Maharashtra News Updates : अंडर 19 चा माजी कॅप्टन विजय झोलवर गुन्हा दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jan 2023 11:19 PM
Vijay Zol: अंडर 19 चा माजी कॅप्टन विजय झोलवर गुन्हा दाखल

राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोलव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना गुंडाकरवी पिस्टल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा


19  जानेवारी 2023 
सायंकाळी 4.45 मुंबई विमानतळावर दाखल होतील
5 ते 6.10 एमएमआरडीए मैदानवरती 
लोकार्पण आणि भुमिपुजन सोहळा


6.30 कुंदवली मेट्रो स्टेशन


6.30  ते 7 मेट्रो उद्घाटन आणि मेट्रोतून प्रवास करणार


7.5 मेट्रो स्टेशन मधून निघणार 


7.15 ला मुंबई विमान तळावरून दिल्लीला रवाना होतील

वर्ध्यात एन परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षापत्रचं मिळालं नाही, 140 विद्यार्थी राहणार परिक्षेपासून वंचित

वर्धा 


- एन परीक्षेच्या आदल्या संध्याकाळ पर्यत परीक्षा प्रवेश पत्र न मिळाल्याने नर्सिंग स्कूल मध्ये राडा
 
- नर्सिंग च्या विद्यार्थ्यांसह पालकांचा व्यवस्थापणासोबत वाद विवाद


- नर्सिंग विद्यालयात विद्यार्थी व पालकांचा संताप 


- नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटांची प्रतीक्षा


- तब्बल 140 विद्यार्थी राहणार परिक्षेपासून वंचित


- मंगळवारी सकाळी आहे नर्सिंगच्या पहिल्या वर्षाची परीक्षा


- परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र आले नसल्याने नर्सिंग स्कूल मध्ये गोंधळ


- नर्सिंग स्कूल चालविणार्यावर व्यक्त करण्यात आला संताप


- प्रवेश पत्रासाठी विद्यार्थी पोहचले होते जिल्हाधिकारी कार्यालयात


- सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश पत्र मिळणार, असे व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते आश्वासन

जालन्यात निसर्गउपचार शिबिरात 800 जणांनी घेतला मधमाशीचा डंख

जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये निसर्गोपचार शिबिरात  800 जनांनी उपचार म्हणून मधमाशीचा डंख घेतलाय. हर्षकुमार जाधव मित्र मंडळाच्या वतीने भोकरदन शहरात दोन दिवसीय निसर्गउपचार शिबिर भरवण्यात आलं होतं. यात संधिवात तसेच इतर आजारी रुग्णांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं. जेष्ठ निसर्गोपचार तज्ञ डॉ. श्रीराम कुलकर्णी यांनी या शिबिरात मधुमक्षिका उपचाराबद्दल या शिबरीत माहिती देऊन शेकडो रुग्णांवर हा उपचार केला. शहरात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती आल्याने अनेकांनी या शिबिरास गर्दी केली होती. 

जालना-निसर्गउपचार शिबिरात 800 जणांनी घेतला मधमाशी चा डंख

जालना जिल्ह्यातील भोकरदन मध्ये निसर्गोपचार शिबिरात  800 जनांनी उपचार म्हणून मधमाशी चा डंख घेतला, हर्षकुमार जाधव मित्र मंडळाच्या वतीने भोकरदन शहरात  दोन दिवसीय निसर्गउपचार शिबिर भरवण्यात आलं होतं, यात संधिवात, तसेच इतर आजारी रुग्णांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं, जेष्ठ निसर्गोपचार तज्ञ डॉ श्रीराम कुलकर्णी यांनी या शिबिरात मधुमक्षिका उपचारा बद्दल या शिबरीत माहिती देऊन शेकडो रुग्णांवर हा उपचार केला... शहरात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती आल्याने अनेकांनी या शिबिरास गर्दी केली होती.

अंबाजोगाईत हप्ता वसुली करणाऱ्या तिघा जणांचा तरुणावर चाकू हल्ला
अंबाजोगाई मध्ये जबरदस्तीने दहा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केल्यानंतर हप्ता न देणाऱ्या एका तरुणावर तिघा जणांनी चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे... याप्रकरणी तीन हल्लेखोरा विरोधात अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अंबाजोगाई शहरातील शेख नदीम हा तरुण आपल्या भावासह एका चौकात उभा होता यावेळी तिघांजणांनी जबरदस्ती करून  त्यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. यावेळी नदीम यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर तीन तरुणांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
BMC: पुढील आदेश येईपर्यंत प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भात कोणतीही कारवाई न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. उद्या आणि परवाही हायकोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरूच राहणार आहे. 


 


 

बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचने संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करणार नाही

बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचने संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. 


उद्या आणि परवाही हायकोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरूच राहणार आहे. 

पोटच्या मुलांना विष देऊन पित्याची आत्महत्या, नागपूरमधील घटनेने खळबळ

नागपूर शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवदेवी नगर येथील एका निर्दयी बापाने स्वतःच्या मुलांना जेवणातून विष देऊन हत्या केल्यानंतर स्वतः सुद्धा आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अशोक बेले ( वय,  45) असे आरोपीचे नाव आहे. यातील एका मुलाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मुलावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश इटकेलवार यांचं निलंबन, अर्ज मागे न घेतल्याने कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश इटकेलवार यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सतीश इटकेलवार यांनी नागपूर शिक्षक मतदार संघात भरलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडी चौकशी संपली

बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आजची ईडी चौकशी संपली

सत्यजित तांबे यांना निलंबित करण्याची शिफारस; विश्वासनिय सुत्रांची ABP Majha ला माहीती

सत्यजित तांबे यांना निलंबित करण्याची शिफारस; विश्वासनिय सुत्रांची माहीती 


शिस्तपालन समितीची महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस ला शिफारस


महाराष्ट्र प्रदेश करणार सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई


डाॅ. सुधीर तांबे यांच्या नंतर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची होणार कारवाई


नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत सुधीर तांबे यानी माघार घेत सत्यजित तांबे यानीअपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शिक्षक भारतीचे प्रमुख आमदार कपिल पाटील यांना फोन

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शिक्षक भारतीचे प्रमुख आमदार कपिल पाटील यांना फोन


शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केली विनंती


कपिल पाटील यांनी माञ नागपूर शिक्षक मतदार संघाची जागा शिक्षक भारती लढवण्यावर ठाम असल्याबाबत संजय राऊतांना सांगितलं


महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेसकडून दिलेला शब्द न पाळल्याने शिक्षक भारती निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची दिली माहिती

Osmanabad News: उस्मानाबादमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

Osmanabad News: उस्मानाबादमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झालं आहे. गेल्या सहा वर्षांपासून  सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत दहा हजार राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी काम करत आहेत. त्यांच्या  विविध मागण्यासाठी आज जिल्हा परिषद उस्मानाबाद समोर काम बंद आंदोलन सूरू केले आहे. 

आमदार बच्चू कडू आजही मुंबई सत्र न्यायालयात गैरहजर

आमदार बच्चू कडू आजही मुंबई सत्र न्यायालयात गैरहजर


मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्याला मारहाणीचं प्रकरण


बच्चू कडू अमरावतीत नुकत्याच झालेल्या अपघात जखमी झाल्यानं आज न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, वकिलांची माहिती


या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीपर्यंत तहकूब 

Beed News: बीडमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा एक दिवसांचा संप

Beed News: बीडमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं बीड जिल्ह्यातील सर्वच डॉक्टर यामध्ये सहभागी झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या या समुदाय अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी आरोग्य सेवेमध्ये रुजू करण्यात यावं, त्याचबरोबर वेतन वाढ आणि बोनस मिळावं यास इतर मागण्यासाठी या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपला संप पुकारला आहे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी ज्या मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. त्या जर 23 तारखेपर्यंत मान्य झाल्या नाहीत, तर बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या डॉक्टरांनी प्रशासनाला दिला आहे. 

Gondiya Crime : जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक, गोंदिया ग्रामीण पोलिसांची कारवाई

गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेमणी गावात अवैधरित्या तास पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्यांवर अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत 12 इसम जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडून  रोख रकमेसह 7 मोटार सायकल, 4 मोबाईल असा 3 लाख 63 हजार 615 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात नरेंद्र जतपेले, धरमदास मंडीये, निलेश कोसरकार, ताराचंद ठाकूर, सचिन मेश्राम, सुनील धोंडे, महेंद भलावी, दिलीप धावडे, आशिष उके, आकाश भिमटे, जलिंग दमाहे राजन लिल्हारे यांच्याविरुध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Beed Crime : डॉक्टरची दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी
परळीतील डॉक्टरांची दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपीला बीड पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे.. या आरोपींना गुजरात मधून बीडमध्ये आणल्यानंतर उशिरा न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोघांना बारा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे..दिलावर कक्कल आणि इस्माईलशा शेख अशी आरोपींची नाव असून त्यांनी परळी येथील डॉ. रवींद्र गायकवाड यांना रुग्णालयाच्या विस्तारासाठी कर्ज मिळून देतो यासाठी 20 कोटी रुपयांची मागणी या दोन आरोपीने त्यांच्याकडे केली होती आणि त्यामध्ये दोन कोटी रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली होती.
Bhandara Road Issue : शासनाच्या निधीचा दुरुपयोगाचं उत्तम उदाहरण म्हणजे, भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांची विकास कामे

शासनाच्या निधीचा दुरुपयोग कसा होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे, भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या विकास कामांवरून बघायला मिळत आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ ते खैरी (घर) हा 2 किमी चा रस्ता पूर्वी डांबरीकरण करण्यात आलेले आहे. तो अत्यंत सुस्थितीत असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नावाखाली हा रस्ता चक्क जेसीबीने फोडण्यात येत आहे. यावर अधिकारी मात्र काहीही बोलायला तयार नाहीत.

Nagpur News : तळेगावच्या जत्रेतील कच्च्या चिवड्याची 'मसालेदार' गोष्ट
अमरावतीच्या तळेगाव दशासर येथे जंगी शंकरपट आणि जत्रेला सुरुवात झाली आहे. तळेगाव ज्याप्रमाणे शंकरपटासाठी प्रसिद्ध आहे तितकेच ते इथल्या जत्रेत मिळणाऱ्या कच्च्या चिवड्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. जत्रेत आलेला प्रत्येकजण या चिवड्याची चव चाखल्या शिवाय जात नाही. तळेगाव दशासर येथील जत्रेत विविध प्रकारची दुकानं थाटून छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहेत. मात्र या ठिकाणी सर्वात जास्त चर्चा आहे ती सुरजुसे बंधू यांच्या कच्च्या चिवड्याची. मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, हिरवा पातीचा कांदा आणी कोथिंबीर सोबत तिखट, हळद, कलमी पावडर, धनिया पावडर, जिरं यासारखे पारंपारिक मसाले वापरून हा चिवडा तयार केला जातो. विशेष म्हणजे जत्रेत येणाऱ्या नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या माफक दरात याची विक्री केली जाते.
Beed News: डॉक्टरची दोन कोटीची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपीला 12 दिवसाची पोलीस कोठडी

Beed News: परळीतील डॉक्टरांची दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपीला बीड पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. या आरोपींना गुजरात मधून बीडमध्ये आणल्यानंतर उशिरा न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोघांना बारा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलावर कक्कल आणि इस्माईलशा शेख अशी आरोपींची नाव असून त्यांनी परळी येथील डॉक्टर रवींद्र गायकवाड यांना रुग्णालयाच्या विस्तारासाठी कर्ज मिळून देतो. यासाठी 20 कोटी रुपयांची मागणी या दोन आरोपीने त्यांच्याकडे केली होती आणि त्यामध्ये दोन कोटी रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली होती. 

Shhada Old Temple Found : कुकडेल भागात खोदकाम करताना सापडले पुरातन महादेव मंदिर
शहादा शहराला लागून कुकडेल भागातील शनिमंदिराच्या मागच्या बाजूला पुरातन भावसार समाज मढीचा जागेवर खोदकाम करताना समाधी वजा शिवलिंग, चबुतरा व पादुका आढळून आले आहे.याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हा परिसर प्राचिन ऐतिहासिक व धार्मिक भाग समजला जातो. नुकतेच प्रकाशा येथे देखील टेकडीवर खोदकाम करताना मूर्ती सापडली होती. याचसोबत  शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर पाडळदा गावात जुने घराचे बांधकाम करीत असताना त्या ठिकाणी पुरातन तोफा आढळून आल्या आहेत. यामुळे शहादा परिसरात ऐतिहासिक धार्मिक याबाबतच्या अनेक गोष्टींना इथं उजाळा मिळत आहे. शहरातील कुकडेल परिसरातील शनि मंदिराच्या मागे खोदकाम करीत असताना मंदिराच्या चबुतरा शिवलिंग समाधी आढळून आलेली आहे ही चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरतात शहर आणि परिसरातील भाविक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येऊ लागले आहे.
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचे गावी स्वागत

महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल शिवराज राक्षेचे त्याच्या मूळ गावी स्वागत करण्यात आलं. शिवराज हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये राहतो, महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी परतला. गावकऱ्यांनी शिवराजला पेढे भरवून, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेनी शिवराजची भेट घेऊन त्याचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र केसरीची गदा आमच्याच तालमीत आणायची हा प्रण वस्ताद यांनी केला होता. महेंद्र आणि शिवराज एकाच तालमीतील असल्याने एकमेकांचे डाव माहीत होता. महेंद्रला चितपट करून शिवराजने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. शासनाने देखील या कामगिरीची दखल घेऊन शिवराज ला नोकरी द्यावी अशी अपेक्षा शिवराजच्या आई, वडिलांनी व्यक्त केली आहे. सरकारकडे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.

Nandurbar Cold : सातपुड्याचा पर्वतरांगांमध्ये तापमान 5 अंश सेल्सिअसच्या खाली
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला असून काही ठिकाणी दवबिंदू गोठले आहेत. जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसच्या खाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याची थंडी अनुभवला मिळाली आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये कडाक्याची थंडी पडली असून तापमान कमी झाल्याने या भागातील शेतात आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवत तसेच वाहने घराच्या बाहेर ठेवल्या वस्तूवर असलेलं दवबिंदू गोठल्याचे दिसत आहे.
Akola Shiv Sena Farmers Morcha : शेतकऱ्यांसाठी ठाकरे गटाचा 'रूमणे मोर्चा'

Akola Farmers Morcha : आज अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शेतकऱ्यांसाठी 'रूमणे मोर्चा' काढण्यात येत आहे. आधी या मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या अकोला पोलिसांनी रात्री ऐनवेळी सशर्त परवानगी दिली. या मोर्चाच्या परवानगी संदर्भात काल दिवसभरात ठाकरे गट आणि पोलिसांमध्ये मोठं नाट्य रंगलेलं पाहायला मिळालंय. खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुखांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी भवन ते दुर्गा चौकातील विद्युत भवन असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भावर होत असलेला अन्याय, पिकविमा कंपन्यांची दादागिरी या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे.

Mumbai Cruise : मुंबईमधून लवकरच दोन क्रूझ सेवांना सुरुवात

मुंबई : मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर आणखी दोन लक्झरी क्रूझ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मुंबई पोर्ट ॲथॉरिटी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कंपनीची बैठक पार पडली आहे. उन्हाळ्यात  दोन क्रूझ मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी बाजारात तेजी; सेन्सेक्स 60 हजार पार, निफ्टी 18 हजारांवर

Stock Market Today Opening Bell : आज आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्ससह निफ्टी तेजीत व्यवहार करत आहे. भारतीय शेअर बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा चांगला परिणाम पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये 250 अंकांची वाढ होऊन तो 60 हजारांपार पोहोचला आहे, तर निफ्टीही 18 हजारांवर व्यवहार करत आहे. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 289 अंकानी उसळी घेत 60550 वर उघडला. तसेच निफ्टी 82 अंकानी वाढून 18033 वर उघडल्याचं पाहायला मिळालं. 

गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक भरमार बंदूक, एक पिस्टल, एक वाकी टाकी, चार्जर आणि इतर नक्षल साहित्य जप्त

गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगलात गडचिरोली पोलिसांचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना काल रविवारी (15 जानेवारी) चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलीस दलाने मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत केले आहे. पोलीस जवान अभियान राबवत असताना लपून बसलेल्या 20 ते 25 नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रतिउत्तरात जवानांनी गोळीबार केला असता पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी पळ काढला. भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची योजना नक्षलवाद्यांनी आखली होती. मात्र पोलिस दलाने त्यांची ही योजना हाणून पाडली. चकमकीनंतर जंगलात शोध मोहीम राबवली असता एक भरमार बंदूक, एक पिस्टल, एक वाकी टाकी, चार्जर आणि इतर नक्षल साहित्य जप्त केले असून या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला मुंबईत, बीकेसी ग्राऊंडवर सभा होणार

PM Modi Mumbai Visit : मुंबईतील विकासकामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीला जुंपले आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी मुंबईत एका मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरे यांच्या घराशेजारी म्हणजेच बीकेसी ग्राऊंडवर घेतली जाणार आहे. त्यामुळे बीकेसी मैदानात सध्या तयारी सुरु आहे.

Petrol Diesel Price : देशात आज इंधन दर वाढले की, कमी झाले? Latest किमती, जाणून घ्या

Petrol Diesel Price 16 January 2023: गेल्या कित्येक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. पण तरीही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) मात्र स्थिर आहेत. आज 16 जानेवारीला देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 


Petrol Diesel Price Today : देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय? 































शहरंपेट्रोलचे दर (प्रति लिटर)डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 96.72 रुपये89.62 रुपये
दिल्ली106.31 रुपये94.27 रुपये
कोलकाता106.03 रुपये92.76 रुपये
चेन्नई102.63 रुपये94.24 रुपये

Adiyogi Statue : 112 फूट उंच 'आदियोगी' शिवशंकराची मूर्ती, भव्यता पाहून डोळे दिपतील

Karnataka Adiyogi Statue : कर्नाटकमध्ये (Karnataka)  बम...बम...भोलेचा गजर...  आदियोगी शंकराच्या (Adiyogi Shiva Statue) 112 फूट उंच मूर्तीचे कर्नाटकमध्ये अनावरण करण्यात आले आहे. कर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला आहे. ही मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे स्थापन करण्यात आलेल्या आदियोगी शंकराच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या आदियोगी मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु हेही उपस्थित होते.

Mumbai Coldest Temperature : मुंबईत पारा घसरला; मोसमातील सर्वात कमी तापमान, पारा 13.8 अंशावर

Seasons Coldest Temperature in Mumbai : मुंबईत हुडहुडी वाढली आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD) , मुंबईत आज सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला आहे. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गेल्या आठवड्यामध्ये वर्तवला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. 

औरंगाबादमध्ये मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याच्या, कटलेला पंतग गोळा करण्याच्या नादात 10 जण जखमी

Aurangabad News : औरंगाबादमध्ये पतंग उडवण्याच्या, कटलेला पंतग गोळा करण्याच्या नादात 10 जण जखमी झाले आहेत. मकरसंक्रांतीला पंगत उतवताना हे दहा जण जखमी झाले आहेत. यात कोणाच्या हनुवटीला, कुणाच्या बोटांना तर कोणाच्या पायांना जखम झाली आहे. या दहा जणांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मालेगावमध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा

Malegaon Farmers Morcha : नाशिक जिल्हा बँकेने 62 हजार शेतकऱ्यांची जमीन लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. घेतलेल्या मुद्दलापेक्षा अनेक पटीने व्याज लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमतीपेक्षा कर्ज अधिक झाले आहे. नाशिक जिल्ह्यातले साधारण 65 हजार शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्ह्यात याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. या पार्श्वभूमीवर आज मालेगावमध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Amravati News: अमरावतीत 'समाधी' गझल संग्रहाचे प्रकाशन

Amravati News: संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे मराठी गझलेचे बादशाह अमरावतीचे चंद्रशेखर भुयार यांच्या "समाधी" गझल संग्रहाचे प्रकाशन अमरावती येथील अभियंता भवन येथे संपन्न झाले. हा प्रकाशन सोहळा भाजप नेते तुषार भारतीय, पुष्पराज गावंडे , नाना लोडम यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी गझल वैदर्भी मराठी गझल महा मुशायरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक गझलकारांनी यात सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात गजल प्रेमी वाचकांची मोठी गर्दी होती.

Chandrapur News: बनावट नोटा देण्याचं आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक

चंद्रपूर : बनावट (नकली) नोटा देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक. या प्रकरणात फिर्यादी हा तेलंगाणा राज्यातील असून त्याने चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की काही लोकं त्याला हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या खोट्या नोटा देण्याचे आमिष दाखवत आहे, पोलिसांनी या तक्रारी नुसार सापळा रचला आणि 5 लाखांच्या नकली नोटांच्या बदल्यात 40 हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले, स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर-तेलंगाणा राज्याच्या सीमेवर 2 आरोपींना केली अटक, या आरोपींकडून भारतीय बच्चओ का बँक असं लिहिलेल्या 500 रुपयांच्या 4408 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

Buldhana News: विविध मागण्यांसाठी आज राज्यातील 10 हजार समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच "कामबंद आंदोलन"

Buldhana News: राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील १० हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं असून जय सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या आरोग्य अधिकाऱयांनी दिला आहे. यासंबंधी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर हे आरोग्य अधिकारी आज निदर्शने करणार आहेत. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना अर्थात सीएचओ यांना शासकीय सेवेत कायम करून 'ब' वर्गाचा दर्जा देण्यात यावा, वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावं, बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात याव या व अशा अनेक मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे.

Hingoli News: औंढा नागनाथ परभणी रोडवर आपघात; टाटा मॅजिकच्या अपघातात दोघेजण जागीच ठार तर सहा जण गंभीर

Hingoli News: परभणी औंढा नागनाथ रोडवर औंढा नागनाथ च्या दिशेने जाणाऱ्या टाटा मॅजिक ला पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिल्याने टाटा मॅजिक रस्त्याचा रस्त्याच्या खाली जाऊन उलटले या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले आहेत रात्री आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून अण्णासाहेब कुरे आणि गंगाधर वावळे हे दोघे मयत झाले आहेत तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत  जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे.. याबरोबरच कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीचं समन्स आलं आहे. त्यामुळे चहल  आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज ठाकरे गटाचा 'रूमणे मोर्चा' निघणार आहे.  


विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस 
 
विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान नाशिकमध्ये शिवसेनेने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर नागपूरची जागा काँग्रेसला दिली जाण्याची शक्यता आहे.  


मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल आज ईडी समोर हजर राहणार


कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीचं समन्स आलं आहे. चहल यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचं आहे.


अकोल्यात ठाकरे गटाचा मोर्चा


शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज ठाकरे गटाचा 'रूमणे मोर्चा' निघणार आहे. पुर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भावर होत असलेला अन्याय, पिकविमा कंपन्यांची दादागिरी हे मुद्दे मोर्चातून सरकारच्या लक्षात आणून देण्यात येणार आहेत. खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुखांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे.  
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बिऱ्हाड आंदोलन  


नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेकडून गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जातय.  त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे.  यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केलं जाणार आहे.
 
सोलापूरच्या  सिद्धेश्वर यात्रेत शोभेचे दारू काम सोहळा


सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत आज शोभेचे दारू काम सोहळा पार पडणार आहे. दोन वर्षानंतर पहिल्यांदा शोभेचे दारू काम पार पडणार असल्याने मोठा उत्साह असणार आहे. कोरोना काळात केवळ धार्मिक विधींना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शोभेचे दारू काम सोहळा झालेला नव्हता. हा सोहळा संध्याकाळी पार पडेल.  


रिमोट वोटर मशीनचा डेमो  


बाहेरगावच्या मतदारांसाठी रिमोट वोटर मशीन आज राजकीय पक्षांना डेमो दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या प्रयोगाला अनेक राजकीय पक्षांचा विरोध केलाय.  या डेमोसाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा 57 पक्षांना आमंत्रित केलं आहे.  


प्रभाग रचनेच्या याचिकेवर सुनावणी  


महाविकास आघाडी सरकारनं आपल्या काळात घेतलेला वाढीव प्रभाग रचनेबाबतचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं सत्तेत येताच रद्दबातल केला. याविरोधात माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी केलेल्या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. महापालिका प्रभागांची संख्या 227 वरुन 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. या निर्णयावर शासकीय अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं हा निर्णय बदलला आणि  पुन्हा महापालिकेची प्रभाग संख्या 227 ठेवण्याचा निर्णय जारी करत तसा कायदाच केला. ज्याला राजू पेडणेकर यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होईल. 


जोशीमठ संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी


जोशीमठ संदर्भात दाखल याचिकेवर न्यायमुर्ती चंद्रचूड, न्यायमुर्ती पी एस नरसिंह आणि न्यायामुर्ती जे बी पारदीवाला यांच्या खंडपीठ पुढे सुनावणी होणार आहे. 


पुण्यात राष्ट्रवादीची पत्रकार परिषद 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहरातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


भाजप नेते किरीट सोमय्या  कोल्हापूर दौऱ्यावर


 भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. 
  
अर्बन नक्षल प्रकरणाती आरोपी वरावरा राव यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


अर्बन नक्षल प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याच्या परवानगी करिता वरावरा राव यांनी दाखल केला आहे अर्ज. सदर अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी.


 सीरम इन्स्टिट्यूट विरोधात दाखल मानहानीच्या याचिकेवर सुनावणी


 सीरम इन्स्टिट्यूट विरोधात दाखल मानहानीच्या याचिकेवर आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालय सुनावणी. सामाजिक कार्यकर्ता अंबर कोरई आणि इतरांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.