Maharashtra News Updates 16 December 2022 : पुण्यात रामनगर पोलिस चौकीपासून काही अंतरावर गोळीबार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Dec 2022 10:52 PM
पुण्यात रामनगर पोलिस चौकीपासून काही अंतरावर गोळीबार

पुण्यात रामनगर पोलिस चौकीपासून काही अंतरावर गोळीबार झालाय. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Nagpur Rain : शहरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

Nagpur Weather Update : दोन दिवस सतत ढगाळ वातावरणानंतर नागपुरात अखेर आज, शुक्रवारी सायंकाळपासून शहरातील काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु होता. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊसाची शक्यता हवामान खात्याने 12 डिसेंबरनंतर वर्तविली होती. गेल्या आठवड्याभरापासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज, शुक्रवारी सायंकाळपासून नागपुरातील बेसा, मानेवाडा, सिव्हिल लाईन्स, सीताबर्डी, सोमलवाडा आदी भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते काही काळासाठी जलमय झाले होते.

नागपुरात विकृतीचा कळस : मादी श्वानावर बलात्कार

Nagpur News : नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने कुत्रीवरच बलात्कार केल्याचे विचित्र प्रकरणे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी भादंवि कलम 294, 377 तसेच पशुक्रुरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार देवेंद्र गणपत भगत (वय 40) हा शिवम ट्रेडर्सच्या समोरील मोकळ्या जागेत, शाहू नगर चौक, मानेवाडा बेसा रोड, हुडकेश्वर या ठिकाणी राहतो. व तेथेच हातमजुरीचे काम करतो. तो मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कोथूलना येथील रहिवासी आहे. बेसा येथील बगिच्यात फिरणाऱ्या एका कुत्रीवर देवेंद्र भगत याने बलात्कार केला.

Mahavikas Aghadi Mahamorcha: महाविकास आघाडीच्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी अटींसह पोलिसांची परवानगी 

राज्यातील विविध प्रश्नांवरुन राज्यातील महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. 


महाविकास आघाडीला उद्याच्या मोर्चासाठी काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे. 


दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कोणतंही भाष मोर्चाला मार्गदर्शन करताना नेत्यांनी करू नये. कुठलेही आक्षेपार्ह विधान करू नये.    


मोर्चात आर्म अॅक्टनुसार घातक शस्त्र वापरू नये. उदा: चाकू, तलवार आणि अन्य शस्त्र.


मोर्चा दरम्यान कुठेही फटाके फोडू नये.


दिलेल्या मार्गानुसारच मोर्चा पुढे जायला हवा.


त्याच बरोबर कायदा व सुव्यवस्थे  उल्लंघन होणार नाही व सर्व नियमांचे पालन करावे अशा अटीच्या आधारे मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे.

पोलीस भरतीच्या 18 हजार 331 रिक्त पदांसाठी 12 लाखांहून अधिक अर्ज, पोलीस शिपाई पदासाठी 68 तर पोलीस शिपाई चालक पदासाठी 5 तृतीयपंथींचे अर्ज

Maharashtra Police Recruitment 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाकडे 18 हजार 331 रिक्त पदांसाठी 12 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. हे अर्ज पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी आले आहेत. पोलीस भरती प्रकियेत तृतीयपंथीयांना अर्ज भरण्यासाठी परवानगी दिल्यानंतर पोलीस शिपाई 68 आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी 5 तृतीयपंथीचे अर्ज आले आहेत. 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती परंतु ऑनलाइन प्रक्रियेत काही गैरसोय झाल्यामुळे ती 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना

Dharmaveer Aadhyatmik Sena : भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाची ही आध्यात्मिक सेनेची स्थापना


बाळासाहेबांच्या शिवसेनेची ‘धर्मवीर आध्यात्मिक सेनेची‘ स्थापना


आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी आणि समस्यांचे निवारण करुन भक्कम पाठबळ देण्याकरता धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना


धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या अभिप्रेत हिंदुत्वाचा विचार ही सेना महाराष्ट्रात पेरणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती

Maha Vikas Aghadi Morcha : मुंबई पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या मोर्चाला अजूनही परवानगी नाही, मोर्चा काढण्यावर मविआ ठाम

Mumbai News : मुंबई पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अद्यापही परवानगी नाही


परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडी ठाम


स्टेज उभारण्याच्या मागणीला मुंबई पोलीस आता सकारात्मक असल्याची माहिती, काल ट्रक ट्रेलर उभारण्याच्या दिल्या होत्या सूचना


मोर्चा तयारीसाठी शाखा प्रमुख आणि माजी नगरसेवकांना दुपारी 3 नंतर रिचर्डसन क्रूडासजवळ जमण्याच्या सूचना, यावेळी अनिल परबांसह इतर सेना नेतेही उपस्थित राहणार 


रात्री 10 वाजता शिवसेनेचे वरिष्ठ नेते टाईम्स इमारतीजवळ स्टेज तयारी पाहणीसाठी येणार

Ashish Shelar : मुंबईत उद्या भाजपचं माफी मांगो आंदोलन, मविआविरोधात आक्रमक पवित्रा

BJPs Mafi Mango Protest : उद्या भाजपकडून मविआविरोधात माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे.



 

राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत : आशिष शेलार

संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत : आशिष शेलार 


 





Nanded News: आता तृतीयपंथीही होणार पोलीस; मराठवाड्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवाराचा पोलीस भरतीचा अर्ज दाखल

Nanded News: महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सामाजिक वातावरणातून बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या,घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय. ज्यात राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आज शेवटच्या दिवशी,देश सेवेची आवड असलेल्या,नांदेड शहरातील उच्च शिक्षित आणि सध्या MPSC ची तयारी करणाऱ्या दिनेश हणवते या तृतीयपंथीयाचा पोलीस भरती नोकरीचा मराठवाड्यातील पहिला अर्ज दाखल झालाय.


राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळताच दिनेश याने,आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. मात्र तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र नसल्याने फॉर्म भरण्यास अडचण येत होती.दरम्यान समाजाशी लढता झगडता निर्माण झालेली जिद्द आणि  तृतीयपंथीयासाठी काम करणार्‍या कमल फाउंडेशनने मदतीचा हात देत त्याचे हे काम सोप्प केल.आणि तीला पोलीस भरतीसाठी  लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिलीय.काल अखेर शेवटच्या दिवशी सायंकाळी तीचा पोलीस भरतीसाठीचा फॉर्म भरून घेतला असून ती पोलीस भरती प्रक्रियेतील मराठवाड्यातील पहिली तृतीयपंथी उमेदवार ठरलीय. दरम्यान आम्ही घेतलेल्या माहीती नुसार काल शेवटच्या दिवशी राज्यातील तृतीयपंथी उमेदवाराचा हा पहिलाच अर्ज दाखल करण्यात आलाय.

Buldhana News: राज्यात महापुरुषांचा अवमान होत असताना बुलढाण्यात राष्ट्रवादी कडून सन्मान

Buldhana News: राज्यात एकीकडे राष्ट्रपुरुषांचा बेताल वक्तव्य करून अवमान केल्या जात आहे तर त्या विरोधात विविध संघटना रस्त्यावर उतरून कुठे जोडेमारो, तर कुठे राजकीय नेत्यांच्या प्रतिमा जाळणे, तर कुठे शाईफेक करण्यासारखे आंदोलन करत आहेत. मात्र बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील 93 गावांत जाऊन महापुरुषायांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला असून आज शिरपूर या गावातून या सन्मान यात्रेचा महापुरुषांचा सन्मान करून आरंभ झाला. या सन्मान यात्रे राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याना सन्मानाने पूजन करणार आहेत.

Maharashtra News: हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात तब्बल 35 हजार कोटींची गुंतवणूक करणार

Maharashtra News: महाराष्ट्रात हिंदुजा ग्रुप तब्बल 35 हजार कोटींची गुंतवणूक करणारेय. हिंदुजा समूहाने महाराष्ट्र सरकारसोबत गुंतवणुकीचा सामंजस्य करार केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हिंदुजा आणि उद्योग विभागाचे मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आलाय. हिंदुजा समूह ग्रामीण आर्थिक विकास, बँकिंग, ऑटोमोबाईल, आरोग्य, शिक्षण आणि माध्यम-मनोरंजन यासारख्या 11 क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक करणारेय. दरम्यान, महिंद्रा कंपनीनेही नुकतीच पुण्यामध्ये दहा हजार कोटींचा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झालीय.

Solapur Bandh Updates: सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून मोठा बंदोबस्त 

Solapur Bandh Updates: सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून मोठा बंदोबस्त 


शहरामध्ये 9 पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच 154 कर्मचारी, राखीव पोलीस दलाच्या 4 टीम, 9 स्ट्राईकिंग फोर्स तैनात केल्यात.


बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षांसोबत तसेच बंदला विरोध करणाऱ्या पक्षांसोबत काल बैठक झाली आहे


कोणीही बंदसाठी किंवा बंदला विरोध करण्यासाठी दबाव आणू नये अशा सूचना केल्या आहेत. 


सोलापूर बंद शांततेत करा, कोणत्याही व्यापाऱ्यांना जबरदस्ती करू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा

Beed News:

Beed News: बीडमधील द्वारकादास मंत्री सहकारी बँकेमध्ये 400 कोटी रुपयांचा घोटाळा संचालक मंडळाने केला होता त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. आणि याचा अपहार प्रकरणी मंत्री बँकेवर रिझर्व बँकेने काही निर्बंध लावले होते आणि हेच निर्बंध पुढील तीन महिने कायम ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने मंत्री बँकेला दिले आहेत.. बँकेवर लावलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने कायम ठेवल्याने ठेवीदाराची चिंता मात्र आता वाढली आहे. निर्बंधाच्या काळामध्ये बँकेत होणाऱ्या व्यवहाराची आणि कामकाजाची तपासणी करून निर्बंध हटवायचे की नाही याचा निर्णय तीन महिन्यानंतर रिझर्व्ह बॅंक घेणार आहे. 

Kolhapur News: कोल्हापुरात पोहचताच भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचे जंगी स्वागत 

Kolhapur News: कोल्हापुरात पोहचताच भाजपकडून चंद्रकांदादा पाटील यांचे जंगी स्वागत 


चंद्रकांत दादांकडून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घोषणा


कोल्हापूर रेल्वे स्थानकावरच भाजप कार्यकर्त्यांनी केलं स्वागत

Vande Bharat Express: नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक

Vande Bharat Express: नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात 'वंदे भारत'वर दगडफेक, 11 डिसेंबरला मोदींच्या हस्ते वंदे भारतला हिरवा झेंडा

Hingoli News: जिल्हापरिषद शाळेत विभागीय आयुक्त झाले शिक्षक

Hingoli News: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल अचानक औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर गावाला भेट दिली. गावाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्रेकर यांनी थेट जिल्हा परिषद शाळा गाठली पाचव्या वर्गात प्रवेश करताच आयुक्तांनी हातात खडू आणि डस्टर घेत विद्यार्थ्यांना गणिताचे धडे शिकवायला सुरुवात केली. संख्यांचे वर्ग वर्गमूळ त्याच बरोबर घन आणि घनमूळ विभागीय आयुक्तांनी विद्यार्थ्यांना शिकवले  विभागीय आयुक्त शिक्षक बनवून शिकवत आहेत. याची नीट शी कल्पना ही नसल्याने विद्यार्थ्यांनी सुद्धा मनमोकळा संवाद साधला यामुळे केंद्रेकर यांनी समाधान व्यक्त केले तर या वर्गाचे वर्गशिक्षक असलेले अशोक इंगोले यांची सुद्धा केंद्रेकर यांनी स्तुती केली. आपण चांगले शिकवत आहात, परंतु विद्यार्थ्यांकडून 300 पर्यंतचे पाढे पाठ करून घ्या अशा सूचना सुद्धा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. 

Hingoli News: ढगाळ वातावरणाने गुलाब फुल शेतीवर परिणाम

Hingoli News: ढगाळ वातावरणाचा गुलाब फुलाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरयांना मोठा आर्थिक फटका बसतोय. ढगाळ वातावरणामुळे गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय, तर दमट वातावरणामुळे अचानकच उत्पादन चार पटीने वाढले आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर गुलाबाच्या फुलांची आवक झाली आहे परिणामी बाजार भाव सुध्धा घसरले आहेत. 

Ulhasnagar News: उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी पोलिसांच्या ताब्यात

Ulhasnagar News: उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौधरी यांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून नेमक्या कोणत्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई केली जातेय, हे मात्र पोलिसांनी सांगितलेलं नाही.


गुरुवारी रात्रीच्या सुमारास राजेंद्र चौधरी हे त्यांच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाबाहेरील शाखेत बसलेले असताना मध्यवर्ती पोलिसांनी शाखेत जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणलं. यानंतर रात्री उशिरापर्यंत मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र पोलिसांकडून शिवसैनिक किंवा पत्रकारच नव्हे, तर अगदी राजेंद्र चौधरी यांच्या कुटुंबीयांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई का केली जातेय? याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार राजकीय दबावातून घडत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी सभागृह नेते धनंजय बोडरे यांनी केला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आशियातील सर्वात मोठा टेक फेस्ट म्हणून ओळख असलेला आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचं खऱ्या अर्थाने दर्शन या टेक फेस्टच्या निमित्ताने करता येणार आहे. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण होणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे, 


शंभुराज देसाई यांचा सीमाभागातील शिनोळी गावाचा दौरा 


राज्याचे मंत्री शंभुराज देसाई सीमाभागातील शिनोळी गावाचा दौरा करणार आहेत. सीमाभाग समन्वयक समितीचे सदस्य आणि मंत्री शंभुराजे देसाई आज कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात जाणार आहेत. कोल्हापुरातून गडहिंग्लज आणि त्यानंतर शिनोळी असा शंभूराज देसाई यांचा प्रवास असेल. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिनोळी गावात शंभूराज देसाई यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सभा होणार आहे. शिनोळी हे गाव महाराष्ट्रात अगदी कर्नाटक सीमेजवळ आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रश्न ताजा असताना समन्वय समितीचे सदस्य असल्याने देसाई यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक दिवसाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. संध्याकाळी 5 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. आपल्या या दौऱ्यात मुख्यमंत्री काही विभागांचा आढावा, गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाली येथून मुख्यमंत्री कोल्हापूरकडे रवाना होतील. कोल्हापूरहून रात्री ते विमानाने मुंबईकडे जातील.


आज सोलापूर बंदची हाक


छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महामानवांच्या बाबतीत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने या बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षासह विविध संघटनाचा पाठिंबा आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या बंदला शिंदे गट, भाजप मनसे या पक्षांचा विरोध आहे. 


कोरोनाच्या दोन वर्षानंतर मुंबई आयआयटीत आजपासून टेक फेस्टची धूम


आशियातील सर्वात मोठा टेक फेस्ट म्हणून ओळख असलेला आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचं खऱ्या अर्थाने दर्शन या टेक फेस्टच्या निमित्ताने करता येणार आहे. टेक कनेक्ट, ऑटो एक्झिबिशन, इंटरनेशनल एक्झिबिशन, रोबोटिक्स ड्रोन रेसिंग लीग, इंटरनॅशनल रोबोवार हे सगळं या टेक फेस्टमध्ये अनुभवता येणार आहे. विविध राज्यातून, देशातून विद्यार्थी प्रतिनिधी या टेक फेस्टमध्ये सहभागी होणार आहेत.


भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण होत आहेत. आज यानिमित्त राहुल गांधींची पत्रकार परिषद होणार आहे. तसेच यावेळी भारत जोडोचं नवीन थीम सॉंग लॉँच करण्यात येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.