Maharashtra News Updates 19 January 2023 : दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्याशी छेडछाड

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jan 2023 11:26 PM
पैलवान सिकंदर शेखने तासगाव तालुक्यातील विसापूर केसरीचे मैदान मारले

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पैलवान सिकंदर शेखने पटकावलेय. अवघ्या ५ मिनिटात पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला सिकंदरने मोळी डावावर लोळवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले.  महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत देशभरात सर्वाधिक चर्चा झालेल्या पैलवान सिकंदर शेखची ५ लाखांची ही कुस्ती होती. राज्यभरातून कुस्ती शौकिनांनी यावेळी उपस्थिती लावली होती. विसापूर येथे यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीत  कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.  महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मल्ल कुस्तीसाठी आल्यामुळे या मैदानाला विशेष महत्त्व होते.  या मैदानावर लहान मोठया १५० ते२०० चटकदार कुस्त्या झाल्या.

एमबीबीएस 22 वर्षीय विद्यार्थी स्वाधीच्छा साने प्रकरणात आरोपी मिट्टू सिंगने केला मोठा खुलासा

एमबीबीएस 22 वर्षीय विद्यार्थी स्वाधीच्छा साने प्रकरणात आरोपी मिट्टू सिंगने केला मोठा खुलासा


 या प्रकरणात तपास करत असलेल्या गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिला जाबब


 सिंगने सानेला मारून बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याची दिली कबुली 


  र 14 महिन्यानंतर  लागला या गुन्हेचा छडा


नोव्हेंबर 2021 ला मुलगी झाली होती बेपत्ता


 बँड स्टँडला मुलीने सिंग बरोबर शेवटचा सेल्फी काढला होता.


  मुंबई गुन्हे शाखाचा कक्ष 9 चा अधिकाराने या प्रकरणात दोन आरोपी अटक केले आहेत .


पण मात्र मुलगी गेली कुठे हे अजून त्यांना तपासात निष्पन्न झाला नाहुते.


 तिच्यावर अत्याचार करून त्याला मारून फेकला का याचा तपास पोलीस करत आहेत.


पोलिसांनी दोघांना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केले होते पण आता त्यात खुनाचे कलम जोडले जाणार आहे.

Swati Maliwal: दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्याशी छेडछाड

दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांना गुरुवारी पहाटे रस्त्यात एका मद्यधुंद गाडी चालकाने छेडछाड केल्याचा आणि ओढत नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती स्वत: स्वाती मतवाल यांनी दिली आहे. 

Congress : सत्यजीत तांबेचं काँग्रेसमधून निलंबन : नाना पटोले

Congress : सत्यजीत तांबेचं काँग्रेसमधून निलंबन केल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली 


 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे साहेब यांना डिस्चार्ज

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. 

Nawab Malik: नवाब मलिक यांच्या वैद्यकीय तपासणीस कोर्टाची परवानगी

नवाब मलिक यांच्या वैद्यकीय तपासणीस कोर्टाची परवानगी


तीन नेफ्ट्रोलॉजिस्टची नावं, मलिक कुटुंबियांनी कोर्टात सादर केली


यातील एक नेफ्ट्रोलॉजिस्ट कोर्ट ठरवणार


2 फेब्रुवारीपर्यंत नवाब मलिक यांच्या किडनीवरील उपचारासंदर्भातील अहवाल तज्ज्ञांकडून कोर्टात सादर केला जाणार


नवाब मलिक गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत


नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखीन 14 दिवसांची वाढ


मलिकांचा जामीन अर्ज सध्या हायकोर्टात प्रलंबित

Beed News: राज्यातील निवडणुकांना न झालेल्या ग्रामपंचायतचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Beed News: राज्यातील ग्रामपंचायत चा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून 25 एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.


राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या. तसेच नव्याने स्थापित झालेल्या त्याचबरोबर चुकीचे प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून 25 एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Dhule News: गफुर नगर परिसरात विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Dhule News: विजेच्या खांबामध्ये करंट उतरल्यामुळे जवळच खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. धुळे शहरातील वडजाई रोड गफुनगर परिसरात या चिमुकल्यासह इतर मुलं देखील खेळत असताना या चिमुकल्यानं विजेच्या खांबाला हात लावला असता त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि यात या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षद अहमद अशपाक मोमीन वय आठ वर्ष असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.


हृदय पिळवटून टाकणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली, वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच या बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप लावत स्थानिकांनी व नातेवाईकांनी संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. 

Rohit Pawar: पंतप्रधान मुंबईत आले म्हणजे मुंबईत निवडणुका लागतील : रोहित पवार

Rohit Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईत आलेले आहेत त्यामुळे आता कदाचित लवकरच मुंबई मनपाची निवडणूक लागेल असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी लगावला आहे. ते जामखेड येथे बोलत होते. सोबतच मुख्यमंत्री दावोस वरून आतच परत आलेत, बोईंग आणि एअरबस असे दोन मोठे प्रोजेक्ट हे भारतामध्ये येण्याची शक्यता आहे तर हे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात कसे येतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांशी चर्चा करायला हवी, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हंटलंय. नाशिकला आणि नागपूरलासुद्धा डेव्हलपमेंटचा स्कोप आहे. तिथे एअरपोर्ट आहे, जमीनसुद्धा आहे तर अशा पद्धतीनं इतर ते प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा आणि आपल्या राज्यात कसे येतील यासाठी मुख्यमंत्र्यांनि पंतप्रधानांशी चर्चा करावी असं रोहित पवार म्हणाले.

Beed News: मध्य प्रदेशातून बीडमध्ये आणलेल्या तीन अल्पवयीन मुलाची सुटका

Beed News: मध्य प्रदेशातून बीडमध्ये आणलेल्या तीन अल्पवयीन मुलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आल आहे..या तीन मुलांकडून जबरदस्तीने ऊस तोडण्याच काम करून घेतल जात होतं ही बाब गावातील एका नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसाला माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी या तीन मुलांची सुटका केली असून या मुलांना पोलिसांनी बालकल्याण समितीच्या ताब्यात दिल आहे.


मध्य प्रदेशातून एका मुकादमाने त्यांना मोबाईल आणि पैशाच अमिश दाखवून बीड जिल्ह्यात पाठवला होता त्यानंतर या मुलांकडून दिंद्रुड मध्ये एक मुकादम जबरदस्तीने काम करून घेत होता.. पोलिसांनी या मुलांची सुटका केली असली तरी मुकादमावर अध्याप कारवाई केलेली नाही त्यामुळे या मुलांच शोषण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 
MahavikasAghadi:  महाविकासआघाडीची आज 12 वाजता आज पुन्हा एकदा बैठक

MahavikasAghadi:  महाविकास आघाडीची आज 12 वाजता आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे.  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी  बैठक होणार  आहे. बैठकीला तीनही पक्षांचे नेते उपस्थित  राहणार  आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन नाशिक आणि नागपूरच्या जागेच्या संदर्भात करणार अधिकृत घोषणा केली आहे. 

BJP: भाजप नेते व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना धमकी

BJP: भाजप नेते व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना धमकी देण्यात आली आहे.  हाजी अराफत शेख यांच्या घरात घुसून त्यांना धमकवण्याचा आरोपीने प्रयत्न केल्याचे बोलले जाते. एका प्रकरणात स आरोपी हाजी अराफत शेख यांच्याकडे आला होता.  तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्यासंदर्भात त्याने तगादा लावला होता. 10 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. 

Nalasopara Fire: नालासोपारा रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही युनिट बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आज सकाळी आग

Nalasopara Fire: नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे सीसीटीव्ही युनिट बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आज सकाळी आग लागली होती. स्टेशन मास्तर आणि रेल्वेच्या  आरपीएफ कर्मचार्यांनी आग विझवली आहे. 


नालासोपारा रेल्वे स्टेशन फ्लॅट फॉर्म क्र. 4 येथे  चर्चगेटच्या बाजूस आज सकाळी 6.30 वाजता दरम्यान  सीसीटीव्ही  युनिट बॉक्सला अचानक आग लागली होती. आर.पी. एफ. आणि रेल्वे स्टेशन मास्टर च्या दक्षतेमुळे आग लगेच  विझवण्यात आली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.  शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पंकजा मुंडे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत उद्या होणार प्रचार सभा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा मागच्या पंधरा दिवसात बीड ला आले मात्र या दोन्ही कार्यक्रमाला ना पंकजा मुंडे हजेरी लावली ना बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी.. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मराठवाडा शिक्षक मतदार संघा च्या होणाऱ्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी येत आहेत. त्यावेळी बावनकुळे यांच्यासोबत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे याही या प्रचार दौऱ्यात असणार आहेत.


उद्या सकाळी गेवराई मध्ये किरण पाटील यांच्या प्रचारात शिक्षक मेळावा आयोजित केलाय त्यानंतर बीड शहरांमध्ये आणि सायंकाळी अंबाजोगाई मधल्या खोलेश्वर महाविद्यालय इथं शिक्षक मिळावे आयोजित करण्यात आले आहेत.. फडणवीसांचा दौरा बीडमध्ये झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या बीडमध्ये येत आहेत आणि जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे या प्रचार दौऱ्यात काय बोलणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू


रेपोली गावाजवळ कारचा भिषण अपघात, ट्रकची कारला धडक


इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात नऊ जणांचा मृत्यू


गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास अपघात

Buldhana News: क्रिकेटच्या वादातून दोन गटात तुफान राडा, मलकापूर येथे तुफान दगडफेक

Buldhana News: बुलढाणा जिल्हयातील मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट सामन्यातील जिंकल्यावरून दोन गटात झालेल्या वादातून तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत एका मंदिरावर दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही जमाव आक्रमक झाल्याने प्रकरण तुफान हाणामारीत झालं. ही घटना काल रात्री उशिरा घडल्याने पोलिसांनी आज दोन्ही गटातील विस जणांवर मलकापूर शहर पोलीसात कलम 160 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्वच आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेताहेत. या परिसरात तुफान दगडफेक झाल्याने परिसरात अद्यापही दहशत असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

Sangli News: मिरजेतील 'त्या' जागेच्या वादावरुन आज मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्याच्या पुढे  तिसरी सुनावणी

Sangli News: 7 जानेवारीच्या रात्री मिरजेतील पाडकाम करण्यात आलेल्या  आणि  वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जागेबाबत आज मिरज तालुका न्याय दंडाधिकारी यांच्या पुढे तिसरी आणि अंतिम सुनावणी होणार आहे. याआधी 9 आणि 11 जानेवारी या दिवशी सुनावणी झाल्या होत्या. मात्र विवादित जागाबाबत 17  मिळकतदार आणि  ब्रह्मानंद पडळकर यांच्या वकिलांनी  योग्य कागदपत्रे आणि म्हणणे सादर करण्यासाठी दोन्ही वेळच्या सुनावणीत  मुदत मागितली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत तरी दोन्ही गटाकडून जागेबाबतची  पुरेशी  कागदपत्रे सादर केली जाणार की   न्याय दंडाधिकारी म्हणून तहसीलदाराना आणखी एक सुनावणी घ्यावी लागणार हे पाहावे लागणार आहे.मात्र जरी दोन्ही गटाकडून आपापली कागदपत्रे जरी सादर केली तरी त्या वर निर्णय घेण्याचे  अधिकार न्याय दंडाधिकारी म्हणून तहसीलदार यांना मर्यादित आहेत. त्यामुळे हा वाद पुढे दिवाणी न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. 

कोरेगाव भीमा प्रकरणी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि शिवाजी पवार यांची चौकशी होणार

कोरेगाव भीमा प्रकरणी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर 21 ते 25 जानेवारी दरम्यान या सर्वांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा प्रकरण घडले त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. तर सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिचीही आयोगासमोर चौकशी होणार आहे. ती यातील आरोपी आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे चौकशी होणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी आज मुंबईत येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, 20 दवाखान्यांच्या लोकार्पणासह मलजल प्रक्रिया केंद्र, रुग्णालयांच्या इमारती, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण या कामांचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची बीकेसी येथे एक मोठी सभा होणार आहे. यासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. ते 5 ते 6.10 एमएमआरडीए मैदानवरती लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहतील. संध्याकाळी 6.30 पंतप्रधान मोदी गुंदवली मेट्रो स्टेशन - 6.30 ते 7 मेट्रो उद्घाटन आणि मेट्रोतून प्रवास करणार. संध्याकाळी 7.5 मेट्रो स्टेशन मधून निघणार  7.15 मुंबई विमान तळावरून दिल्लीला रवाना होतील. सुरक्षतेची खबरदारी लक्षात घेता मेट्रो-1 ची सेवा बंद रहाणार. संध्याकाळी 5.45 ते 7.30पर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे.


पंतप्रधानांचा मोदींचा कर्नाटक दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी कर्नाटकात यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील.          दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. दुपारी 2.15 च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. इथे ते नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे मालकी पत्र वितरीत करतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.


ज्योतिरादित्य शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर 


कोल्हापूर- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे आज आणि उद्या असे दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर इचलकरंजीत शिंदेंचा दौरा असेल. या दौऱ्यात शिंदे इचलकरंजी शहरातील भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होती.


महाविकास आघाडीची पत्रकार परिषद 


मुंबई – आज दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होईल. यावेळी नाशिक आणि नागपूर संदर्भातील घोषणा केली जाईल. अखेर चर्चेअंती उमेदवारांबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. 


बारामती - कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि अजित पवार हजर राहणार


बारामती मधील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि अजित पवार हजर राहणार. अजित पवार हे आज सकाळी 8.30 वाजता कृषी प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज सकाळी 10 वाजता कृषी प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत. 


आज सकाळी 10 वाजल्यापासून कुस्तीपटू पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलन करणार 


नवी दिल्ली - राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून त्यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी भारतातील दिग्गज कुस्तीपटूंनी बुधवारी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनात टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते. यानंतर बृजभूषण सिंह यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले, तर यानंतर आमच्याकडे सगळे पुरावे आहेत मोदींनी कधीही बोलवावं आम्ही सगळे पुरावे देऊ, असं प्रत्युत्तर विनेश फोगाटने, दिलंय. तसचं याची दखल क्रिडा मंत्रालयाने आणि दिल्ली महिला आयोगाने याची दखल घेतलीय. येत्या 72 तासातं याचं उत्तर द्यावं अस क्रिडा खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, आज सकाळी 10 वाजल्यापासून कुस्तीपटू पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत. 


ओशो आश्रम आंदोलन


पुणे - ओशो आश्रम आंदोलन...आचार्य ओशो रजनीश यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून ओशो भक्त आश्रमाच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, आश्रम प्रशासनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) भक्तांना समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही असा दावा करत ओशो भक्त आज सकाळी 11 वाजता ओशो आश्रमाजवळ निषेध आंदोलन करणार आहेत.


वाशिम :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज आंदोलन


वाशिमच्या रिसोड शहरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज आंदोलन. पिक विमा आणि परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदत भरपाई मिळावी या करिता आज आंदोलन असणार आहे. यावेळी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ही उपस्थित असणार आहेत. 


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या रणनीती संदर्भात आज शिक्षक सेनेची महत्वाची विभागीय बैठक


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या रणनीती संदर्भात आज शिक्षक सेनेची महत्वाची विभागीय बैठक होणार आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. 


बंजारा ब्रिगेड तर्फे आज जामनेर येथे महामोर्चा 


जळगाव - बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावे, बैआहार राज्याप्रमाणे ओबीसी जनगणना व्हावी, जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ओढरे गावातील दोनशे  शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा त्यांच्या नावे लावण्यात याव्यात. यासह विविध मागण्यासाठी बंजारा ब्रिगेड तर्फे आज जामनेर येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी 8 ते 10 हजार बंजारा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


सत्यजीत तांबे यांचा श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात दौरा


शिर्डी - आज सत्यजीत तांबे यांचा श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात दौरा आहे. शिक्षकांच्या भेटीगाठी ते घेण्यासाठी हा दौरा असण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा तुळजापूर दौरा


उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा तुळजापूर दौरा. सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरने तुळजापूर येथे आगमन होणार आहे. दर्शन घेऊन अक्कलकोट कडे जातील. राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मंदिर परिसरात उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.