Wedding Cancels After Groom Dance : भारतात सध्या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओतील काही क्षण आनंद देणारे-हसवणारे असतात. तर काही व्हिडीओ आपल्या संवेदनशील मनाला स्पर्श देखील करतात. लग्नात नवरदेव आणि वधूच्या प्रवेशापासून ते त्यांनी केलेल्या नृत्यापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहेत. पण दिल्लीतील एका विवाह सोहळ्यात नवरदेवाला डान्स करणे, चांगलचं महागात पडलंय. नवरदेवाकडे त्याच्या मित्रांनी वारंवार डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर नवरदेवाने 'चोली के पीछे' या गाण्यावर तो आनंदात नाचू लागला? हे पाहून त्याच्या सासऱ्याला राग आला आणि त्यांनी लग्न मोडल्याचं समोर आलंय.
रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
अधिकची माहिती अशी की, नवरदेवाने सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स केला. मात्र, हे त्याच्या सासऱ्याला आवडलं नाही. त्याने थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. दिल्लीतील या विवाहसोहळ्यात नवरदेव विवाहस्थळी पोहोचत असताना मिरवणुकीत 'चोली के पीचे क्या है' या लोकप्रिय गाण्यावर तुफान डान्स केला. मात्र, याच डान्समुळे त्याचं लग्न मोडलंय.
पाहुण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाचे मित्र त्याला डान्स करण्यासाठी सांगत होते. त्यानंतर नवरदेवानेही मित्रांच्या आग्रहानुसार डान्स केला. त्यालाही डान्स करताना आनंद वाटू लागला. अनेक पाहुण्यांनी देखील त्याच्या डान्सचा आनंद घेतला. पण नवरदेवाच्या सासऱ्यांना हे आवडले नाही. त्यांनी हे कौटुंबिक मुल्यांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दिक्षित यांचा खलनायक सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातील 'चोली के पिछे क्या है', हे गाण वादात देखील सापडलं होतं. ते लोकप्रिय देखील ठरलं होतं. हे गाण अलका यागनिक आणि इला अरुण यांनी गायलं होतं. मात्र, हे गाण सध्या एक लग्न मोडल्यामुळे चर्चेत आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या