Maharashtra News Updates 25 January 2023 : सीबीआय प्रकरणात देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सदिच्छा साने हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी
किला कोर्टाने दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडीत पाठवल
आरोपींची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी दाखल केला कोर्टात अर्ज
आज दुपारी होणार त्या अर्जावर सुनावणी
सदिच्छा साने हत्या प्रकरणात मिथु सिंग आणि जब्बार अन्सारी यांना अटक करण्यात आलीय
दोघेही पोलीस कोठडीत होते आज त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय
Parbhani News: गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या केलेल्या बदला रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीच्या मानवत तालुक्यातील इरळद येथील विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेत शाळा भरवली. बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
सीबीआय प्रकरणात देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर
अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना हायकोर्टाचा दिलासा
अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराचं प्रकरण
Bhandara Pathaan Movie Protest : भंडारा शहरातील आदर्श सिनेमागृहात आज पठाण सिनेमा प्रदर्शित झाला. पिक्चरच्या निषेधार्थ गांधी चौकातील आदर्श सिनेमागृहासमोर भंडारा येथील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच, हिंदू रक्षा मंच, भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सिनेमाच्या विरोधात सिनेमागृहाच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी करत विरोध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पठाण सिनेमाचे पोस्टर जाळले आणि शाहरुख खानच्या फोटोवर काळी शाही फेकून निषेध नोंदवला. यावेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान, भंडारा पोलिसांच्या प्रसंगवधनामुळे पुढील अनर्थ टळला आणि कार्यकर्त्यांचे आंदोलन शांत झाले.
Share Market: सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 230 अंकांनी खाली
निफ्टी बॅंक निर्देशांकात 1 हजार अंकांची घसरण
अमेरीकेतील आर्थिक डेटाच्या आकडेवारीतून आर्थिक मंदीचे संकेत मिळत असल्यानं आणि कंपन्यांकडून विस्ताराचा विचार नसल्यानं भारतीय बाजारात घसरण
वित्त आणि आयटी क्षेत्रातील समभागात मोठी घसरण
Sangli News : सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवाना पुतळा बसवण्याची घटना पुन्हा घडली आहे. तासगाव तालुक्यातील आळते गावात पहाटे अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. मागील वर्षी देखील पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र प्रशासनाने तो पुतळा काढून ग्रामपंचायतच्या ताब्यात दिला होता. आता पुन्हा हाच पुतळाच बसवला आहे. त्यामुळे हा पुतळा कोणी बसवल याचा तपास केला जाणार आहे.
Gondia ZP School Fire : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव शहरालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रात्री अचानक आग लागल्याने जुनी इमारत जळून संपूर्णत: खाक झाली. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. सुदैवाने रात्रीचा वेळ असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाक खोलीत ही आग लागली होती. या आगीने बाजूला असलेल्या चार वर्ग खोल्यांना देखील आपल्या कवेत घेतले. आग इतकी भयानक होती की स्वयंपाक खोलीतील साहित्यासह बाजूला असलेल्या वर्ग खोलीतील साहित्य देखील जाळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत स्वयंपाक खोलीसह चारही वर्ग खोल्या जळून खाक झाल्याने विद्यार्थ्यांना आता कुठे शिकवावे, असा प्रशन शिक्षकांना पडला आहे.
Sangli News : सांगलीत रिव्हर्स रिक्षा स्पर्धेच्या वेळी रिक्षा पलटी झाल्याने रिक्षाचालक जखमी झाला आहे. या घटनेछा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हरिपूरमध्ये काल वारणा आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचा थरार रंगला होता. या स्पर्धेवेळी एक रिक्षा पलटी झाल्याने रिक्षाचालक जखमी झाला. हरिपूरच्या संगमेश्वर देवाच्या विशाळी यात्रेच्या निमित्ताने या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
2002 Gujarat Riots Incident: 2002 साली झालेल्या गोध्रा दंगलीतील 22 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील एका न्यायालयाने हा निर्णय दिलाय. 2002 साली गोध्रामध्ये दंगल भडकली होती. त्यात 17 जणांचा बळी गेला होता. याच प्रकरणी यातील 22 आरोपींना सबळ पुरावे नसल्याचं कारण देत निर्दोष मुक्त केलंय.
Maha Vikas Aaghadi News: महाविकास आघाडीच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. संजय राऊत, अनिल देसाई, जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाली असून, इतरही पाच निवडणुकांबाबत रणनीतीवर चर्चा झाल्याचं समजतंय. दरम्यान, बैठकीला काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नव्हतं, त्यामुळे याबाबत काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं जातंय.
Hingoli News: औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारा निमित्त काल सायंकाळी हिंगोली हिंगोली शहरातील सर्जू देवी भिकुलाल कन्या शाळेमध्ये शिक्षक मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित होते.
Ganesh Jayanti 2023 : आज माघी गणेश जयंती आहे. या निमित्ताने, भक्तांनी काल रात्रीपासून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली आहे. सकाळी 5 वाजता झालेल्या आरतीमध्ये 100 ते 200 भाविक सामील झाले होते. त्याच वेळी, मुंबईतील अनेक भागातील लोक सिद्धिविनायक मंदिरात पालखींसह पोहोचले. घाटकोपरमधील भाविकांनी सांगितलं की आम्ही रात्री 10 वाजता पालखी घेऊन निघालो होते पहाटे तीनच्या सुमारास पोहोचलो. दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Nagpur Crime: दहावीत शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, नागपूर जिल्हातील पाटनसावंगी येथील घटना.
पीडित तरुणी सावनेर येथील एका विद्यालयात शिकत असून शाळा सुटल्या नंतर घरी सोडायचा बहाण्याने आरोपी अखिल भोंग व भासकवरे यांनी पिडीतला आपल्या कारमध्ये बसवले.
पाटनसावंगी शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Nagpur Crime : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना नागपूर जिल्हातील पाटनसावंगी इथे घडली आहे. पीडित तरुणी सावनेर इथल्या एका विद्यालयात शिकत असून शाळा सुटल्यानंतर घरी सोडायचा बहाण्याने आरोपी अखिल भोंग आणि भासकवरे यांनी तिला आपल्या कारमध्ये बसवले. आरोपींनी तिला पाटनसावंगी शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Hingoli News: कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे. आमदार बांगरच नाहीतर आमदार बांगर यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली? याचे कारण जरी अस्पष्ट असले तरीही अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचेच आहे. आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायंदळी तुडवतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या विषयावर आमदार बांगर यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
Latur Fire: लातूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या वारद मेडिकल स्टोअर्स ला मध्यरात्री भीषण आग. लाखो रुपयांची औषधे जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश.
शहरातील गांधी चौक भागातील वारद मेडिकल स्टोअर्स ला आग लागली होती. आगीचे कारण कळाले नाही. बंद असलेल्या दुकानातून धूर बाहेर येत होता. याची माहिती बाजूलाच असलेल्या गांधी चौक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कळाली. तात्काळ घटनास्थळी दाखल होत यंत्रणा उभी करण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. वारद मेडिकल स्टोअर्स हे नावाजलेले दुकान आहे. होलसेल आणि किरकोळ स्वरूपात औषधाची विक्री होत असते. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हे दुकान सुरू असते. दुकान बंद करून गेल्या नंतर ही आग लागली होती. दुकानातील लाखो रुपयांची औषधे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. वारद मेडिकल स्टोअर्स च्या आजूबाजूला ही मेडिकल स्टोअर्स ची अनेक दुकाने आहेत. ही आग इतर दुकानात पसरू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. घटनेची माहिती कळताच या भागातील व्यापार्यानी गांधी चौकाकडे धाव घेतली होती.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकची आज महत्वाची बैठक आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभेच्या पोट निवडणुकी संदर्भात ही बैठक होणार आहे. अजित पवारांसह चार नेते मातोश्रीवर बैठकीला उपस्थित रहाणार. या दोन जागांवर उमेदवार दिले जाणार की निवडणुक बिनविरोध होणार? हे या बैठकीनंतर कळू शकेल. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या प्रमाणे सरकार असताना मुंबई महापालिका एकत्र लढवण्यासंदर्भात सेना सकारात्मक होती. आगामी मुंबई महानगर पालिका एकत्र लढवण्यासंदर्भात चर्चा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज शहारूख खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार
पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले आहे. अमरावतीमध्येही आज पठाण सिनेमाच्या पहिल्या शो साठी एका शाहरुख खानच्या फॅनने अख्खा थिएटर बुक केला. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलय. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी 9 ते 12 वाजताचा शो बुक केला असून यापूर्वी त्याठिकाणी शाहरुख खानच्या फॅन कडून केक कापून सिनेमा पाहिला जाणार आहे.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची आज भूमिका ठरणार
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची आज भूमिका ठरणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून बैठक संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद ही साधणार आहेत.
दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद
मुंबई- आज सकाळी दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद आहे. दीपक केसरकर आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. सकाळी 9 वाजता
राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. राहुल गांधी यांनी राफेल बाबत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमांडर इन थीफ, अशी टीका केली होती. यामुळे राहुल गांधी विरोधात अब्रुनुकसानीची, भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे भाजप सदस्य असल्यानं अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना असल्याचं मत व्यक्त करत गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. मात्र गिरगांव कोर्टाच्या कार्यवाईवर 25 जानेवारी पर्यंत मुंबई हायकोर्टानं दिली आहे स्थगिती. ही स्थगिती कायम राहण्यासाठी उच्च न्यायालयात सुनावणी.
आज माघी गणेश जयंती
आज माघी गणेश जयंती आहे. त्यानिमित्त श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात आणलेल्या पाळण्यासाठी 2 किलो 280 ग्राम सोने वापरण्यात आले आहे. या पाळण्यासाठी बाजूचे स्टँड साठी 10 किलो चांदी वापरण्यात आलीये. तर मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात मोठी गर्दी होते.
अविनाश भोसले यांच्या स्वास्थच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डच्या मागणीवर आज निकाल
मुंबई – प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या स्वास्थच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डच्या मागणीवर आज निकाल. नेव्ही हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर्सच करतील भोसले यांची तपासणी. मात्र त्या संदर्भात सीबीआय तर्फे देण्यात आलेल्या यादीवर मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्ट आज देणार निर्णय.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आज देशाला संबोधित करणार
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आज देशाला संबोधित करणार आहेत, संध्याकाळी 7 वाजता.
आशिष मिश्रा याच्या जामिनावर आज सुप्रिम कोर्टात निर्णय येणार
उत्तर प्रदेश – लखीमपूर खीरी शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्या प्रकरणी आज आशिष मिश्रा याच्या जामिनावर आज सुप्रिम कोर्टात निर्णय येणार आहे.
आज मोदी आणि मिस्त्रचे राष्ट्रपती सीसी यांची भेट होणार
दिल्ली – मिस्त्रचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी यांना प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणुन हजर रहाणार आहेत. आज मोदी आणि सीसी यांची भेट होणार आहे. 25 ते 29 जानेवारी दरम्यान राष्ट्रपती भवन बंद असणार आहे.
अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुलगा हरिश याचं लग्न
जयपूर – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुलगा हरिश याचं लग्न आज राजमहल पॅलेस हॉटेल मध्ये होणार आहे.
रामदास आठवले यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद, दुपारी 4 वाजता.
तानाजी सावंत यांचा औरंगाबाद दौऱ्यावर
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, सकाळी 8.30 वाजता. उस्मानबाद येथे जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत सहभागी होणार आहे.
बीडमध्ये जयंत पाटील यांची सभा
बीड - विक्रम काळेंसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी 1 वाजता सभा घेणार आहेत.
राज्य महिला आयोगाचा आज 30वा वर्धापन दिन
मुंबई - राज्य महिला आयोगाचा आज 30 वा वर्धापन दिन सोहळा आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे, दुपारी 2 वाजता, सह्याद्री अतिथीगृह. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्या अध्यक्षा असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला आपली उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -