Maharashtra News Updates 27 January 2023 : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात पवेश   

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jan 2023 11:05 PM
माजी आमदार सदाशिवराव माळी यांचे 91 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन

माजी आमदार सदाशिवराव माळी यांचे 91 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन 

घशात चॉकलेट अडकल्याने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू, गुहागर मधील साखरी आगर गावातील दुदैवी घटना 

घशात चॉकलेट अडकल्याने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालाय. गुहागर मधील साखरी आगर गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. रिहांश तेरेकर असे मृत बाळाचे नाव आहे. श्वास घेता न आल्यामुळे बाळाचा तडफडून मृत्यू झाला. 

सोलापुरात जड वाहतुकीमुळे चिमुरड्याचा मृत्यू

सोलापूर शहरात जड वाहनाने आणखी एकचा बळी घेतला आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड परिसरात ट्रक खाली आल्याने अवघ्या तीन वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना CCTV  कॅमेऱ्यात कैद झाली आहे. असद अल्ताफ बागवान असे या मृत मुलाचे नाव आहे.  

भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात पवेश   

भाजप नेते अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात पवेश केलाय. अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हिरे यांचा पक्षप्रवेश झालाय. 

Sangli News : सांगलीत शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा; उपचारानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Sangli News : सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारामधील डाळ-भातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवलं. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचा माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील करण्यात आले आहे.

सांगलीत शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा..

सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहार मधील डाळ-भातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  मळमळ, उलटे आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रा मधील डॉक्टरांना बोलून दाखवलं,मात्र त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, सध्याचे परिस्थितीमध्ये या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचा माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितला आहे.घटनेची माहिती मिळताचं शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली होती.यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील करण्यात आले आहे.

अंबरनाथच्या मलंगड परिसरात बिबट्याचा कुटुंबावर हल्ला, धाडसी पत्नीने वाचवले पती आणि मुलीचे प्राण
Ambarnath News : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात बिबट्याने मध्यरात्री एका कुटुंबावर हल्ला चढवला. यावेळी धाडसी पत्नीने बिबट्याचा प्रतिकार करत पती आणि मुलीचे प्राण वाचवले. मलंगगड परिसरातील जकात नाका भागात पप्प्या बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपलेलं असताना अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला चढवला. या गोंधळाने जागा झालेल्या सखुबाईने त्वरित मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिमतीने प्रतिकार केला आणि बिबट्याला पळवून लावलं. मात्र या दरम्यान बिबट्याशी झालेल्या झटापटीत तिचा पती पप्या हा जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. त्याच्या चेहऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या असून त्याच्यावर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यानंतर अतिशय हिमतीने आपल्या कुटुंबाचं बिबट्यापासून रक्षण करणाऱ्या धाडसी सखुबाईचं कौतुक होतं आहे.
Bhusawal Earthquake : भुसावळ शहर परिसरात 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, नागरीकांमध्ये गोंधळ

Bhusawal Earthquake : भुसावळ शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजून ३५ मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरीकांमध्ये एकच गोंधळ उडाला. भुसावळसह लगतच्या सावडा, कंडारी रायपुर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवल्याने समजते आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये सावडा परिसरात आज सकाळी दहा वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ यांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. 

Sangli News: सांगलीत संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण
Sangli News: सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा संविधान स्तंभ बनविण्यासाठी 525 किलो ब्राँझ मटेरियलचा वापर करण्यात आला असून स्तंभाच्या मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेण्यात आली आहे. संविधान स्तंभाची उंची 5 फूट तर असून व्यास अडीच फुटाचा आहे.  संविधान स्तंभ लोकार्पण समारंभास महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी संतोष रोकडे आदी मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. 
Pune News: कसबा विधानसभा पोटनिवडणूक; पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुन्हा घेणार बैठक

Pune By-Election: कसबा विधानसभा पोटनिवडणूक


पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुन्हा घेणार बैठक


कसबा विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी घेणार बैठक.


बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित.


संध्याकाळी सात वाजता कसबा मतदार संघात आरसीएम हायस्कूल येथे घेणार बैठक

Share Market: सेन्सेक्स 300 अंकांनी आपटला तर निफ्टी देखील 90 अंकांनी खाली

Share Market: सेन्सेक्स 300 अंकांनी आपटला तर निफ्टी देखील 90 अंकांनी खाली 


जागतिक बाजारात चांगली तेजी बघायला मिळत असतानाही भारतीय शेअर बाजारात घसरण 


डाॅलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी मजबूत, रुपया 81.49 प्रति डाॅलरवर 


जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले, ब्रेंट क्रूड 88 डाॅलर प्रति बॅरलवर 


अमेरीकेचा जीडीपी आणि चीनकडून मागणीत झालेल्या वाढीमुळे कच्च्या तेलाचे भाव वधारले


टाटा मोटर्स, बजाज ऑटो, आयटीसी, डाॅ. रेड्डीजसारख्या कंपन्यांच्या समभागात तेजी

परभणीच्या 'त्या' अपघातातील दुसऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

Parbhani News : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी दुचाकीवरुन जाताना रील बनवताना झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील चव्हाण असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात कालपासून उपचार सुरु होते. आज सकाळी स्वप्नील चव्हाणची प्राणज्योत मालवली. परभणीच्या पाथरी सोनपेठ महामार्गावर डाकू पिंपरी येथील नववीत शिकणारे चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी दुचाकीवरुन जात होते. यावेळी दुचाकी चालवत रील बनवताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात काल एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या विद्यार्थ्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शंतनु सोनवणे आणि स्वप्नील चव्हाण या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर राहुल तिथे, योगानंद घुगे या दोघांवर सध्या अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Nanded Crime News: नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची हत्या, कुटुंबीयांनी संपवल्याचं उघड

Nanded Crime News: नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची हत्या, आई-वडिलांनीच जीव घेतल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. 


मृत तरुणीच्या मैत्रिणीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याने हत्येचे बिंग फुटले. नांदेड जिल्ह्यातील महापाल पिंपरी येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना. दरम्यान पोलिसांचा तपास सुरू, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही.


नांदेड येथे BAMS तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या वैशाली साली जोगदंड असे मुलीच नाव असून सदर घटना ही रविवारीची आहे. यात अत्याच्या मुलासोबत प्रेम संबंध असल्या कारणाने, आई वडील, भाऊ चुलत  चुलता काका काकू यांनी मिळून, मुलीस क्रुर पणे मारहाण करून मारून टाकले व जाळून राख उधळून लावल्याची माहिती. तर मुलास ही अपहरण केल्याची माहिती. सदर घटनेमुळे महीपाल पिंपरी गाव दहशतीत आहे. तर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. प्रतिष्ठेपोटी जिवे मारली अशी माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 


उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज 


उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तुरळक ठिकाणी पाऊस 


काल देखील काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी 


पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ, पुढील 2-3 दिवस असं चित्र राहणार

Ratnagiri News: रत्नागिरी - कोकणातल्या रिफायनरी विरोधाची नवी रणनीती

Ratnagiri News: कोकणातल्या रिफायनरीला विरोध दर्शवण्यासाठी आता नवी रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार कोकण रिफायनरी विरोधी  समितीच्या बैठकीत राजापूर तालुक्यातील 17 गावचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी बारसु येथील रिफायनरिला विरोध दर्शवण्यासाठी मार्च महिन्यातील होळी झाल्यानंतर एकाच वेळी आणि एकाच दिवशी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरण्याबाबतची रणनीती आखण्यात आली. राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरीला संपूर्ण कोकणातूनच विरोध आहे हे दाखवण्यासाठी हा नवा प्लॅन ठरवण्यात आला. कोकण रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी याची माहिती दिली. त्यामुळे या नव्या प्लॅनला कोकणातून किती प्रतिसाद मिळतो? हे पहावं लागेल.


 
चंद्रपूरमध्ये पोहायला गेलेली तीन मुलं बुडल्याची शंका, तलावाजवळ मुलांचे कपडे आणि चपला सापडल्या

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये पोहायला गेलेली तीन मुलं बुडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर इथल्या अल्ट्राटेक सिमेंट परिसरात ही घटना घडली आहे. तिन्ही मुलं दहा वर्षांची असून एकाच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. काल सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधाशोध सुरु झाली. रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मुलांचे कपडे मिळाले आणि चपला सापडल्या, रात्री शोध न लागल्यामुळे सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली.

ट्रेकिंगसाठी पालघरच्या तांदुळवाडी किल्ल्यावर गेले, उतरताना वाट चुकले; स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने मुंबईतील आठ जण सुखरुप परतले

Palghar News : पालघर पूर्वेस असलेल्या तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले असता वाट चुकलेल्या मुंबईतील आठ पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली.  स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली आणण्यात पोलिसांनी यश आलं. यामध्ये पाच महिला आणि तीन पुरुष असून यापैकी तीन जण हे मुंबईतील वैद्यकीय अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. हे आठही जण मुंबईतील रहिवासी असून अंधार होईपर्यंत ते तांदुळवाडी किल्ल्यावरच होते. अंधार पडल्याने रस्ता सापडत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली. अखेर उशिरा या पर्यटकांनी पालघर कंट्रोल रुमला फोन करुन मदत मागितली. त्यानंतर त्यांना स्थानिक पोलीस स्टेशन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरुप खाली उतरवण्यात आलं. या पर्यटकांनी पोलीस आणि स्थानिकांचे आभार मानले. दरम्यान तांदुळवाडी किल्ल्यावर येणाऱ्या ट्रेकर्सनी येथील निसर्गात रमून न जाता वेळीच खाली उतरावं, असं आवाहन स्थानिक आणि पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Bhiwandi News : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू

Bhiwandi News :  भिवंडीत खाडीपार येथील मूलचंद कंपाऊंड परिसरात दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळल्याची घटना घडली. यामध्ये खाली असलेल्या कापडाच्या दुकानात झोपलेल्या एकाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मजीद हबीब अन्सारी (वय 35) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली असून या ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का? याचा तपास सुरू केला आहे. ही दोन मजली इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून ही इमारतीत कमर्शियल आहे. यामध्ये कापडाचे गोडाऊन तसेच टेक्स्टाईल कंपन्यांचे ऑफिस होते. भिवंडीत अनेक धोकादायक इमारती असून अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. परंतू, महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग या ठिकाणी वेळीच कारवाई होत नसल्यानं अशा घटना घडत आहेत. या इमारतीला नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, अद्याप कारवाई करण्यात आली नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना नंदुरबारमधील भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध

Nandurbar News : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. नंदुरबारमधील भाजपा नगरसेविकेचे पुत्र लक्ष्मण माळी यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्यांना भाजपा कार्यकर्ते मतदान करणार नाहीत असं त्यांनी म्हटलं.  यावेळी त्यांच्या हातात सत्यजीत तांबे हे पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे लावत असलेले बॅनर होते. हे बॅनर हातात धरत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि भाजपने सत्यजीत तांबेंना पाठिंबा जाहीर करु नये अशी मागणी केली.

भिवंडीत दोन मजली इमारतीचा पहिला मजला कोसळला, ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत खाडीपार येथील मूलचंद कम्पाऊंड परिसरात दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळल्याने खाली कापडाच्या दुकानात झोपलेल्या इसमाचा ढिगाराखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असे मयताचे नाव आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली असून या ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का याचा तपास सुरु केला आहे. ही दोन मजली इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून ही कमर्शियल आहे. यामध्ये कापडाचे गोडाऊन तसेच टेक्स्टाईल कंपन्यांचे ऑफिस होते. भिवंडीत अनेक धोकादायक इमारती असून अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. परंतु महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग या ठिकाणी वेळीच कारवाई होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. या इमारतीला नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे परंतु कारवाई का करण्यात आली नाही हा एक मोठा प्रश्न आहे

बुलढाण्यात ढगाळ वातावरणानंतर काल अनेक भागात अवकाळी पाऊस, आज सर्वत्र धुक्याची चादर

Buldhana Rains : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर काल (26 जानेवारी) अनेक भागात अवकाळी पाऊस पडला तर आज (27 जानेवारी) सकाळी जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर बघायला मिळत आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

Bank of Maharashtra Employees on Strike Today: बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज संपावर

Bank of Maharashtra Employees on Strike Today: नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी एक दिवसीय संपावर आहेत. 


महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार, राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या 700 शाखा आणि 13 हजार कर्मचारी संख्या. सध्याची असलेली कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय, मात्र बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याचा बॅंक संघटनेचा आरोप. दुसरीकडे, बॅंकेचा कारभार 250 पटीनं वाढलाय सोबतच अनेक शाखा देखील वाढल्या आहेत. तरीही कर्मचारी संख्या वाढवली जात नाही असा आरोप करत एकदिवसीय संप पुकारलाय.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


शिवसेना नेते आनंद दिघे यांची आज जयंती असल्याने ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी एक दिवसीय संपावर जातील.  


आनंद दिघे यांची जयंती (Anand Dighe birth anniversary)


शिवसेना नेते आनंद दिघे यांची आज जयंती असल्याने ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आणि शक्तिस्थळ येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक असे नेते देखील येणार आहेत. 


बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी आजपासून संपावर (Bank of Maharashtra employees strike)
बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी एक दिवसीय संपावर जातील. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या 700 शाखा आणि 13 हजार कर्मचारी संख्या आहेत. सध्याची असलेली कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय. मात्र बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याचा बॅंक संघटनेचा आरोप आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी  विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार ( PM Modi)


पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ च्या सहाव्या भागात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सहभाग असणार आहे. यंदा ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुमारे 38.80 लाख विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी यासाठी नोंदणी केली आहे. राज्यातील शाळांमध्ये सुद्धा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवला जाणार आहे. 


शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर  ( sharad pawar And nitin gadkari ) 


स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुंडल या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचा लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, सांगलीचे खासदार संजय काका पाटील,  जिल्ह्यातले आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 


"सेक्सेल सीमेन जेनेटिक" प्रयोगशाळेचे उद्घाटन


चितळे डेअरी यांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे "सेक्सेल सीमेन जेनेटिक" प्रयोगशाळा उभारण्यात आलीये. याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 


कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनात 12 कोटींचा रेडा 


भीमा कृषी प्रदर्शनात आज मुख्य आकर्षण असलेला 12 कोटींचा रेडा आणला जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.