Maharashtra News Updates : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Dec 2022 10:52 PM
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना मोठा झटका, लिंबागणेश ग्रापंचयात जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात

ईव्हीएम मशीन मध्ये फेवीक्यूक टाकल्याने झाले होते फेर मतदान - लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणूक..


भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना मोठा झटका


लिंबागणेश ग्रापंचयात जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात


सरपंच पदी बालाजी जाधव विजयी


दोन भाजप नेत्यात क्षीरसागर गटाचा उमेदवार विजयी 


तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यात होती थेट लढत


दोन्ही भाजप नेत्याच्या लढतीत क्षीरसागर गटाचा उमेदवार विजयी

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक, व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता असल्याचा आरोप

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक, व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता असल्याचा आरोप

कॅलिफोर्नियात राहणाऱ्या अनिवासी भारतीयाकडून शिर्डी  संस्थानला 50 हजार डॉलरची देणगी

Shirdi News: मूळ पंजाब येथील आणि कॅलिफोर्नियात राहणारे अनिवासी भारतीय डॉ. अखिल शर्मा व डॉ. अपर्णा शर्मा दांम्पत्याकडून 50 हजार डॉलर (भारतीय चलनात सुमारे 41 लाख रुपये)  संस्थानला देणगी.... सदरचा चेक साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी कैलास खराडे यांच्याकडे सुपूर्त केलाय...

तरुण संतविचारांकडे कसं पाहतात, याचा अभ्यास महत्त्वाचा, रिंगण वक्तृत्व स्पर्धेप्रसंगी आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचं वक्तव्य

सध्याचं युग हे क्रोधाचं, द्वेषाचं आणि विचारधारांच्या अंताचं आहे. अशा काळात संतांचे विचार खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत. देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी संत विचारांकडे कसं पाहते, याचा अभ्यास व्हायला हवा, असं मत आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केलं. संत विचारांवर आधारित रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन रविवारी शरदचंद्र कला आणि वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 


पौर्णिमा तोटेवाड (औरंगाबाद), मुग्धा थोरात (पुणे), श्रुती बोरस्ते (नाशिक), सुजित काळंगे (सातारा), गणेश खुटवड (पुणे) यांना अनुक्रमे पहिल्या पाच पुरस्कारानी गौरवण्यात आलं. तर यश पाटील, आकाश सोनवणे आणि शुभांगी ढेमसे यांना उत्तेजनार्थ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ११ हजार, ९ हजार, ७ हजार, 5 हजार, 3 हजार आणि उत्तेजनार्थ 2हजार अशी रोख रकमेची पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.


प्रख्यात पखवाजवादक दासोपंत स्वामी यांच्या वादनाने स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी एमआयटी युनिवर्सिटीचे संचालक महेश थोरवे आणि प्रा. पांडुरंग कंद उपस्थित होते. तर पुरस्कार वितरण सोहळ्यात कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह हभप पुरुषोत्तम पाटील आणि वार्षिक रिंगणचे संपादक सचिन परब होते. परीक्षक म्हणून अमृता मोरे आणि प्रा. डॉ. राजेंद्र थोरात उपस्थित होते.


‘रिंगण वक्तृत्व स्पर्धे’चं हे दुसरं वर्ष असून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्यानं भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत यंदा महाराष्ट्रभरातून १५ ते २० वयोगटातील ५४ स्पर्धक सहभागी झाले होते. ‘कल्पनेची बाधा न हो कोणे काळी’, ‘कीर्तन : प्रबोधन की मनोरंजन?’, ‘कुणाही जीवाचा न घडो मत्सर’, ‘संत मुक्ताबाई : महान मोटिवेटर’, ‘माझा विठोबा, २८ युगं जुना आधुनिक देव’ या विषयांवर स्पर्धकांनी मांडणी केली.


'वारी अमृताची' या मासिकाची निर्मिती केल्याबद्दल पत्रकार श्रीकांत बोरावके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात कोविडच्या अनुषंगाने वैद्यकीय पातळीवर संपूर्ण सुविधा तत्पर-जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत. 
देशभरात कोविडच्या नवीन व्हेरीयंटच्या अनुषंगाने कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी केलेय. दरम्यान कोविडबाबत विविध माध्यमाद्वारे अनेक प्रकारच्या बातम्या शेअर केल्या जात असल्याचे नांदेड जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय.या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात वैद्यकिय पातळीवर संपूर्ण सुविधा तत्पर ठेवल्या असल्याचे व त्या सुविधांचा वेळोवेळी आढावा घेतला जात असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान कोविडच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करत मास्कचा वापर करत,पंचसुत्री पाळण्याचे आवाहन केलेय.

 

 
लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला उद्या पुण्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी पुण्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध कार्यक्रमांना ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत.


लोकसभा अध्‍यक्ष बिर्ला सकाळी  8.10 मिनिटांनी पुणे येथे पोहोचतील. सकाळी 9.40 ते 10.20 वाजेपर्यंत ते राजभवनामध्ये मान्यवरांची भेट घेतील. सकाळी 10.35 ते 10.55 पर्यंत ते येरवडा येथील अग्रवाल प्रशालेमध्‍ये जाणार आहेत. सकाळी 11.00 ते 12.30 पर्यंत अध्‍यक्ष बिर्ला येरवडा येथील डेक्‍कन मैदानावर अग्रवाल समाजाच्‍या संमेलनामध्‍ये सहभागी होतील.

Maharashtra Corona Updates: राज्यात 23 नवीन रुग्णांचे निदान तर 23 रुग्ण बरे होऊन घरी

आज २३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८७,८९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१७% एवढे झाले आहे.
• आज राज्यात २३ नवीन रुग्णांचे निदान .
• राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या- जिल्हाधिकारी भोसले

अहमदनगर - चीनमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढल्याने देशातील आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी देवस्थान येथे मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी गजेण्याचे आवाहन केले जात असताना अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनीही जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे... गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे फार नुकसान झालेला आहे, त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन आहे की कोरोनाचा प्रसार कमी होण्याच्या दृष्टिकोनातून मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे आणि विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी महिलेवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशीद या तथाकथित समाजसेविकेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात आता पिटा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत. रिदा रशीद या मुंब्रा परिसरात समाजसेविका म्हणून वावरत आहे. त्यांच्याकडे घटस्फ़ोटित महिला नोकरीसाठी गेली असता त्यांना हॉटेलमध्ये गैरकृत्य करण्यास पाठविण्यात आल्याची तक्रार महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून तथाकथित समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. १२०४ भादंवि ३७०(ए), पॉक्सो अंतर्गत कलम ४, १०, ६, आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र मुंब्रा पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.


 

शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीने मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाला सुरुवात 

मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महा अधिवेशनाला आज परभणीत सुरुवात झाली आहे शहरातून शोभायात्रा व ग्रंथ दिंडी काढून या अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुतल्यापासून निघालेल्या भव्य शोभायात्रेत हजारो समाजबांधव सहभागी होते. विशेषतः या यात्रेतील सजीव देखावे, हलगी पथक व पारंपारिक लोककलेतील कलावंतांनी एका सरस एक सुंदर अशा कला सादर करीत परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले.या शोभायात्रेत भगवे फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांसह समाजबांधव शिस्तबध्द पध्दतीने सहभागी होते. या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सजीव देखावे लक्षवेधीच ठरले. विशेषतः चिमुकल्यांनी माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी वेशभूषा साकारली. तर एका कलावंताने काठ्यांची आत्मसंरक्षणाची सुंदर प्रात्याक्षिके ठिकठिकाणी सादर केली. तसेच पारंपारिक लोककला सादर करणार्‍या गोंधळींनी, कलावंतांनी एका सरस एक कला सादर केल्या. पुढचे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे.

लेखी आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांचे आंदोलन मागे
Ravikant Tupkar: पिक विमा परतावा मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी रविकांत तुपकर आणि आंदोलन शेतकरी यांनी कृषी विभागाचे कार्यालय ताब्यात घेतलं होतं जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नसल्याच्या निर्णयावर आंदोलनक ठाम होते. गेल्या वर्षीचा विमा कंपनीकडे विमा परतावा थकीत होता त्याचबरोबर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना तोकड्या स्वरूपाचा विमा परतावा विमा कंपनीने दिला आहे. तो विमा परतावा मिळावा आणि गेल्या वर्षीचा थकीत विमा मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी कृषी अधिकारी त्याचबरोबर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. अखेर कृषी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसाच्या आत पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जर पंधरा दिवसात पिक विमा मिळाला नाही तर आज महात्मा गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने आलेलो आहोत उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही
 पत्रकार रविश कुमार यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं घेतलं दर्शन

 पत्रकार रविश कुमार यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आहे. त्यांनी पुण्यातून फेसफटका मारत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आज सकाळी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मार्गे आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन त्यांनी मनसोक्त फेसफटका मारला आहे त्यासोबतच या रस्त्यांचीदेखील त्यांनी माहिती घेतली आहे. 

 पत्रकार रविश कुमार यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं घेतलं दर्शन

 पत्रकार रविश कुमार यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आहे. त्यांनी पुण्यातून फेसफटका मारत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आज सकाळी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मार्गे आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन त्यांनी मनसोक्त फेसफटका मारला आहे त्यासोबतच या रस्त्यांचीदेखील त्यांनी माहिती घेतली आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये उपसरपंचाची निवडी सात दिवसात करा, जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश

बीड जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या 704 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मध्ये सरपंचाच्या निवडी झाल्या असून सात दिवसात उपसरपंचाच्या निवडी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले आहेत...निवडणूक झालेल्या सातशे चार ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा 24 आणि 30 डिसेंबर रोजी संपत असल्याने उपसरपंचाच्या निवडी करण्यात येणार आहेत..


ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेतून जरी झाली असली तरी उपसरपंचाची निवड ही सरपंचांना करावी लागणार आहे त्यामुळे विशेष सभा घेऊन सात दिवसात उपसरपंचाची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निवडीमध्ये जर एखाद्या उमेदवाराला समान मत पडली तर त्यामध्ये विशेष मतदान करण्याचा अधिकार सरपंचाला देण्यात आला आहे..त्यामुळे आता गावगाडा चालवण्यासाठी सरपंचाची निवड जरी झाली असली तरी लवकरच उपसरपंचाची निवड देखील होणार आहे..

कोणत्याही कोविड निर्बंधाशिवाय गोव्यात ख्रिसमस व नवीन वर्ष साजरा करता येणार

कोविडच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्ष व ख्रिसमस साजरा करायला येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नसून 2 जानेवारी नंतरच परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

Thane: मुंब्रा येथे खोकला सिरपच्या नशेसाठी खून 

Thane: मुंब्य्रातील रशीद कंपाऊंडमध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपच्या वादातून एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. रशीद कंपाऊंड झंडे वालामध्ये मुंब्रा बायपास टोल नाक्याजवळील बाबा परिसरात रात्री नशेत खोकल्याच्या सिरपवरून वाद झाला. त्यानंतर काही जणांनी आडनावावरून हल्ला केला.शस्त्राने वार करून त्याचा मृत्यू झाला सुरनम हा मूळचा यूपीच्या बहराइच जिल्ह्यातील आहे, मात्र पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून हत्येचा गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.  

बीड जिल्ह्यामध्ये उपसरपंचाच्या निवडी सात दिवसात करण्याचे जिल्हाधिकारी यांचे तहसीलदार यांना आदेश
बीड जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या 704 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मध्ये सरपंचाच्या निवडी झाल्या असून सात दिवसात उपसरपंचाच्या निवडी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले आहेत...निवडणूक झालेल्या सातशे चार ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा 24 आणि 30 डिसेंबर रोजी संपत असल्याने उपसरपंचाच्या निवडी करण्यात येणार आहेत..

 
कोणत्याही कोविड निर्बंधाशिवाय गोव्यात ख्रिसमस व नवीन वर्ष साजरा करता येणार

कोणत्याही कोविड निर्बंधाशिवाय गोव्यात ख्रिसमस व नवीन वर्ष साजरा करता येणार


कोविडच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्ष व ख्रिसमस साजरा करायला येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नसून 2 जानेवारी नंतरच परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितला.

घोडेगावचा जनावरांचा बाजार आजपासून झाला सुरू

लम्पीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती,  गेल्या साडेतीन महिन्यापासून अहमदनगर जिल्ह्यात बंद असलेले जनावरांचे बाजार आता सुरू झालेत... जिल्ह्यात लोणी, वाळकी, घोडेगाव येथे मोठे बाजार भरत असतात आजपासून नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार सुरू झाला आहे... लम्पीच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर 22 पासून घोडेगाव येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता...पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून दिवसभर हा बाजार सुरू असणार आहे... जनावरे बाजारात आणताना पधुपालकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहेत ...जनावरांचे 28 दिवस आधी लसीकरण झालेले असावे, जनावरांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र पशुपालकांकडे असणे बंधनकारक आहे,जनावरांच्या कानात महाराष्ट्र सरकारकडून 12 अंकी क्रमांक असलेला टॅग असणे आवश्यक आहे...लम्पीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले बाजार पुन्हा सुरू झाल्याने पशुपालक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.

विठ्ठल मंदिर अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक , भाविकांनाही मास्क परिधान करण्याचे मंदिर प्रशासनाकडून आवाहन

चीनसह काही देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. मात्र भाविकांना मंदीरात दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन अप्पर जिल्हा अधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी चर्चा केल्यावर प्रशासनाने आज या निर्णयाची माहिती दिली आहे. आजपासून विठ्ठल मंदिरातील सर्व अधिकारी, कर्मचारी अगदी देवाजवळ बसणाऱ्या पुजाऱ्यानाही मास्क वापर सक्तीचा करण्यात आला आहे. भाविकांनी स्वतःचे व सामाजिक आरोग्य जपण्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. उद्यापासून दर्शन रांगेतील ज्या भाविकांना मास्क नसेल त्याला मंदिर समितीच्या वतीने सर्जिकल मास्कचे वितरण केले जाणार असले तरी भाविकांनी दर्शनाला येताना आणि गर्दीत फिरताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन तुषार ठोंबरे यांनी केले आहे . प्रशासनाने केलेल्या या वाहनाचे विठ्ठल भक्तांच्या कडून स्वागत करण्यात येत आहे. मास्कचा फायदा प्रत्येक भाविकाला होणार असल्याने मास्क वापराबाबत केलेले वाहनामुळे आता यापुढे आम्ही दर्शनाला येताना मास्क घालून येऊ अश्या प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या आहेत. कोरोनाचा धोका वाढण्याच्या भीतीने आज देखील अनेक भाविकांनी मास्क परिधान करूनच दर्शन घेतले आहे. सध्या नाताळाच्या सुट्ट्यांमुळे देशभरातून रोज दोन ते अडीच लाख भाविक आणि पर्यटक धार्मिक पर्यटनासाठी पंढरपूरला येत आहेत. यामध्ये जेष्ठ नागरिक त्याचबरोबर लहान मुले यांची संख्या जास्त असल्याने मंदिराने मास्क बाबत घेतलेल्या निर्णयाचा फायदा भाविकांनाच मिळणार आहे .

सेन्सेक्स 980 अंकांनी खाली घसरत 60 हजारांखाली बंद

सेन्सेक्स 980 अंकांनी खाली घसरत 60 हजारांखाली बंद, सेन्सेक्सचा निर्देशांक 59 हजार 845 अंकांवर बंद तर निफ्टीत 321 अंकांनीघसरत 17 हजार 807 अंकांवर बंद. निफ्टी बॅंक निर्देशांकाही मोठी पडझड, निफ्टी बॅंक 741 अंकांनी खाली जात 41 हजार 668 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारात मागील 3 महिन्यातील एका दिवसातील सर्वात मोठी पडझड , मोठ्या प्रमाणात समभागांची विक्रीत होत असल्यानं निर्देशांकात आपटला

नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला दिलासा कायम, कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु ठेवण्यासाठी 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ 

Nawab Malik News : नवाब मलिक यांचा रुग्णालयातील मुक्काम 6 जानेवारीपर्यंत वाढला


नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला दिलासा कायम


कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु ठेवण्याकरता मुदतवाढ 


जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना तपास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते 


मात्र डॉक्टर काही कारणास्तव हजर न राहू शकल्याने अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही


मलिक यांची एक किडनी निकामी झाली असून त्यांच्यावर बऱ्याच महिन्यांपासून उपचार सुरु आहेत

नांदेडमध्ये अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्यांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला, नायब तहसीदारास चालत्या वाहनाखाली फेकण्याचा प्रयत्न, घटना कॅमऱ्यात कैद
Nanded News : मुखेड तालुक्यातील जांब बुद्रूक येथे काल मध्यरात्री 12 च्या सुमारास महसूल पथकाने अवैध गौनखनिज उत्खनन करुन (मुरूम) वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. या कार्यवाही दरम्यान गौण खनिज माफियांनी महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करत, मारहाण करुन नायब तहसीलदारासह एकास चालत्या वाहनाखाली फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीची घटना कॅमऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान अशाप्रकारे अवैध गौनखनिज उत्खनन करणाऱ्या माफियांनी महसूल प्रशसनावर जीवघेणा हल्ला करण्याची ही पहिलीच घटना नसून हे गौण खनिज माफिया नुसते उत्खनन करुन शांत न बसता आता नैसर्गिक साधन संपत्ती असणारे भले मोठे डोंगर आणि माळ सुद्धा पोखरत आहेत. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Disha Salian: आदित्य ठाकरे यांनी दिशा प्रकरणी बोलावे, सत्य बाहेर येत राहिल, अनिल परब यांच्या ट्वीटची चौकशी करा; भाजप आमदार नितेश राणे यांची मागणी

आदित्य ठाकरे यांनी दिशा प्रकरणी बोलावे, त्यातून सत्य बाहेर येत राहील असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले. शिवसेना नेते अनिल परब यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली. एसआयटीमधून चौकशी बाहेर येणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीस आमदार मुक्ता टिळकांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दिल्लीला रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार मुक्ता टिळकांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दिल्लीला रवाना झाले आहे. नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे ते नागपूरला जातील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पुण्यातून दिल्लीला गेल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीसांच्या अचानक दिल्ली जाण्याचं कारण अस्पष्ट आहे. 

परभणीत जैन समाजाचा विराट मुक मोर्चा, सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र करण्यास विरोध

जैन धर्मियांचे शाश्वत जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र बनविण्याच्या विरोधात,तसेच शाश्वत गिरीराज शत्रुंजय गिरनार तीर्थरक्षे साठी परभणीत सकल जैन समाजाने विराट मुक मोर्चा काढला आहे. परभणी शहरातील जैन स्तंभ गांधी पार्क येथून हा मुक मोर्चा निघून शहरातील।प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.हातात निषेधाचे फलक घेऊन जैन समाजातील महिला,पुरुष,तरुण,वृद्ध मोठ्या संख्येने या मुक मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले..

मुक्ता टिळकांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी- देवेंद्र फडणवीस

मुक्ता टिळकांचं निधन आमच्यासाठी अत्यंत दुखाची बातमी आहे. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटटलावर संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून त्यांनी चांगल काम केलं. टिळकांचा वासरा त्यांनी चांगला निभावला. सामान्य कार्यकर्तीपासून मोठ्या पदावर स्वत:च्या मेहनतीने पोहचल्या. कल्पक आणि चांगल्या वक्त्या होत्या. त्या अर्ध्या वाटेत सोडून जातील असं वाटलं नव्हत. राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी रुग्णवाहिकेतून त्या मतदानासाठी आल्या होत्या. पक्षाला आवश्यकता असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचं  निधन म्हणजे पक्षाची मोठी हानी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी शोक व्यक्त केला आहे. गिरिष बापटांची प्रकृती ठिक आहे. ते लवकरच बरे होतील, असं डॉक्टरांनी सांगितल्याचंही ते म्हणाले.

आमदार मुक्ता टिळक यांचं पार्थीवाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

आमदार मुक्ता टिळक यांचं पार्थीवाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन पोहोचले आहे. पुण्याच्या केसरी वाड्यात त्यांचं पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. 

गिरीश बापटांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी नेते मंडळी रुग्णालयात

पुण्याचे खासदार गिरीश बापट गेल्या पंधरा दिवसापासून दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. त्यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रकांत दादा पाटील  दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. त्यानंतर आमदार  मुक्ता टिळकांच्या अत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीसाठी रवाना होणार आहेत. 

Beed News: ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्विक टाकल्यामुळे थांबवण्यात आली मतदान प्रक्रिया आज पुन्हा सुरु
Beed News: 18 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक मतदानावेळी बीड जिल्ह्यातल्या लिंबागणेश गावामध्ये एका उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटणावर अज्ञाताने खोडसाळपणा करत फेविक्विक टाकल्यानं मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. लिंबागणेश येथील गणेश वाणी हे वार्ड क्रमांक दोनमधून सरपंच पदाचे उमेदवार होते आणि त्यांच्या चिन्ह समोरील बटनावर फेवक्विक टाकण्यात आल होत आणि त्यानंतर वाणी यांनी फेर मतदान घेण्याची मागणी केली होती.

 

त्यामुळे आज वार्ड क्रमांक दोन साठी फेर मतदान होत असून त्याचा निकाल संध्याकाळी आठ वाजता बीड मध्ये लागणार आहे. सकाळपासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून या मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर वरिष्ठ अधिकारी देखील तळ ठोकून आहेत. 

 
Shivshahi : शिवशाही आजपासून मुंबई ते गोवा धावणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

Shivshahi : शिवशाही आजपासून मुंबई ते गोवा धावणार आहे.  ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त एसटी महामंडळाकडून भेट देण्यात आली आहे  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ट्विट करुन माहिती दिली आहे. 


 





Mohit Kamboj: भाजप नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचिट

Mohit Kamboj: भाजप नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचिट दिलीय. पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातला वाद वाढला होता. दरम्यान, कथित बँक घोटाळा आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणातही मोहित कंबोज यांना क्लीनचिट देण्यात आलीय.

सीमाबांधवांचा सच्चा कैवारी हरपला, ॲड. राम आपटे यांचे निधन
Mahadev Apte: सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य आणि  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड राम महादेव आपटे (दादा) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. देहदान केल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत अंतीम दर्शनासाठी घरी पार्थिव ठेवण्यात येईल. सीमा प्रश्नाच्या दाव्याचा मसुदा तयार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी   आपली संपूर्ण हयात सीमा प्रश्नाच्या  सोडवणुकीसाठी खर्ची घातली . सीमा प्रश्नाचा संपूर्ण इतिहास मांडणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहिले होते सध्याच्या परिस्थितीत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी या पुस्तकाची मोलाची मदत होणार आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून व्यापक कार्य केले होते. कामगारांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी त्यांनी अखंड लढा दिला होता. त्यामुळे ते कामगार नेते म्हणूनही परिचित होते. त्यांच्या निधनामुळे बेळगावातील सीमा बांधवांचा सच्चा कैवारी हरपला आहे.

 


Elections 2022: संगलट येथील मतदान यंत्रातील चीप बदलली, खेड तहसीलदारांकडे ग्रामस्थांची तक्रार

Elections 2022: संगलट ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रातील चीप बदलली गेल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी खेड तहसीलदार यांच्यासह निवडणूक आयोगाकडे केली आहे..

बीडच्या लिंबागणेशमधील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मतदानाला सुरुवात, ईव्हीएममध्ये फेविक्विक टाकल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवली होती

Beed News : ईव्हीएममध्ये फेविक्विक टाकल्यामुळे थांबवण्यात आलेल्या मतदानाला सुरुवात झाली आहे. बीडच्या लिंबागणेशमध्ये मतदानादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर वॉर्ड क्रमांक दोनची मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. या ठिकाणी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

मनसूख हिरेन आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील आरोपी रियाजुद्दीन काझीच्या जामीन अर्जावर आज निकाल

Mansukh Hiren Death Case : बडतर्फ पोलीस शिपाई रियाजुद्दीन काझीने हायकोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली असून कोर्ट त्यावर आज निकाल देणार आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर गाडीत स्फोटकं आणि त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेसह पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरुन रियाजुद्दीन काझीला अटक करण्यात आली होती.

इंदापूर तालुक्यातील गोखळी गावात वानराचा धुमाकूळ

Indapur News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गोखळी गावात वानराने धुमाकूळ घातला आहे. हे वानर रस्त्याने ये-जा करणाऱ्या माणसांना तसेच पाळीव जनावरांवर अचानक येऊन हल्ला करुन जखमी करत आहे. वानर एवढ्यावरचं थांबत नाही तर थेट घरात घुसून भाकरीवर देखील ताव मारत आहे. या वानाराला ग्रामस्थ पुरते हैराण झाले आहेत. उपद्रवी वानराला वनविभागाने तातडीने उपाययोजना करुन वनीकरणात मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविय आज दुपारी 3 वाजता राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत कोविड-19 परिस्थिती आणि तयारीबाबत बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. 



मुरबाडच्या म्हसा यात्रेत यंदा बैलांचा बाजार नाही, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Thane News : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा गावच्या जत्रेत यंदा गाय, बैलांचा बाजार भरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. तब्बल 350 वर्षांची परंपरा असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा गावात दरवर्षी पौष पौर्णिमेपासून मोठी यात्रा भरते. तब्बल 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत गुरांचा बाजार हे मोठं आकर्षण असतं. या बाजारात ठाण्यासह नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमधूनही गुरं खरेदी विक्रीसाठी येत असतात. मात्र यंदा लम्पीच्या प्रादुर्भावामुळे या यात्रेत भरणाऱ्या गुरांच्या बाजारात गाय, बैल यांचा समावेश मात्र असणार नाहीये. कोंबड्या, शेळ्या, बकऱ्या यांचा समावेश या गुरांच्या बाजारात असणार आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र पोहरादेवी विकास आराखडा शिखर समितीची बैठक संपन्न, उपमुख्यमंत्री उपस्थित

Nagpur/Washim News : बंजारा समाजाची काशी तथा श्रीक्षेत्र पोहरादेवी विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नागपूर विधानभवनात संपन्न झाली. यावेळी बंजारा धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज, मंत्री संजय राठोड, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे साहेब, मंत्री रविंद्र चव्हाण, आ.राजेंद्र पाटणी, श्री वाशिम, श्री विनोद राठोड सरपंच तीर्थक्षेत्र पोहरादेवी उपस्थित होते. या बैठकीत विकासाबाबत चर्चा करण्यात आली.

Winter Session: हिवाळी अधिवेशनात विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता

Winter Session: आज होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधक सभागृहात न जाता बाहेर राहून आंदोलन करण्याची शक्यता. दरम्यान विरोधकाकडून प्रतिसभागृह करण्याची देखील शक्यता आहे. 

CoronaVirus:  गर्दी करु नये, मास्कचा वापरा : आरोग्यमंत्री

CoronaVirus:  'परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचं विमानतळांवर थर्मल टेस्टिंग होणार', काळजीपोटी खबरदारी घेतली जातेय, घाबरण्याचं कारणं नाही. गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, मास्कचा वापर करावा. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आवाहन केले आहे

राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या केरळच्या दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Nagpur News : राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या केरळच्या दहा वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. फातिमा निदा शहाबुद्दीन असे दहा वर्षीय बालिकेचे नाव असून ती केरळमधील अलपी जिल्ह्याची रहिवासी होती. नागपुरातील सद्भावनानगर मैदानावर सायकल पोलो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी ती आपल्या संघासह नागपुरात आली होती. मात्र आदल्या दिवशी रात्री तिला उलटी होऊन अस्वस्थ वाटत होते. काल तिला रुग्णालयात नेण्यात आले तिथे तिला उपचारादरम्यान इंजेक्शन देण्यात आले. मात्र, कालच काही तासांनी तिची प्रकृती बिघडली आणि ती अचानकच कोसळली. याप्रकरणी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आज फातिमाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर, तीन महिन्यात दुसऱ्यांदा राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.  या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.. तसंच पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देखील देण्यात येणार आहेत.सायंकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका होणार आहेत.  दरम्यान हिवाळी अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर  आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.. याआधी सप्टेंबर महिन्यातही राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची नेमणूक असं त्यांच्या दौऱ्याचं उद्दिष्ट आहे. सकाळी 10 वाजता नागपुरात त्यांचं आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका आहेत. राज ठाकरे सकाळी 7 वाजता त्यांच्या मुंबईतील घरातून निघणार आहेत.


आमदार मुक्ता टिळकांवर आज अंतिम संस्कार


आमदार मुक्ता टिळक यांचे पार्थिव सकाळी 9 ते 11 या कालावधीत पुण्यातील केसरी वाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटने कृषी अध्यक्ष कार्यालयावर मोर्चा 
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अध्यक्ष कार्यालयावर शेकडो शेतकरी घेऊन मोर्चा काढला जाणार आहे. पिक विमासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर सहभागी होणार असून गोरेगावपासून ते हिंगोली पर्यंत रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या गाड्यांचा ताफा येणार आहे. पोलिस हा ताफा अडवण्याची शक्यता आहे,  दुपारी 1 वाजता. 


मराठा सेवा संघच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात


परभणी- मराठा सेवा संघच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आज शोभायात्रा व ग्रंथदिंडी चे आयोजन करण्यात आले आहे.  दुपारी 3 वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही शोभा यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेत छत्रपती शिवरायांचा सजीव देखावा, छत्रपती शिवरायांची मूर्ती, हलगी पथक,घोडेस्वार, लेझीम पथक, वारकरी, वासुदेव, गोंधळी बॅन्ड सहभागी होणार आहेत. 


महाराष्ट्र राज्य किसान सभेची आज पदयात्रा 
 
वर्धा- महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी ते नागपूर पदयात्रा करत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरिता संघर्ष दिंडी पदयात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. आज वर्धा जिल्ह्यातील बरबट्टी येथून निघत ही पदयात्रा नागपूर विधानभवनवर जाणार आहे. या पदयात्रेत अनेक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत, सकाळी 10 वाजता.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.