देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2025 संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून भारतीय रेल्वेसाठी 2025-26 या वर्षात तब्बल 2 लाख 52 हजार 200 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रालालाही भरगोस निधी देण्यात आला असून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचं कामही या बजेटमधून होत आहे.

महाराष्ट्रातील एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील प्रकल्पांसाठी 511.48 कोटींची तरतूद केली आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
रेल्वेच्या प्रस्तावित कामांसाठी 4.60 लाख कोटींचा निधी असून, यामध्ये नवीन वर्कशॉप, नवीन डबे, स्टेशन डेव्हलपमंट यांचा समावेश असणार आहे.
यंदाच्या वर्षी रेल्वे 17 हजार 500 जनरल डबे बनवणार असून प्रवाशांच्या भेटीला 200 वंदे भारत, 100 अमृत भारत आणि 50 नमो भारत ट्रेन येणार आहेत.
रेल्वे बजेटमधूनन 1 हजार फ्लायओव्हर आणि अंडर पास बनवले जाणार आहेत. तर, संपूर्ण भारतात 7 हजार किमीचा रेल्वे ट्रॅक हा हाय स्पीड ट्रॅक बनवणार आहेत.
रेल्वे सुरक्षेसाठी 1 लाख 14 कोटींची भरीव गुंतवणूक असून रेल्वेचे यावर्षी संपूर्ण विद्युतीकरणाचे लक्ष आहे, त्यातून 1.6 बिलियन टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्टही रेल्वे ठेवले आहे.