Maharashtra News Updates 28 December 2022 : सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण : शरद पवार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
औरंगाबादेत एका मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले. एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप. माश्यांऐवजी साप पाहून मच्छीमाराची भंबेरी उडाली. यावेळी सर्पमित्र्याच्या मदतीने सापांची सुटका करण्यात आली.
ही घटना विटावा शिवारातील तलावात घडली. 20 पैकी 14 सापांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले, तर 6 सापांचा मृत्यू झाला
भिवंडी या कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.आणि असे असताना याबाबत अनेक तक्रारी महानगर पालिका आरोग्य विभागाकडे होत असतात. नुकताच अशाच एका तक्रारीनंतर भिवंडी शहरातील हमाल वाडा या परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा पती-पत्नीवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे.मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी वय 46 व रायला मुशर्रफ मोमीन वय 40 असे अटक कारवाई झालेल्या बोगस डॉक्टर पतीपत्नीचे नाव आहे .यांनी दिनांक 1 ते 10 ऑगष्ट 2022 दरम्यान या बोगस डॉक्टरांनी तनवीर गुलाम मुस्तफा मोमीन वय 52 यांच्या वर या बोगस डॉक्टरांनी दवाउपचार करीत वेगवेगळया वैद्यकीय तपासण्या करायला भाग पाडून चुकीचे पध्दतीने दवा उपचार केल्याने अटक केली आहे..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हजार कोटी वसुली प्रकरणी आज रोजी जामीन मंजूर झाला असून त्यांची कारागृहातून सुटका झाली त्यानंतर त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगत प्रथम सिद्धिविनायकाच्या दरबारी बाप्पाच्या दर्शनाला गेले व त्यानंतर त्याने चैत्यभूमीला हजेरी लावल्यानंतर त्यांचा ताफा त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी पोहोचले त्या ठिकाणी जोरदार फटाक्यांचे आतिषबाजी तसेच ढोल ताशाचा गजरात कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा पाहायला मिळाल्या इमारतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला दिवसभराच्या घडत असलेल्या घडामोडी कुटुंबीय एबीपी माझ्यावर पाहत होते यादरम्यान कुटुंबीयांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या तसेच अनिल देशमुख त्यांनी गेल्या 14 महिन्यांपासून आपल्या कुटुंबीयां पासून दूर होते आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांची तसेच आपल्या नातवंडांची भेट घेतली यावेळी त्यांची ओवाळणी करून घरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 122 व्या जयंतीचे औचित्य साधून टाइम्स म्युझिक निर्मित, भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केलेल्या आणि डॉ. दीपक वझे यांनी वंदनीय लतादीदींवर रचलेल्या पहिल्याच गीताच्या ध्वनीचित्रफितीचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात रात्री ८ वाजता आयोजित केला आहे. तुषार पानके यांनी याचे चित्रीकरण केले आहे.
त्यानिमित्ताने, विश्वस्वरमाऊली हा लतादीदींच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.. केतकी माटेगावकर, सावनी रवींद्र, प्रियांका बर्वे आणि विभावरी आपटे जोशी ह्या कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाला अजय मदन यांचे संगीत संयोजन लाभले असून निवेदन स्मिता गवाणकर यांचे आहे तसेच, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उषा मंगेशकर यांची प्रमुख उपस्थितीत लाभली आहे. आर्यन इन्स्टिट्यूट ऑफ चेस अँड आर्ट एक्सलन्स यांची प्रस्तुती असलेल्या या सोहळ्याला एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी चे विशेष सहकार्य लाभले असून संयोजन हृदयेश आर्ट्सचे आहे.. या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका बुकमायशो वर उपलब्ध आहेत असे आयोजकांनी कळविले आहे...
दहावीतील विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून थेट मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आयुष गारळे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होते. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेला ही बसू देणार नाही. अशी धमकी मुख्याध्यापक हितेश शर्मा देत होते. असा त्यांच्यावर आरोप आहे. आयुष दिघी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेतो. त्याच शाळेत दहा डिसेंबरला ही आयुषला आणण्यासाठी आई स्वतः गेल्या होत्या. तेंव्हा ही मुख्याध्यापक शर्मा यांनी आईला आवाज देऊन बोलावून घेतलं आणि वरील सर्व बाबी त्यांच्या ही कानावर टाकल्या. त्यामुळं आयुष टेन्शनमध्ये होता. अशातच 13 डिसेंबरला घरातील सगळे बाहेर गेले, तेंव्हा एकटाच घरी असणाऱ्या आयुषने गळफास घेत आयुष्य संपवलं. या मृत्यूला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. त्याच आधारावर भोसरी पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर 24 डिसेंबरला कलम 305 नुसार गुन्हा दाखल केलाय.
"सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहेत. न्यायालयाने दिलेला निकाल हा अनिल देशमुखांवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरेल ही अपेक्षा आहे. न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट म्हंटलंय की अनिल देखमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही. आधी 100 कोटींचा आरोप करण्यात आला. त्यानंतर चार्जशीटमधे ही रक्कम साडेचार कोटी दाखवण्यात आली आणि फायनल चार्ज शीटमधे ही रक्कम एक कोटी दाखवण्यात आली. कोर्टाने म्हटलं की एका सुसंस्कृत आणि कर्तुत्ववान नेत्याला तेरा महिने चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलं. न्यायपालिकेने न्याय दिला याचे समाधान आहे. तपास यंत्रणांच्या या गैरकारभाराची माहिती एकत्रित करुन मी आणि संसदेतील आणखी काही जेष्ठ सहकारी देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास देशाच्या पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकाऱ्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटणार आहोत.
मनी लाँड्रीग संबंधी कायद्यात बदल करण्याची आम्ही मागणी करत नाहीत तर त्याबद्दल आम्ही संसदेत चर्चा करणार आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आज सायंकाळी मेहकर जवळील समृद्धी महामार्ग चैनेज क्र 335.5 , मुंबई कॉरिडॉर वर कोळसा वाहून नेणारा ट्रक क्र UP 72 AT 3688 चे चालक करीम खाँ रशीद खाँ वय 30 वर्ष राहणार भवानीपूर उत्तरप्रदेश हे मुंबई कॉरिडॉरने वणी ते भिवंडी जात असताना त्यांच्या गाडीचे स्टिअरिंग फ्री झाल्याने वाहन वरील ताबा जावून मुंबई रोडला असलेले पुलाचे सिमेंट बॅरियर ला धडकून ट्रक समृद्धी महामार्गावर पलटी होवून अपघात झाला. सदर अपघातात चालक जखमी झाला असून त्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की यात ट्रकची केबिन उखडून दूर जाऊन पडली व ट्रक मधील कोळसा महामार्गावर पसरला . अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी तात्काळ क्रेन चे साहाय्याने मिडीयम मध्ये लावण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली, वाहतूक सुरळीत सुरू
मी आणि माझ्या समर्थकांनी कुठेही पोलिसांसोबत अरेरावी, मारहाण केली नाही... असे नितीन देशणुख म्हणाले.
गेल्या दोन वर्षात कोरोनाचे सावट असल्याने या वर्षी साजरा होणारा थर्टी फस्ट डिसेंबर हा विशेष राहणार आहे. सरकारनेही पहाटे पाच पर्यंत बार , पब, हॅाटेल उघडी ठेवण्यास परवानगी दिली असल्याने लोकांकडून जोरदार सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे. यामुळेच कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी नवी मुंबई , पनवेल भागात ३ हजार पोलीस अधिकारी , कर्मचारी तैनात राहणार असल्याचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी सांगितले आहे. पनवेल मधील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने फार्म हाउसची संख्या असल्याने येथे दारूच्या किंवा रेव्ह पार्ट्या होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलीसांनी विशेष नार्को सेल पथक तयार केले असून त्यांचे याकडे जातीने लक्ष राहणार आहे. थर्टी फस्ट दिवशी मद्य पिणार्यांची संख्या जास्त असल्याने अशा लोकांनी गाड्या चालवू नये असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केलय. मद्यपिंवर कारवाई साठी शहरातील मुख्य रस्ते , अंतर्गत मार्गावर पोलीस फौजफाटा तैनात असणार आहे..
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिकेत पोहोचले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली.
खरी शिवसेना आम्हीच आहोत त्यामुळे राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची कार्यालय असतील ती आमच्या ताब्यात असणार आहेत. शिवसेना भावनासंदर्भात देखील लवकरच एकनाथ शिंदे जाहीर करतील. आणखी चार ते पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. काही दिवसात चित्र तुम्हाला वेगळे दिसेल. आगामी निवडणुका आम्ही सर्व चाळीस आमदार तर जिंकू. मात्र विरोधी पक्षातील ठाकरे गटातील आमदार निवडणुकीसाठी देखील शिल्लक राहतात की नाही हे पाहायला मिळेल, असे मत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
Belgaum News : टाटा समूहाला आपल्या दूरदृष्टीने उद्योग जगतात वेगळी ओळख निर्माण करून देणारे उद्योगपती पद्मभूषण रतन टाटा यांना 85 व्या वाढदिवसानिमित्त बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळी रेखाटून शुभेच्छा दिल्या. दीड फूट बाय दोन फूट आकाराची रांगोळी रेखाटण्यासाठी त्यांना पाच तासांचा कालावधी कृष्ण धवल रंगाने लागला. सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वडगावमध्ये 2 जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ पर्यंत नागरिकांना पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत त्यांनी जवळपास 150 रांगोळी रेखाटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, बाळासाहेब ठाकरे, बाळ वारकरी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, आशा भोसले, पंडित भीमसेन जोशी, अशा अनेक महान व्यक्तींचे भावचित्र त्यांनी रेखाटलेले आहेत. अभिनेते मोहन जोशी यांनी स्वतः कुटुंबासह येऊन कौतुक केले.
बाळासाहेबाच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुंबई महानगरपालिकेत पोहोचले आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतलाय. विधानसभेतील कार्यालयावरून राडा झाला होता. आता शिंदेंच्या नेत्यांचा पालिकेतील कार्यालयावर डोळा आहे. कार्यालयाच्या ताब्यावरून दोन गटांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिंदे गटाच्या नेत्यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली.
धुळे शहरात गोवरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून गोवर बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. शहरातील ज्या भागात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत त्या भागात महापालिकेकडून नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.
धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून गोवर या साथीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली असून शहरात सध्या 341 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 66 वर गेली असून एकाच दिवसात तब्बल 34 गोवर बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून नंदी रोड हजार खोली या परिसरात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या गोवर बाधित रुग्णांमध्ये बालकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून या बालकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाला दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोवरला आळा घालण्यासाठी लसीकरणासह विविध उपाय राबविले जात आहेत. शहरातील ज्या भागात, संस्थेत रुग्ण आढळून येत आहेत त्या भागात महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. लसींचा तुटवडा गेल्या काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता. मात्र गोवर बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लसींचा साठा उपलब्ध झाल्याने हे लसीकरण पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. शहरातील ज्या भागात गोवरचे सर्वाधिक वृद्ध आढळून येत आहेत. त्या भागात महापालिकेकडून नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.
मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, माझ्यावरील आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी कारागृहाबाहेर आल्यानंतर दिलीय.
Anil Deshmukh: अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. एक वर्ष आणि दोन महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याशिवाय आर्थर रोड तुरुंगाबाहेर कार्यकर्ते जमले होते. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पाणथळ जमीन संवर्धनाला चालना देण्यासाठी, वाशी आणि भांडुप दरम्यान पसरलेल्या ठाणे खाडीकिनारी असलेल्या फ्लेमिंगो अभयारण्यला आंतरराष्ट्रीय पाणथळ भूसंपादनाद्वारे अधिकृतपणे रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे भारतातील 75 वे आणि जगातील 2490 वे रामसर स्थळ म्हणून ही खाडी ओळखली जाणार आहे . ऐरोली येथील प्लेमिंगो अभयारण्याला रामसर चा दर्जा मिळाल्याने नवी मुंबईचा लौकिक जागतीक पातळींवर गेला आहे. नवी मुंबई शेजारी पसरलेल्या खाडी मध्ये अनेक पक्षी , प्राणी पहायला मिळत असून यासाठी दुरवरून पक्षी प्रेमी या स्थळाला भेट देत असतात. ऐरोली येथील खाडीत फ्लेमिंगो सफर सुरू करण्यात आली असून यामुळे खाडीत जावून प्रत्यक्ष फ्लेमिंगो च्या जवळपास जावून त्यांचे निरिक्षण करता येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल लागला आहे, 2018 साली राजकीय वर्चस्वादातून जामखेड शहरात योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोन तरुणांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती... संपुर्ण राज्यात गाजलेल्या या हत्याकांड प्रकरणाचा श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने आज अंतिम निकाल सुनावला... यात एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये तर 13 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती वकील सुमित पाटील यांनी दिलीये...जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव स्वामी ऊर्फ गोविंद गायकवाड आहे...या खटल्यात राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली होती...अहमदनगरमध्ये केडगाव हत्याकांड झाल्यानंतर लगेचच जामखेड येथे हे हत्याकांड झाले होते त्यामुळे नगर जिल्हा हादरून गेला होता...या खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी अशा एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली होती तर बचाव पक्षाने एकूण 5 साक्षीदार तपासले गेले
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयातून सुटकेचे आदेश पत्र (release memo ) मिळालं आहे. अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग सुटकेचे आदेशपत्र घेऊन बाईकवर मुंबई सत्र न्यायालयातून आर्थर रोड जेलकडे रवाना झाले आहेत. जामीनाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात सदर आदेशपत्र आर्थर रोड तुरुंगाच्या पत्रपेटीत टाकणार आहे.
कल्याण जवळ असलेल्या बल्यानी येथे मिठाईवाला हे 2011 सालापासून राहतात. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जागा आहे. याच बल्याणी गावातील काही जमीन ही मुंबई बडोदरा महामार्ग बाधित होत आहे .या बाधितांना शासनाकडून मोबदला देण्यात येतोय. मात्र या ठिकाणी जागा किंवा बांधकाम नसताना मिठाईवाला यांच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . तब्बल 2 कोटी 8 लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे . हा निवडा वर्षभरापूर्वी झाला आहे. मात्र मिठाईवाला यांनी कामानिमित्त कल्याण प्रांत कार्यालयास भेट दिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या नावे जागा नसताना त्यांची नावाचा आणि फोटाचा वापर करुन प्रांत कार्यालयात संमती पत्र देत निवाडा करण्यात आला आहे. त्यांच्या नावाने अन्य दुसऱ्याच व्यक्तीने मोबदला लाटला आहे. हा निवडा त्यांच्या नावाचा गैरवापर करुन करण्यात आला आहे. त्यामुळे हा निवाडा रद्द करण्यात यावा. त्याच्या नावाने दिलेली 2 कोटी 8 लाख रुपयांची रक्कम सरकार दफ्तरी जमा करण्यात यावी अशी मागणी मिठाईवाले यांनी केली आहे. तर दुसरीकडे प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी बल्याणी येथे मिठाईवाला आणि सादीक रईस या दोघांनी जागा मालकाकडून करार करुन चाळ वजा घरे बांधली. ही घरे मुंबई वडोदरा महामार्ग प्रकल्पात बाधित होत असल्याने मिठाईवाला यांनीच प्रांत कार्यालयाकडे घरांचा मोबदला मिळावा असा अर्ज केला होता. त्यांच्या मागणी अर्जानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी प्रत्यक्ष जागेवर सव्रेक्षण करुन बाधित बांधकामांचे मूल्यांकन केले. त्यानुसार मिठाईवाला यांना मोबदला देण्याचे ठरले. मिठाईवाला आणि रईस यांच्यात आपसात करार झाला. मिठाईवाला यांनी नोटरीकरून त्यांचा मोबदला रईस यांना देण्यात यावा असे संमतीपत्र दिले आहे. त्यावर मिठाईवाला यांच्या सह्या आहेत. त्यानुसार मोबदला रईस यांना देण्यात आला आहे. मोबदला वाटप हा प्राप्त अधिकृत कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला आहे. तरी देखील मिठाईवाला यांनी तक्रार केली आहे. तक्रारीच्या आधारे या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल. गरज भासल्यास मिठाईवाला यांची सही खरी आहे की नाही याची शहानिशा केली जाईल. त्यांची सही आढळून आल्यास खोटी तक्रार दिल्या प्रकरणी मिठाईवाला यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते असे ही प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाची कागदपत्र तयार आहेत. थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टासमोर जामीनदार प्रेमचंद राठोड यांच्या कागदपत्रांचीही पडताळणी होणार आहे. दुपारच्या सत्रात प्रेमचंद राठोड यांची वैधता न्यायाधीश एस एम मेंजोगे तपासणार आहे.
त्यानंतर कोर्ट रिलिज ऑर्डर जारी करणार आहे.
MPSC News: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मुलाखतीत नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेटच्या निकषांमुळे विद्यार्थी होत आहेत अपात्र
Kalyan News: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी योजनेतून स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे . या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने स्टेशन परिसरातील महानगरपालिकेच्या पार्कींगचे कामासाठी लागणाऱ्या विजेची चोरी केल्याचे उघड झाले आहे . या प्रकरणी महावितरण ने आतापर्यत त्याने 34 लाख 16 हजार 960 रुपयाची वीज चोरी केल्याचा ठपका ठेवत महावितरणकडून एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनी आणि पर्यवेक्षक फौज सिंग यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे .
कल्याण डोंबिवली महापलिका क्षेत्रातील स्टेशन परिसर विकासाचे काम करण्यासाठी एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनीला 500 कोटीचे काम दिले आहे. या ठेकेदाराकडून महानगरपालिकेच्या पार्कींगचे बांधकाम करताना चोरीची वीज वापरल्याचे उघड झाले आहे. महावितरणचे शिवाजी चौक शाखेचे सहायक अभियंता मोहम्मद शेख, दक्षता व अंमलबजावणी विभागाचे रामचंद्र मासाळे यांच्या पथकाने 19 डिसेंबरला या बांधकामाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. या तपासणीत बांधकामाच्या कामासाठी फिडर पीलरमधून थेट वीजवापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा ठेकेदार मागील वर्षभर अशा प्रकारे चोरीची विजेचा वापर करत असून जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत 84 हजार 372 युनिट वीज चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 34 लाख 16 हजार 960 रुपयांचे चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस कंपनीला बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्याने सहायक अभियंता मोहम्मद शेख यांनी संबधित कंपनी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी सदर कंपनी व पर्यवेक्षक सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Ahmadnagar News: अहमदनगर शहरासाठीच्या अमृत पाणी योजनेच्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या जानेवारी अखेरपर्यंत पंप आणि मोटारी बसवल्या जाणार आहेत.त्यानंतर फेज टू योजनेत उभारलेल्या टाक्यांतून पाणी सोडून, त्यातून वितरणाची चाचणी फेब्रुवारी अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. मार्च महिन्यापासून नव्या वाहिनीवरून नळ कनेक्शन देऊन त्याद्वारे नगरकरांना 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले आहे. मनपात फेज टू आणि अमृत पाणी योजनेचा आढावा खासदार विखे यांनी घेतला, अमृत योजनेत मुळा धरणापासून वसंत टेकडीपर्यंत पाईप टाकण्याचे काम अवघे 12 मीटरचे शिल्लक आहे. खासगी जागेतून हे काम होणार असल्याने त्याबाबत संबंधितांशी बोलून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा विषय मार्गी लागेल असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला. एकंदरीतच मार्च महिन्यात नगरकरांना पूर्ण दाबाने आणि 24 तास पाणी मिळणार असल्याने त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे
कॉंग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्याच्या काॅंग्रेसभवनात हजर राहणार आहेत. तब्बल 24 वर्षांनंतर शरद पवार पुण्याच्या कॉंग्रेस भवनात प्रवेश करणार आहेत.
Beed Crime News: बीडच्या माजलगाव येथील पवार हॉस्पिटलमध्ये एका दीड महिन्याच्या बाळाला मुदत संपलेला डोस पाजल्याचा प्रकार उघडकीस आला होता आणि या प्रकरणानी तब्बल दीड महिन्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने डॉक्टर शरद पवार यांच्यासह एका नर्सवर माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Nashik News : नाशिकमध्ये चोरांचा काजळे ज्वेलर्सचा लोखंडी दरवाजा तोडून, दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश, CCTV कॅमेराही तोडला, मात्र चोरांच्या हाती लागले फक्त पंधरा हजार रुपयांचे नकली दागिने. चोरांची फसवणूक चर्चेचा विषय
Pune News : पुण्यातील महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (27 डिसेंबर) रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिल. यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शेखर शिंदे नावाचा हा तरुण रात्री नऊ वाजता रामेश्वर चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांनी पिस्तुलातून गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या शेखर शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
Nashik News: भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेविका पुत्र विक्रम नागरे वर घोटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अनिरुद्ध शिंदे नामक जामिनावर सुटलेल्या संशयिताने काल दुपारी भरवीर खुर्द गावी राहत्या घरी केली होती आत्महत्या
मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांनी अनिरुद्धला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले तसेच वारंवार त्रास देत असल्याने पतीने जीवन संपवल्याची मयत शिंदेच्या पत्नीची पोलिसांकडे तक्रार
पोलिसांकडे प्राप्त झालेल्या एका सुसाईड नोटमध्ये देखिल हे दोघे वारंवार त्रास देत असल्याचे नमूद
नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Navi Mumbai News : नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पँटच्या सहाय्याने पंख्याला गळफास कैद्याने आयुष्य संपवलं. करण प्रमोद सीरियन असं आत्महत्या केलेल्या कैद्याचं नाव आहे. हा कैदी बलात्कार आणि अपहरण गुन्ह्यातील आरोपी असून त्याच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हाच्या नोंद आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास प्रकार उघड झाला.
Palghar News : मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन येथे केमिकल टँकरला भीषण आग. टँकरला आग लागल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. मात्र ज्यावेळी टँकरला आग लागली त्यावेळी टायरचे ब्लास्ट झाल्याने गावातील लोक भयभीत होऊन जंगलात पळाली. रात्री एक वाजेची घटना, सध्या एका बाजूने वाहतूक सुरू असून कासा पोलीस घटनास्थळी दाखल.
Navi Mumbai : तळोजा मध्य वर्ती कारागृहात आरोपीची आत्महत्या
पँटच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेऊन संपवले जीवन
करण प्रमोद सीरियन असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव
कामोठे पोलिस ठाण्यात बलात्कार आणि अपहरण गुन्ह्यातील आरोपी
रात्री 2 वाजण्याच्या सुमारास प्रकार उघडकीस
Nashik News : भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेविकेचा पुत्र विक्रम नागरे यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिरुद्ध शिंदे नावाच्या जामिनावर सुटलेल्या वक्तीने काल दुपारी भरवीर खुर्द गावी राहत्या घरी आत्महत्या केली होती. मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांनी अनिरुद्धला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले तसेच वारंवार त्रास देत असल्याने पतीने जीवन संपवल्याची तक्रार मृत शिंदेच्या पत्नीने पोलिसांकडे केली होती. पोलिसांना प्राप्त झालेल्या एका सुसाईड नोटमध्ये देखील हे दोघे वारंवार त्रास देत असल्याचे नमूद आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
Ambernath News: अंबरनाथमध्ये कारचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. जुन्या डम्पिंगसमोरील जय अंबे हॉटेलसमोर हा अपघात झाला. पांढऱ्या रंगाची एक व्हॅगनआर कार भरधाव वेगात टी जंक्शनकडून फॉरेस्ट नाक्याकडे जात होती. यावेळी कारचालकाचं नियंत्रण सुटून या कारने आधी इलेक्ट्रिकच्या खांबाला धडक दिली आणि मग थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. तर कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.
Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील अनेक गावांत उसावर पांढरा लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. वाढत्या लोकरी माव्यांच्या किडीमुळे शेतकरी हैराण झालेत. दहिगावने, भावीनिमगाव, मठाचीवाडी, रांजणी, शहरटाकळी, देवटाकळी, भायगावसह अनेक गावांमध्ये सध्या उसावर पांढरा लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या लोकरी माव्यामुळे ऊसावर पांढरा थर आढळून येत आहे.
Mumbai Fire : मुंबईतील कुर्ला कपाडियानगर परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास लाकडांच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडी. आगीचे माहिती मिळतात पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या आगीमध्ये दुकानात असलेल्या साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्यावतीनं देण्यात आली आहे. पण आग कशामुळं लागली याचा तपास सध्या स्थानिक पोलीस व आग्निशमन दलाचे अधिकारी घेत आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अधिवेशनाचा आज 8 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यानिमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदीर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
अधिवेशनाचा आज 8 वा दिवस
अधिवेशनाचा आज 8 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार असून अधिवेशनाच्या कालावधीचा निर्णय होणं अपेक्षित आहे. आज विविध विषयांवर 11 मोर्चे निघणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जामीनावरील स्थगिती उठवल्यानंतर आज ते कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यानिमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदीर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम
28 डिसेंबर 1885 साली मुंबईतील तेजपाल सभागृह येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. आज त्या ऐतिहासिक घटनेला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. 28 डिसेंबर काँग्रेस स्थापना दिवस दरवर्षी संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात 'प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार होणार आहे. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, श्री के सी वेणू गोपाल, एच के पाटील, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, भाई जगताप, नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, चरणसिंग सप्रा यांच्यासह आदी नेते उपस्थित रहाणार आहेत, दुपारी 3.30 वाजता, सोमय्या मैदान, सायन येथे हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चहा पानाच्या कार्यक्रमास शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार
शिंदें गटाचा दोन्ही ठाकरेंना दणका शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार, पदाधिकारी आज नागपूरमध्ये बाळासाहेबाच्या शिवसेनेत प्रवेश करत असताना मनसेचे पदाधिकारी ही शिंदे गटात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अमित ठाकरे नशिकमध्ये असताना मनसेचे दोन विभाग अध्यक्षचा पक्षाला जय महाराष्ट्र या आधी शहर समनव्याक ही शिंदे गटात सहभागी झाल्यानं आधीच कमजोर असणाऱ्या मनसेला आणखी एक धक्का बसलाय.
संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन
आज संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे. सकाळी 10 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन तर संध्याकाळी 5.30 वाजता शरद पवार यांच्या हस्ते समारोप.
चंदा आणि दिपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कस्टडी आज संपणार
आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी चंदा आणि दिपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कस्टडी आज संपतेय. या तिन्ही आरोपींना पुढील रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. सीबीआय आरोपींची आणखीन कस्टडीत वाढवून मागण्याच्या तयारीत तर आरोपींच्यावतीनं न्यायालयीन कोठडीसाठी प्रयत्न होतील. रिपोर्टर - अमेय
तुनिषा शर्माचा प्रियकर शीझान खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकर शीझान खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली असून तो चार दिवस पोलिस कोठडीत होता.
खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची लटकती तलवार यावर सुनावणी
महानगर दंडाधिकारी न्यायालय आज खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची लटकती तलवार यावर सुनावणी होणार आहे. दोघांविरोधात जारी आजामीन पात्र वॉरंटवर कारवाई करण्याचा शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -