Maharashtra News Updates 21 October 2022 : सगळे उत्सव जोरात साजरे करण्याची कमिटमेंट दिली होती ती पाळली - शिंदे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दिवाळीमुळे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्लॅटफॅार्म तिकिटांच्या किंमतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात वाढ केली आहे. सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकावर प्लॅटफॅार्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आले आहे. अशी माहिती मध्य रेल्वेनं ट्वीट करत दिली आहे.
समाज सुधारक आणि तत्वज्ञ वामनराव पै यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील दामोदर हॉल येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज पासून वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे. त्याचेच औचित्य साधून पुढील एक वर्षात संस्कार शिक्षण अभियान, व्यसन मुक्ती अभियान, ग्राम समृध्दी अभियान, अवयव दान अभियान, कौटुंबिक सौख्य अभियान, बाल संस्कार अभियान, कॉर्पोरेट कोर्सेस राबविण्यात येणार आहेत. आज दामोदर हॉल येथे हजारोंच्या संख्येने वामनराव पै यांचे अनुयायक जमले होते. या सर्व अनुयायांना अमरावती यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रबोधनात्मक भाषण केले. जीवन विद्या मिशन ट्रस्ट तर्फे पुढील एक वर्षासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Coronavirus : राज्यात आज 485 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात 402 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला लागाल तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, जुना देवेंद्र भुयार जागवू नका असा धमकीवजा इशारा मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्थानिक विरोधकांना दिला. आमदार भुयार यांच्या या वक्ताव्याने ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज वरुड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि विधान परिषद आमदार एकनाथ खडसे, आमदार निलेश लंके मंचावर उपस्थित होते. यावेळी स्थानिक विरोधक काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्यावर टीका करतांना आमदार देवेंद्र भुयार यांनी तलवारीने हात छाटण्याचे वक्तव्य हे केले. विशेष म्हणजे आमदार देवेंद्र भुयार हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेला आपल्या गळ्यात घालून होते.
उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील स्वामी शांतीप्रकाश आश्रम रोडवर साहिल श्यामदासानी यांचं मोबाईलचं दुकान आहे. १६ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने दुकानाचं शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे महागडे मोबाईल चोरले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस सध्या चोरट्याचा शोध घेतायत.
शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या संकल्पेतून 10 वर्षंपासून दीपोत्सव साजरा केला जातो. माञ मागील 2 वर्ष कोरोनामुळे सण साजरा करता येत नव्हता. माञ यावेळी मोठया प्रमाणत सण साजरा होतोय, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सगळे उत्सव जोरात साजरे करण्याची कमिटमेंट दिली होती ती पाळली आहे. सर्वजण दबून बसले आता सगळे मोकळे झाले आहेत. प्रत्येक सण मोठ्या प्रमाणत साजरा होतोय. 10 वर्ष आम्हला यायची इच्छा होती पण येता आलं नाही. योगा योग लागतो त्याला, असेही शिंदे म्हणाले.
बदलापूर: कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात चार मुले बुडाली; चारही मुले घाटकोपरमधील असल्याची माहिती
बदलापूर: कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात चार मुले बुडाली; चारही मुले घाटकोपरमधील असल्याची माहिती
Abdul Sattar : अनेक जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. पावसानं मोठं नुकसान केलं आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मी स्वतः सगळीकडे दौरा करणार आहे. एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. 15 दिवसात पंचनामे होतील असे सत्तार म्हणाले. मका, कापूस सोयाबीन नुकसान झालं आहे. ओला दुष्काळाचा अर्थ वेगळा होतो. कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भावना समजून घेत असल्याचे सत्तार म्हणाले.पंचनामे करण्यासाठी सॅटेलाईट पाहणी पद्धत तयार करतोय, भविष्यातील अडचणी यातून दूर होतील मात्र यावेळेस ग्राउंड वर जाऊनच पंचनामे करावे लागतील असे सत्तार म्हणाले.
Bachchu Kadu: प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने ठोठावला 5 हजार रुपयांचा दंड. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने काढले होते अटक वॉरंट. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली. मागील तीन वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित.
Ratnagiri News : सध्या परतीचा पाऊस जिल्ह्यात धुमाकूळ घालत असतानाच ऑक्टोबरमध्ये आंब्याला मोहर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माजगांव येथील आंबा बागेतील कलमांना मोहर आला असून पाऊस सुरु असतानाच आंबा हंगामाची चाहूल लागली आहे. गेल्या आठवड्यातच माजगाव येथील राजेंद्र कदम यांच्या बागेतील एका कलमाच्या फांदीला मोहर निदर्शनास आला होता. मात्र आता दोन्ही कलमांना चांगलाच मोहोर आला आहे. परतीच्या पावसामुळे मोहोर वाचवणे खर्चिक आहे. मोहोर सुरक्षित राहिला तर फळधारणा होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे..
Diwali 2022 : दिवाळीनिमित्त मुंबईच्या बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. घराला लावण्यासाठी तोरण ,कंदील फ्लोर रांगोळी अशा विविध प्रकारची खरेदी मार्केटमध्ये केली जात आहे. दादरमध्ये अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये विविध डिझाईन, विविध रंगांची तोरणं पाहायला मिळतात. शिवाय बाजारात झुंबर कंदीलचा नवीन प्रकार पाहायला मिळतोय ज्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
Diwali 2022 : दिवाळी सण म्हटलं की घराघरात फराळ हा आलाच. मात्र, काही गरिबांना दिवाळी साजरी करता येत नाही. त्यासाठी पनवेल मधील जे मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेतकरी कामगार पक्षानं पनवेलमध्ये विविध ठिकाणी दिवाळीच्या फराळाचे शिधा वाटप केंद्र चालू केले आहे. प्रत्येकाची दिवाळी ही गोड जावी प्रत्येकाला रवा, मैदा, साखर बाजारभावापेक्षा कमी दरात ना नफा ना तोटा या तत्त्वावर याचे वाटप करण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी गेल्या सात वर्षापासून ही योजना राबवली आहे.
Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात एकच दिवसात गोळीबाराच्या दोन घटना
सकाळी घंटाळी देवी रोडवर झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असताना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी गोळीबाराची घटना उघडकीस आल्याने खळबळ
काळ्या गण्या असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे टोपण नाव, त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने सध्या व्हेंटिलेटर वर उपचार सुरु, हा व्यक्ती देखील गुन्हेगार असल्याची सूत्रांची माहिती
मात्र ठाणे पोलिसांचा ठाण्यातील गुन्हेगारीवर काहीच वचक नाही का? असा प्रश्न
MNS : मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या पाठोपाठ आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खेड पोलिसांनी काल अटक केली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये व केदार वणंजू या तिघांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता या तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई हाय कोर्टात आज वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वैभव खेडेकर हे नॉट रीचेबल असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक दादू नांदगावकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये व केदार वणंजू या तिघांना खेड पोलिसांनी अटक केली आहे.
भाजपचे (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसत आहे. हे दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राम शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट नाही मिळालं की ते कसं करतं, तसं आमचं विरोधक करत असल्याचा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावलाय.
Parbhani Rain : परभणीच्या सोनपेठ तालुक्यात रात्री झालेल्या पावसामुळं फाल्गुनी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना एक तरुण दुचाकीसह वाहून जात होता. मात्र, या परिसरात असलेल्या गावकऱ्यांनी तरुणाला वाचवले. परंतू दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे. ग्रामीण भागातील नदी नाल्यांना ओढांना जेव्हा पूर येतो तेव्हा या पुराच्या पाण्यातून मार्ग काढणं जीवावर बेतू शकते. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडूनही मार्ग काढू नये, असं सांगण्यात आल्यानंतरही अनेक जण पुराच्या पाण्यातून मार्ग काढतात. यातूनच आपला जीव धोक्यात घालतात अशीच घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यात घडली आहे. सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथील फालगुनी नदीला रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला आणि या पुराच्या पाण्यातून आवलगाव कडे जात असताना एक तरुण दुचाकीसह या पुराच्या पाण्यात वाहून गेला सदर तरुणाने पुढे जाऊन झाडाच्या फांद्याला पकडल्याने स्थानिक गावकऱ्यांनी या तरुणाला सुखरूप बाहेर काढले परंतु या तरुणाची दुचाकी मात्र या पुराच्या पाण्यात वाहून गेली.
Maharashtra News : शिंदे-फडणवीस सरकारने CBI ला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची ‘जनरल कॅसेन्ट’ पुन्हा बहाल केली
आता CBI ला चौकशीसाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने CBI ला राज्यात चौकशीची परवानगी काढून घेतली होती.
त्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय CBI चौकशी करू शकत नव्हती.
शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे CBI आता कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतं.
महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.
21 ऑक्टोबर 2020 ला उद्दव ठाकरेंनी CBI ला चौकशीसाठी परवानगी नाकारण्याच्या गृह विभागाच्या प्रस्तावावर सही केली होती. त्यावेळी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते.
CBI राज्यातील अनेक प्रकरणांची चौकशी करत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीने केंद्रावर तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर केल्याचा सातत्याने आरोप केला होता.
Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार सुरु असलेल्या या पावसामुळं जिल्ह्यातील आसना नदीला पूर आला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यानं जवळपासचे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. शेतातील उभी असलेली पिकं सोयाबीन, कापूस, हळद, ऊस यासह अन्य सर्व पिके आता पाण्यामध्ये आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. काढलेलं सोयाबीन आणि कापूस पूर्णपणे नष्ट झाले आहे.
कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली चौकवरील हनी आर्केड इमारतीत राहणाऱ्या निपाने कुटुंबियांच्या घरातून 50 लाखांची रोकड चोरून नेली....
निपाने बंधू भाजीचा व्यवसाय करतात... त्याच निमित्ताने काल सकाळी लवकरच निपाने बंधू कळमना भाजी बाजारात गेले असता घरी कोणी नसताना फ्लॅट चे मुख्य दार तोडून चोरट्यांनी 50 लाखांची रोकड चोरून नेली...
दुपारी मोलकरीण घरी आल्यानंतर घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले...
त्यानंतर मोलकरीण ने निपाने बंधूंना कळविले... आणि पोलिसांना ही माहिती देण्यात आली...
व्यवसायाच्या निमित्ताने मिळालेली रक्कम घरातील अलमारी मध्ये ठेवण्यात आली होती घरी कोणी नसताना चोरट्यांनी फ्लॅटचा मुख्य दार तोडून ती रक्कम चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचा एक मोठा निर्णय राज्य सरकार रद्द करणार
सरकारी कर्मचार्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल
सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता वाढावी म्हणून महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतला होता
परंतु या निर्णयाचे दुष्परिमाण दुष्परिणाम झाले. कामे रेंगाळली
यामुळे नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसाचा आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता पावसानंतर जिल्ह्यात अनेक भागांत दाट धुके दिसून येत आहे.त्यामुळे कांदा मिरची पिकाना फटका बसण्याची शक्यता आहे. धुके पडल्यानंतर कांद्याच्या पातीवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू जमा होऊन होऊन सडून खराब होत असते तर मिरची वर दव बिंदू जमा होऊन डाग पडून प्रत वारी कमी होत असते तर धुक्यामुळे कापसाचे फुल फुगडी गळत असून जवळपास खरीप हंगामातील सर्वच पिकांना कमी जास्त प्रमाणात याचा फटका बसून उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.
Beed News : रात्री झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाला येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे म्हणून मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले
मांजरा प्रकल्पाचे द्वार क्रं.1 व 6 हे 0.25 मीटर उंचीवरून 0.50 मी उंचीवर स्थिर करून मांजरा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे.
सद्यस्थितीत द्वार क्रं.1 व 6 हे 0.50 मी उंचीने तर द्वार क्रं. 4,3,2 & 5 हे 0.25 मी उंचीवर उघडलेले असून असे एकूण 6 द्वारे चालू असून एकूण 197.92 घमी/सेकंद ने (6989.34 घनफूट/सेकंद) विसर्ग सुरू करण्यात आला आहे..
रात्री धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढवू शकतो म्हणून मांजरा नदीकाठी असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनाला जाणार आहेत. केदारनाथला मोदी सकाळी 8.30 वाजता पोहचतील आणि पूजा करतील. त्यानंतर मोदींच्या हस्ते रोपवे योजनेचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मोदी बद्रीनाथाला जाऊन पूजा करतील. बद्रीनाथलाही रोपवे आणि विविध योजनांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र त्यांनी चौकशीला सामोरे न जाता कार्यालयावर मोर्चा काढत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. त्यासाठी भाजपकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजप कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सीबीआय केसमधील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. आज दुपारी 3 वाजता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. अनिल देशमुख सध्या जसलोक रूग्णालयात दाखल आहेत.
Diwali 2022 : आज दिवाळी (Diwali) पहिला दिवस आहे. हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मनसेच्या (MNS) वतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्यातील दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. मनसेच्या दीपोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार आहेत.
दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिवाळीच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मनसेच्या वतीनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याचा शुभारंभ आज (21 ऑक्टोबरला) होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित असतात. यंदा मात्र, दिग्गज नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
अनिल देशमुखांच्या जामीनावर आज सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सीबीआय केसमधील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. आज दुपारी 3 वाजता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. अनिल देशमुख सध्या जसलोक रूग्णालयात दाखल आहेत.
आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकत्र
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच कार्यक्रमात दिसणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त हे तिन्ही महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उदघाटन होणार आहे. गेल्या वर्षी या दीपोत्सवावरुन सेना आणि मनसेत वाद झाला होता.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर असून दुपारपर्यंत शहरातील विविध कार्यक्रमात ते हजेरी लावणार आहेत. यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे शिंदे गटाच्या नाशिकच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान नाशिकमध्ये पहिले वहिले शिंदे गटाचे संपर्क कार्यालय उभारण्यात आले असून त्याच्या उदघाटनासाठीचा महत्वाचा कार्यक्रम समजला जात आहे. शिंदे गटाच्या आगामी पायाभरणी साठी हे महत्वाचे केंद्र असणार आहे. काही दिवसांनी नाशिक महापालिका निवडणुका रंगणार आहे. त्यादृष्टीने देखील तयारीचा श्रीगणेशा हे कार्यालय ठरण्याची शक्यता आहे. तर अलीकडेच अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. यांचा प्रवेश सोहळा या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटासह इतर कोणते पदाधिकारी शिंदे गटाची वाट चोखळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सिंधुदुर्गात भाजपकडून संविधान रॅली
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र त्यांनी चौकशीला सामोरे न जाता कार्यालयावर मोर्चा काढत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. त्यासाठी भाजपकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजप कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनाला जाणार आहेत. केदारनाथला मोदी सकाळी 8.30 वाजता पोहचतील आणि पूजा करतील. त्यानंतर मोदींच्या हस्ते रोपवे योजनेचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मोदी बद्रीनाथाला जाऊन पूजा करतील. बद्रीनाथलाही रोपवे आणि विविध योजनांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.
आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस
आज वसुबारस म्हणजेच दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. आजच्या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि दिवाळीचा शुभ पर्वाची सुरुवात केली जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -