Maharashtra News Updates 22 December 2022 : सीमाप्रश्नाच्या विरोधात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा ठराव, महाराष्ट्रातील नेते वातावरण बिघडवत असल्याचा दावा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Dec 2022 09:29 PM
गाडीचा टायर फुटल्याने बहिण-भावाचा मृत्यू

गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात भावा बहिणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे सोलापूर हायवेवर दौंड तालुक्यातील मळद येथे घडली. पुण्याकडून सोलापूर दिशेला भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडी दुभाजकावरून विरोध बाजूच्या लेनवरून येणाऱ्या कंटेनरला जावून धडकल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट मधील चुलत बहिण व भाऊ मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिल्पा तुलशी गिरी आणि गौरव गिरी या बहिण भावाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. गुरुवारी  सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने प्रवास करीत असताना अचानक स्विफ्टचा टायर फुटला. त्यामुळे स्विफ्ट दुभाजक ओलांडून विरोधी बाजूच्या सोलापूर लेनवरील कंटेनरला जावुन जोरात धडकली.  या घटनेत स्विफ्टमधील शिल्पा ही अपघात या गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर गाडी चालविणारा तिचा भाऊ साधव  याचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

केंद्रीय आरोग्य सचिवांचे नागरी हवाई उड्डाण सचिवांना पत्र 

केंद्रीय आरोग्य सचिवांचे नागरी हवाई उड्डाण सचिवांना पत्र, जपान, दक्षिण कोरीया, फ्रांस, ब्राझिल आणि चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं पत्र 


प्रत्येक फ्लाईटमधून येणाऱ्या 2 टक्के प्रवाश्यांची विमानतळावर तपासणी करण्यात येणार


चाचणीसाठी रॅन्डम प्रवाशांची निवड एअरलाइन्स ऑपरेटरच करणार


अशा प्रवाशांनी आपले नमुने दिल्यानंतर त्यांना विमानतळ सोडण्याची परवानगी असेल 


पाॅझिटिव्ह असलेल्या नमुन्यांची माहिती प्रयोगशाळेनं एनसीडीसीला देखील द्यावी आणि राज्य सरकारांना देखील त्याबाबतीत सुचित करण्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना


पाॅझिटिव्ह आलेल्या प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग करीता पाठवावे 


२४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ही व्यवस्था विमानतळांवर कार्यान्वित केली जाणार 


कोव्हिड चाचणी प्रक्रिया नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर माफक दरात उपलब्ध करण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रातून विनंती

अमोल मिटकरी यांची जीभ परत घसरली

अमोल मिटकरी यांची जीभ परत घसरली, राज्यपाल बोगस माणूस आहे असला उल्लेख केला ..


राज्यपालची तुलना संत्रा फोखरणाऱ्या कोळशी रोगाच्या माशीची केली..



जशी कोळशीची माशी संत्रा पोखरते तशी काळी टोपीची  लोकांचे डोकं पोखरते...(अप्रत्यक्ष संघावर टीका )

Beed News: बैलगाडी तलावात बुडाल्याने शेतात निघालेल्या आजोबासह नातवाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Beed News: शेतात जात असताना रानडुकराच्या भीतीने बैलांनी थेट गाडी तळ्यात ओढली आणि यामध्ये तळ्यातील पाण्यात बुडून आजोबासह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातील कासारी गावात घडली आहे.. कबीर सय्यद हे आपल्या दोन नातवासह बैलगाडी घेऊन शेतात जात असताना बैलगाडी तलावाच्या जवळ आली असता अचानक रानडुकरांनी बैलावर हल्ला केला आणि यामध्ये घाबरलेल्या बैलांनी बैलगाडी थेट तलावाकडे ओढली आणि यातच पाण्यात बुडून कबीर सय्यद आणि त्यांचा बारा वर्षाच्या नातू आतिक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर दहा वर्षाचा अखिल यामध्ये बचावला असून तो बैलावर बसून पाण्याच्या बाहेर आला आणि त्यांनी या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली..

जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर


सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


भूखंड घोटाळा बाबतीत जयंत पाटील प्रश्न मांडत होते, हा घोटाळा उघड होईल म्हणून त्यांच्यावर कारवाई


राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांची प्रतिक्रिय

बैलगाडी तलावात बुडाल्यानो शेतात निघालेल्या आजोबासह नातवाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

बैलगाडी तलावात बुडाल्यानो शेतात निघालेल्या आजोबासह नातवाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू


शेतात जात असताना रानडुकराच्या भीतीने बैलांनी थेट गाडी तळ्यात ओढली आणि यामध्ये तळ्यातील पाण्यात बुडून आजोबासह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातील कासारी गावात घडली आहे..


कबीर सय्यद हे आपल्या दोन नातवासह बैलगाडी घेऊन शेतात जात असताना बैलगाडी तलावाच्या जवळ आली असता अचानक रानडुकरांनी बैलावर हल्ला केला आणि यामध्ये घाबरलेल्या बैलांनी बैलगाडी थेट तलावाकडे ओढली आणि यातच पाण्यात बुडून कबीर सय्यद आणि त्यांचा बारा वर्षाच्या नातू आतिक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर दहा वर्षाचा अखिल यामध्ये बचावला असून तो बैलावर बसून पाण्याच्या बाहेर आला आणि त्यांनी या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली..

कर्नाटकाच्या विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माडला, तो सर्वसंमतीने मंजुर झालाय 

कर्नाटकाच्या विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माडला, तो सर्वसंमतीने मंजुर झालाय.
 कर्नाटकाची एक इंच ही जागा देणार नसल्याच्या भूमिकेचा बोम्मई यांनी ठराव मांडताना पुनरुच्चार केलाय. यापुढील काळात कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची परवा केली जाणार नाही असा इशारीही मुख्यमंत्र्यांनी दिलाय.  मुख्यमंत्र्यांनी सभागृहात महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्तनाचा निषेध करणारा निषेध ठराव मांडला आणि सदर ठराव एकमतीने मंजूर करण्यात आलाय.

Maharashtra Karnataka Border Dispute: सीमाप्रश्नाच्या विरोधात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा ठराव, महाराष्ट्रातील नेते वातावरण बिघडवत असल्याचा दावा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत ठराव मांडला. महाराष्ट्रातील नेते बेळगाात येऊन वातावरण बिघडवत असल्याची टीकाही त्यांनी केली. कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद आता उरला नसून कर्नाटकातील सीमाभागात सगळे काही सुरळीत चालले आहे. राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्याची पुनर्रचना होताना जनतेच्या भावना जाणून घेऊन राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे असं ते म्हणाले. महाजन अहवाल हाच अंतिम आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली होती तो उद्देश बाजूला गेला आहे. समितीला कोणाचाही पाठिंबा नसल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नाबाबत ठराव मांडला.

प्रविण बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

लेखक प्रविण बांदेकर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर कऱण्यात आला आहे. 

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात उद्यापासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्तीचा

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात उद्यापासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्तीचा


पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय


भाविकांना मात्र अद्याप सक्ती नाही


जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा महत्त्वाचा निर्णय


पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार

धुळे - वक्फ बोर्डाच्या विषयावर खडाजंगी

धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात  महासभा घेण्यात आली या महासभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असतांनाच, सत्ताधारी भाजप सदस्यांच्या मागणी पत्रावरून आलेल्या विषय क्रमांक १८७  यावर शहरातील विविध भागात असलेल्या वक्फ बोर्डाच्या विषयावर खडाजंगी पाहायला मिळाली.


धुळे शहरातील वक्फ बोर्डाच्या जागेवरील ३० ते ४० वर्षापासून रहिवास करत असलेल्या नागरिकांना मालकी हक्काने जागा देण्याकरिता शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा अशी मागणी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी केली, यावरून विरोधी पक्षातील अल्पसंख्यांक नगरसेवकांनी या ठरावास तीव्र विरोध दर्शविला तसेच धुळे महानगरपालिकेला अशा प्रकारचा ठराव करण्याचे अधिकार नाही म्हणत त्यांनी या ठरावास विरोध दर्शवल्याने सत्ताधारी भाजप नगरसेवक व विरोधक नगरसेवक आमने सामने आल्याने  सभागृहात बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी सभागृहातीळ ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्ती करत दोघेही पक्षाच्या सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी मंगळसूत्र चोरी करणारे तीन गुन्ह्यातील पाच आरोपी अटकेत, चोरट्यांकडून 14 तोळ्यांचे दागिने हस्तगत

सोलापुरातील बाळे परिसरातील खंडोबा मंदिर आणि एस.टी स्टँड येथील गर्दीचा फायदा घेऊन सोने साखळी, गंठन, मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल तीन गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करण्यात आलीय. यामध्ये आरोपीकडून पोलिसांनी 14 तोळे सोने असा एकूण चार लाख 2 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. संजय जाधव, कावेरी  जाधव, सुचित्रा जाधव, अश्विनी जाधव, पुष्पा गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची नावे आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या या तीन गुन्ह्यातील आरोपी सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने या आरोपींना अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांनी दिली.

Navneet Rana News : खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची टांगती तलवार कायम 

Navneet Rana News : खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची टांगती तलवार कायम 


नवनीत राणांविरोधात जारी जामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाचे पोलिसांना निर्देश


सध्या संसदेचं अधिवेशन सुरु असल्याने नवनीत राणा आजही कोर्टात उपस्थित राहू शकल्या नाहीत


तसेच त्यांचे वडील हे सध्या तीर्थयात्रेला गेल्याची कोर्टात वकिलांची माहिती 


याप्रकरणी पुढील सुनवणी 28 डिसेंबरपर्यंत तहकूब

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बैठकीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या नेत्यांची पाठ

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बैठकीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या नेत्यांची पाठ.


सरकारविरोधात आक्रमक भुमिका घेत नसल्यामुळे तसेच सभेत सभागृहात बोलायला मिळतं नसल्यामुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती.


सकाळी 10 वाजता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. 

Solapur News: सोलापुरातील तब्बल दोन लाखांची लाच घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास अटक

Solapur News: सोलापुरातील तब्बल दोन लाखांची लाच घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास अटक.


अजित वसंतराव पाटील असे या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याचे नाव.


स्थानिक नागरिकांनी कारखान्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरिता तसेच परवाना देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.


काल रात्री दोन लाखांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडलं.


साखर कारखान्याकडून हवा आणि पाणी प्रदूषण होत असल्याबाबत कारखान्याच्या आजूबाजूच्या लोकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या.


तसेच साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन नूतनीकरण करावयाचे होते.


मात्र यासाठी उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर काल बुधवारी रात्री रचला होता सापळा. 


तक्रारदाराकडून रोख 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहात पकडत त्याच्यावर कारवाई केली. 

Amravati News: दोन दिवसापासून दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथील विहीरीत पडली नीलगाय

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील धामोडी परिसरातील मोहम्मदपूर अटकरी येथे विहिरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक निलगाय पडलेली असून विहिरीमध्ये गाळ असल्यामुळे ती विहीरीतच गोल गोल फिरत असताना दिसून येत आहे. वन्यजीव बचाव व संरक्षण करणाऱ्या टीमला अमरावती येथून पाचारण करण्यात आले, परंतु अद्यापपर्यंत रेस्क्यू टीम धामोडी परिसरात दाखल झालेली नाही, 


काही वन्यजीव प्रेमी ग्रामस्थ त्या नीलगाईला चारापाणी वरून देत असल्यामुळे ती सध्या जिवंत आहे, गावकऱ्यांनी तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पूरेशी साधने आणि मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांना या कामात यश आले नाही, तेव्हा वन्यजीव प्रेमींचे लक्ष अमरावती येथून रेसिक्यु टीम कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागली आहे.

परभणीतल शिक्षकाने रोखली अंगणवाडीतील गॅस गळती
Parbhani News : अंगणवाडीमध्ये स्वयंपाक सुरु असतानाच गॅस गळती सुरु झाली अन् शेगडीने पेट घेतला, ज्यामुळे अंगणवाडी सेविका आणि 15 चिमुकले घाबरुन गेले. मात्र याच वेळी या परिसरातून जाणाऱ्या एका शिक्षकाने धाडस केले आणि गॅस रेग्युलेटर बंद केले ज्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा सर्व प्रकार घडलाय परभणीच्या जिंतूर तालुक्यातील फुलवाडी येथील अंगणवाडीत.  परभणीच्या जिंतूर तालुक्यातील फुलवाडी येथील अंगणवाडीत काल सकाळी नऊच्या सुमारास बालकांसाठी अन्न शिजवण्याचे काम चालू असताना अचानक गॅस सिलेंडर ने पेट घेतला. यावेळी अंगणवाडीपासून दुसर्‍या गावात शाळेत जात असताना शिक्षक प्रविण भुजंग राठोड वय (27वर्ष) यांना बालकांची आरडाओरड ऐकू आला. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने बालकांना बाहेर काढलं. त्यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून पेटलेल्या सिलेंडरचा कॉक बंद केला. त्यामुळे सिलेंडर ची आग आटोक्यात येऊन मोठा अनर्थ ठळला. परंतू यामध्ये शिक्षकाचा डावा हात भाजून मोठी इजा पोहोचली आहे. आगीचा हा थरार साधारण आर्धा तास चालू असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
बुलढाण्याच्या खामगावात चांदीचे भाव वाढले, चांदीचे दर 65 हजारांवरुन 70,200 रुपये प्रतिकिलो

Buldhana News : दिवसेंदिवस सोन्याच्या भावात वाढ होत असताना आता चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी म्हणून असलेल्या आणि देशातील चांदीची मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव शहरात चांदीचे भावात मोठी वाढ झाल्याचं व्यापारी सांगत आहे.  चांदीचा कालचा भाव प्रतिकिलो 70,200 इतका होता. गेल्या महिन्यात हाच भाव जवळपास 63 ते 64 हजार रुपये प्रतिकिलोच्या घरात असताना मात्र आता अचानक भाववाढ झाली आहे. याची वेगवेगळी कारणे व्यापारी सांगत आहेत. जगभरात कोरोना संकटाने पुन्हा आगमन केल्याने ढासळलेला शेअर बाजार हे प्रमुख कारण मानलं जात आहे.

बीडच्या अंबाजोगाईमध्ये भरधाव कार ऊसाच्या ट्रॉलीच्या धडकली, भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू


Beed News : बीड जिल्ह्यात भरधाव कार ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात तिघे जण जागीच मृत्युमुखी पडले. बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोरवड पाटीजवळ रात्री हा भीषण अपघात झाला. अंबाजोगाईकडून लातूरकडे भरधाव वेगात चाललेल्या कारने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. घटनास्थळावरून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले. बबन प्रभू राठोड (वय ४५, बिटरगाव, ता. रेणापूर), नंदू माणिक राठोड (वय ३३, बिटरगाव, ता. रेणापूर) आणि राहुल सुधाकर मुंडे (वय ३१, वंजारवाडी, ता. रेणापूर) अशी मृतांची नावं आहेत.


Urfi Javed : बिहारमधून उर्फी जावेदला धमकावत होता तरुण, बलात्कार आणि खुनाच्या धमक्या, मुंबई पोलिसांकडून अटक

Urfi Javed : सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदला (Urfi Javed) वारंवार जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या संदर्भात उर्फी जावेद हिने गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) फिर्याद दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी बिहारमधील (Bihar) पाटणा येथून नवीन गिरी नावाच्या तरुणाला अटक केली. उर्फीने तक्रार केली होती की, आरोपी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर सतत अश्लील भाषेचा वापर करून धमकी देत ​​आहे. तसेच उर्फी म्हणाली की, आरोपी तिच्या फॅशन स्टाइलवरही आक्षेप घेत होता.

धुळे जिल्ह्याचा पारा घसरला, तापमान दहा अंशांवर; ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

Dhule Cold : धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा पंधरा ते सतरा अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र आता पुन्हा एकदा दहा अंशावर तापमान येऊन पोहोचला आहे. वातावरणातील गाराठा वाढू लागला आहे, याचा परिणाम जनजीवनावर मोठ्या प्रमाणावर झाला असून लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या आजारपणात वाढ होऊ लागली आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर देखील होऊ लागला असून गहू आणि इतर पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

जळगावात सोन्याचे दर आणखी वधारले, जीएसटीसह दहा ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार 650 रुपये

Jalgaon Gold Rate : सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. आज दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी ४९००० रुपये तर जीएसटीसह हेच दर ५६६५० रुपये इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात वाढीच्या कारणबाबत व्यापाऱ्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या चीनमध्ये पुन्हा वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, दुसरीकडे वधारलेला डॉलरचा दर, तिसरे कारण म्हणजे अमेरिकन फेडरल बँकांचे व्याजदर विषयक धोरण आणि चौथे कारण म्हणजे तोंडावर आलेला ख्रिसमस. या व्यवसायाशी निगडित जगभरात असलेले अनेक व्यावसायिक सध्या ख्रिसमस सणात व्यस्त असल्याने सोन्याच्या आवक आणि जावकीवर त्याचा परिणाम होऊन सोन्याच्या मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दोन व्यावसायिक सांगत आहेत. आगामी काळात अजूनही वाढ होण्याचा सोने व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. सोन्याचा दरात झालेली वाढ पाहता ग्राहकांवर त्याचा मोठा परिणाम झालेला नसला तरी सुद्धा सर्वसामान्य ग्राहकांच्या मात्र आवाक्याबाहेरचे हे दर असल्याने त्यांची मोठी निराशा झाली आहे

सोलापुरात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Solapur News : सोलापुरात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ओम संजय मोरे असे आत्महत्या केलेल्या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोलापुरातल्या अभिमनश्री नगर येथे राहणाऱ्या ओमने काल संध्याकाळी आपल्या घरीच गळफास घेतला. ही घटना कळताच नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ओम यांच्या मृत्यूची माहिती कळताच नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनादरम्यान 12 मोर्चे निघणार आहेत. चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढल्यामुळे देशात आणि राज्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जातीये. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे. 


नवनीत राणा कोर्टात हजर राहणार का?
मुंबई – शिवडी दंडाधिकारी कोर्टात नवनीत राणा यांच्याविरोधात दाखल बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं राणा आणि त्यांच्या वडिलांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावलाय तसेच त्यांच्याविरोधात जारी अजामानपात्र वॉरंटही रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आज नवनीत राणा शिवडी कोर्टात हजर राहणार का? 


राज्यात पुन्हा मास्क बंदी?  
चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढल्यामुळे देशात आणि राज्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जातीये. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यात राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार का? इतर राज्यातून विमानातून येणाऱ्या प्रवाशांनी टेस्ट सक्ती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 


विधीमंडळ अधिवेशनात आज 12 मोर्चे 
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज 12 मोर्चे निघणार आहेत. यातला पोलीस पाटील संघटनेचा मोर्चा महत्वाचा असणार आहे. कोकणातील रिफायनरी विरोधक आज नागपुरात एक दिवसाच आंदोलन केलं जाणार आहे. सरकारने मांडलेल्या 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत. 


घोड्यांची शर्यत 
नंदुरबार – सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल मध्ये आज घोड्यांची शर्यत होणार आहे. घोड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो अश्व शैकिन दाखल होणार आहे. दीडशेहून अधिक अश्व यात सहभागी होणार आहेत.


माळेगावची यात्रा
नांदेड – श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगावची यात्रा आजपासून सुरू होणार आहे. दुपारी 2 वाजता शासकीय पूजा करून यात्रेला सुरूवात होईल. देशभरातील विविध राज्यातून घोडा, गाढव, उंट, कुत्रा, मांजर, बैल, गाय म्हैशी घेऊन व्यापारी यात्रेच्या बाजारात सहभागी होतात.


नागपूर – भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचं आज राज्यस्तरीय संम्मेलन असून दिवसभर चालणाऱ्या या संम्मेलनात एका सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित राहणार आहे.


सातारा – देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी रथ पूजन कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इतर मंत्री सुद्धा उपस्थित रहाणार आहेत. 


टोलचा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. टोल वसुलीला विरोध केल्यानंतर आता निलेश राणे आज सकाळी 10 वाजता हातिवले टोल नाक्यावर हजर राहणार आहेत. यावेळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा असे मेसेज सध्या फिरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोलचा प्रश्न आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही


नागपूर - लेखक राजेश कोचरेकर यांनी लिहिलेले नागपूर थंडी, अधिवेशन आणि महासंत्तातर यावर चर्चा - एकाच मंचावर मुख्यमंत्री, बाळा नांदगावकर आणि प्रताप सरनाईक असतील. या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 


राज्यातील सर्व जिल्ह्यांनी टेस्ट- ट्रॅक- ट्रिट -वॅक्सिनेट आणि कोव्हीड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रत्येक आरटीपीसीआर नमुना जीनोम सिक्वेन्सीसाठी पाठवा, आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर आदेश. प्रत्येक जिल्हा /मनपा ने आपले टेस्टिंग वाढवावे टेस्ट मधील आरटीपीसीआर चे प्रमाण वाढवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.  


दिल्ली- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार अलर्ट झालेय. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांनी आपतकालीन बैठक बोलवली आहे.  


लखनौ- यूपीचे सीएम सीएम योगी आदित्यनाथ कोरोनासंदर्भात टीम-9 सोबत बैठक बोलवली. 


भोपाळ- मध्यप्रदेश विधानसभामध्ये काँग्रेसनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर गोंधळ होण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिवराज सिंह सकाळी 11 वाजता उत्तर देणार आहेत. 


श्रद्धा वालकार हत्याकांडातील आरोपी अफताब याच्या जमीनावर साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे. 
 
दिल्ली - धनगर आदिवासी आरक्षणावरून महाराष्ट्राच्या खासदारांमध्ये खडाजंगी


संसदेमध्ये धनगर आणि आदिवासी यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी महाराष्ट्राच्याच खासदारांमध्ये पाहायला मिळाली. शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित जे पालघर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी आपल्या वक्तव्यात धनगरांना एसटीमधूनआरक्षण देण्यास विरोध केला. धनगर हे कसे लाभार्थी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात ज्यांचं सरकार आहे त्यांची भूमिका धनगरांच्या आरक्षण विरोधी असल्याचा आरोप केला. कुठल्याही समाजाचं सध्याचं आरक्षण न हिरावता न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं त्यानंतर शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी देखील पक्षाची भूमिका हीच असल्याचे स्पष्ट केलं. भाजपच्या खासदार हिना गावित यांनी कुठल्याही पद्धतीने आदिवासी आरक्षणात एखाद्या समाजाला सामावून घ्यायचं असेल तर त्याचा निर्णय हा सखोल अभ्यास आणि निष्कर्षाशिवाय व्हायला नको अशी भूमिका मांडली. 


काठमांडू  - तुरुंगातून बाहेर येणार 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज, 19 वर्षापासून नेपाळच्या तुरुंगात कैद - नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. हत्येच्या आरोपाखाली तो 2003 पासून नेपाळी तुरुंगात बंद आहे. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांत त्याला हद्दपार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.