Maharashtra News Updates 27 November 2022 : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळून 14 प्रवासी जखमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Nov 2022 04:14 PM
नंदुरबारात जयपुरी मुस्लिम लोहार समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 19 जोडप्यांचे शुभमंगल

Nandurbar News : नंदुरबार येथील पटेलवाडीतील बादशहा नगरात जयपुरी मुस्लिम लोहार समाजाच्या खान्देशातील सहाव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात समाजातील 19 जोडप्यांचा शुभमंगल लावण्यात आला.  महाराष्ट्रातील खान्देशात हा सहावा सामूहिक विवाह सोहळा नंदुरबारात पार पडला. आतापर्यंत शिरपूर धुळे शहादा आदी ठिकाणी जयपुरी मुस्लिम लोहार समाजाचे सामूहिक विवाह सोहळे झाले. यावर्षी सहाव्या खांदेस्तरीय सामूहिक विवाह सोहळ्याचे नंदुरबारात आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग विकणाऱ्या विक्रेत्यांवर शहादा पालिकेची धडक कारवाई; चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

Nandurbar News : पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या आणि सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असल्याची माहिती शहादा पालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या दुकानांवर धाडसत्र राबवत 400 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड पालिकेच्या वतीने ठोठाविण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने शहरात सलग तीन दिवस ही मोहीम राबविण्यात येणार असून प्लास्टिकमुक्त शहादा शहर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे


महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 - 24 डिसेंबर 2022


 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक -31 डिसेंबर 2022


 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2, राज्य कर निरीक्षक -7 जानेवारी 2023


महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 सहाय्यक कक्ष अधिकारी - 14 जानेवारी 2023


यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलं आहे.


प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. 

वाशीम जिल्ह्यातील 287 ग्राम पंचायतींचं बिगुल वाजलं

Vashim News: वाशीम जिल्ह्यातील 287 ग्राम पंचायतींचा बिगुल वाजला आहे. आजपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. तर 18 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 20 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे. सर्व ग्राम पंचायतींची निवडणूक चुरशीची होणार असून या निवडणुकीत अधिकाधिक युवा चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या गावागावातील गटातटाच राजकारण आता सक्रीय झालं आहे. या निवडणुका जरी ग्राम पंचायतच्या असल्या तरी इथं राजकीय पक्ष सहभागी नसल्याच दिसतंय.  

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांना एका वाहनाची सिनेस्टाईल पाठलाग

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांना एका वाहनाची सिनेस्टाईल पाठलाग 24 लाख 80 हजार रुपये किमतीची अवैध दारु सह मुद्देमाल जप्त केली. दरा फाट्यावर नाकाबंदी दरम्यान पीकअपमध्ये दारुची अवैध तस्करी सुरु असल्याची बाब पोलीसांना समजली. यावरुन पोलिसांनी सदर वाहनाला थाबवण्याचा प्रयत्न केला मात्र तोरणमाळ रस्त्याकडे पळून जाण्याचा प्रय्तन करणाऱया या वाहनाचा पोलीसांनी पाठलाग करत वाहनाला घाटात अडवून ताब्यात घेतलं. मात्र त्यातील तीनही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या पीक अप व्हॅनमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असणारी विदेशी मद्य आढळून आले आहे. 

Bhiwandi News: भिवंडीत तोडक कारवाई करताना शाळेच्या इमारतीचा काही भाग अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू
भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरात एका धोकादायक शाळेच्या इमारतीचे तोडक कारवाई करता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने एका ठेकेदाराला ठेका दिला होता परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे इमारतीचे बांधकामावर तोडक कारवाई करत असताना इमारतीचा काही भाग एका कामगाराच्या अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . राजपाल गौड वय वर्ष 50 असे मयत कामगाराचे नाव आहे. 

 

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत गैबी नगर येथे शाळा क्रमांक 22/ 62 गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होती आणि अनेक वर्षांपासून बंद होती त्यामुळे या इमारतीचे बांधकाम तोडून त्या ठिकाणी नवीन शाळा तयार करण्यासाठी या इमारतीचे बांधकाम तोडण्याकरता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने ठेकेदाराला ठेका दिला होता परंतु या ठिकाणी कामगारांच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे एका कामगाराने आपला जीव गमावला आहे इमारतीचा काही भाग तोडत कारवाई दरम्यान खाली कोसळला आणि त्याच्या ढिगार्‍याखाली कामगार राजपाल गोड दाबले गेले आणि त्यातच त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेचे तपास करत आहेत

 
92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार का? सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण उद्या सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे.


शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का?... 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? याचा निर्णय सोमवारी सकाळी सुप्रीम कोर्टात होणार आहे. 

यावर्षीचा महात्मा फुले समता पुरस्कार जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना देण्यात येणार

समता परिषदेकडून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार.  महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे

उदयनराजेंच्या उपस्थितीत सोमवारी शिवप्रेमी संघटनांची बैठक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. कारवाई न झाल्यास 28 नोव्हेंबरला आपण आपली भुमिका स्पष्ट करु असं उदयनराजेंनी जाहीर केलं होतं. उदयनराजेंना अपेक्षित असलेली कारवाई राज्यपाल आणि त्रिपाठी दोघांवरही न झाल्याने सोमवारी 12 वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरविण्यासाठी उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय.  या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल काय भुमिका घ्यायची हे जाहीर करणार आहेत. 


 

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला, स्लॅब कोसळून 14 प्रवासी जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळल्याने अंदाजे 14 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून बाकी प्रवासी किरकोळ जखमी आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 यांना जोडणारा हा पादचारी पूल असून संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान या पुलाचा एक भाग कोसळला. पादचारी फुलाचा भाग कोसळल्या नंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. रेल्वेने सध्या ओव्हर हेड वायरसह पादचारी पुलाचा भाग पुन्हा एकदा दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं आहे. या अत्यंत वर्दळीच्या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मोठ्या संख्येत रेल्वे कर्मचारी अभियंते रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. हा पूल सुमारे 40 वर्ष जुना होता. सहा ते आठ महिन्यांपूर्वी या पुलाची पाहणी करण्यात आली होती. रेल्वे प्रवाशांच्या अधिकच्या वजनाने हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
आदित्य ठाकरेंचा 218 कोटींचा प्रस्ताव मुंबई पालिकेकडून मंजूर

Mumbai News : आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेला वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला यादरम्यान 3.59 किमीचा सायकल ट्रॅक बांधण्याचा मार्ग अखेर मोकळा. प्रस्तावाला नुकतीच पालिका प्रशासकांनी मंजुरी. त्यासाठी तब्बल 218 कोटी रुपये खर्च केला जाणार.

Beed News : आष्टीच्या पंचायत समिती कार्यालयातून महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी

Beed News : बीड जिल्ह्यातल्या आष्टी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या डीआरडीओ विभागातून महत्त्वाच्या कागदपत्राची चोरी झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. पंचायत समितीमध्ये असलेल्या डीआरडीओ विभागाच्या खिडक्या तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि यामध्ये असलेल्या घरकुल योजना, एमआरइजीएस मधून मिळणाऱ्या विहिरी असतील यासारख्या अन्य महत्वाच्या योजनांची कागदपत्र अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.















विशेष म्हणजे, आष्टीच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नसल्याने नेमकी ही कागदपत्र कोणी चोरली त्याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.. आणि याच संदर्भामध्ये आता आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.













गेवराई अवैध्य वाळूउपसा करणाऱ्यावर कारवाई 6 ट्रॅक्टरसह 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन केन्या आणि तीन ट्रॅक्टर वर कारवाई करून 50 ब्रास वाळू सह 40 लाख रुपयांचा मुद्देमाल तहसीलदार यांनी जप्त केला आहे. गोदावरी पात्रातलं पाणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याने महसूल विभागाकडून धडक कारवाई करायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच गेवराईच्या तहसीलदारांनी दहा ट्रॅक्टर पकडून एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता आणि आता पुन्हा एकदा अवैध वाळू उपसा करणार्‍यावर कारवाई करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरुन संभाजीराजे आक्रमक

शिंदे सरकारला खोके सरकार म्हणून मान्यता मिळालीये : संजय राऊत

Nashik : ज्ञानपीठ आधार आश्रमाच्या संचालकाकडून 5 विद्यार्थिनींवर बलात्कार

नाशिकच्या ज्ञानपीठ आधार आश्रमाच्या संचालकाने आणखी 5 विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर 


तीन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून संचालक हर्षल मोरेला करण्यात आली होती अटक 


संचालक हर्षल मोरेवर आत्तापर्यंत म्हसरुळ पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचे सहा गुन्हे दाखल


पीडित 6 मुलींपैकी 5 मुली अल्पवयीन


पोलिसांनी 15 मुलींचे जबाब नोंदवले असता त्यातून धक्कादायक माहिती उघड 


एका मुलीवर ग्रामीण भागात तर 5 मुलींवर आश्रमातच करण्यात आले अत्याचार


हात पाय दाबायचे आहे असे सांगून मुलींना बोलावले जायचे आणि कोणाला सांगितल्यास बदनामी करेल आश्रमातून काढून टाकेल अशी धमकी द्यायचा


म्हसरुळ परिसरातील माने नगरमध्ये द किंग फाउंडेशनचे आहे ज्ञानपीठ आधार आश्रम

जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई





अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या  खंडोबा मंदिरात सध्या चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे. या उत्सव निमित्त खंडोबा मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईने जेजुरी येथील मल्हार गड उजळून निघालाय.


 




Konkan Refinery Leaders in Election : रिफायनरी विरोधकांचे नेते अशोक वालम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

Konkan Refinery Leaders in Election : राज्यासह कोकणात सध्या रिफायनरी चा मुद्दा गाजतोय. पण आता याच रिफायनरी विरोधकांचे नेते अशोक वालम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा रंगली आहे. कारण अशोक वालम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथून कुणबी जोडो अभियानाची सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांमधून हे अभियान राबवले जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास 65 ते 70 टक्के लोकसंख्या ही कुणबी आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी कुणबी फॅक्टर महत्त्वाचा ठरणार का? याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी प्रस्तावित असलेल्या नाणार इथल्या रिफायनरी विरोधात अशोक वालम यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. याच आंदोलनामध्ये रिफायनरी विरोधकांचे नेते म्हणून वालम यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण तेच अशोक वालम आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. रिफायनरीला विरोध म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय देखील रिफायनरी विरोधी संघटनांनी घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या काही निवडणुका देखील रिफायनरी विरोधी संघटनांनी लढवल्या होत्या. त्यामुळे आता रिफायनरीच्या मुद्द्यावर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका गाजल्यास आश्चर्य वाटायला नको.

Ratnagiri Crime News : व्हिडीओ कॉलवर तरुण झाला नग्न; ब्लॅकमेल करून महिलेनं उकळले 50 हजार

Ratnagiri Crime News : मोबाईल व्हिडिओ कॉल करत एका अज्ञात महिलेने तरुणाची 50 हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. व्हिडीओ कॉल करणार्‍या महिलेने निर्वस्त्र होऊन तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तरुणाला देखील निर्वस्त्र होण्यास सांगितले. यादरम्यान अज्ञात महिलेने तरुणाचा निर्वस्त्र व्हिडिओ रेकॉर्ड केला. काही वेळानंतर त्याला फोन करून, तुझा नग्न व्हिडिओ माझ्याकडे असून मला पैसे न दिल्यास तो युट्युबवर अपलोड करेन, अशी धमकी देत तरुणांकडून पन्नास हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात महिला आणि तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी अज्ञात महिलेने पीडित तरुणाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधत विश्वास संपादन केला.व्हिडिओ कॉलवर महिला स्वतः निर्वस्त्र झाली. तसेच पीडित तरुणाला देखील निर्वस्त्र होण्यास सांगून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर काही वेळाने पीडित तरुणाच्या मोबाईलवर ' तुझा निर्वस्त्र किंवा नग्न व्हिडिओ माझ्याकडे आहे. मला त्या बदल्यात पन्नास हजार रुपये दे अन्यथा तो व्हिडिओ मी युट्युब वर अपलोड करेन' अशी धमकी दिली. यानंतर पीडीत तरुणाने पन्नास हजार पाचशे रुपये सदर महिलेला ऑनलाइन ट्रान्सफर केले. या प्रकरणात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास देखील सुरू केला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


एकनाथ शिंदेंचा गुवाहाटी दौरा आणि उद्धव ठाकरेंची चिखलीतील सभा, यामुळे शनिवारचा दिवस गाजला... रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. आज मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हा कार्यक्रम होणार आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत.. 


राज ठाकरेंची तोफ धडाडणार
रविवारची संध्याकाळ राज ठाकरेंच्य़ा सभेनं हिट होणार आहे. कारण, सहा महिन्यानंतर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. 27 नोव्हेंबरला मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. आणि या मेळाव्यात पुन्हा एकदा राज गर्जना होईल. काऱण, राज्यातलं सध्याचं वातावरण, त्याचच टिझर मनसेनं लाँन्च केलंय.  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, सावरकर, राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेलं विधान, हर हर महादेव चित्रपट वाद आणि शरद पवार यांच्या संदर्भात राज ठाकरे भाष्य करणार असल्याचं बोललं जातंय.  


इस्लामपुरात जयंत पाटलांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक याचा राहूल किर्लोस्कर यांची कन्या अलिका हिच्याशी शाही विवाहसोहळा होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार आणि इतर अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. 


ललित गांधी यांची पत्रकार परिषद 
सोलापूर- सोलापुरात विमानसेवा सुरु व्हावी या मागणीसाठी मागील 22 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. सोलापूरकरांच्या या मागणीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिलाय. यासंदर्भात चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी सोलापुरात येत आहेत. सोलापुरात त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. काल सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शाह यांना रि्व्हॉल्व्हर दाखवून धमकवण्याचे प्रयत्न करण्यात आला. सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी केला धमकवण्याचा प्रयत्न केला. केतन शाह यांचा टिकटॅक, रिव्हॉल्वर दाखवतानाचे व्हीज चाललेत. 


मोदींची मन की बात 
दिल्ली- आज मोदींची मन की बात होणार आहे. हा मन की बात चा ९५ वा एपिसोड आहे, सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


मुंबई- भाजपच्या ‘जागर मुंबई’चा मध्ये आशिष शेलार, प्रवीण दरेकरांची भाषणं होणार आहेत. दहिसर येथे संध्याकाळी 6 वाजता भाषणे होतील. 


पुणे- स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या वास्तव कट्टा या गृपकडून आयोजित संवादात सहभागी होण्यासाठी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार आणि निरंजन डावखरे येणार.  


कृषीथॉनचे आयोजन 
नाशिक- नाशिकच्या ठक्कर डोममध्ये आंतरराष्ट्रीय कृषीथॉनचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या अनेक अधुनिक साधनांचे स्टॉल या प्रदर्शनात बघायला मिळतायत. नाशिकच्या के के वाघ महाविद्यालयाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पेरणी, नांगरणी, कापणी आणि इतर अशी एकूण शेतीची सात कामे करता येतील, दोन टन मालाची वाहतूक क्षमता, सर्व प्रकारच्या खडतर परिस्थितीत चालणारी आणि एक लिटर पेट्रोलमध्ये 25 किमी प्रवास करेल अशी बाईक तयार केली असून ही बाईक सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे.


शिर्डी- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज मतदारसंघात असून गायरान जमिनी वादाबाबत मीडियाशी संवाद साधणार आहेत. 


'इंडियां बुक ऑफ रेकार्ड 2022'' बुक मध्ये रोशनचे नाव 
वर्धा- वर्ध्यातील रोशनच्या एका हाताने टाळी वाजविण्याच्या कलेची 'इंडिया बुक ऑफ रेकार्ड' मध्ये नोंद. वर्धा जिल्ह्यातील रोशन संजय लोखंडे यांने एका हाताने 30 सेकंदात 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजवल्या आहे. आणि त्याचीच दखल घेत 'इंडियां बुक ऑफ रेकार्ड'' या संस्थेने घेतली आहे. त्याच्या या अद्भुत कलेला वाव देण्याकरिता 'इंडियां बुक ऑफ रेकार्ड 2022'' बुक मध्ये रोशनचे नाव नोंदविले गेले आहे.. 


भारत-न्यूझीलंड दुसरा सामना


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.