Maharashtra News Updates 12 December 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Dec 2022 10:24 PM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलीय.  या विद्यार्थ्यांना होस्टेलमधुन बाहेर जाण्यास सांगण्यात आलय.  मात्र या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरु करण्यात आलय.  कारवाई झालेले हे विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर अंथरुन- पांघरून घेऊन आलेत.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.  मात्र ज्यांना वसतीगृह मिळालय अशा विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांना वसतीगृह मिळालेले नाही असे विद्यार्थी देखील बळजबरीने राहतात.  अशा चोरुन राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलीय.

बारामती व्यापारी महासंघ  बंद  

बहुजन महापुरुषांच्या सतत होणाऱ्या अवमानबद्दल बारामतीतून निघणाऱ्या बहुजन समाजाच्या निषेध मोर्चा निमित्त बारामतीतील सर्व दुकाने उद्या दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बारामती व्यापारी महासंघाने घेतला आहे. 

महापुरूषांच्या अवमानाविरोधात उद्या बारामती बंद  

महापुरुषांच्या सतत होणाऱ्या अवमानाबद्दल बारामतीतून निघणाऱ्या बहुजन समाजाच्या निषेध मोर्चा निमित्त बारामतीतील सर्व दुकाने उद्या दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बारामती व्यापारी महासंघाने घेतला आहे.  

मुंबईत गोवरग्रस्त रुग्णांची संख्या 462 वर, एका चिमुकलीचा मृत्यू 

मुंबईत गोवरग्रस्त रुग्णांची संख्या 462 पर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 16 बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. आज एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. तर मुंबईत संशयित रुग्णांची संख्या 4936 झाली आहे. रुग्णालयात आज 146 मुले दाखल झाली आहेत. यातील 23 मुले ऑक्सिजनवर असून 5 आयसीयूमध्ये आहेत. तर1 व्हेंटिलेटरवर आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी वाय प्लस सुरक्षा नाकारली





भाजपचे नेते त्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना शासनाकडून दिले जाणारी वाय प्लस ही सुरक्षा नाकारली आहे. याबाबतचे प्रधानमंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या राज्य गुप्तवार्ता विभागाला दिले आहे. राज्यात भाजप शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारकडून मंत्र्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता... पोलीस कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण . व पोलीस विभागातील वाहनांची कमतरता या बाबींचा विचार करता देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात यावी, असे लेखी पत्र 9 नोव्हेंबर 2022 रोजी  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या राज्य गुप्त वार्ता विभागाला दिले आहे. शासनाकडून मंत्र्यांना वाय प्लस ही सुरक्षा दिली जाते. मात्र ही सुरक्षा घेण्यास मंत्री गिरीश महाजन यांनी नकार दिला आहे.


 

 



 


तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी मंत्री तानाजी सावंतांचं पत्र एबीपी माझाच्या हाती

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंच्या (IAS Tukaram Mundhe) बदलीसाठी राज्याचे मंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) यांनी स्वत: पत्र लिहिलं होतं. सावंत यांनी लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या पत्रात तुकाराम मुंढे हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचीही तक्रार सावंतांनी केली आहे.  तुकाराम मुंढे यांना कामकाजाच्या सुधारणेबाबत समज देऊनही सुधारणा होत नाही, असंही या पत्रात म्हटलं आहे.

शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांची जामीनासाठी हायकोर्टात याचिका

शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांची जामीनासाठी हायकोर्टात याचिका, राष्ट्रीय तपासयंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला नवलखा यांच्यावतीनं हायकोर्टात आव्हान

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर 9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैन्यांमध्ये झटापट, झटापटीत दोन्ही देशांचे 30 सैनिक जखमी

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर 9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैन्यांमध्ये झटापट, झटापटीत दोन्ही देशांचे 30 सैनिक जखमी

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात... 

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात... वायफळ टोल नाक्यावर एक कार हळुवार जात असताना मागून आलेल्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली...त्यामध्ये टोल नाक्यावर समोर असलेल्या कारचे मोठे नुकसान झाले...आज दुपारी झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे... कालच समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते आणि आज त्याच ठिकाणी अपघात झाला... कदाचित समृद्धी महामार्गावरचा हा पहिला अपघात असावा....

पोलीस भरती प्रकियेत तृतीयपंथीयांना अर्ज भरता येणार

पोलीस भरती प्रकियेत तृतीयपंथीयांना अर्ज भरता येणार. पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज भरता येणार.पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी..हायकोर्टाच्या आदेशानुसार आदेश जारी

Samruddhi Mahamarg: लालपरी आता समृद्धी महामार्गावर धावणार, आठ तासात नागपूर ते शिर्डीचा एसटीने प्रवास

सर्वसामान्य साई भक्तांना आता समृद्धीची सफर करता येणार आहे, कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होताच लाल परी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने समृद्धीवर उतरण्याचे ठरवले आहे. एसटी ने नागपूर ते शिर्डी दरम्यान एसटीची विनावातानुकूलित 45 आसनी ( 30 सीटिंग, 15 स्लीपिंग ) बस सेवा 15 डिसेंबर पासून थेट समृद्धी महामार्गावरून सुरू करण्याचे ठरवले आहे. रात्री नऊ वाजता नागपुरातून निघणारी बस समृद्धी महामार्गावरून पहाटे पाचच्या सुमारास शिर्डीला पोहोचेल. आधी दुसऱ्या मार्गाने नागपूरपासून शिर्डीला जाण्यासाठी 14 तासांचा वेळ लागायचा. मात्र आता अवघ्या 8 तासात शिर्डीपर्यंतचा प्रवास पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ तर वाचणारच आहे, सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धीवरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये भाडं द्यावा लागणार असून पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचं भाडं हेदेखील 1300 रुपये होतं. 

Nora Fatehi: जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात नोरा फतेहीने दाखल केला मानहानीचा दावा 

अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करा : सामान्य नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन






तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करा : सामान्य नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

मागणी मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू : निवेदनकर्त्यांच्या प्रतिक्रिया

 

 राज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या केवळ 59 दिवसांतील अन्यायकारक बदलीबाबत आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे.. 

 

जिल्ह्यातील अनेक मतदार सामान्य नागरिकांच्या वतीने निवेदन

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन पाठवण्यात आलंय..
 

 




 



 


Chandrapur Crime News : अट्टल दुचाकी चोरट्याला अटक, चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका अट्टल दुचाकी चोराला अटक केलीय.  त्याच्याकडून पोलिसांनी 14 बाईक जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरी करून विक्री करण्याचा त्याचा धंदा होता. वरोरा बस स्थानकावर चोरीची बाईक विक्री करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांना त्याचा सुगावा लागला. सापळा रचून अटक करण्यात आल्यावर त्याने 14 बाईक चोरीची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने 14 दुचाकी ताब्यात घेत अमर उर्फ पिंटू मेश्राम नावाच्या या दुचाकीचोराला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यासह वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमधून बाईक चोरी करणाऱ्या या आरोपीला चोरीच्या प्रकरणात आधीही अटक झाली होती.
 

Chandrapur crime: चंद्रपुरात अट्टल दुचाकी चोराला पकडून 14 बाईक जप्त

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका अट्टल दुचाकी चोराला पकडून त्याच्याकडून 14 बाईक जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरी करून विक्री करण्याचा त्याचा धंदा होता. वरोरा बस स्थानकावर चोरीची बाईक विक्री करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांना त्याचा सुगावा लागला. सापळा रचून अटक करण्यात आल्यावर त्याने 14 बाईक चोरीची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने 14 दुचाकींना ताब्यात घेत अमर उर्फ पिंटू मेश्राम नावाच्या या दुचाकीचोराला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यासह वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमधून बाईक चोरी करणाऱ्या या आरोपीला चोरीच्या प्रकरणात आधीही अटक झाली होती.

मुंबई विमानतळावर प्रवाशांची रेकॉर्डब्रेक गर्दी, दोन दिवसात दीड लाख प्रवाशांची नोंद 

मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या रेकॉर्डब्रेक गर्दीची नोंद झाली आहे. मागच्या आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी म्हणजे 10 ते 11 डिसेंबर दरम्यान विमानतळावर 1 लाख 50 हजार 988 प्रवाशांच्या वावराची नोंद झाली आहे. यात  1 लाख 11 हजार 441 आंतरदेशीय विमानसेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची नोंद आहे.  

Navneet Rana News: नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी 19 डिसेंबरला फैसला, मुंबई सत्र न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण, विशेष कोर्टाच्या न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला

Navneet Rana News: नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी 19 डिसेंबरला फैसला, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालय देणार 19 डिसेंबरला फैसला


मुंबई सत्र न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण, विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निकाल राखून ठेवला. राणा यांनी शिवडी कोर्टानं दिलेल्या कारवाईच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयात मागितली आहे दाद

पर्ल ग्रुप घोटाळ्यात प्रवीण राऊतांची दिल्ली ईडीकडून चौकशी, प्रवीण राऊत संजय राऊतांचे निकटवर्तीय

पर्ल ग्रुप घोटाळ्यात प्रवीण राऊतांची दिल्ली ईडीकडून चौकशी, प्रवीण राऊत संजय राऊतांचे निकटवर्तीय, प्रवीण राऊतांसह संजय राऊतांनाही झाली होती पत्राचाळ घोटाळ्यात अटक

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर प्रवाशांची रेकॉर्डब्रेक गर्दी

मुंबई विमानतळावर प्रवाश्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी, या विकएण्डला दिवसभरात दीड लाखांहून अधिक प्रवाश्यांची नोंद, 10 ते 11 डिसेंबर दरम्यान विमानतळावर 1 लाख 50 हजार 988 प्रवाश्यांच्या वावराची नोंद, ज्यात 1 लाख 11 हजार 441 आंतरदेशीय विमानसेवेचा वापर करणाऱ्यांची नोंद

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर प्रवाशांची रेकॉर्डब्रेक गर्दी

मुंबई विमानतळावर प्रवाश्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी, या विकएण्डला दिवसभरात दीड लाखांहून अधिक प्रवाश्यांची नोंद, 10 ते 11 डिसेंबर दरम्यान विमानतळावर 1 लाख 50 हजार 988 प्रवाश्यांच्या वावराची नोंद, ज्यात 1 लाख 11 हजार 441 आंतरदेशीय विमानसेवेचा वापर करणाऱ्यांची नोंद

Karnataka Belgaum News : कर्नाटक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा
Belgaum News :  बेळगावात दि.१९ ते ३० डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन होणार आहे.बेळगावात होणारे हे दहावे हिवाळी अधिवेशन आहे.अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ,वरिष्ठ अधिकारी आणि अन्य कर्मचारी येणार आहेत.राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी देखील अधिवेशनासाठी येणार आहेत.त्यांच्या निवास,भोजन,वाहतूक,सुरक्षा यांची व्यवस्थेत कोणतीही कसूर राहू नये.वैद्यकीय सेवेची व्यवस्था करावी. येणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या.दोन हजार हून अधिक खोल्यांची व्यवस्था बेळगावातील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे.बैठकीला जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईच्या खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये स्फोट होऊन आग, दोन पोलीस कर्मचारी जखमी

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे परिसरातील खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये मोठी आग लागली. दुपारी साडेबाराच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अर्धा तासांत आगीवर नियंत्रण मिळवलं. खेरवाडी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये स्टोअर रुममध्ये स्फोट होऊन मोठी आग लागली. आगीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र आग कशामुळे लागली याचा तपास खेरवाडी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या याचिकेवरील सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब

Sanjay Raut News : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या याचिकेवरील सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब


मुंबई सत्र न्यायालयाने राऊत यांना दिलेल्या जामीनाला ईडीकडून हायकोर्टात आव्हान


पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने केली होती अटक


मात्र पुराव्यांअभावी पीएमएलए कोर्टाने मंजूर केला संजय राऊतांना जामीन

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Anil Deshmukh Bail : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराचा आरोपात देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. 

Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांना जामीन मंजूर

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. 





Buldhana News: शिवसेना ठाकरे गट बुलढाणा उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांच्या गाडीची आज्ञताकडून तोडफोड

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बुलढाणा उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांच्या निवासस्थानी उभी असलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर रात्री बारा वाजेच्या सुमारास अज्ञाताने हल्ला चढवून गाडीची तोडफोड करून, गाडीच्या पाठीमागील काचेवर लिहिलेला शिवसेनेचा सिम्बॉल आणि नावाची तोडफोड केली आहे. घटनास्थळी चिखली पोलीस पोहोचले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. याठिकाणी शिवसैनिक जमले असून वातावरण तापण्याची शक्यता.

Nawab Malik: नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका

Nawab Malik: नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका


मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात मलिकांची हायकोर्टात याचिका


न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्यासमोर सादर होणार याचिका


कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली होती

यवतमाळमध्ये भाजीपाला व्यापाऱ्याच्या घर फोडलं, 27 लाखांचा ऐवज लंपास

Yavatmal News : घराचे कुलूप तोडून चोरट्याने भाजीपाला व्यापाऱ्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख असा एकूण 27 लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना अरुणोदय सोसायटीमध्ये सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी हिरालाल जयस्वाल (रा. रेणुका मंगल कार्यालयाजवळ, अरुणोदय सोसायटी, यवतमाळ) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शहरातील रेणुका मंगल कार्यालय परिसरातील अरुणोदय सोसायटीतील हिरालाल जयस्वाल शुक्रवारी काही कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील 20 लाखांचे सोने आणि 7 लाखांची रोख रक्कम असा एकूण 27 लाखांचा ऐवज लंपास केला. ही बाब बाहेरगावावरुन परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. त्यांनी अवधूतवाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अरुणोदय सोसायटी गाठून पाहणी केली. अवधूतवाडी पोलिसांनी  याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून पुढील तपास अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहे.

माझगाव डॉकजवळील उंच इमारतीचा वापर हेरगिरीसाठी होऊ शकतो, संवेदनशील परिसर असल्याने परवानगी देता येणार नाही : हायकोर्ट

Mumbai News : माझगाव डॉकजवळील उंच इमारतीचा वापर हेरगिरीसाठी होऊ शकतो - हायकोर्ट


अतिशय संवेदनशील परिसर असल्याने परवानगी देता येणार नाही - हायकोर्ट


दक्षिण मुंबईतील एका उंच इमारतीस पालिकेने नाकारलेली परवानगी योग्यच असल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा


चार मजल्यांचीच परवानगी असलेल्या परिसरात दहा मजली इमारतीच्या बांधकामाला पालिकेने साल 2018 मध्ये बजावली होती काम बंद नोटीस

खदानीजवळ सेल्फी काढणं जालन्यातील विद्यार्थ्याच्या जीवावर, फोटो काढता हातातून पाण्यात पडलेला मोबाईल फोन काढताना बुडून मृत्यू

Jalna News : खदानीजवळ सेल्फी काढणं विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं आहे. जालना इथल्या खरपुडी इथे फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा खदानीत बुडून मृत्यू झाला. नववीमध्ये शिकणारा अर्णव गिरी हा विद्यार्थी शिवारात फिरत होता. यावेळी अर्णवला पाण्याने भरलेल्या खदाणीजवळ सेल्फी काढण्याचा मोह झाला. यादरम्यान हातातील मोबाईल निसटून पाण्यात पडला, तोच मोबाईल काढण्याच्या प्रयत्नात त्याचा बुडून मृत्यू झाला.

Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर

Nandurbar Latest News: नंदूरबार जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती त्यापैकी 4 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने 119 ग्रामपंचायतींसाठी  प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटपही करण्यात आले असून प्रचाराला ही सुरुवात झाली आहे.  या टप्प्यात सर्वाधिक ग्रामपंचायत धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील असून या भागातून रोजगाराच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आठ महिने स्थलांतर करीत असतात गावात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम असली तरी दुर्गम भागातील गाव  स्थलांतरामुळे ओस पडले आहेत. त्यामुळे गावातून बाहेर गावाला गेलेल्या मतदारांना शोधून त्यांना मतदानाच्या दिवशी अर्थात 18 डिसेंबर रोजी मतदानासाठी गावात आणण्याची मोठी कसरत उमेदवार आणि समर्थकांना करावी लागणार आहे.

Jalna News: जालन्यात विद्यार्थ्यांचा सेल्फी काढतांना तोल जाऊन खदाणीत बुडून मृत्यू

Jalna News: जालना येथील खरपुडी येथे फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास खदाणी जवळ सेल्फी काढण जीवावर बेतलं ,गावच्या शिवारातील खदानी जवळ सेल्फी काढताना नववीमध्ये शिकणाऱ्या अर्णव गिरी या विद्यार्थ्यांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला. शिवारात फिरताना अर्णवला पाण्यानं भरलेला खदाणी जवळ सेल्फी काढण्याचा मोह झाला. दरम्यान हातातील मोबाईल निसटल्याने तो पाण्यात पडला, तोच मोबाईल काढण्याच्या प्रयत्नांत त्याचा बुडून मृत्यू झाला. 

Ratnagiri News : एसीबी कार्यालयातील शक्तीप्रदर्शनचा आमदार राजन साळवी यांचा आजचा कार्यक्रम रद्द

Ratnagiri Latest News : रत्नागिरी- एसीबी कार्यालयात शक्तीप्रदर्शनचा आजचा आमदार राजन साळवी यांचा कार्यक्रम रद्द


आमदार राजन साळवी यांच्या सासुचे निधन


निधनामुळे आजचा कार्यक्रम साळवी यांनी केला रद्द


उद्या आमदार राजन साळवी याांना अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी रहाणार होते हजर


शक्तीप्रदर्शनकरत राजन साळवी जाणार होते अलिबागच्या एसीबी कार्यालयात


उद्धव ठाकरे गटाचे आमदारा सध्या एसीबीच्या रडावर

Hingoli News: हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; अंकुश आहेर भाजपमध्ये प्रवेश करणार

Hingoli Latest News: आज हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले अंकुश आहेर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अंकुश आहेर गेली 12 वर्षांपासून जवळा बाजार समितीचे सभापती होते. तालुका प्रमुख म्हणून 16 वर्षांपासून काम करत आहेत आणि जिल्हापरिषद गट नेता म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. आज हिंगोलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आहेर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अंकुश आहेर म्हणजेच, उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यातील विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे, परंतु अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणानं ते पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Palghar News: बोईसरमधील अवधनगर परिसरातील भंगारांच्या दुकानांना आग

Palghar News: बोईसरमधील अवधनगर परिसरातील भंगारांच्या दुकानांना आग. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत अनेक भंगार दुकान आगीच्या भक्षस्थानी. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. बोईसरमधील अनधिकृत भंगार दुकानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. 

विहिरीत पडलेल्या सापाला सर्पमित्राने जीवाची बाजी लावून दिले जीवनदान

Bhandara News : विहिरीत पडलेल्या सापाला सर्पमित्राणे स्वत:च्या जीवाची बाजी लावून जीवनदान दिल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील काटेबामनीमध्ये घडली आहे. काटेबामनी परिसरात टिचकुले यांच्या शेतातील विहिरीमध्ये नाग जातीचा साप दिसला. याची माहिती सर्पमित्र आकाश पिकलमुंडे, मोहित देशमुख यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत जीवाची पर्वा न करता 30 फूट खोल विहीरीतून नागाला बाहेर काढले. हा नाग पाच फूट लांब असून यात न्यूरोटॉक्सिक नावाचा विष असल्याचे सांगण्यात येत आहे. नागाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

Mandous Cyclone: मंदोस चक्रीवादळाचा कोकणाला फटका, आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली

Mandous Cyclone: नैऋत्य बंगालच्या उपसागरात मंदोस चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्याचा परिणाम कोकणातही दिसत आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत पाऊस हलक्या स्वरूपाचा जिल्ह्यातील सर्वच भागांत पडत आहे.


अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंबा आणि काजू पिकावर मोहोर तसेच फळधारणा होताना अवकाळी पाऊस पडत असल्याने किडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. चक्रीवादळामुळे कोकणात अवकाळी पावसाचा परिणाम पुढील चार दिवस अलर्ट वेधशाळेने दिला आहे.

रत्नागिरीतील वेळास समुद्रकिनारी कासव संवर्धन मोहीम, दोन महिन्यात कासवांची 280 अंधी संरक्षित

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन मोहीम यशस्वी पार पाडली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून 280 कासवांची अंडी वनविभाग आणि कासवामित्र यांनी संरक्षित केली आहेत. निसर्गात होत असलेल्या बदलामुळे कासवांच्या विणीच्या हंगामापुढे देखील काही समस्या निर्माण होत आहेत. पण अशावेळी देखील सध्या कोकणात कासव संवर्धन मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

रत्नागिरीत तीन अपत्ये असलेले 81 जण शासकीय सेवेत, नियमानुसार सेवा सोडणं आवश्यक असतानाही संबंधित अधिकाऱ्यांसह शासनाकडून कारवाई नाही





Ratnagiri News : महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी शासकीय सेवा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियम आणले. त्यात तीन अपत्य झाल्यास सेवा समाप्ती या नियमानुसार तिसरं अपत्य झाल्यावर शासकीय सेवा खंडित होते. असे असताना तिसरे अपत्य होऊन अनेक वर्ष लोटली तरी जिल्ह्यात 81 जण अद्यापही सेवेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यात चिपळूण तालुक्यात 40 जणांचा समावेश आहे. मात्र या सर्वांवर संबंधित अधिकारी आणि शासन कोणतीही कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.




 


चंद्रकांत पाटील शाईफेक, पिंपरी पोलिसांकडून पत्रकार गोविंद वाकडे यांची सुटका

Pune News : पत्रकार गोविंद वाकडे यांना पिंपरी पोलिसांकडून सोडण्यात आले आहे. पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर पोलिसांनी गोविंद वाकडे यांला सोडून दिले आहे. गोविंद वाकडे हे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपींच्या आधीपासून संपर्कात होते असा त्यांच्यावर आरोप झाला होता. त्यानंतर काल रात्री गोविंद वाकडेंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मुंबईच्या मालाडमधील राज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लागलेली आग आटोक्यात; गोदाम जळून खाक
Mumbai News : मुंबईच्या मालाड पश्चिमेत बॉम्बे टॉकीजजवळ असलेल्या राज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लागलेल्या आगीवर एक ते दीड तासात नियंत्रण मिळवण्यात यश आलं. राज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये काल रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. ग्राऊंड प्लस वन असं स्ट्रक्चर असलेल्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल आणि अॅसिड असल्यामुळे आग लागल्यानंतर आग मोठ्या प्रमाणात भडकली होती आणि स्फोट झाला होता. केमिकलच्या स्फोटामुळे गोदामाची पूर्ण भिंतीला मोठ्या प्रमाणात चिरा पडल्या आहेत. या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झालं आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे आजूबाजूला असलेल्या वस्तीमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होता. दरम्यान आग कशामुळे लागली होती आणि गोदामात एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकल आणि अॅसिडचा साठा का ठेवला होता या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
Pune News: पुण्यात रिक्षा संघटनांकडून बंदची हाक

Pune News: पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलनाची हाक. दुचाकीवरील प्रवासी वाहतूकीला रिक्षा संघटनांचा विरोध. तर आज 11 वाजता आरटीओ कार्यालयासमोर करणार चक्का जाम आंदोलन

Bhupendra Patel Oath : भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Gujrat CM Bhupendra Patel Oath  : गुजरात विधानसभेची (Gujrat Election)निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपनं (Gujrat BJP) 156 जागा जिंकत दणदणित विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली आहे. भूपेंद्र पटेल हे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा आज, 12 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. सोबतच भाजपचे अन्य राज्यांतील काही मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


निवडणूक चिन्हाच्या लढाईत आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात होईल. याबरोबरच  सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे.  शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅली होणार आहे. तर  भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या विविध घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहेत, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ.... 


पुण्यात संघटनांकडून रिक्षा बंद आंदोलन
दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आलंय. रिक्षा बंदमधे सहभागी असलेले रिक्षाचालक 11 वाजता आर टी ओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 


निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात
 निवडणूक चिन्हाच्या लढाईत आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात होईल. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे. 


अनिल देशमुखांना जेल की बेल?, हायकोर्ट आज सुनावणार निर्णय
सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे. 


महामोर्च्याच्या नियोजनासाठी ठाकरे गटाची बैठक
ठाकरे गटाच्या शिवसेनेची आज महामोर्च्याच्या नियोजनासाठी बैठक होणार आहे. बैठकीत मोर्च्याचा मार्ग अंतिम करण्यात येणार आहे.


शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज होणार व्हर्च्युअल रॅली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅली होणार आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथून शरद पवार यांच्या हस्ते या व्हर्च्युअल रॅलीचा शुभारंभ होणार आहे. काही नेते आपल्या जिल्ह्यातून रॅलीत सहभागी होणार आहेत.  
 
भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
 भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदेंसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील. 
 
ईडीच्या याचिकेवर सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.


गौतम नवलखा यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
शहरी नक्षलवाद प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी गौतम नवलखा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. 


वेंगुर्ले मराठी साहित्य संमेलन 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मराठी साहित्य संमेलन आज होत आहे. या साहित्य संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात येणार आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होईल.  
 
चंद्रशेखर बावनकुळेंची हिंगोलीत पत्रकार परिषद 


भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद होणार आहे बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विविध बैठका आणि आढावा घेतला जाणार आहे.
 
हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा 


ठाकरे गटाच्या  वतीने कळमनुरी तहसील कार्यालयावर दे दणका मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी होणार आहेत.   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.