Maharashtra News Updates 29 October 2022 : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Oct 2022 06:05 PM
एअरबसचा प्रकल्प कुठेही महाराष्ट्रात येणार असे ठरले नव्हते - सामंत

आज मझ्यावकडे सर्व कागदपत्रे आहेत. एअरबसचा प्रकल्प कुठेही महाराष्ट्रात येणार असे ठरले नव्हते.  तो प्रकल्प मिहान मध्ये येणार होता, एम आय डी सी सोबत कोणतेही बोलणे झाले नव्हते, ते मिहान सोबत झाले होते - सामंत

आदित्य ठाकरे आरोप करतात पण कागदपत्र देऊ शकले नाहीत - सामंत

आदित्य ठाकरे आरोप करतात पण कागदपत्र देऊ शकले नाहीत - सामंत

Palghar : बंद कारखान्यात भंगार चोरी करण्यासाठी गेला आणि झाला सिलेंडरचा स्फोट, एक जण गंभीर जखमी

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात केमिकल कंपनीत स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत पुन्हा एकदा ब्लास्ट झाला आहे. यावेळी कंपनी बंद असल्याने ही घटना कशी घडली याबद्दल तपास करण्यात येत असून. या तपासासून धक्कादायक माहिती समोर आली आहे.


बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औरा ऑइल या बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सिलेंडरचा ब्लास्ट होऊन भीषण आग लागली. बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीतील साहित्याची चोरी करत असताना हा ब्लास्ट झाला असल्याची माहिती समोर आली असून या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीवर बोईसर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कंपनीला भीषण अशी आग लागली असून या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Palghar : बंद कारखान्यात भंगार चोरी करण्यासाठी गेला आणि झाला सिलेंडरचा स्फोट, एक जण गंभीर जखमी

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात केमिकल कंपनीत स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत पुन्हा एकदा ब्लास्ट झाला आहे. यावेळी कंपनी बंद असल्याने ही घटना कशी घडली याबद्दल तपास करण्यात येत असून. या तपासासून धक्कादायक माहिती समोर आली आहे.


बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औरा ऑइल या बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सिलेंडरचा ब्लास्ट होऊन भीषण आग लागली. बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीतील साहित्याची चोरी करत असताना हा ब्लास्ट झाला असल्याची माहिती समोर आली असून या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीवर बोईसर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कंपनीला भीषण अशी आग लागली असून या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

लिफ्टमध्ये अडकून 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू,  मुंबईच्या गोराई चारकोप भागातील घटना

मुंबईतील गोराई चारकोपमधून एक धक्कादायक व लक्ष विचलित करणारी बातमी समोर आली आहे. रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकून एक 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. नगीना अशोक मिश्रा असे मृत महिलेचे नाव आहे ही घटना गोराई चारकोप मधील हायलँड ब्रिज इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे लिफ्ट मुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर वंचित बहूजन आघाडीचा विजय.

अकोला जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर वंचित बहूजन आघाडीचा विजय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा केला पराभव. वंचित बहूजन आघाडीच्या रिजवाना परवीन, माया नाईक, आम्रपाली खंडारे आणि योगिता रोकडेंचा सभापती पदावर विजय. भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांचं मतदान महाविकास आघाडीला. तर दोन सदस्यांनी केलं वंचितला मतदान. एका सदस्याच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर 1 नोव्हेंबरला न्यायालयाच्या निर्णय येणार असल्यानं अधिकृत निकाल 1 नोव्हेंबरला होणार अधिकृत निकाल जाहीर.

Aditya Thackeray : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्याता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारचा कुठलाही मंत्री बांधावर गेला नाही अशी टीकाही त्यांनी केली. 

पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली

नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. 14956 पदांसाठी भरती होणार होती. पुढील आठवड्यात भरतीबाबात निर्णय घेण्यात येणार आहे. 

परळी बस स्थानकावर दोन बस समोरासमोर आदळल्याची घटना

Bus Accident : परळी बस स्थानकावर दोन बस समोरासमोर आदळल्याची घटना घडली. यावेळी बसमधील प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही बसेसच्या ड्रायव्हरने बेशिस्तपणे गाड्या चालवल्यामुळं ही घटना घडली. या दोन्ही एसटी ड्रायव्हरवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांनी केली.


 

प्रसिद्ध गायक अशोक निकाळजे यांची तोतया पोलिसांकडून फसवणूक

प्रसिद्ध गायक अशोक निकाळजे यांची तोतया पोलिसांकडून फसवणूक 


काही दिवसांपूर्वी निकाळजे यांना एक फोन आला होता फोनवरील व्यकतीने एक गायनाचा कार्यक्रम करायचा असल्याचे सांगितले


तसेच या कार्यक्रमाला सेलिब्रिटी आणण्याची जबाबदारीही निकाळजेंवर सोपवली. तसेच ज्या सेलिब्रिटीला आणायचे आहे त्याचा नंबरही निकाळजे यांना पाठवला.


सेलिब्रिटींना आणण्यासाठी लागणारी फी चे पैसेही पाठवल्याचा बनावट मेसेज निकाळजेंना पाठवला


मात्र पैसे आले नसल्याचे निकाळजेंनी आयोजकांना सांगितल्यावर ते संध्याकाळपर्यंत येतील असे सांगितले. निकाळजेंना विश्वास बजावा यासाठी आपण आयपीएस अधिकारी बोलत असल्याची हमीही दिली.


दरम्यान दुसरीकडे निकाळजेंनी संबधित सेलिब्रिटींना फोन केला असता. त्यानेही तात्काळ पैसे दिल्यावरच आपण कार्यक्रमाला येण्याची इच्छा दर्शवली.


आयोजकांकडून पैसे येतील या आशेने  निकाळजेंनी संबधित सेलिब्रिटीला अडीच लाख दिले. मात्र कालांतराने त्याचा फोन बंद येऊ लागला


 आयोजकांकडूनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने निकाळजेंना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले


या प्रकरणी निकाळजेंनी दिलेल्या तक्रारीनुसार टिळक नगर पोलिस ठाण्यात 170, 420 भादवी कलमांतर्गत हनीफ शेख व अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे


या प्रकरणी टिळक नगर पोलिस अधिक तपास करत आहे. मात्र अशाच प्रकारे बेळगाव निप्पाण्णी ची एक टोळी आॅर्केस्ट्रा आणि गायकांना गंडा घालत असल्याची  माहिती निकाळजेंनी दिली आहे.

Chhath Puja : बिहारमध्ये छठ पूजेदरम्यान आग लागून मोठी दुर्घटना, 30 जण जखमी  

Bihar Aurangabad Fire : बिहारमध्ये छठ पूजेदरम्यान (Chhath Puja 2022) आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किट आग लागून त्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे आग अधिक भडकली. दुर्घटनेतील जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.

Crime News : वाहन चालकाला झाडाला बांधून कार पळविणारे तिघे अटकेत

Crime News : मोबाइल टॉवर लावण्यच्य सर्वेक्षनाचे काम असल्याचा बनाव करून आलिशान कार भाड्याने घेवून चालकाला झाडाला बांधून वाहन  चोरून नेण्यात आले. मूर्तीजापूर येथे घडलेल्या या प्रकरणातील तीन चोरट्यांना अटक करण्यात आली


 

अविनाश भाऊराव इंगळे (32, रा. साखरी, ता. अंजनगाव सुर्जी), विनोद ज्ञानेश्वर उघडे (45 रा. साखरी), मनोहर सहदेव खुंटे (48, रा. अचलपूर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. 

 

नेर येथे 30 सप्टेंबरला विरगव्हाण येथील संतोष सहस्त्रबुद्धे यांची गाडी तिघांनी भाड्याने घेतली. स्वतः सहस्त्रबुद्धे हे मोबाइल टॉवर सर्वेक्षणासाठी मूर्तीजापूरकडील गावाकडे घेवून गेले. रात्री साडेदहा वाजता दरम्यान मूर्तीजापूरजवळील शेणगावजवळ रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवून वाहनमालक सहस्त्रबुद्धे यांना एका झाडाला बांधले, त्यांचा मोबाईल, व कार असा एकूण 5 लाख आठ हजार सहाशे रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला. या प्रकरणी मूर्तीजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. कागदपत्रे प्राप्त होताच नेर पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर सेलची मदत घेण्यात आली. अविनाश इंगळे याला ताब्यात घेतले असता, गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे त्याने सांगितली.
Winter Update : पावसाळा संपताच आता सर्वत्र थंडीची चाहूल

Winter Update : पावसाळा संपताच आता सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. सकाळच्या वेळेला सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सध्या कोकणातली अनेक गावं धुक्यात हरवून गेली आहेत. दुपारच्या वेळेला कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी मात्र हवेत गारवा अशा प्रकारचं वातावरण सध्या कोकणात अनुभवायला मिळत आहे. सध्याचे वातावरण हे आंब्याला मोहर येण्यासाठी पोषक असल्याचं सांगितलं जातं. 

Maharashtra News :

Maharashtra News : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात एक देशी कट्टा आणि 4 जिवंत काडतुसे घेऊन फिरत असतांना एका आरोपीला राजुरा पोलिसांनी अटक केली आहे. 19 वर्षीय लबज्योतसिंह हरदेवसिंह देवल हा देशी कट्टा घेऊन फिरत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ लबज्योत सिंहला ताब्यात घेत त्याच्या जवळील देशी आणि 4 जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपीकडून एकूण 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजुरा आणि आसपास असलेल्या कोळसा खाणींच्या भागात सक्रिय असलेल्या कोळसा गॅंगवॉरच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव काळात राजुरा पोलिसांनी केलेली कारवाई महत्वाची मानली जात आहे.

Wardha Bus Accident : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; वर्ध्यात मोठा अनर्थ टळला

Wardha Bus Accident : वर्ध्यात (Wardha News) काल एसटी बसला (ST Bus) भीषण अपघात (Accident News) झाला असून चालकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. या एसटी बसमधून जवळपास 50 ते 60 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून चालकाला मात्र दुखापत झाली आहे. स्थानिक रुग्णालयात चालकावर उपचार सुरु आहे. 


आर्वी डेपो येथील एसटी बस वर्ध्याहून वरुडला निघाली असता. येळाकेळी नदीपूलावरुन जात असताना तांत्रिक बिघाडामुळे एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास येळाकेळी नवीन पुलावर घडली. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र, चालकाला दुखापत झाली असून उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या घटनेमुळे सर्व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दुपारी 12 वाजता बाभूळगाव येथून दौऱ्याला सुरुवात होईल. नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  

Maharashtra Politics : पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा

Maharashtra Politics : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त औरंगाबादच्या पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या प्रमुख वक्त्या म्हणून भाषण करणार आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे हे देखील उपस्थित असणार आहेत. 

आज उस्मानाबाद बंदचे आवाहन

आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस संपला. अजूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आलंय.  

Maharashtra News : मुख्यमंत्री नंदूरबारच्या दौऱ्यावर

Maharashtra News : शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबार येथे होणार आहे. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.  

Investigation of Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी





Investigation of Kishori Pednekar by Mumbai Police : कथित एसआरए घोटाळा प्रकरणी काल शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. आज सकाळी 11 वाजता पुन्हा त्यांना दादर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून आज सकाळी 10.30 वाजता किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे  




पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


किशोरी पेडणेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी 
कथित एसआरए घोटाळा प्रकरणी काल शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. आज सकाळी 11 वाजता पुन्हा त्यांना दादर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून  आज सकाळी 10.30 वाजता किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे  
 
मुख्यमंत्री नंदूरबारच्या दौऱ्यावर
शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबार येथे होणार आहे. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.  
 
आज उस्मानाबाद बंदचे आवाहन
आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस संपला. अजूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आलंय.  
 
पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त औरंगाबादच्या पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या प्रमुख वक्त्या म्हणून भाषण करणार आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे हे देखील उपस्थित असणार आहेत. 
  
आशिष शेलार यांची पत्रकार परिषद
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे. 
 
आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दुपारी 12 वाजता बाभूळगाव येथून दौऱ्याला सुरुवात होईल. नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.