवाडी भागात भीषण अपघात झाला आहे. पी एम पी एल बसने अनेक गाड्यांना धडक दिली. काल रात्री 8 वाजता ही घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 8 वाजता पी एम पी एम एल बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने अनेक गाड्यांना धडक दिली. यामध्ये तीन चार चाकी, एक टेम्पो पॅगो, दोन मोटरसायकल, एक 407 यांचा समावेश होताा. बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचे नाव समजू शकले नाही. 



Buldhana News: उपजिल्हाधिकारी (भुसंपादन ) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Buldhana News: नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याने जिगाव प्रकल्पात जमीन गेल्याने वडिलांच्या नावा ऐवजी काकाचे नाव यादीत आल्याने ते नाव बदलून देण्यासाठी मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाच उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी मागितली. संपूर्ण रक्कम 21 लाख होती त्याची 10 टक्के रकम 2 लाख 17 हजार लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना भूसंपादन जिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना रंगेहात पकडले. त्यात त्यांचा लिपिक नागेश खरात व वकील अनंत देशमुख असे तीन आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे... पुढील कारवाई सुरु आहे.

पर्यटकांसाठी रत्नागिरी दर्शन नावाने एसटीची बस सेवा सुरु, 2 जानेवारीपर्यत ही सेवा सुरु राहणार

Ratnagiri News : कोकणात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्यांसाठी एसटीची लालपरी पुढे आली आहे. आजपासून रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांना रत्नागिरी दर्शन नावाने एसटीची बस सेवा सुरु करणण्यात आली आहे. रत्नागिरी आणि आसपासची पर्यटन स्थळे या एसटीच्या रत्नागिरी दर्शनच्या माध्यामातून पहाता येणार आहेत. मोठ्यांसाठी 300 रुपये आणि छोट्यांसाठी 150 रुपयात एसटी महामंडळाने ही सेवा सुरु केली आहे. ही बस दररोज आठ वाजता रत्नागिरी एसटी स्टॅण्डमधून सुटणार आहे. 2 जानेवारीपर्यत ही सेवा सुरु असणार आहे.

Nashik News: नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक पोलीस सज्ज, सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

Nashik News: नववर्षाच्या जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून, नाशिक पोलीस सज्ज झालेत... सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे... 120 अधिकाऱ्यांसह बाराशेहून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.. तसेच 13 पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी असणार आहे... हॉटेल आणि बारचालकांनी सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्यात...

Beed News: युवा सेनेच्या अंबाजोगाई विभागीय सचिव अक्षय भूमकरचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed News: युवा सेनेच्या अंबाजोगाई येथील विभागीय सचिव अक्षय भूमकर याने विष घेऊन केला आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाडा युवा सेना विभाग प्रमुख विपुल पिंगळे यांच्यासोबतच्या आर्थिक व्यवहाराच्या जाचातून आत्महत्या करत असल्याचं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पत्र दिले होते. अक्षय भुमकरवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहे. 



31 डिसेंबरला आपापल्या आस्थापनांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करा, नाशिक पोलिसांच्या सर्व हॉटेल आणि बारचालकांना सूचना

Nashik News : सुरक्षेच्या कारणास्तव 31 डिसेंबरला शहरातील सर्व हॉटेल आणि बारचालकांनी आपल्या आस्थापनांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याच्या सूचना नाशिक पोलिसांनी दिल्या आहेत. तसंच कायदा सुवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 120 अधिकाऱ्यांसह बाराशेहून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून शहरातील 13 पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिलांची छेडछाड टाळण्यासाठी विशेष गस्ती पथक तयार करण्यात आले आहे. यासोबतच रॅश ड्रायव्हिंग तसेच दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलीसही विशेष मोहीम हाती घेणार आहेत. 

रायगडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात अपघात. टेम्पोने दोन कारना धडक, टेम्पो चालक किरकोळ जखमी

Raigad News : रायगडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री खंडाळा घाटात अपघात झाला. अंडापॉईंटनजीक ब्रेकफेल झालेल्या टेम्पोने दोन कारना धडक दिली. या अपघातात टेम्पोचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. 

पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करुन वृद्ध पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या, बुलढाण्यातील माऊली भोटा गावातील धक्कादायक घटना

Buldhana News : बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील माऊली भोटा गावातील 60 वर्षीय वृद्धाने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने आधी हत्या करुन नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. बुधाजी वानखेडे असं या वृद्धाचं नाव असून शोभबाई वानखेडे त्यांचा पत्नीचं नाव आहे. हे दोघेही गावाजवळ असलेल्या आपल्या शेतात झोपडी करुन राहत होते. गेल्या काही दिवसांपासून बुधाजी यांचं मानसिक संतुलन ठीक नसल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे. जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई सुरु आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जिल्हा दौऱ्यावर आहेत. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत.  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस


 विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यावर चर्चा होणार आहे. 
 
मुंबईत अशोक नायगावकर यांचा सत्कार


साहित्य आणि व्यक्ती या कार्यक्रमात अशोक नायगावकर यांचा सत्कार आणि पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला श्रीनिवास पाटील, सुशीलकुमार शिंदे, आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.   
 
सोलापुरात सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन


सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज होणार आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये महत्त्वाचे आकर्षण म्हणजे दीड टन वजनाचा आणि एक कोटी किंमतीचा गजेंद्र नामक रेडा पाहायला मिळणार आहे. यामध्ये 200 पेक्षा अधिक कंपन्या सहभाग घेणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.


अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयावर हॉकर्स युनियनच्या वतीने मोर्चा
 
अहमदनगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय झिंजे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज सकाळी 11 वाजता अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हॉकर्स युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
अमरावतीत राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन


महाराष्ट्र कामगार मंडळातर्फे अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात आज राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार असून सकाळी 11 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील 27 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात असून राज्यभरातील 225 कलावंत या स्पर्धेसाठी आपली हजेरी लावणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल भंडारा जिल्हा दौऱ्यावर
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता भंडारा शहरातील बावने कुणबी सभागृहात आयोजित पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित रहाणार आहेत.


अभिनेत्री तुनिषाच्या शर्मा नातेवाईकांचे जबाब नोंदवणार


पालघर- वालीव पोलिस अभिनेत्री तुनिषाची मावशी, मामा आणि दोन चालकांचे जबाब नोंदवणार आहेत.  


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हैदराबाद दौऱ्यावर


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हैदराबादमध्ये जी नारायणम्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, बीएम मलानी नर्सिंग कॉलेज आणि सुमन ज्युनियर कॉलेज ऑफ वुमन एफिशिएन्सी सोसायटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधतील. शमशाबाद येथील श्रीरामनगरम येथे असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’लाही ती भेट देणार 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.