Maharashtra News Updates 25 December 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कसारा थाळघाटावरील बिवलवाडी आदिवासी वस्तीत बिबट्याचा दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते . गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती शहापूर वन विभागाला दिली व माहिती मिळतात शहापूर वन विभागाचे पथक तसेच एस जी एन पी बचाव पथक शहापूर विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे . हा बिबट्या आठ वर्षाचा असून गेल्या अनेक दिवसांपासून आहार न मिळाल्याने अशक्त झाल्याने एकाच परिसरात फिरत असावा अशा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. तर या बिबट्याला जेरबंद करून त्याला उपचारासाठी संजय गांधी नेशनल पार्क या ठिकाणी हलवण्यात आला आहे . बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू... कोरपना तालुक्यातील बेलगाव शेतशिवारातील घटना, हल्ल्यात नितीन आत्राम या मुलाचा मृत्यू, हल्ल्यानंतर या भागात भीतीचे वातावरण, आज दुपारी आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या मुलावर बिबट्याचे अचानक केला हल्ला, गेल्या काही दिवसापासून या भागात वाघ-बिबट दर्शन नित्याचे झाल्याने वनकर्मचारी करत होते नियमित गस्त, मात्र त्यादरम्यान झाली दुर्दैवी घटना
ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कसारा थाळघाटावरील बिवलवाडी आदिवासी वस्तीत बिबट्याचा दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते . गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती शहापूर वन विभागाला दिली व माहिती मिळतात शहापूर वन विभागाचे पथक तसेच एस जी एन पी बचाव पथक शहापूर विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे . हा बिबट्या आठ वर्षाचा असून गेल्या अनेक दिवसांपासून आहार न मिळाल्याने अशक्त झाल्याने एकाच परिसरात फिरत असावा अशा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. तर या बिबट्याला जेरबंद करून त्याला उपचारासाठी संजय गांधी नेशनल पार्क या ठिकाणी हलवण्यात आला आहे . बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
१८ डिसेंबर रोजी खालापूर तालुक्यातील कारगावनजीकच्या जंगलात एका आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. यावेळी, या चिमुरडीचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याने केल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, या मुलीचा मृतदेह हा मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. यावेळी, या चिमुरडीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड मारून केली असल्याचे समोर आल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर, पोलीसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली असता कारगाव येथील एका संशयित तरुणाकडे कसून चौकशी करण्यात आली. यावेळी, त्याने या चिमुरडीची हत्या केली असून अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केल्याने अजय चव्हाण याला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे. तर, आरोपी अजय याला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कसारा थाळघाटावरील बिवलवाडी आदिवासी वस्तीत बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते . गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती शहापूर वन विभागाला दिली व माहिती मिळतात शहापूर वन विभागाचे पथक तसेच एस जी एन पी बचाव पथक शहापूर विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे . हा बिबट्या आठ वर्षाचा असून गेल्या अनेक दिवसांपासून आहार न मिळाल्याने अशक्त झाल्याने एकाच परिसरात फिरत असावा अशा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. तर या बिबट्याला जेरबंद करून त्याला उपचारासाठी संजय गांधी नेशनल पार्क या ठिकाणी हलवण्यात आला आहे . बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या नावाने बेल भंडारा व खोबरे उधळत, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात पहिल्या दिवशी पालखी महोत्सव संपन्न झाला. दरम्यान कोविड नंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यामुळे भाविक भक्त व व्यावसायिकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावलीय. ज्यात गेल्या चार दिवसांपासून कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, कुस्त्यांच्या दंगली,घोडे,गाढव, उंट, कुत्री यांच्या बाजारासह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत. दरम्यान आज श्री क्षेत्र खंडोबाच्या यात्रे निमित्त लावणी महोत्सवा महोत्सवाचे आयोजन करणयात आले होते.ज्यात महाराष्ट्रासह देशभरातील लावणी कालावंत, कलाकार मंडळी, राजकीय मंडळी, परंपरागत लावणी महोत्सवास हजेरी लावलीय.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवायचे असेल तर येत्या काळात संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्री व्हायला हवा त्यासाठी पुढे येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणूक संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन मराठा सेवा चे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी परभणीत मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात केले आहे.या अधिवेशनात महामानवांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध राष्ट्रद्रौहाच्या गुन्ह्याची तरतूद असणारा कायदा तयार व्हावा असा ठराव ही संमत करण्यात आला.
परभणीत सुरू असलेल्या मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा समारोप आज पार पडला ज्याला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांची उपस्थिती होती.यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात संभाजी ब्रिगेडला राजकीय ताकद देण्याचे आवाहन उपस्थितांना केले जात ग्रामपंचायत असो की लोकसभा यात सर्वच निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींना निवडून द्या तसेच संभाजी ब्रिगेड चा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आरक्षण मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले तसेच महामानवांची बदनामी करणार्यांविरोधात राष्ट्रद्रोहाच्या गुन्हयाची तरतूद असणारा कायदा करण्यात यावा यासह एकूण 10 ठराव या महाअधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आले.या अधिवेशनाला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती..
मुंबई नाशिक महामार्गावर वाशिंद ते शहापूर दरम्यान वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा वाशिंद व शहापूर दरम्यान महामार्गाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे असनगाव येथे अंडरपास ब्रिजचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे ते देखील पुर्ण झाले नाही तर दुसरीकडे थोड्याच अंतरावर मुंबई नाशिक महामार्गावरील रेल्वे लाईन वर असलेला जुना ब्रिज तोडण्याचे काम सुरु आहे या मुळे या वाशिंद व शहापूर दरम्यान नेहमीच वाहतूक कोंडी होत असते याचच सामना वाहन चालकांना करावा लागत आहे वाशिंद ते शहापूर अंतर पार करण्यासाठी तब्बल चार तास लागत आहे .यांची खंत एका वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.
मार्चमध्ये निवडणूक लागली तर मी पुन्हा येईल आमचे फटाके लावायला - राज ठाकरे
जिथे मी कार्यक्रमांमध्ये जातो तिथे लोक मला बोलायला माईक देऊन टाकतात,,,
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील कॅपिटल मॉल गर्दीमुळे बंद करण्यात आलं आहे. आज रविवार आणि ख्रिसमस सुट्टीमुळे लोकांनी कॅपिटल मॉलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या वाढत्या गर्दीमुळे अखेर कॅपिटल मॉलच्या व्यवस्थापकांनी आजच्या दिवशी कॅपिटल मॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार नारायण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, संचालक रश्मी बागल, महेश चिवटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन कामांना गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून, राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. करमाळा तालुक्यातील विकास प्रकल्प पूर्ण केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करा
श्री आदिनाथ कारखान्याचे संस्थापक गोविंदराव पाटील आणि दिगंबर बागल यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, या कारखान्याचे ३२ हजार सभासद असून, त्यांची कुटुंबे कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी कारखान्याचे खासगीकरण होऊ नये, हा कारखाना सहकारी तत्वावरच चालावा, यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित, एक दिलाने काम करावे, सरकार नागरिकांच्या पाठीशी राहील.
महसूल व आरोग्य विभाग नाविन्यपूर्ण व चांगल्या योजना राबवत असल्याचे सांगताना आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाद्वारे ४.५ कोटी महिलांची आरोग्य तपासणी होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कारखान्यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी – पालकमंत्री
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने समयसूचकतेने निर्णय घेतला. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे हित कायम राखले गेले आहे. शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा अध्याय या कारखान्याने सुरू केला आहे. शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्यासाठी भैरवनाथ उद्योग समुहाने आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचाच राहणार – आरोग्य मंत्री
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. सावंत म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांचा आहे, तो सभासदांचाच राहणार आहे. सभासदांच्या हितासाठी व कारखान्याच्या प्रगतीसाठी भैरवनाथ उद्योगसमुहाकडून यापुढेही या कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून, मोळी टाकून कारखान्याचा २७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य
कोर्टात जाणार-सूत्र
------
बदनामी करणाऱ्यांविरोधात
आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा
दावा दाखल करण्याची शक्यता
-----
आदित्य ठाकरे कायदेशीर
सल्ला घेत असल्याची
सूत्रांची माहिती
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया झाली मतदानादरम्यान मतदान केंद्रावर जाण्याच्या कारणावरून पोलीस अधिकारी बाळासाहेब खार्डे यांनी संचालक पदासाठी उमेदवार असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे यांच्या श्रीमुखात लगावली आणि त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली होती. या प्रकरणात पुढे शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई ही मागणी करण्यात आली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून उठणार नसल्याची भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी घेतली होती. अखेर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर पोलीस विभागाअंतर्गत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे
Disha Salian case: भाजप नेत्यांविरोधात आदित्य ठाकरे आक्रमक, कायदेशीर कारवाई करणार?
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दिशा सालियान प्रकरणी मोठं वक्तव्य
आदित्य ठाकरे सुशांतसिंह आणि दिशा सालियान प्रकरणी जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार,
शिंदे आणि फडणवीस सरकार असून आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर नाताळ नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची तुफान गर्दी,पर्यटकांनी समुद्रकिनारी गजबजलेले पाहिला मिळत आहेत,किनाऱ्यावरील रिसॉर्ट ची बुकिंग फुल,हजारो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्याने पर्यटन व्यवसाय चांगलाच बहरला आहे. कोरोना मुळे गेली दोन वर्ष लोकांना नातं साजरा करता आला नव्हता परंतु कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर पहिल्यांदाच नाताळच्या सुट्टीत पर्यटकांची पावले रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाराकडे वळली आहे..
ग्रंथाली वाचकदिनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यंदा ग्रंथाली वाचकदिनाचे ४८ वे वर्ष आहे . यामध्ये 'शब्दांचा झुला' , 'ढगाखाली', 'तिरकस चौकस' , 'जिणं शोषितांचं' , 'जागो मै खुदा हूं' , व 'नोबेलनगरी' फक्त तिच्यासाठी असे एकूण सहा पुस्तकांचं प्रकाशन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुस्तकांचे लेखक व्यासपीठावर उपस्थित होते तर या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर वाचकांनीही सहभाग घेतला होता.
एबीपी माझचे संपादक राजीव खांडेकर यांनी देखील या पुस्तकांची प्रसंशा केली . चांगले लेखक आहेत परंतु त्यांच्या बद्दल लोकांना काही माहितीच नाही त्यांचं कौतुकच होत नाही त्यामुळे माझाच्या वतीने लेखक व त्यांच्या पुस्तकाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे तसेच वाचन किती महत्वाचे आहे याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केलं जातं आहे . दरम्यान पुस्तक लिहित असतांना आपले नाटकीय, सामाजीक ,वैज्ञानिक, गम्मतशीर विचार लेखकांनी वाचकांसमोर मांडल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तर ग्रंथालीच्या माध्यमातून लवकरच ऑडिओ पुस्तकांची सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे
पुस्तक प्रकाशित नाव
शब्दांचा झुला लेखिका - मोनिका गजेंद्रगडकर ,
ढगाखाली लेखक - चांगदेव काळे
तिरकस चौकस लेखक - सॅबी परेरा
जिणं शोषितांचं लेखिका - वृषाली मगदूत,
जागो मै खुदा हूं, लेखक - किरण येले
नोबेलनगरी - लेखक - सुधीर थत्ते - नंदिनी थत्ते
फक्त तिच्यासाठी - लेखक
ग्रंथाली वाचकदिनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यंदा ग्रंथाली वाचकदिनाचे ४८ वे वर्ष आहे . यामध्ये 'शब्दांचा झुला' , 'ढगाखाली', 'तिरकस चौकस' , 'जिणं शोषितांचं' , 'जागो मै खुदा हूं' , व 'नोबेलनगरी' फक्त तिच्यासाठी असे एकूण सहा पुस्तकांचं प्रकाशन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुस्तकांचे लेखक व्यासपीठावर उपस्थित होते तर या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर वाचकांनीही सहभाग घेतला होता.
एबीपी माझचे संपादक राजीव खांडेकर यांनी देखील या पुस्तकांची प्रसंशा केली . चांगले लेखक आहेत परंतु त्यांच्या बद्दल लोकांना काही माहितीच नाही त्यांचं कौतुकच होत नाही त्यामुळे माझाच्या वतीने लेखक व त्यांच्या पुस्तकाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे तसेच वाचन किती महत्वाचे आहे याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केलं जातं आहे . दरम्यान पुस्तक लिहित असतांना आपले नाटकीय, सामाजीक ,वैज्ञानिक, गम्मतशीर विचार लेखकांनी वाचकांसमोर मांडल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तर ग्रंथालीच्या माध्यमातून लवकरच ऑडिओ पुस्तकांची सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे
पुस्तक प्रकाशित नाव
शब्दांचा झुला लेखिका - मोनिका गजेंद्रगडकर ,
ढगाखाली लेखक - चांगदेव काळे
तिरकस चौकस लेखक - सॅबी परेरा
जिणं शोषितांचं लेखिका - वृषाली मगदूत,
जागो मै खुदा हूं, लेखक - किरण येले
नोबेलनगरी - लेखक - सुधीर थत्ते - नंदिनी थत्ते
फक्त तिच्यासाठी - लेखक
ग्रंथाली वाचकदिनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यंदा ग्रंथाली वाचकदिनाचे ४८ वे वर्ष आहे . यामध्ये 'शब्दांचा झुला' , 'ढगाखाली', 'तिरकस चौकस' , 'जिणं शोषितांचं' , 'जागो मै खुदा हूं' , व 'नोबेलनगरी' फक्त तिच्यासाठी असे एकूण सहा पुस्तकांचं प्रकाशन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुस्तकांचे लेखक व्यासपीठावर उपस्थित होते तर या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर वाचकांनीही सहभाग घेतला होता.
एबीपी माझचे संपादक राजीव खांडेकर यांनी देखील या पुस्तकांची प्रसंशा केली . चांगले लेखक आहेत परंतु त्यांच्या बद्दल लोकांना काही माहितीच नाही त्यांचं कौतुकच होत नाही त्यामुळे माझाच्या वतीने लेखक व त्यांच्या पुस्तकाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे तसेच वाचन किती महत्वाचे आहे याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केलं जातं आहे . दरम्यान पुस्तक लिहित असतांना आपले नाटकीय, सामाजीक ,वैज्ञानिक, गम्मतशीर विचार लेखकांनी वाचकांसमोर मांडल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तर ग्रंथालीच्या माध्यमातून लवकरच ऑडिओ पुस्तकांची सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे
पुस्तक प्रकाशित नाव
शब्दांचा झुला लेखिका - मोनिका गजेंद्रगडकर ,
ढगाखाली लेखक - चांगदेव काळे
तिरकस चौकस लेखक - सॅबी परेरा
जिणं शोषितांचं लेखिका - वृषाली मगदूत,
जागो मै खुदा हूं, लेखक - किरण येले
नोबेलनगरी - लेखक - सुधीर थत्ते - नंदिनी थत्ते
फक्त तिच्यासाठी - लेखक
आज राज्यात ३२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आज राज्यात 20 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८७,९४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१७% एवढे झाले आहे.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याच्या बोरघाटात वाहन पुण्याच्या दिशेने कासवगतीने सुरू आहे. आज विकेंड आणि नाताळ असल्याने असंख्य वाहन रस्त्यावर आली आहेत. पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. तर, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळं वाहतूक पोलिसांवर ताण वाढल्याचं चित्र आहे.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याच्या बोरघाटात वाहन पुण्याच्या दिशेने कासवगतीने सुरू आहे. आज विकेंड आणि नाताळ असल्याने असंख्य वाहन रस्त्यावर आली आहेत. पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. तर, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळं वाहतूक पोलिसांवर ताण वाढल्याचं चित्र आहे.
आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, नेते-खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई नागपूरात येणार
आज रात्री उशीरा मुंबईहून नागपुरात दाखल होणार
गेल्या आठवड्यात दिशा सालियन मृत्य प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई नागपुरात येणार
आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, नेते-खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई नागपुरात येणार
आज रात्री उशीरा मुंबईहून नागपुरात दाखल होणार. गेल्या आठवड्यात दिशा सालियन मृत्य प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई नागपुरात येणार
भिम टायगर सेनेच्या वतीने मनुस्मृती दहन करण्यात आले, त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पदाधिकारी, आणि कार्यकर्ते उपस्थित होते..२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृती दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज वर्ध्यातील भीम टायगर सेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात 4.30 वाजता मनुस्मृती चे दहन केलेय..
माथेरान येथे पर्यटकांची गर्दी , नाताळ आणि सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी..
नववर्ष आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे माथेरान येथे पर्यटकांची गर्दी..
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये राज्यभरातून पर्यटकांची गर्दी ..
गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघालेल्या इंदापूर तालुक्यातील भाविकांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे अपघात झालाय. यात इंदापूर तालुक्यातील बावडा गावातील बापलेकांचा जागीच मृत्यू झालाय. वारणा नदीवर असलेल्या कोकरुड- नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असून यात दोघांचा मृत्यू झालाय तर अन्य तिघेजण जखमी आहेत.महेंद्र अशोक घोगरे वय 35 वर्षे तर आरव महेंद्र घोगरे वय 4 वर्ष अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
नालासोपारा : नालासोपारा येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना घडली आहे. यात ३५ हून अधीक लोकांना चाळीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहीती पालिकने दिली आहे. सदर घटनेवने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नालासोपारा पुर्वेच्या तुळींज परिसरातील साई निवास या एक मजली चाळीचा रविवारी सकाळी १० च्या सुमारात बालकनीचा भाग अचानक कोसळून खाली आला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २१ सदनिका तर तळ मजल्यावर १० सदनिका आहेत. रविवार असल्याने बहुतांश नागरिक घरात असल्याने दारासमोर स्लॅब कोसळल्याने घरातच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून लोकांना सुखरूप बाहेर काढले.
या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. सदरची इमारत धोकादायक इमारत घोषित केलेली नव्हती. ही इमारत २५ वर्षे जुनी असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे.
त्यामुळे ही इमारत धोकादायक असतानाही पालिकेच्या यादीत याची कोणतीही नोंद नसल्याने शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे.
देवगड बंदरातील मच्छीमारीसाठी गेलेली पुण्यश्री नौका २२ वाव मध्ये मच्छीमारी करत असताना अचानक नौकेने घेतला पेट
खोल समुद्रात तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास मच्छिमार बांधवांना यश
नौकेवरील मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात उड्या घेत आपले जीव वाचविण्याचा केला प्रयत्न
दोन मच्छीमार बांधवाला पायाला भाजल्यामुळे स्थानिक देवगड ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचार करण्यासाठी पोलिसांच्या गस्ती नौकेने उपचारासाठी दाखल
मात्र आगीचे नेमके कारण अस्पष्ट
शिवसेना एकच आणि ती संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते- संजय राऊत
मी शाखेच्या उद्घाटनासाठी आलोय आणि बाहेर वातावरण शिवसेनामय आहे. शिवसेना सोडून दोन चार दलाल गेले असतील.
पळपुटे गेले आणि उद्या जर आमचं सरकार आलं तर ते परत इकडेच असणार.
गेली 70 वर्षे बेळगावच्या प्रश्नावर लढतोय आणि शिवसेना पंचावन्न वर्षे झाली बेळगावच्या प्रश्नावर ती लढा देतेय.
शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्याने बेळगाव प्रश्नासाठी स्वतःचे 69 हुतात्मे दिले. बाळासाहेबांनी याच प्रश्नासाठी तुरुंगवास भोगला. आमचं बेळगावशी भावनिक नातं आहे.
सरकारने शेपूट घातला असेल तरी शिवसेना शेपूट घालणार नाही. बेळगावच्या जनतेने कधीही हाक मारावी आम्ही सगळी बंधने तोडून तिकडे पोहचू बघुयात कोण अडवत.
कोणाच्या आरोपांबाबत बोलताय तुम्ही त्याने आरोप केले आणि तुम्ही ते गांभीर्याने घेत आहे. पब्लिक है सब जानती है… यावर मी सविस्तर उद्या बोलेन….
नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे
शासकीय कार्यालयात कामानिमित्य येणाऱ्या नागरिकांनी देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे
Nashik: विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधत नाशिकमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून फ्लॉवर पार्कला त्यांच्याकडून अधिक पसंती दिली जातीय. 9 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या फ्लॉवर पार्कमध्ये यंदा 53 विविध जातींची तब्बल 6 लाख फुले बघायला मिळतायत. चला तर मग या फ्लॉवर पार्कची एक सफर करूयात..
निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकच्या अंजनेरी परिसरात शुभम वॉटर पार्कमध्ये 9 एकर जागेवर उभारण्यात आलेले हे आहे नाशिक फ्लॉवर पार्क.. यात 20 विदेशी आणि 33 देशी आशा 53 विविध जातींची तब्बल 6 लाख फुले लावण्यात आली असून दुबईच्या धर्तीवर देशातील अशाप्रकारचा हा पहिला प्रयोग आहे. इथले वैशिष्टय म्हणजे फुलांची रचना मोर, हत्ती, गाडी, घर, ह्रदय, फुलपाखरू अशा विविध आकारांच्या माध्यमातून केली गेलीय तर जवळपास 80 सेल्फी पॉईंट ईथे उभारण्यात आले आहेत.
Mumbai Cold Weather News : राज्यातील तापामानात (Temperature) सातत्यानं बदल होत आहे. रात्री कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. हळूहळू राज्यात थंडीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतही (Mumbai) तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत किमान तापमान 15 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. तर कमाल तापमान देखील 30 अंश सेल्सिअसवर गेलं आहे.
Rahul Shewale : माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला ठाकरे गटासाह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची फूस असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. सदर महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषदेत केला आहे. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची NIA च्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Rahul Shewale : माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केलं. माझ्या पक्षातील लोकच त्या महिलेला संपर्क करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळेंनी केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मला या प्रकरणी मदत केली असल्याचं शेवाळेंनी सांगितलं. त्या महिलेला कोरोनाच्या काळात मी मदत केली असल्याचा खुलासाही त्यांनी केला. त्यानंतर त्या महिलेनं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळेंनी सांगितले.
Weather Update : देशात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका (cold Weather) चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही (maharashtra) तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच घसरला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार आहे. तसेच धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
Maharashtra News: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आणि अहमदनगर जिल्हा हौशी कब्बडी संघटनेच्या वतीने अहमदनगरच्या वाडिया पार्क येथे 70 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवडचाचणी आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा मॅटवर खेळवली जाणार असून त्यासाठी मैदान बनवण्याचं काम सुरू आहे. कबड्डी प्रीमियर लीगच्या धर्तीवर प्रो कब्बड्डीप्रमाणे या नियोजन करण्यात आलंय. या स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार हे आहेत. 600 महिला-पुरूष खेळाडू या स्पर्धेसाठी येणार असून किमान 10 हजार प्रेक्षक स्पर्धा बघण्यासाठी येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे.
Navi Mumbai : आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेने कंबर कसली आहे. मनसे पक्ष स्थापनेपासून मनसेला साधं खातंही नवी मुंबई मनपा निवडणुकीत उघडता आलेलं नाही. त्यामुळे आगामी नवी मुंबई मनपा निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. या दृष्टीनंच नवी मुंबई स्थित कोकणवासीयांचा मेळावा मनसेतर्फे घेण्यात आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. कोकणातील गावागावांमध्ये मनसे पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन या मेळाव्या दरम्यान करण्यात आले.
Shahapur News : मुंबई नाशिक महामार्गावर वाशिंद ते शहापूर दरम्यान वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा वाशिंद आणि शहापूर दरम्यान महामार्गाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. असनगाव येथे अंडरपास ब्रिजचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे ते देखील पूर्ण झाले नाही. तर, दुसरीकडे थोड्याच अंतरावर मुंबई नाशिक महामार्गावरील रेल्वे लाईनवर असलेला जुना ब्रिज तोडण्याचे काम सुरु आहे. यामुळे या वाशिंद आणि शहापूर दरम्यान नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. वाशिंद ते शहापूर अंतर पार करण्यासाठी तब्बल चार तास लागत आहे. यांची खंत एका वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.
Beed News : बीडच्या उत्तरेश्वर पिंपरी या गावात गोठ्याला लागलेल्या आगीत लहान मोठ्या दहा शेळ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महादेव धांडे यांचा गावातच छोटा शेळीपालनाचा व्यवसाय असून शेळ्या बांधलेल्या गोठ्याला अचानक आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यात असलेल्या लहान मोठ्या दहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याने धांडे यांचं मोठ आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
Nagpur News : नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज एक आगळावेगळा विक्रम केला असून नागपूरच्या बी.आर.मुंडले शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने पाच हजार किलो समरसता भाजी केली. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने समरसता दिवसाचे औचित्य साधून ही समरसता भाजी तयार करण्यात आली. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातून थोड्या थोड्या प्रमाणात भाज्या आणल्या, त्या एकत्रित चिरल्या आणि मग एकत्रित शिजवल्या म्हणून या भाजीला 'समरसता भाजी' असं नाव देण्यात आलं. यात 396 किलो तेल, 330 किलो कांदे, 661 किलो बटाटे, गांजर 330 किलो, एक हजार किलो कोबी, टोमॅटो 661 किलो आणि मटार 330 किलोसह इतर साहित्यांचा वापर करून ही पाच हजार किलोची ही विश्व विक्रमी भाजी तयार झाली. इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये या भाजीची नोंद झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली होती.
Shahapur News : नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावातील वेठबिगार आणि काही शिक्षणापासून वंचित असणाऱ्या एकूण 13 विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत असणाऱ्या अदीम जमातीच्या दहागाव आश्रमशाळेत प्रवेश देण्यात आला असून प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार या स्वतः विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेऊन आहेत. इगतपुरी तालुक्यातील ग्रामस्थांनी आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उभाडे येथील वस्तीला समक्ष भेट देऊन वेठबिगारीतून सोडलेली मुले आणि त्यांचे पालक यांचे प्रबोधन करुन पालकांच्या इच्छेनुसार त्यांना शिक्षणासाठी दहागाव येथील शाळेत प्रवेश देण्यात आला. दरम्यान विद्यार्थी किंवा पालक यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा वयाच्या दाखल्यासाठी सक्षम पुरावा नव्हता म्हणून शिक्षण हक्क कायदा 2009 अन्वये या कातकरी मुलांना वयानुरुप शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. आदिवासी क्षेत्र आढाव समिती अध्यक्ष विवेक पंडीत यांच्या सुचनेनुसार प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार यांनी दहागाव मुख्यध्यापकांना त्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी सूचना केलेल्या आहेत अशी माहिती प्रकल्प अधिकारी यांनी दिली.
Sangli Accident: सांगली जिल्हयातील पेठ ते शिराळा या राज्य मार्गावर भीषण अपघाताची घटना घडलीय. दोन कारची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाला. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत एक कार पूर्णतः जळून खाक झाली. इस्लामपूरकडून शिराळाकडे जाणाऱ्या कारचालकाने भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने कार चालवल्याने सदरचा अपघात झाला. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात शिराळा येथील संदीप आनंदा शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी दिपाली, मुलगा श्रीराज, मुलगी आराध्या व समोरील कारचे चालक संदीप मारुती लोंढे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर संदीप लोंढे यांची कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. इस्लामपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
Jejuri News: जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता आता मंदिर प्रशासनानं आता सोमवारपासून भाविकांसाठी मास्क सक्ती केलेली आहे. मंदिर प्रशासनानं आजच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून भाविकांना मंदिरात यायचे असेल तर मात्र मास्क बंधनकारक असणार आहे.
Bharat Biotech Nasal Vaccine : भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लस (Covid Nasal Vaccine) आता कोविन (CoWin) ॲपवर उपलब्ध आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय शनिवारी संध्याकाळीपासून कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप लसीची किंमत आणि वापरासाठी उपलब्धता जाहीर करण्यात आलेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
Mumbai Local Train Mega Block : मुंबईकरांनो (Mumbai) नाताळ (Christmas) निमित्त घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज रविवारी, 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी मध्य रेल्वे (Central Railway Line) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbor Railway Line) मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी मुंबई लोकलचं (Mumbai Local Train) वेळापत्रक तपासा आणि त्यानंतरच घराबाहेर पडा.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज जगभरात नाताळ सण साजरा करण्यात येणार आहे. भारतामध्ये आजपासून नाताळाच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा रेडिओ कार्यक्रम आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु...
जगभरात ख्रिसमस म्हणजेच नाताळ सण साजरा होत आहे. आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु...पर्यटनस्थळी गर्दी वाढणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. वर्षाअखेर आणि ख्रिसमस यामुळे पर्यटनस्थळावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दापोलीत पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. किनाऱ्यावरील सर्व हॉटेल्स फुल झालेली आहेत. चंद्रपूर- ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांनी हाऊस फुल्ल झालाय. नाशिक- नाताळ आणि विकेंडमुळे नाशिकमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून अंजनेरी जवळील फ्लॉवर पार्कला चांगलीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यातील इतर पर्यटन स्थळावरही गर्दी होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी -
मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्याचा नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. तसेच, कोरोना टेस्टिंग ट्रेसिंग वाढवणार तर लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे.
अभिनेत्री तुनिषावर अंत्यसंस्कार -
नायगाव येथील अलिबाबा मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार झीशानच्या मेकअपरुममध्ये तुनिषानं फाशी घेतली. तुनिषाचे तिचा सहकारी कलाकार झीशान खानसोबत प्रेमसंबंध होते. यातूनच तिनं आत्महत्या केल्याचा तिच्या आईचा आरोप आहे. तिच्या आईच्या तक्रारीवरुन झीशानवर गुन्हा दाखल झाला आहे. तुनिषावर जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर आज संध्याकाळी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
आनंद परांजपेंना अटक होणार?-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय. त्यामुळे आनंद परांजपे यांना पोलीस अटक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.
भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड -
शिमला- हिमाचलमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड होणार आहे. निवडीसाठी केंद्राचे निरीक्षक म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिमल्यात होणाऱ्या बैठकीत नाव जाहीर होणार आहे.
आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती.. देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन-
दिल्ली- अटलबिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळी सदैव अटल येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भाजप अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
नागपूर- प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आज एक आगळावेगळा उपक्रम राबवत असून नागपूरच्या बी आर मुंडले शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ते आज ५ हजार किलो समरसता भाजी शिजवणार आहेत. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्त समरसता दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी त्यांच्या घरातून थोड्या थोड्या प्रमाणात भाज्या आणतील. त्या चिरुन मग एकत्रित शिजवल्या जातील. म्हणून त्या भाजीला समरसता भाजी अस नाव दिलं आहे.
अमरावती- भाजप नेते तुषार भारतीय यांच्या गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अथेलिटिक संस्थेकडून अटल दौड हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत विविध गटांसाठी एकूण ५ लाख रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींची मन की बात -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 96 वा भाग आज प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. कोरोना पार्श्वभीवर, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात यावर पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद, सोलापूर दौरा-
औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ.श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता जनजागृती मोहिमेत सकाळी अकरा वाजता सहभागी होणार आहेत.
करमाळा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करमाळा येथे आदिनाथ सहकारी साखर कारखाना २७ वा गळीत हंगाम शुभारंभ होणार आहे.
राहुल शेवाळेंची पत्रकार परिषद-
राष्ट्रवादीचे नेते रूपाली ठोंबरे रिंकी बक्सला यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राहुल शेवाळे यांच्या संदर्भात काही आरोप केले होते. त्याच आरोपाला उत्तर देण्यासाठी राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद होणार आहे, सी/२, बाळासाहेब भवन , मंत्रालयासमोर, दुपारी १२ वाजता- पत्रकार परिषद होणार आहे.
भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
औरंगाबाद- भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार रावसाहेब दानवे, भागवत कराड, अतुल सावे यांच्या उपस्थितीत होणार आहे, दुपारी १२.३० वाजता.
दिल्ली- राहुल गांधी आज शक्ती स्थळ, राजघाट, अटलबिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळांवर जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
पुणे- संजय शहा हे त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आज ६० किलोमीटर धावणार. संजय शहा हे मॅरेथॉन रनर असून कारगिल मॅरेथॉन आयोजित करतात, पहाटे वाजता शाह धावायला सुरुवात करणार आहे.
अहमदनगर- नाताळ निमित्त हजारो ख्रिस्त बांधव अतिशय जुन्या आणि ऐतिहासिक ह्युम मेमोरिअल चर्च मध्ये प्रार्थना करणार आहेत. ह्यूम मेमोरियल चर्च हे 1833 साली स्थापन केलेल अतिशय जूनं चर्च आहे. अमेरिकेतून आणलेले बेंच हे या चर्चचे वैशिष्ट आहे. या बरोबरच अमेरिकेतून संपूर्ण भारतात केवळ 5 बेल पाठवण्यात आल्या होत्या
नांदेड- राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
माळेगाव यात्रेची सांगता -
नांदेड- सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेनिमित्त आज लावणी महोत्सव. देशभरातील लावणी कालावंत, कलाकार मंडळी, राजकीय मंडळी, परंपरागत लावणी महोत्सवास लावणार हजेरी. दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. लावणी महोत्सवा नंतर यात्रेची सांगता होणार आहे.
वाशिम- विविध हिंदुत्ववादी संघटच्यावतीने वाशिम येथे सकल हिंदू समाजातर्फे लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
भंडारा- माजी मंत्री महादेव जानकर जिल्ह्यात असणार आहेत. या वेळी पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -