Maharashtra News Updates : मुंबईतील गोवर रुग्णांची संख्या 184 वर 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Nov 2022 10:54 PM
खासदार कुमार केतकर यांना भाषण थांबवावे लागले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे भाषणात कौतुक सुरू केले, म्हणून ज्येष्ठ पत्रकार व काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांना भाषण थांबवावे लागले. पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात हा प्रकार घडला.मराठी पत्रकार परिषदेचे थेरगाव येथील दिवंगत शंकरराव गावडे सभागृहात अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनानंतरच्या सत्रात खासदार केतकर हे पत्रकारांना मार्गदर्शन करत होते.


काही वर्षांपूर्वी परभणी येथे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देऊन झाल्यानंतर भाषणाच्या ओघात त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा विषय काढला. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे व त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीचे केतकर कौतुक करू लागले. तेव्हा प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने आक्षेप घेतला व गोंधळ सुरू केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. केतकर यांना भाषण थांबवावे लागले.

जम्मू काश्मीरयेथे सेवा बजावत असताना अतीबर्फवृष्टीमुळे अडकलेल्या जवनास वीरमरण

जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना अतीबर्फवृष्टीमुळे अडकलेल्या जवनास वीरमरण



 कर्तव्य बजावत असताना भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले धुळे तालुक्यातील चिंचखेड येथील मनोज गायकवाड यांना जम्मू कश्मीर येथे झालेल्या अतिबर्फवृष्टीमुळे शारीरिक त्रास झाल्याने उपचारादरम्यान वीरमरण आले.

पुणे जिल्ह्यातील दौंड प्रकरणातील आणखी तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतलंय

पुणे जिल्ह्यातील दौंड प्रकरणातील आणखी तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतलंय. दौंड शहरातील मारहाण प्रकरणातील फरार आरोपीं पैकी ईलास उर्फ इलाईस इस्माईल शेख, वाहीद जावेद खान आणि सुफियान उर्फ जुम्मा रमजान शेख यांना पोलिसांनी लोणावळा खंडाळा अटक केलीय. हे सर्व आरोपी दौंड शहरातील कुंभार गल्ली मधील राहणारे आहेत तर यापूर्वी जिलानी बादशहा शेख यास दौंड पोलीसांनी अटक केलीये. दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह बावीस अँट्रासिटीचा गुन्हा दौंड पोलीसात दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात आलाय होता. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी दौंड मध्ये दाखल होत स्वतः या प्रकरणात लक्ष घातल. पोलीसांवर गंभीर आरोप करीत आरोपी बादशाह शेख याला पोलीसांनी 48 तासात अटक करावी अन्यथा मी माझ्या पद्धतीने बघेल असा इशारा दिला होता. आणि त्याच रात्री दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणातील आणखी तीन आरोपी पोलिसांनी अटक केले त्यामुळे पोलीस कारवाईला आता वेग आलाय.

शिंदे गट गुवाहातीला जाण्याच्या तारखेत बदल, लवकरच नवीन तारीख जाहीर होणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची गुवाहाटी 21 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र 21 नोव्हेंबर एवजी लवकरच नवीन तारीख जाहीर होणार नवीन तारीख आल्यावर गुवाहाटीला जाण्याबाबत निर्णय होईल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.

दौंड शहरातील मारहाण प्रकरणातील फरार आरोपींना अटक

पुणे जिल्ह्यातील दौंड प्रकरणातील आणखी तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतलंय. दौंड शहरातील मारहाण प्रकरणातील फरार आरोपींपैकी ईलास उर्फ इलाईस इस्माईल शेख, वाहीद जावेद खान आणि सुफियान उर्फ जुम्मा रमजान शेख यांना पोलिसांनी लोणावळा खंडाळा अटक केलीय. हे सर्व आरोपी दौंड शहरातील कुंभार गल्ली मधील राहणारे आहेत तर यापूर्वी जिलानी बादशहा शेख यास दौंड पोलीसांनी अटक केलीये. दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह बावीस अँट्रासिटीचा गुन्हा दौंड पोलीसात दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात आलाय होता. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी दौंड मध्ये दाखल होत स्वतः या प्रकरणात लक्ष घातल. पोलीसांवर गंभीर आरोप करीत आरोपी बादशाह शेख याला पोलीसांनी 48 तासात अटक करावी अन्यथा मी माझ्या पद्धतीने बघेल असा इशारा दिला होता. आणि त्याच रात्री दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणातील आणखी तीन आरोपी पोलिसांनी अटक केले त्यामुळे पोलीस कारवाईला आता वेग आलाय.

नवी मुंबई - वाशी टोल नाक्यावर गाडीने घेतला पेट,  गाडीला अचानक लागली आग, आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश,  गाडीचे नुकसान

नवी मुंबई - वाशी टोल नाक्यावर गाडीने घेतला पेट,  गाडीला अचानक लागली आग, आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश,  गाडीचे नुकसान

अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राला विजय चौधरी यांनी सुवर्ण पदक मिळवून दिलं

पुण्यात सुरु असलेल्या 71 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राला विजय चौधरी यांनी सुवर्ण पदक मिळवून दिलं.  आज झालेल्या अंतिम लढतीत विजय चौधरी यांनी हरियाणा पोलीस दलाच्या मौसम खत्री यांचा पराभव केला.  विजय चौधरी हे महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या पुणे पोलीस आयुक्तालयात काम करतात.

मुंबईतील गोवर रुग्णांची संख्या 184 वर 

मुंबईतील गोवर रुग्णांची संख्या 184 वर पोहोचली आहे. आज 11 गोवरचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर आठ जणांना अहवालातून गोवरची लागण झाल्याचे निश्चित झाले. मुंबईत एकूण संशयित गोवर रुग्णांची संख्या 3 हजार 36 वर गेली आहे. मुंबईत गोवरमुळे आठ बालकांचा मृत्यू तर एक मृत्यू मुंबईबाहेरील आहे. गोवरमधून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27 आहे.  73 रूग्ण सध्या उपचार घेत असून स्थिर असलेल्या रुग्णांची संख्या 62  आहे. तर ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या असून व्हेंटिलेटरवर दोन रूग्ण आहेत. 

शरद पवार यांना दिलेल्या डिलीट पदवी विरोधात गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप

शरद पवार यांना दिलेल्या डिलीट पदवी विरोधात गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शरद पवार यांना डी लीट पदवी देण्यात आली यावर आमचा आक्षेप आहे.


ज्या शरद पवारांनी या विद्यापीठाच्या नामांतर होऊ दिले नाही त्यानंतर या विद्यापीठाचा नाम विस्तार झाला... मात्र या दरम्यान समाजामध्ये दरी निर्माण करण्यामध्ये शरद पवारांचे राजकारण यशस्वी झालं.


त्यामुळे या विद्यापीठाने शरद पवार यांना अशाप्रकारे डीलीट पदवी देणे हे तत्कालीन विद्यार्थी विद्यापीठ संसदेचे अध्यक्ष हिंदुस्थानी नागरिक यांना न पटणार आहे.


डी लिट पदवी देताना विद्यापीठ अनुदान आयोगाने काही नियम तयार करावेत अन्यथा कोणालाही अशा प्रकारची पदवी विद्यापीठाकडून दिली जाते.


शिवाय राज्यपालांनी आपल्या भाषणात जे वक्तव्य केलं त्याला पराभूत मनोवृत्तीच्या व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने घेतला आहे राज्यपाल काहीही चुकीचे बोललेले नाहीत.

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना दिलासा, अटकपूर्व जमीन मंजूर

खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आला आहे.


 अनिल परब यांचे वकील  ऍड सुधीर बुटाला यांची जामिनासाठी केला होता अर्ज दाखल त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर


 दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी 420 अंतर्गत माजी मंत्री अनिल परब यांच्यावर झाला होता गुन्हा दाखल 



 9 नोव्हेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला होता , त्यानंतर खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात परब यांच्या अर्जावर सुनावणी चालू होती 


अखेर आज माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत - रोहित पवार

राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते.  माझा सावरकर यांच्या बाबतीतला अभ्यास नक्कीच कमी आहे. अभ्यास गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या बाबतीत अभ्यास आहे त्यामुळे आपण लढतो. पण सावरकरांच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तकात नेमके काय मुद्दे आहेत हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. राहुल गांधींचा विरोध कमी होते पण शिंदे गटाचे काही लोक, बीजेपी आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, रोहित पवार म्हणाले.  
  


 

शेतकऱ्यांची वीज तोडल्याने महावितरणच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच धरणे आंदोलन

कृषी पंपाची वीज कट केल्याने गेवराई मध्ये महावितरणच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केलं. महावितरणकडून कृषी पंपाची वीज तोडली जात असून मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे महावितरणच्या विरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय समोरच धरणे आंदोलन केलं..

Beed News : बीडमध्ये ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

 Beed News : बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असल्याचं राष्ट्रवादीच्यावतीने सांगण्यात आले आहे.. बीड जिल्ह्यामध्ये सध्या 702 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यामध्येच आता महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये एकत्र लढणार असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांचं ज्या ज्या भागात वर्चस्व आहे त्या भागात त्या त्या पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात येतील असे देखील माहिती चव्हाण यांनी दिली आहे..

Ajit Pawar : बारामतीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा जनता दरबार सुरू

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीच्या दौऱ्यावर असल्यानंतर प्रत्येक वेळी विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेतात. या जनता दरबारामध्ये  अडचणी घेऊन आलेल्या नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी होत असते. आज देखील मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेऊन आले आहेत.

Nandurbar : शहादा शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता गाव पातळीवर होणार रस्ता रोको सप्ताह

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील मुख्य वाहतुकीचा मार्ग म्हणून ज्या महामार्गाकडे पाहिले जाते तो म्हणजे शिरपूर शहादा मार्ग या महामार्गाची दुरावस्था झाली असून या महामार्गावर येणाऱ्या गावकऱ्यांनी या संदर्भात संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रस्ता संघर्ष समिती यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत परिसरातील अठरा गावातील प्रतिनिधींनी एकत्र येत 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान रस्त्यावरील प्रत्येक गावात आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलेला आहे या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे तर अनेक जण जायबंदी झालेत मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता महामार्गावर येणाऱ्या गावातीलच नागरिक आक्रमक झाल्या असून आठवडाभरात या मार्गावरची वाहतूक ठप्प पाडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

Raj Thackeray : रणजीत सावरकर राज ठाकरेंना भेटणार

Raj Thackeray :  राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मनसेने देखील या वादात उडी घेतली असून मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो दरम्यान काळे झेंडे दाखवले. आज सावरकरांचे नातू रणजित सावरकर हे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेने घेतलेल्या या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी रणजित सावरकर आज राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. 11 वाजता रणजित सावरकर राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.


 


शरयू आरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची आरती होणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

वाराणसीतील शरयू आरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची आरती होणार आहे.. दररोज संध्याकाळी 7 वाजता गोदावरीची महाआरती होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.. यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून ११हून अधिक पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. कुंभमेळा जवळ आला असताना सरकारची हिंदुत्ववादी छाप पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु आहे. 

एसटीचा चेहरामोहरा बदलणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

Maharashtra News : एसटीच्या ताफ्यात  पाच हजार इलेक्ट्रिक बस  येणार आहेत.  मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखालील एसटी महामंडळाच्या बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला आहे

राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हां एकदा थांबले

रत्नागिरी : तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्ग आंबडवे - राजेवाडी या मार्गाचे काँक्रिटीकरण प्रकल्पाचे मंजूर असलेले काम विविध कारणाने मागील चार वर्षापासून रखडलेले आहे. हे काम नुकतेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केले होते. मात्र ठेकेदारांने नागरिकांच्या दबावामुळे कामास सुरुवात केल्याचा बहाना करून काम पुन्हा बंद केले आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी हे काम पूर्ण होणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्थेत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


भारत जोडो यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी होणार


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी अशी ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आज भारत जोडो यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी होणार आहे. भारत जोडो यात्रेला आज गजाननदादा पाटील मार्केट यार्ड, शेगाव येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर  जलंब या ठिकाणी सकाळी 10 वाजता विश्रांतीसाठी ही यात्रा थांबेल. दुपारी चार वाजता जलंब येथून पुन्हा एकदा पदयात्रेला सुरुवात होणार आहे. 


 लोकल मार्गांवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक


मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज आणि उद्या प्रवासाचा बेत असेल तर मुंबई आणि ठाण्यात वाहतूक व्यवस्थेत केलेले बदल लक्षात घेऊनच प्रवासाला निघा. कारण मध्य रेल्वेवर आजपासून 27 तासांचा मेगाब्लॉक आहे. तर ठाण्यात कोपरी पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान असलेला धोकादायक कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात.. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्यात... कर्नाक पुलाच्या कामासोबत ठाण्यात कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आलेत.. गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीय..


मद्यधुंद पोलीस वाहन चालकाने दिली तीन वाहनांना धडक


 राहुल गांधी यांच्या सभेतून परत येणाऱ्या तीन वाहनांना खामगाव शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वाहनाने धडक दिल्याने तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन वाहन पोलीस कर्मचारी असलेल्या चालकाने खामगाव शहराजवळ मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालविल्याने हा अपघात घडला. यात खा.राहुल गांधी यांच्या सभेतून आपल्या गावी परत जात असलेल्या तीन वाहनांना या पोलीस वाहनाने धडक दिली यात या तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं , मध्यरात्री खामगाव शहराजवळ हा अपघाड झाला , सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.